"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक आईला आपला मुलगा सर्वगुणसंपन्न वाटत असतो.
प्रत्येक बायकोला आपला नवरा एकदम व्यवहारशून्य व नालायक वाटत असतो.
पण प्रत्यक्षात तो इतकाही चांगला नसतो जितका आईला वाटतो आणि इतकाही वाईट नसतो जितका बायकोला वाटतो.

आज दोन चार बॅंकांच्या बाहेर रांगा पाहिल्या. आयच्याआईची बॅंकेच्या बाहेर कॅश नाही असा बोर्ड पाहिला. मग रांग कसली विचारल्यावर ते म्हणाले संपत आलेत पैसे.
माझ्याकडे अजून मागच्या वेळचे बरेच बाकी असल्याने मी थांबले नाही.
आयस्क्रीम खाताना रद्दीवाल्याच्या दुकानातला संवाद ऐकू आला.
एक रद्दीवाला दुकानदार शिव्या घालत होता. लोक चेक ने पैसे देतात - तुमच्या खात्यात पैसे असले तरी तुम्ही देणार कसे.
बाबा - तु ही चेक ने दे ना असे म्हणावेसे वाटले. दुकान मोठे होते.
व्यापारी मोदींवर वैतागलेत असे तो दुसऱ्या माणसाला सांगत होता.

शेजारचा किराणा दुकानदार म्हणाला खूप फरक नाही पडला. लोकांना किराणा घ्यावाच लागतो.
गाडी पुसणारे - केबल वाला सगळ्यांनी चेक घेतले.
उमरग्याला शेत असणारा रिक्षावाला आज भेटला. तो म्हणाला लोक शेतकऱ्याला त्रास होतो म्हणून गळे काढतात. आम्हाला फरक पडत नाही. षेतीमाल चेक ने घेतला. बाकी परिस्थितीची आम्हाला सवय आहे. काहीच फरक पडत नाही. त्याच्यामते शहरातील दुकानदार अडवणूक करत असतील - गावाकडे फरक नाही.

जितक्या लोकांशी बोलता येईल तितक्यांशी बोलण्याचा प्रयत्न चालू आहे.

माझी शंका
न दिसणारे लोक सर्जरी करू शकतात का? कुठले हॉस्पिटल म्हणे?

(सुतक सभा संपली का? डायरेक्ट शुक शुक?)

प्रत्येक आईला आपला मुलगा सर्वगुणसंपन्न वाटत असतो.
प्रत्येक बायकोला आपला नवरा एकदम व्यवहारशून्य व नालायक वाटत असतो.>>> हर्पेन Lol

झाडू (किंवा जे कोणी असाल ते)

मी तुमच्यावर कुठलाही आळ घेतलेला नाही तर तुमच्याच दोन विधानातला विरोधाभास नजरेस आणून काही शंका/शक्यता व्यक्त केल्यात

तुम्ही मात्र त्या शंकांना बगल देवून जो पाचकलमी उत्तराचा पाल्हाळ लावलाय त्यातली कुठलीच गोष्ट मी तुम्हाला विचारली नव्हती

उगाच एव्हढे defending मोडमध्ये गेलात राव!

बाकी तुमचा या दोनचार धाग्यांवरचा वावर पाहता हे असलेच काहीतरी उत्तर अपेक्षित होते

अल्पमती, जळजळ, तोकडी आकलनशक्ती वगैरे शब्दातुन तुमचा त्रागा दिसतोय तोही अपेक्षितच होता!

(भारीच बुवा प्रेडिक्टेबल तुम्ही Wink )

नोटबंदीने आम जनतेची भलेही गैरसैय केलेली असेल पण समाजवादी बसपा काँग्रेस च्या नेत्यांसाठी भ्रष्ट्राचाराच्या / गुन्ह्यांची नविन दालन उघडली आहेत.
आजतकने केलेल्या स्टिंग मध्ये हे स्पष्ट झाल आहे.

https://youtu.be/tDUB8daGlGU

या निर्णयाला बुद्धीमान लोकांचा पाठींबा आहे.. असे म्हणून मला गोत्यात आणतात लोकं ! पण हाय रि किस्मत. पेपरमधल्या बातम्या वेगळ्याच आहेत हो.. त्या तरी वाचू ना ?

निश्चलनीकरणामुळे पुस्तकविक्रीत निम्म्याहून अधिक घट
; प्रदर्शने थंडावली, वर्षभराचे वेळापत्रक बिघडले
निश्चलनीकणाचा साऱ्याच व्यवसायांना टक्क्यांच्या हिशेबात कमी-अधिक प्रमाणात फटका बसत असला, तरी सध्या मराठी साहित्य व्यवहार भीषण आर्थिक चरक्यात सापडला आहे. खरेदी-विक्रीच्या ऐन हंगामात नोटाबंदीचा निर्णय झाल्याने राज्यातील साऱ्याच पुस्तकांच्या दुकानांमध्ये ग्राहकटंचाई दिसत आहे. नव्या पुस्तकांची निर्मिती आणि विक्री पूर्णपणे थंडावली आहे. पुढील काही महिन्यांत यात सुधारणा न झाल्यास मराठी ग्रंथव्यवहाराला कधी नव्हे इतक्या मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुस्तकखरेदी ही अत्यावश्यक बाब नसली, तरी साहित्यप्रेमींमुळे ती कधी रोडावत नाही. नोटाबंदीनंतर मात्र देशभरातील नागरिकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. बँका, एटीएम रांगांत वेळ खर्च करून हाती पडणारे स्वहक्काचे तुटपुंजे पैसे मूलभूत गोष्टींसाठी कमी पडत आहेत. त्यामुळे साहित्य वाचून हा व्यवसाय तगविणाऱ्या पुस्तकवेडय़ांसोबत भेटवस्तू म्हणून पुस्तक देणाऱ्या लोकांनीही ग्रंथदुकानांकडे पाठ फिरविलेली आहे. पुस्तकांची विक्री चाळीस ते पन्नास टक्क्य़ांनी थंडावल्याचे ग्रंथविक्रेते सांगत असले, तरी हा आकडा त्याहून अधिक असल्याचे चित्र सर्व पुस्तकालयांकडे पाहिल्यानंतर दिसते आहे.

==========

चलनी नोटांवर घातलेल्या बंदीचा रायगड जिल्ह्य़ातील मद्यविक्रीला फटका बसला आहे. नोव्हेंबर महिन्यातील दारूविक्रीत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. देशी आणि विदेशी दारूची विक्री ४ टक्क्यांनी घटली आहे. तर बिअरविक्रीत १० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
राज्यात दारू विक्रीत घट व्हावी. यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असले तरी त्याला आजवर अपेक्षित यश मिळालेले नाही. मात्र विविध उपाययोजना करूनही जे शक्य झाले नाही ते चलनबंदीच्या निर्णयाने करून दाखवले आहे. चलनी नोटांवर घातलेल्या बंदीमुळे मद्यविक्रीत पहिल्यांदाच लक्षणीय घट दिसून आली आहे. गेल्या महिन्याच्या ८ तारखेला चलनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यानंतर नोव्हेंबर महिन्यातील मद्यविक्री घटल्याचे दिसून आले. रायगड जिल्ह्य़ात देशी दारूची विक्री २५ हजार ७१५ बल्क लिटरने घटली आहे. तर विदेशी दारूची विक्री २३ हजार २६५ बल्क लिटरने घटली आहे. चलनबंदीचा सर्वाधिक फटका बिअरविक्रीला बसला आहे. बिअरविक्री १ लाख ३४ हजार ९४४ बल्क लिटरने घटली आहे. वाइनच्या विक्रीत मात्र २ हजार ५१५ बल्क लिटरची वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

ट्रैन में सामने की सीट पर बैठे हुए एक बन्दे को मैंने ऐसे ही पुछा *"आप गुजराती हो?"*

तो वो भड़क उठा.. *"उसमे मेरा क्या कुसूर? अकेले मैने वोट दिया था क्या???"*

आज ४० दिवसांनंतर धंदा रफली ५०% वर आला आहे, तर त्याचवेळी कर्जाचे हप्ते, नोकरांचे पगार, लाईट्/फोन बिले इ. रोजचे खर्च सुरूच आहेत. रोज खुर्चीत बसल्यावर किती पैसे आधी मला या नोकर/कर्ज्/इ. साठी कमवावे लागतात, ज्यानंतरचा पहिला रुपया माझ्या खिशात येतो, याचा हिशोब तुम्हाला सांगून उपयोग नाही. उगच जळजळ वाढेल.>>>>>{> काका +11111

NDTV
6 mins ·
"The total value of the assets seized from the financier, who earlier worked as a 'chaiwala', is Rs. 10.50 crore," Income Tax sources said as they refused to reveal the identity of the person citing ongoing probe

त्यात काय इतके. एक चायवाला जर ९ लाखाचा सुट घालून मिरवू शकतो तर दुसर्‍या चायवाल्याकडे १० करोड नाही सापडू शकत ?

विकास काय फक्त एकाच चायवाल्याचा झाला पाहिजे ? Lol

बॉलिवूड भास्कर ह्या साईटवर खालील आशयाची बातमी आहे - खखोदेजा

विदेशातून रोजीरोटीसाठी भारतात आलेल्या अनेक एक्स्ट्राचे काम करणार्‍या मुली पैसेटंचाईमुळे घरभाड्याच्या बदल्यात मालकांना शरीरसोबतीचा पर्याय देत आहेत Sad

"अतिथी देवो भव" ला जबरदस्त तडा गेलेला आहे हे खरे असेल तर.

साती,

त्यांना ह्या परीस्थितीला सामोरे जायला लागत आहे हे खेदजनक नाही का? त्यांचे पगार आधी कॅशमधे मिळायचे, विदेशी असल्यामुळे बँक खाते काढता येत नाही.

राजसी

टूरीस्ट विजा वर काही महिने इथे कामासाठी येतात म्हणजे अतिथी नाही का? तसेही बाहेरचे कोणीही नैतिक काम करणारे आपल्या परंपरेनुसार पाहुणेच ना?

परदेशातून येतात आणि त्यांच्याकडे डेबिट, क्रेडिट काहिच नाही? डायरेक्त शरीर ???
अधले मधले काहीच नाही?
किती ती बोगस बातमी

आता उद्या बारबालांवर कुणी पैसे उधळत नाही त्यामुळे त्यांचे कसे हाल होतायत याचीही लिंक द्यायला कमी करणार नाही तुम्ही.

नोटा मिळत नाही म्हणून डायरेक्ट शरीरव्रिकय हे तुमचे तुम्हाला तरी पटतेय का हे मनापासून एकदा कबूल करा....नोटांबदीचा त्रास अमान्य नाही पण म्हणून काहीही लिहायचे का...

म्हणून काहीही लिहायचे का...>>> बॉलीवूड भास्करमधे काहीही लिहिलेले असू शकते हे पहिल्याच प्रतिसादात लिहिलेले आहे. त्याला तुम्ही किंवा मी किंव अन्य कोणी काहीच करू शकत नाही. पण एन डी टी व्ही चा तो व्हिडीओ 'काहीही' ह्या सदरात मोडत नसावा.

निर्णयाची अंमलबजावणी सपशेल फसलेली आहे.

ह्या निर्णयावर माझी स्वत:ची प्रतिक्रीया अशी बदलत गेली

१) वा, काय निर्णय घेतला... पहिल्यांदाच कुणीतरी धाडसी पाऊल उचलले

२) थोडा त्रास सोसू, होईल हळू हळू सुरळीत... निर्णयामागची भावना चांगली आहे

३) थांबू, पाचशेची नोट येतेच आहे... तेव्हा गोंधळ आटोक्यात येईल

४) काहीतरी नक्कीच गडबड झालेली आहे... परिस्थिती आटोक्यात येत नसल्यासारखे दिसत आहे

५) जे चालले होते तेच बरे होते, कशाला उगाच हे लचांड मागे लावून ठेवले ह्या बाबाने...

इ.इ.

अजून शिव्याशाप, दंगेधोपे करावे असे वाटणे ही स्टेज यायची बाकी आहे हे नमूद करतो.

टूरीस्ट विजा वर काही महिने इथे कामासाठी येतात ------ कोण हे? आधी त्यांना एकतर तुरुंगात टाका नाहीतर deport करा. बेकायदेशीररित्या इथे राहिल्याबद्दल.

मल्ल्यासारखा सज्जन भारतीय आम्हाला कंटाळून देशाबाहेर गेला आणि त्याच्या गळ्यात पडून सरकारने त्याला अडवलं नाही, हे एकवेळ समजून घेऊ शकतो.

पण बाहेरून लोक इथे येतात, विनापरवाना? काम करतात आणि याची खबरही नाही, देशभक्त सरकारला!

राजसी.....Good Catch!

हे लोक भंजाळलेत.... ते काय लिहतायत त्यांचे त्यांना कळत नाही Proud

स्वरूप हे कॅच नाही आहे.

जे खरे आहे ते लिहिले. त्यात त्यांनी त्यांना पकडा जेल मधे टाका बोलले. सरकार भाजपाचे आहे हे विसरले का? Wink
त्यांना पकडायला काय मोदींना सोनिया यांची परवाणगी लागेल का?
जिथे इटालियन नौसैनिकांना त्यांच्या देशात जायला मोदींनी अडवणूक केली नाही. तिथे आपल्याच देशात येणार्‍या लोकांना अडवणूक करेल ?

Pages