चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दंगल ट्रेलरबरूनच जबराट वाटत होता. जसे आमीरचा धूम ट्रेलरवरूनच फालतू वाटत होता.
त्यामुळे मस्ट वॉचच्या लिस्टीत आहेच. तसेच ड्रामा, इमोशन, अ‍ॅक्शन पॅक सिनेमा विथ कचकचीत बॅकग्राऊंड स्कोअर असल्याने थिएटरातच बघण्यात मजा आहे हे सुद्धा जाणवते.
आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी बघितलाय सगळ्यांनी या अंदाजाला अनुमोदन दिल्याने बघणे होईलच.

दंगल मस्त आहे. दमदार स्क्रीप्ट, सुंदर सादरीकरण, सर्वच कलाकारांचे सुंदर अभिनय. विशेष उल्लेख परफेक्शनिस्ट खानचा. के-व-ढा दिसतो तो सिनेमाभर ! सिनेमा संपल्यावर गीत्ता-बबित्ता (अशीच वाचायची ही नावं)-महावीरसिंग सर्वांचे फोटो दिसतात. खराखुरा महावीरसिंग वाटतो आमीर संपूर्ण सिनेमाभर.
हानीकारक बापू, धाकड आणि दलेरच्या भारदस्त आवाजातलं 'दंगल, दंगल' ही गाणी प्रचंड आवडली.

पुढची ओळ स्पॉयलर म्हणून वाचावी / वाचू नये:-
'चक दे' शी बरीचशी साम्यस्थळे जाणवली. प्रत्येकाने पाहून यावर आपापलं मत बनवावं ! शेवटाकडे सिनेमा थोडा ताणल्यासारखा वाटला.

प्रियंका गांधी सारखी दिसत होती ती. काम चांगलं केलंय तिनेही आणि ज्यु. गीतानेही.

>>> अगदी अगदी प्रियंका गांधीच हुबेहूब

इंस्पिरेशान पेक्शा मला तर जेन्डर बायस बाबतचा सण्देश जास्त प्रभावी वाटला.माण्डणी अशी आहे की लेक्चरबाजीपेक्षा माणसे अण्तर्मुख होण्याचे जास्त चान्सेस आहेत. ग्रामीण भागातील लोकाना पचेल अशीच मान्डणी आहे. मूळ महावीर फोगटला तर पद्मश्रीच द्यायला पाहिजे . लवकरात लवकर टॅक्स फ्री व्हावा हीच अपेक्षा.

..

सिनेमा हीट होण्यासाठी काय लागतं? दोस्ती, दुश्मनी, मसालेदार कथा, हेवेदावे, खून, दे दणादण मारामारी, गुंड, हवेत कैक फूट उडून पडणार्या महागड्या कार, उन्मादक बेड सीन, बिभत्स गाणे, मद्याचे भराभर उसळणारे प्याले, नयनरम्य समुद्रकिनारे, जंगले, परदेशातील गगनचुंबी चकाचक बिल्डिंग्ज, हेलिकॉप्टर्स, चोर, पोलिस, जेल, बलात्कार, चोर्या वगैरे वगैरे..

सगळ्यात महत्वाचं सुंदर हिरोइन, पिळदार बॉडीचा हिरो, लागलेच तर तसलाच तगडा ‌व्हिलन, त्याचा जामानिमा, हिरोची मोठी फॅमिली, त्यातील फॅमिली ड्रामा, कट कारस्थाने आणि बरंच काही....

पण यातील एकही गोष्ट नसताना चित्रपट अतिशय सुंदर, तब्बल तीन तास खुर्चीला खिळवून ठेवणारा होऊ शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दंगल.

प्रत्येकाने आपल्या फॅमिलीसह असतील तर मुला-मुलींसह अवश्य पहावा असा हा सिनेमा. आमीर खानचा सिनेमा असला तरी संपूर्ण सिनेमाभर कुठेच आमीर खान किंवा त्याचं स्टारडम दिसत नाही. दिसतो तो फक्त ध्येयाने झपाटलेला एक बाप. थ्री इडियट्समधला कॉलेजला जाणारा आमीर, पीकेमधला लुकडासुकडा अल्लड वाटणारा एलियन ते दंगलमधला महावीरसिंग फोगट. अगदी परस्परविरोधी भूमिका. महावीर‌सिंग फोगटचा रुबाब, त्याचं पडदाभर व्यापूर राहणं आमीरने ज्या पध्दतीने साकार केलंय, ते केवळ अप्रतिम. गिरीश कुलकर्णी नाणं खणखणीत वाजवतो. मुलींनी तर कुस्ती अक्षरशः जगली आहे. आमीर खान कोणत्या धर्माचा आहे, दंगल किती पैसे कमावेल वगैरेंचा विचार न करता महावीर फोगट आणि त्यांच्या मुलींचा प्रेरक प्रवास अनुभवण्यासाठी सर्वांनी एकदा तरी पहावाच.

टोच्या, मस्त पोस्ट . पाहिला दंगल . आमिर महावीर फोगत ही व्यक्तिरेखा अक्षरश: जगला आहे. आमिर खान न वाटता तो पूर्ण चित्रपटभर महावीर फोगत बनतो. त्याच सिनेमादरम्यानच ट्रान्सफॉर्मशन थक्क करणार आहे . त्या मुलींनी पण अप्रतिम काम केलंय. छोट्या गीता बबिता पण इतक्या क्यूट दिसतात. सगळ्या महत्वाचं म्हणजे चित्रपट कुठेही प्रिची न वाटता सहजपणे उलगडत जातो. सगळ्यात मोठं शक्तीस्थान म्हणजे डायलॉग . खुसखुशीत संवाद आहेत. मोठ्या पणीच्या गीता बबिता खरोखर कुस्तीगीर वाटतात त्याचीही मेहनत पडद्यावर दिसते . गाणी देखील सुरेख आहेत. नैना हे गाणं सुंदर जमलंय. शेवटच्या राष्ट्रगीताच्या सिनला थेटरमधल्या प्रेक्षकांनी स्वतःहून स्टँडिंग ओव्हेशन दिले .
सगळ्यात आवडलं ते म्हणजे महावीर फोगत आणि गीतामधील नातं हळुवारपणे दाखवलं आहे. कोचच ट्रेनिंग की वडिलांचा सल्ला मानायच ह्यात होणारी ओढाताण , लहान बहिणीने समजावून सांगितल्यावर वडिलांना फोन केल्यावर केवळ अश्रूनीच बोललेला संवादाचा प्रसंग असे सीन मस्त जमलेत. त्यांच्या चुलतभावाचा रोलही मस्त आहे . बिचारा दोन्हीकडून मार खातो ..

चित्रपटात दाखवलं आहेच पण प्रत्यक्ष आयुष्यात महावीर फोगतना काय किती सहन करावं लागलं असेल हे पाहूनच अंगावर येत. हरयाणासारख्या कर्मठ भागात मुलींसाठी उभं राहताना किती सोसावा लागलं असेल . सुरुवातीला त्यांना मुली आहेत म्हणून खेळू दिल जात नाही आणि दिल जातं ते ही मुली असणं कॅश करण्यासाठी . पहिल्या वहिल्या दंगल दरम्यानच्या प्रेक्षकांच्या कमेंट्स पाहून चीड आलेली . ते सहन करायलाही ताकद लागते . सॅल्यूट टू हिम ..

टोच्या, जाई मस्त पोस्टस. बघायला हवा दंगल.

सध्या स्टार प्रवाह वर छान चित्रपट दाखवत आहेत. मागे YZ बघितला. आवडला मला. आज 'राजवाडे and सन्स' होता पण शेवटी अर्धा तास बघायला मिळाला, चांगला होता परत लागला की पूर्ण बघेन. आता एखाद्या रविवारी '& जरा हटके' दाखवणार आहेत.

मागे झी मराठी वर 'हायवे, एक सेल्फी आरपार' बघितला पण तोही पूर्ण नाही बघता आला. जरा उशीर झाला. तोपण पूर्ण बघायचा आहे. जेवढा बघितला तेवढा खूप आवडला.

दंगल जाम म्हणजे जाम आवडला , आमीर खान द बेश्ट , गीता फोगट उर्फ फातिमा शेख जाम आवडली तीच्या गालावरच्या खळीसकट Proud
फाईट्स जबरदस्त आहेत , अगदी खर्‍याखुर्‍या आणि उत्कंठावर्धक वाटतात.
टोच्या आणि जाई मस्त लिहिलयं.

Dangal khoop awadla , Aamir and girls rock !!
Chak de athvat hota Happy
Songs are super cool !

बघितला आणि एकदमच आवडला! वर कुणीतरी म्हटले तसं आमीर इज बॅक!! अमेझिंग काम केलेय. गीत्ता बबित्ताचे काम पण भारी एकदम! लहानपणीच्या गीत्ता चे विशेष कौतुक, आधीची जबरदस्तीने मेहनत करावी लागताना वैतागलेलीआणि नंतर जिगरबाजपणे बापाला ' अगली दंगल कब है ' विचारते तेव्हाच्या नंतर नजरेत आलेला आत्मविश्वास, बदललेला अ‍ॅटिट्युड जबरी दाखवला आहे!! ओंकार चे पात्र धमाल आहे!

मी कालच बघितला "ती सध्या काय करते" हा चित्रपट. चांगला आहे. थोडा वेगळा विचार देणारा आहे.

मी एका ग्रुपसोबत मुव्ही बघायला गेले होते. त्यात ज्यांना ज्यांना लग्नाआधी कोणी एक्स नव्हता/ नव्हती त्यांना एकदम भारी आवडला चित्रपट. आणि ज्यांना होता/ होती त्यांना ओकेच वाटला. आता यामागे काय गौडबंगाल आहे देव जाणो.

माझ्या वयाचे बरेच जण ती सद्ध्या काय करत आवडला म्हणतायेत आणि माझ्या पेक्षा वयाने मोठे बोअर आहे म्हणतायेत

परवा कितव्यांदा तरी बावर्ची पाहिला. प्रत्येकवेळी कंटाळा न येता पाहिला जातो. (यावरून थोडासा रुमानी हो जाये आणि संजय दत्तचा खूबसूरत आला होता ).
काल खूप दिवसांनी हृषिदा - रेखाचा खूबसूरत पाहिला - प्रसन्न मूड झाला.

Thodasa rumani bawarcvhi var aadharit naahiye, kinva tyachi kathasuddha bawarchi sarakhi nahiye. To purn pane vegla chitrapat aahe…. Khubsurat che maahit naahi…

साधनातै

एक घर असतं. ज्याट प्रत्येकाच्या आपापल्या समस्या आहेत. एकमेकांशी सुसंवाद नाही. अविश्वास आहे. भांडणं आहेत. स्वप्नं पाहणं विसरून गेलेले आहेत. अशा ठिकाणी एक आगंतुक येतो. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद भरतो. या छोट्या छोट्या बाबींमुळे घरातले सदस्य पुन्हा रिचार्ज होतात. उत्साही होतात. आयुष्य जगण्याची नवी उमेद मिळते....

हीच थीम तिन्ही सिनेमात आहे. एकात तो आगंतुक स्वैंपाकी दाखवलाय, दुस-यामधे पाऊस पाडण्याचे आश्वासन देणारा बारीशकर तर तिस-यामधे घर लुटायला आलेला चोर इतकाच फरक आहे. बारीशकर ही व्यतिरेखा रेनमेकर मधून घेतलेली आहे. पण थीम तपन सिन्हांच्या बंगाली सिनेमाशी नाळ जोडून दाखवते. ( हे माझे मत आहे, चुकीचे असू शकते).

ताक : बावर्ची हा सिनेमा तपन सिन्हा यांच्या गल्पा होलीय सत्याई (१९६६) या बंगाली सिनेमावर आधारीत आहे. पण रेनमेकर १९५० साली रंगभूमीवर आले याची कल्पना आली. अधिकृतरित्या हा सिनेमा रेनमेकर वर आधारीत आहे असे कुठेही म्हटले गेलेले नाही. पण शक्यता नाकारता येत नाही

सैराट बघणारा मी बहुदा शेवटचा. इथली चर्चा वाचून बघताना मजा येते. काय बघायचे, कुठे लक्ष द्यायचे ते कळते, त्यामूळे बारकाईने बघता आता. सिडी असल्याने काही काही सीन परत बघता आले.

अर्थातच खुप आवडला. पहिला भाग तीन वेळा बघितला.

काही बाबींकडे मात्र थोडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटले. एकंदरीतच परश्या कडे लेखनात थोडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटले.
पहिल्याच सीन मधे तो शेतातून धावतो तेव्हा, मग पाणी हापसतो तेव्हा आणि क्रिकेट खेळायला येतो तेव्हा, त्याच्या पँट्स वेगवेगळ्या आहेत ( बहुतेक घरी जाऊन बदलून आला का ? )

पण हा कंटीन्यूटीचा प्रोब्लेम होता. एक भुमिका म्हणून मला न समजलेल्या / पटलेल्या बाबी अश्या.

१) तो सल्या बरोबर दुकानात असतो तेव्हा मन लावून काम करत नाही. काही शिकतोय असे वाटत नाही. नंतर मात्र स्वतः गॅरेज मधे स्कूटरवर काम करताना दाखवलाय.

२) आर्ची घरच्यांशी संपर्क साधते, पण तो एकदाही तसे करत नाही. आई, बाबा, बहीण यान्च्याबद्दल त्याला
काहीच वाटत नाही ? स्वतः फ्लॅट घेण्याइतपत प्रगती करताना त्याला घरच्यांची आठवण येत नाही.

३) त्याच्यासाठी अक्षरशः जीवावर उदार होणार्‍या मित्रांशीही तो काही संबंध ठेवत नाही.

४) सार्वजनिक ठिकाणी तो आर्चीला मारतो, तेवढ्यावर थांबत नाही तो भर रस्त्यात तिचा हात पिरगाळतो, गाल ओढतो, ही मला पटले नाही. मूळात असे पुरुषांनी स्त्रियांना मारहाण करणारे सीन्स चित्रपटात का असावेत, तेच मला कळत नाही ( टू स्टेट्स मधे पण असा प्रसंग आहे. पण थेट नाही. जून्या चित्रपटात तर सर्रास असे प्रसंग असत. ) सैराट मधे आर्ची ते सहन करते, हेही पटत नाही.

५) एकाच गावात असून आर्चीला तो माहीत नसतो, हे पण पटत नाही. ( गावचा धोनी आणि तिला माहीत नाही ?.)

६) ती एकटीच त्याच्यासोबत अनेक ठिकाणी जाते, ते घरच्यांना कसे कळत नाही ?

७) बारावीला ७२ टक्के मात्र असून तो कलाशाखेत का ? ( कविता, शब्दांच्या जाती शिकवताहेत म्हणजे, कला शाखाच असावी ! )

शेवटचा प्रसंग कितीही परिणामकारक असला तरी वास्तव वाटत नाही. सर्व घरे उघडी, दुसरी शेजारीण तर दारातच बसलेली ? मग तिला काहीही आवाज येत नाही ? जी शेजारीण लहान बाळाला घेऊन जाते, ती त्याला अशीच कशी सोडून जाते ? एवढ्या लहान बाळाला कुणीही अगदी आईकडे सोपवल्याशिवाय जाणार नाही.

अर्थात या सगळ्या छोट्या बाबी आहेत. चित्रपट आवडलाच. गाणीही आवडली. पण आजकाल सर्वच गाण्यात असतो तो शब्द नीट ऐकू न येण्याचा प्रॉब्लेम आहेच. पिंजरा चित्रपटातले, आली ठुमकत.. गाणे आठवतेय ? प्रत्येक शब्द कसा खणखणीत उच्चारलाय. त्यावेळी त्या गायक कलाकार वाघ्या ( वाघमारे ) यांचे काही नावही नव्हते. त्या एकाच गाण्याने ते प्रसिद्ध झाले. ( पण नंतर त्यांचे गाणे ऐकले नाही कधी ! )

७) बारावीला ७२ टक्के मात्र असून तो कलाशाखेत का ?

हा काय प्रश्न आहे ? टक्के आनि शखा चा काहि सम्बन्ध आहे का ?

दिनेश. on 8 January, 2017 - 21:56 >>>>

पहिल्याच सीन मधे तो शेतातून धावतो तेव्हा, मग पाणी हापसतो तेव्हा आणि क्रिकेट खेळायला येतो तेव्हा, त्याच्या पँट्स वेगवेगळ्या आहेत ( बहुतेक घरी जाऊन बदलून आला का ? ) >>>

काहि पण काय..एकच आहे ती.. काळपट...

आता उरल सुरल...........

१) तो सल्या बरोबर दुकानात असतो तेव्हा मन लावून काम करत नाही. काही शिकतोय असे वाटत नाही. नंतर मात्र स्वतः गॅरेज मधे स्कूटरवर काम करताना दाखवलाय.
>>>> मन लावुन करतो हे कस दाखवायच ?

२) आर्ची घरच्यांशी संपर्क साधते, पण तो एकदाही तसे करत नाही. आई, बाबा, बहीण यान्च्याबद्दल त्याला
काहीच वाटत नाही ? स्वतः फ्लॅट घेण्याइतपत प्रगती करताना त्याला घरच्यांची आठवण येत नाही.
>>>> त्याच्या घरी फोन लाइन किंवा मोबाइल आहे अस दाखवलय का ?

३) त्याच्यासाठी अक्षरशः जीवावर उदार होणार्‍या मित्रांशीही तो काही संबंध ठेवत नाही.
>>>>> अहो ..निट आठवा फ्लॅट घेताना आर्चाना काय म्हणते..कोणाचा फोन आलेला म्हणुन...

५) एकाच गावात असून आर्चीला तो माहीत नसतो, हे पण पटत नाही. ( गावचा धोनी आणि तिला माहीत नाही ?.)
>>>> आर्ची काय सगळ्यांची माहीती ठेवते वाटत का? ....

७) बारावीला ७२ टक्के मात्र असून तो कलाशाखेत का ? ( कविता, शब्दांच्या जाती शिकवताहेत म्हणजे, कला शाखाच असावी ! )
>>>> हे तर काही पण राव... कला शाखेत ७२ टक्के वाले जात नाहीत.. ? बर.. १२ वी कला असेल तर पुढे कले मध्येच जाव लागत हे कदाचीत माहीत असु द्या...

--- एकंदरीतच परश्या कडे लेखनात थोडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटले.
>>>> अर्चना हिच तर ह्या सिनेमाची हिरो आहे... परश्याच पात्र हे तिला सपोर्टिंग आहे...

आता परत एकदा पाहा तो सिनेमा...

मोरपंखी,

तो शेतातून धावतो तेव्हा निळी जीन्स, पाणी हापसतो तेव्हा ट्रॅक सूट आणि क्रिकेट खेळतो तेव्हा काळसर निळी जीन्स आहे.

तो सल्याबरोबर दुकानात असतो तेव्हा दोघांच्याही हालचाली बघा. परश्या नुसताच स्क्रू ड्रायव्हर घेऊन
टाईमपास केल्यासारखे काही तरी करतो आहे, तर सल्ल्या मनापासून काम करतोय.

त्याच्या घरी फोन नाही, पण सल्ल्याकडे तर होता ना ?

ज्याला पुढे आर्थिक कमाई करुन घरच्या खर्चाला हातभार लावायचा आहे तो सहसा कलाशाखेकडे जाणार नाही. ( हे माझे वैयक्तीक मत. बारावीला कलाशाखा असेल तर पुढेही तीच शाखा घ्यावी लागेल,
हे कळण्याइतपत माझे शिक्षण झाले आहे.)

आर्ची घरात बसून राहणारी मुलगी नाही, मैत्रिणींबरोबर पोहायला वगैरे एकटीच जाते, त्यामूळे गावातली
नाववाली मूले तिला माहीत असावीत, असे मला वाटले.

सपोर्टींग पात्र, लेखनातही कच्चे ठेवावे, असा नियम नाही बहुतेक.

माझ्याकडे सिडी आहे, मी ३ वेळा पहिला बघितला असे लिहिले आहेच.. आणखी बघीनही कदाचित. तूम्ही पण बघा..

बाकिचे मुद्दे पटलेले दिसताहेत तूम्हाला !

बारावीला कलाशाखा असेल तर पुढेही तीच शाखा घ्यावी लागेल >> पूर्वी सायन्सच्या विद्यार्थ्याला बारावीनंतर वाणिज्य, कला हे दोन विषय घेता येत होते. वाणिज्यच्या विद्यार्थ्याला कला शाखा निवडता येत होती असे ऐकले होते. (मला बदलण्याची गरज पडली नाही त्यामुळे नक्की माहीत नाही) .

सहसा ग्रामीण भागातल्या मुलांचा कल बीए होऊन MPSC वा तत्सम परीक्षा देण्याकडे असतो . exposure ही कमी असत त्यामुळे सरसकट बीए अभ्यासक्रम निवडला जातो. त्यात वावगं असं काहीच नाही प्रश्याचे वडीलही त्याला सावलीतली नोकरी पकडा असाच सल्ला देतात .

Pages