"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सपनातै,
तुम्ही आमच्यापैकी एकाचीच घ्या काळजी,
दुसर्‍याची/रीची आपोआप घेतली जाईल!
Wink

आणि तुमच्या प्रतिसादांत काय आहे गौडबंगाल ते तुम्हीच बसा बै शोधत, मला ना तुम्ही खूप म्हणजे खूपच बोअर करताय आता.
तुमच्या पुन्हा इंटरेस्ट आला की बोलते.

बोअर झाले तरी चालेल हो. मला स्क्रीनशॉट्स टाकावे लागतील. खोटे नका बोलत जाऊ फक्त. (हलकेच घ्या. मनापासून सांगतेय )

कसं आहे ना, माझ्या प्रतिसादात कर भरू नका असा उल्लेखच नाही. पण तुम्ही तसं विचारलंय. आणि काकांनी पण तेच केलंय. तुम्हाला मला बोअर करायला कंटाळा येत नाही म्हणून तर स्क्रीनशॉट्स येत राहतात ना मला ?
आणि हो, माझं टायमिंग एकदा स्टडी करून काय ते लिहीत चला तुमच्या गुहेत. म्हणजे ज्या त्या वेळीच विचारता येईल. तुम्ही सकाळी रात्री लिहीणार, मी सकाळी पाहणार. पण मेल त्याच वेळी आलेली असते. नंतर विचारायला बरं नाही ना वाटत..

तुम्ही बोअर करायचं बंद केलं की मी पण केलं म्हणून समजा.
पण त्याआधी माझा प्रतिसाद कॉपी पेस्ट करून त्यात कुठे वाचलं ते सांगा नक्की. मी काही सोडणार नाही . अधून मधून विचारत राहणार.

सातीतै
तुम्हाला आता ते सोयीचं नसेल म्हणून लिंक देते.

http://www.maayboli.com/node/60794?page=52

इथे जा आणि तुम्ही काय विचारलेय ते वाचा.
त्याच पानावर प्रतिसाद आहेत माझे. झाडूजींच्या प्रश्नाकडे नंतर पाहू.

साती | 15 December, 2016 - 23:43
अय्या#, आणि मग जेव्हा त्यावर टॅक्स भरायची वेळ येईल तेव्हा काय सगळे मिळून टॅक्स भरतील?
'भाजीवाले अनडिवायडेड फॅमिली' म्हणून.

उत्पन्न कुणाचे दाखवतिल, खर्च कुणाचे दाखवतिल?

नाहि, हरिनामे, तुम्ही जेव्हा ही आयडिया मर्केटींग कराल तेव्हा नंतर इतक्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागेल आणि सी ए/ टॅक्स कन्सल्टंटला सांगून विवरण पत्रही भरावे लागेल ते सांगा.

नै, आपल्या मायबाप सरकारने अशी कलेक्टीव टॅक्स भरायची स्कीम अजून काढली नाही हो

सपना हरिनामे | 15 December, 2016 - 23:54
सातीतै

तुम्ही तर डबल हुषार आहात. भाजीवाले एका सल्ल्याचे तीनशे रुपये घेतात आणि महिन्याला कोट्यवधी कमावतात त्यामुळे त्यांना प्रचंड कर भरावा लागत असेल. एकेक भाजी हजाराच्या खाली मिळते का हो ? त्यातून सरकारने अडीच लाख पर्यंतच कर माफ केला आहे. आणि शिवाय शेती व शेतमालावर कर ठेवलेला नाही.

सेल्स टॅक्स द्यायला तर हरकत नाही ना तुमची ? हरकत असेल तर मग कॅशलेसबद्दल तुमच्याशी कुठल्या मुद्द्यावर बोलायचे ?

शिवाय असे कार्ड रीडर मोफत द्यायच्या विचारात आहे सरकार, पण ते होईल तेव्हां होईल. पण सेल्स टॅक्स विभागून कट करणे (किंवा हिशेबाने) हे शेतक-यांना अशक्यच असेल , अगदी खरंय हो तुमचं !!
तुम्ही देखील नीती आयोगात जाऊ शकता. ओपीडी काय..

साती | 16 December, 2016 - 00:04
सातीतै म्हणतात, झाडुजी नेहमी म्हणतात->>

मस्तं हो!
धन्यचवाद!

लोकमान्यांना लोकांचा सपोर्ट होता,
गांधीजी आणि आंबेडकर यांचे विचार तेव्हाही बरेच जण क्रिटीसाईज करत होते आणि आत्ताही.

बाकी भाजीवाल्याला टॅक का बसू नये हे तुमचं लॉजिक मला समजलेलं नाही

(#- हा प्रतिसाद ते झाडूखराटे अंगावर येत होते म्हणून त्यांना मी प्रतिसाद दिला त्यावर बचावासाठी तुम्ही धावून आलात तो आहे. दुसरीकडे ते झाख तुमच्यासाठी धावून आले हे पाहून गहीवरले मी Sad )

बाकी भाजीवाल्याला टॅक का बसू नये हे तुमचं लॉजिक मला समजलेलं नाही

हे वरचं लॉजिक माझ्या प्रतिसादात दाखवण्याचे सातीतैं ना नाही जमलं तर इतर कुणीही मदत केली तरी चालेल. Happy
नंतर आपण फुकट इंटरनेट कडे पण पाहूयात.
आणि हा विनोद नाही. कुणाला बोअर होण्याचा तर प्रश्नच नाही.

या बोटाची त्या बोटावर चुकून झाली तर ठीक... पण मान्य तर करायला पाहीजे ना ?

साती | 16 December, 2016 - 21:02
तर बाळांनो, आपण जेव्हा बँकेत कॅश भरायला घेऊन जातो तेव्हा बँका काही त्यातली एखादी नोट खोटी निघाली की आपल्याला पोलिसांत देत नाहीत.

एकाच ट्रान्सेक्शनमध्ये जर चारपेक्षा जास्त नोटा खोट्या निघाल्या तरच पोलिस कंप्लेंट होते.
बर्‍याचदा (आणि आर बी आय ने वारंवार सूचना देऊनही) बँका सरळ या नोटा खोट्या आहेत किंवा चालणार नाहीत असे सांगून परत करतात.
काऊंटरफिटचा स्टँप मारत नाहीतच पण एका विहीत नमुन्यात नोटेचा सिरीयल नंबर लिहून कॅशियर आणि पैसे भरणार्याची सही घेऊन तो आपल्याला देणे अपेक्षित असतानाही तो देत नाहीत.

पूर्वी हे सगळ्या प्रकारच्या म्हणजे को ऑप्/नॅशनलाइन्ड्/कार्पोरेट बँकात सगळीकडे अनुभवलंय.

पण आता खास खोट्या नोटा पकडण्यासाठी नोट्बंदी केलीय तर आत्ता तरी नोंद ठेवली जाईल आणि बँका खोट्या नोटा जमा करून आपल्यालडे साठवून आर बी आय ला परत करतील असे वाटले होते तसेही झालेले नाही.

जेव्हाही एखादी सस्पिशियस नोट छोट्या बँकेत भरते ती खरी असल्याबद्दल शंका असल्यास बँक कर्मचारी नोटेच्या पाठी नाव आणि नंबर लिहून घेतात.
मोठ्या बँकेत ती नोट चालली तर ठिक नाही तर फोन करून बोलावून परत देतात.
आणि बदल्यात फिट नोट घेतात.

(ता क - माझा खोट्या नोटा छापण्याचा धंदा नाही पण लोकांकडून सतत बर्‍याच नोटा घ्याव्या लागतात आणि प्रत्येकवेळी काऊंटरवरच्या माणसाला खरी /खोटी नोट ओळखता येतेच असे नाही.)

राजसी | 16 December, 2016 - 20:57
suspicious नोटेवर ग्रहाकासमोर त्याचा act नो लिहून घेतात. कस्टमर ला प्रूफ पाहिजे असेल तर मग पूर्ण official पोलीस complaइंट ची प्रोसेस करता येते. पोलीस complaint साठी ती नोट आधी रद करावी लागते. कस्टमर ला choice असतो. मोस्टली customer नोट परत घेऊन जातो म्हणतात. त्यांना माहित असते कुठून नोट आली ते.

१०० कोटी बुक value असलेल्या बँकेत रोज ५० ते ७० कोटी च्या उलाढाली होतात आणि ते सांभाळायला एक कॅशियर असतो. एक ऑफिसर असतो जो पूर्ण टेलर बॉक्स चे transactions बघतो. त्याला कॅश, dd, foreign exchange, check deposit,/return etc.transaction authorised करायचे असतात. प्रत्येक टेलरचा दर ग्राहकांसाठी turn around time अर्धा मिनिट असतो.

राजसी | 16 December, 2016 - 21:11
बरोबर, कस्टमरने नोटेची पोलीस complaint करा असा सांगायला पाहिजे. रोजचा कस्टमरला रोज तोच प्रश्न न विचारता नोट परत दिली जाऊ शकते. आता कदाचित होतील कडक प्रोसेस. जितक्या जास्त खोट्या नोटा ब्रँच पकडेल तितकं हाय ऑडिट rating / जो कॅशियर जास्त नोटा पकडेला त्याला प्रोमोशन, बोनस, hike अशी जोपर्यंत policy होत नही. तोपर्यन्त अवघड आहे.

सातीजी

उत्तर देताय ना ? आधीच्या प्रतिसादांचा, प्रश्नांचा निकाल लागलेला नसताना नवं कशाला लिहीता ? तुमच्या धाडसाची पण कमाल आहे. एखाद्याला मूर्खात काढण्यासाठी खोट्याचा आधार घ्यायला लागतो का हो तुम्हाला ?

ते तुमचे काका पण कमी नाहीत.

नसलेला शब्द घुसडून उर्मट सल्ले देत फिरतात. त्यांना स्वतःचे अस्तित्त्व तरी आहे का हो ? ज्याच्या प्रतिसादांमुळे केंद्र सरकार पडायची वेळ आली तो दिवाभीतासारखा लपून खोटारडेपणा का करतो ?

त्या काकाजींना पण सांगा फुकट इंटरनेट हा शब्द त्यांना माझ्या प्रतिसादात कुठे सापडला ते. आधी स्वतःची फेकाफेकी आवरा मग इतरांना सांगा. कि हे कळवू प्रशासकांना ? तुम्ही कुणाबद्दलही काहीही तारे तोडले तर हारतुरे समजून घ्यायचे का ?
ते तुम्ही कुठे हे सर्व लिहीत असता ते सार्वजनिक करून टाका कि एकदा. सचिन पगारे पण तुम्हीच ना ?
कसे काय मॅनेज करता एव्हढे पासवर्ड ? आणि एव्हढे सर्व करून दुस-याबद्दल दिवसभर टाळ कुटत बसता. मानलं पाहीजे तुम्हाला.

क्लास घ्याच एकदा सर्वांचा.

सुरुवातीला दुर्लक्ष केले म्हणून भलतेच शेफारलेत हे तुमचे काका. तो प्रतिसाद अ‍ॅडमिन कडे सुपूर्द नाही केला याचा चांगलाच गैरफायदा घेताय. ना तुम्हा लोकांना विनोदाची जाण, ना आकलनशक्ती, ना तुमच्याकडे कसला उमदेपणा. पहिल्याच पानातले प्रतिसाद वाचूनही तुमचे काका भक्त वगैरे भाषा वापरून लाज बिज काढतात. काडीची तरी अक्कल आहे का ?

तुमच्यासारख्या नकारात्मक डॉक्टरांकडे येणार पेशंट खरंच जगतो ?
त्याचा जीव गेला तरी तुमचा निर्णय होणार नाही. कन्सेन्ट घेताएवीना नातेवाईकांकडून ? कि कशाला घ्यायचे ऐवीतेवी मरणारच आहे म्हणून सोडून देत असता ?

भारतातल्या काळ्या पैशाबद्दल गेल्या साठ वर्षात काही हालचाल झालेली नाही. रुग्ण एकदम हाताबाहेर गेला आहे त्यामुळे भला या बुरा निर्णय घेणे आवश्यक होते. लोकशाहीत पुन्हा सत्ता मिळेल न मिळेल, असे बहुमत पुन्हा हाताशी असेल न असेल... तेव्हां जे काही करायचे ते आताच केले पाहीजे म्हणून केले आहे हे सर्व.
अंमलबजावणीत ज्या चुका झाल्या त्या मी मांडल्याच आहेत की. पण जर चुका टाळल्या असत्या तर ? असा विचार एकदा तरी आला का मनात ?

खेड्यापाड्यात बँका नाहीत हे तुम्हाला आज समजले होय ? दोन लाख कोटीचे एनपीए आज समजले का ? या आधी कधी त्याबद्दल ब्र काढलाय का ? तुम्ही इतक्या वर्षात बँकींगचा विस्तार करू शकला नाही म्हणून नोटबंदी चूक होय ? जो काही त्रास होईल तो सहन करूनही जर चांगले काही झाले तर कुणाला नकोय ते ?

प्रमाणापेक्षा जास्त पैसे अकाउंटला भरणा-या सर्वांना नोटिसा गेल्या आहेत हे दडवून एव्हढे पैसे परत आले म्ग कुठेय काळा पैसा असे विचारताय. या अकाउंट्सची चौकशी पूर्ण तरी होऊ द्याल कि नाही ?

कालच दिल्लीत बेनामी अकाउंट्स मधे साडेतीनशे कोटी रुपये सापडले. दिल्लीतच दुस-या एका बँकेत असेच पैसे सापडले.अनेक ठिकाणी सापडताहेत. थांबायला नको का ?

हे अ‍ॅप्रिशिएट करायला भक्त असण्याची आवश्यकता नाही.
पण तुमच्यासारख्या काँग्रेस पक्षाच्या एजंट्सना हे थोडीच कळणार ?

मा . अ‍ॅडमिन
झाडू नामक सदस्याला नियंत्रणात ठेवावे ही विनंती. या सदस्याने आल्यापासून जी भाषा वापरली आहे त्याबद्दल तक्रार न केल्याने हा बेछूट सुटलेला आहे. ऋन्मेषच्या ५००- १००० च्या नोटा बंद या धाग्यावरची याची भाषा पहा.

sapna.jpgzadu.jpgzadu2.jpgzadu4_0.jpg

साती

तुम्ही त्याच धाग्यावर पुढे पेट्रोलपंपावर नोटा चालणार असल्याचे लिहीले होते. मी विचारले तर सरळ झटकून टाकले. हे अनवधानाने होत नाहीये म्हणून तुमच्या मागे लागले आहे.

तुम्ही आणि ते तुमचे काका...
माझ्या प्रतिसादात घुसडलेले शब्द दाखवा नाहीतर माफी मागा.

अरेआणखी खुर्च्या आणा . लई दिसानी जुम्पली आहे. आता एक तर आय डी जाणा र न्हाई तं धागा.
ए पॉप कॉर्न वाला हिकडं ये की मर्दा . सगळं पोतंच ठिव हितं लेका ::हहगलो:

images_3.jpg

अरेच्चा! हे आधी वाचलंच नव्हतं. पाचशे हजारच्या जुन्या नोटा आठ नोव्हेंबरनंतर खपविण्याचा प्रयत्न करणं यात लाज वाटण्यासारखं काय आहे हे कळत नाही.

आठ नोव्हेंबरनंतर जर नोटा अमूक तमूक ठिकाणी चालतील असं सरकारनं जाहीर केलं असेल तर त्या ठिकाणी त्या नोटा देऊन सेवा किंवा वस्तु विकत घेणे हा गुन्हा नव्हे. त्याला नोटा "खपविणं" असं म्हणता येणार नाही. जिथे वर्तमानपत्र, टीवी, इंटरनेट पोचत नाही अशा एखाद्या ओसाड गावच्या भोळ्याभाबड्या खेडूताला, ज्याला हा नोटाबंदीचा निर्णय समजलेलाच नाही, त्याला आपल्या जुन्या हजार पाचशेच्या नोटा खपविणे चू़कच आहे. ती त्याची फसवणूक म्हणता येईल. पण पेट्रोल पंप, हॉस्पीटल्स इथे या नोटा देणं ही त्यांची फसवणूक कशी ठरेल?

दुसरा मुद्दा असा की, जुन्या नोटा भरायला मोठ्या नोटाबंदीच्या तिसर्‍या दिवसापासून (कारण मध्ये एक दिवस बँका ग्राहकांकरिता बंद होत्या) मोठ्या रांगा लागल्या होत्या. बरे रांगेत थांबून त्या भरल्या तर पुन्हा नवीन व्यवहार करायला लोकांकडे नवीन नोटा नव्हत्या. त्यापेक्षा अजुन काही दिवस लोकांनी ज्यांना नोटा घेणे शक्य आहे अशा व्यापारांशी जुन्या नोटांत व्यवहार केला तर ते चूक कसे?

माझ्याकडे पाचशे व हजारच्या जुन्या नोटा मिळून ३५ हजार रु. होते. १० नोव्हेंबरला मी रांगा पाहिल्या आणि इतका वेळ आपल्याला उभे राहणे शक्य नाही म्हणून तेव्हा भरल्या नाहीत. जे व्यापारी माझ्याकडून त्या नोटा घेण्याची तयारी दाखवत होते त्यांच्याशी मी पुढचे पाच दिवस व्यवहार केला. त्यानंतर मुलीला पेट्रोल टाकी फूल करायला अडीच हजार दिले आणि तिच्याकडून शंभरच्या नोटा घेतल्या. त्या आणि माझ्याकडच्या आधी असलेल्या अजुन पन्नास नोटा मला किरकोळ खर्चाला पुरतील असा अंदाज आला आणि मग जुन्या नोटा भरायच्या रांगा कमी झाल्यावर फारसा वेळ न घालवता २३ नोव्हेंबरला माझ्याकडच्या सगळ्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटा (एकूण रक्कम सत्तावीस हजार पाचशे) बँकेत भरल्या. तेव्हाच बँकेतल्या लोकांनी सावध केले. एक तारखेनंतर पगार होतील आणि नव्या नोटांतील रक्कम काढायला गर्दी होईल म्हणून लगेच दोन हजाराच्या नव्या तीन नोटा मिळत होत्या त्या काढून घेतल्या.

मी १० तारखेनंतर लगेचच जुन्या नोटा बॅंकेत न भरता रांगा कमी होण्याची वाट पाहत २३ तारखेपर्यंत थांबलो आणि मधल्या काळात माझ्याकडे असलेल्या १०० च्या व त्याखालील नोटा काटकसरीने वापरल्या व शक्य तिथे जुन्या पाचशे व हजारच्या नोटा वापरल्या म्हणजे खपविल्या नाहीत. तसेही हा निर्णय होण्यापूर्वीदेखील किरकोळ खरेदीकरिता दुकानदार मोठ्या नोटा घ्यायला नाखूशच असायचे. आपण जितक्या मूल्याची नोट पुढे करतो तिच्या किमान साठ टक्के मूल्याचा व्यवहार असेल तरच (म्हणजे तीनशे+ ची खरेदी असेल तर पाचशेची नोट) समोरचा खळखळ न करता ती नोट घेतो आणि उरलेली मोड परत देतो असा सर्वसाधारण अनुभव आहे. तेव्हा १० ते २३ या कालावधीत जुन्या नोटा वापरणार्‍या माझ्यासारख्यांनी काही बेकायदेशीर अथवा लाजिरवाणे कृत्य केले असावे असे मला वाटत नाहीये.

अजय अभय अहमदनगरकर | 17 December, 2016 - 10:32
अरेआणखी खुर्च्या आणा . लई दिसानी जुम्पली आहे. आता एक तर आय डी जाणा र न्हाई तं धागा.
ए पॉप कॉर्न वाला हिकडं ये की मर्दा . सगळं पोतंच ठिव हितं लेका
>>

आरं मर्दा,
हितं बायकांची भांडनं लागल्याती आनि तुम्हाला पॉपकॉर्न दिसून र्‍हाईले का गड्या!

सपना, त्यात आभार कसले? तुम्ही एकट्याच नाही. मी आणि अजुनही अनेक जणांनी मधल्या काळात या नोटा वापरल्या आहेतच. सगळ्यांची एकदम लाज काढता येईल का? एकतर सरकारने स्वतःच नोटा बॅंकेत भरायला ५० दिवसांची मुदत दिली होती. १३० कोटी जनतेपैकी लहान मुले व घरातील अतिवृद्ध आणि बॅंकेत खाते नसलेले वगळता किमान १० कोटी लोक तरी बँकेचे खातेदार असणार ना? सर्वांनी पॅनिक होत पहिल्याच दिवशी रांगा लावायच्या होत्या का? बरे ही सगळी रक्कम बँकेत जमा केली तरी नवी लगेच मिळत नव्हती मग बाकी व्यवहार कसे करायचे. त्यापेक्षा टप्प्याटप्प्याने जशी नवी कॅश उपलब्ध त्यानुसार जुनी भरत नवी काढत प्रॅक्टीकली हा प्रॉब्लेम सोडवणे जास्त सोपे होते. मी, तुम्ही आणि बहुतेकांनी तेच केले. करंट अकाऊंटवाल्या मोठ्या व्यापार्‍यांना साडेबारालाख तसेही भरायला अलाऊड होते. त्यांनी ते आपल्याकडून म्हणूनच स्वीकारले. आपण त्यांची कुठलीही फसवणूक केलेली नाही. एखाद्या गरीब भाजीवाल्याशी भांडून, त्याला नाडून त्याला आपली पाचशेची नोट त्याच्याकडून शंभर रुपयाची भाजी आणि चारशेची मोड घेण्याचा व्यवहार मी तरी नाही केला. तुम्ही केलाय का? नसल्यास तुम्ही मनात कुठलाही गिल्ट बाळगू नका.

सपनाताई हरिनामे आणि माझे कधी जमले नाही हे आम्ही दोघेही जाणतो. त्या आज केवळ साती आणि सहकार्‍यांना दोष देत आहेत म्हणून त्यांना अनुमोदन द्यायला धावत नाही. मात्र हा त्यांनी लिहिलेला खालचा पॅरा अतिशय बोलका आहे व त्याच्याशी पूर्ण सहमतः

>>>>खेड्यापाड्यात बँका नाहीत हे तुम्हाला आज समजले होय ? दोन लाख कोटीचे एनपीए आज समजले का ? या आधी कधी त्याबद्दल ब्र काढलाय का ? तुम्ही इतक्या वर्षात बँकींगचा विस्तार करू शकला नाही म्हणून नोटबंदी चूक होय ? जो काही त्रास होईल तो सहन करूनही जर चांगले काही झाले तर कुणाला नकोय ते ?<<<<

===========

>>>>आठ नोव्हेंबरनंतर जर नोटा अमूक तमूक ठिकाणी चालतील असं सरकारनं जाहीर केलं असेल तर त्या ठिकाणी त्या नोटा देऊन सेवा किंवा वस्तु विकत घेणे हा गुन्हा नव्हे. त्याला नोटा "खपविणं" असं म्हणता येणार नाही<<<<

बिपीनजी,

राग राग झाल्यानंतर सगळेच चुकीचे दिसू लागते तसे आहे ते! त्या नोटबंदी आणि भ्रष्टाचार धाग्यावरही मी त्यांना हेच म्हणालो होतो, पण समजून घ्यायची तयारी नाही. मी तर ह्याच्यापुढे जाऊन म्हणेन की जेथे जुन्या नोटा चालतील त्यापलीकडेही काहीजण त्या नोटा घेऊन जर स्वतःच्या खात्यात भरून पांढर्‍या करून घेणार असेल तर तेथेही द्याव्यात की त्या नोटा?

गैरसोय करून घेतली तर खूप आहे, मार्ग काढायचे म्हंटले तर त्याहून अधिक आहेत. शुगोल ह्यांनी एका गावाची यू ट्यूब लिंक दाखवली होती त्यावर कोणाचे काही म्हणणेच नाही. उलट ती रिपोस्ट केली तर म्हणे मी आणि माझ्या ड्यु आय डी ज नी ती मुद्दाम खोदून काढली. आता चांगली उदाहरणेही द्यायची नाहीत असा ह्यांचा फतवा दिसतो.

{{{ हितं बायकांची भांडनं लागल्याती आनि तुम्हाला पॉपकॉर्न दिसून र्‍हाईले का गड्या! }}}

दोन्ही बायका भांडत आहेत असे का म्हणताय? मला तर जिथल्या भांडणाचा उल्लेख आहे अशा वरच्या स्क्रीनशॉट्समध्ये सपना हरिनामे आणि झाडू यांचे प्रतिसाद दिसत आहेत. त्यापैकी झाडू यांच्या आयडीवर क्लिक केल्यास http://www.maayboli.com/user/62663 पुरुष असल्याचं दिसतंय तुम्हाला झाडूऐअवजी केरसूणी दिसतेय का?

पाचशे हजारच्या जुन्या नोटा आठ नोव्हेंबरनंतर खपविण्याचा प्रयत्न करणं यात लाज वाटण्यासारखं काय आहे हे कळत नाही.
<<

जर तुम्ही देशभक्तीचे डोस इतरांना पाजीत, नोटबंदीमुळे सगळ्या नोटा व्हाईट होतील हे सांगत असाल, तर नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण या नोटा "लीगल टेंडर नाहीत" असे पंप्र यांनी जाहीर केलेले होते.

तुम्ही तुमच्याजवळचे चलन बँकेबाहेर खपवताहात, याचाच अर्थ ते बँकेत आणून व्हाईट करीत नाही. १ जरी नोट तुम्ही अशी - रस्त्यावरचा कुणी घेतोय म्हणुन त्याला देऊन (जे अधिकृत सरकारी परवानगी दिलेले ठिकाण नाही)- खपवली तरी तुम्ही त्यावरचा टॅक्स चुकवताय असा अर्थ होतो जे नक्कीच लाज वाटण्यासारखे आहे. नव्हे देशद्रोह आहे!

मा. पंप्र यांनी ऑलरेडी सांगितले होते, की हे कायदेशीर चलन नाही. फक्त बँकेत भरता येईल. ज्या दिवशीचे प्रतिसाद आहेत, त्या दिवशीपर्यंत तरी अनेक ठिकाणी चालतील अशी सवलत न देता, फक्त दवाखान्यांना या नोटा घ्यायची सक्ती करण्यात आलेली होती. ज्यामुळे विनाकारण चौकशीचे शुक्लकाष्ठ माझ्यामागे लागणार हे सरळ होते.

या नोटा घेऊन मी बँकेत भरल्यावर माझी ट्रँजॅक्शन्स २॥ लाखापेक्षा कित्येक वर आहेत, व माझ्यामागे एन्क्वायरी लागलेली आहेच.

आता ही विनाकारण पाठी लागलेली ही मगजमारी "थोडीशी" गैरसोय नक्कीच नाही.

आता या पार्श्वभूमीवर निर्लज्जपणे माझ्याकडे येऊन नोटा खपवू पाहणार्‍यांची उदाहरणे दिल्यानंतरही हे असले थयथयाट करायचे असतील, तर करत रहा. नंदनवन तुमचेच आहे.

>>>>१ जरी नोट तुम्ही अशी खपवली तरी तुम्ही त्यावरचा टॅक्स चुकवताय असा अर्थ होतो जे नक्कीच लाज वाटण्यासारखे आहे. नव्हे देशद्रोह आहे!<<<<

झाडू,

ज्याला ही नोट खपवली तो त्या नोटेचे काय करतो? त्याच्या बँकेत भरतो किंवा पुढे खपवतो. अल्टिमेटली त्या नोटेचा प्रवास बँकेतच संपतो. (संपणे अभिप्रेत आहे, नदीत संपला तर वेगळी बाब).

झाडू
लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला ? मी तुमच्याकडे कधी आले होते उपचार घ्यायला ? वैयक्तिक व्हायची काय गरज होती त्या प्रतिसादात ? तुम्हाला स्वतःचे अस्व्तित्त्व सिद्ध करता येत नसताना माझ्या प्रोफाईलचा डेटा वारंवार कॉपी पेस्ट करता, आणि पुन्हा सातीच्या आयडीने अनुमोदनही घेता. हा असला निलाजरेपणा करून दुस-यांची लाज काढता याबद्दल एखादा शब्द बोला की ! थयथयाट हा शब्द तुम्ही इतरांना वापरणे हा सुद्धा निलाजरेपणा आहे. तुमच्याइतक्या पातळीला उतरून प्रतिसाद देता येत नसले तरी तुमची खोड जिरवायची ठरवली तर मागे हटणार नाही हे लक्षात ठेवा.

पेट्रोल पंपावर नोटा चालणार असतील तर चालणारच होत्या. दुसरी गोष्ट मी मोदीभक्त नसल्याने त्या अँगले माझ्यावर डाफरणे हा तुमचा मूर्खपणा आज ११ नोव्हेंबर नंतर १६ डिसेंबरलाही चालूच आहे. तुम्हाला वेळो वेळी सांगितले आहे. माझे सरकारच्या अंमलबजावणीबाबत टीकात्मक प्रतिसाद देखील आहेत.

मूर्खांच्या पातळीवर उतरल्याने मूर्खांची संख्या एकाने वाढते हे माहीत असल्याने तुम्हाला उत्तर देत नव्हते याचा तुम्ही भलताच अर्थ काढून जिथे तिथे मला काहीही बोलत सुटला आहात. मला आजवर दहा एक जणांची ड्युआयडी असल्याचे प्रमाणपत्रही दिले. यातल्या एखाद्याचे संबंध दुस-याशी बरेवाइट असतील त्याप्रमाणे ते सदस्य माझ्याकडे पाहणार जसे बेफिकीर यांच्याबाबतीत होतेय.

मी सपना हरनामे आहे आणि त्याच नावाने मला ओळखले जावे ही नेटसभ्यता आहे. याउप्पर अ‍ॅडमिनकडून माझे आयपीअ‍ॅड्रेस घेऊन मगच माझ्यावर आरोप करावेत. तुम्हाला शक्य नाही म्हणून म्ह्टले नाही, पण ऑफर आहे. माझ्या घरी या चहा प्यायला. अस्तित्त्वात असाल तर ! नसाल तर शांत बसा आणि माणसासारखे लिहा.

मला तुम्हाला झाडू या नावाने ओळखायला काही एक अडचण नाही. तुम्ही स्वतः मर्यादेत रहा. तुमच्याकडून पगार घेत नाही मी.

माझ्याकडे तेव्हां फक्त सहा हजार रूपये होते ज्याचा हिशेब देणे मला शक्यच होते. या नोटा बँकेत भरता आल्या असत्या. पण लोकांनी स्वतःच पर्यायी मार्ग काढला, त्यांना प्रॉब्लेम नाही तर मला का असावा ? त्यांना काय मी फसवले बिवसलेय का ? माझे सोलापूर रस्त्याला दूरवर जाणे झालेच होते आणि अनायासे या नोटा चालल्या. त्यातून मला पर्यायी व्यवस्था दिसली त्याबद्दल मी लिहीले होते. ते तुमच्या डोक्यात घुसलेच नाही. उगीच जिथे तिथे येऊन घाण करीत राहता. मला माहीत आहे तुम्ही ख-या कोन आहात ते.. म्हणून महिनाभर काही बोलले नाही.

अक्कल गहाण टाकता का प्रत्येक वेळी ?

{{{ १ जरी नोट तुम्ही अशी - रस्त्यावरचा कुणी घेतोय म्हणुन त्याला देऊन (जे अधिकृत सरकारी परवानगी दिलेले ठिकाण नाही)- खपवली तरी तुम्ही त्यावरचा टॅक्स चुकवताय असा अर्थ होतो जे नक्कीच लाज वाटण्यासारखे आहे. नव्हे देशद्रोह आहे! }}}

इथे काहीतरी गल्लत होतेय. १० नोव्हेंबरला माझ्या अकाउंटमध्ये सहासष्ट ह्जार रुपये आहेत आणि जुन्या पाचशे व हजारांच्या नोटांत कॅश पस्तीस हजार आहेत. मी माझे हे पस्तीस हजार देखील लिगली बँकेत भरु शकतो पण मोठ्या रांगा ही एक अडचण आहे आणि तात्काळ नव्या चलनातील नोटा न मिळणे ही दुसरी अडचण आहे. मी ज्या दुकानदाराकडे जातोय तो मला त्याच्याकडचा माल विकण्याच्या बदल्यात माझ्याकडून चेकने / बँक ट्रान्स्फरने पैसे स्वीकारत नाहीये (जो माझा टॅक्सपेड पैसा आहे), नव्या नोटा माझ्याकडे लगेचच नाहीयेत. अशा वेळी माझ्या जुन्या नोटा तो घेत असेल तर हे बेकायदेशीर कसे? तो माझा चेक / डेबिट कार्ड मनी घेत नाही हा माझा दोष नव्हे, जुन्या नोटा घेणे ही त्याची आणि माझी दोघांची मधल्या काही दिवसांची व्यावहारिक गरज आहे. माझ्या अशा जुन्या नोटांपैकी मी केवळ साडे सात हजार या तेरा दिवसांत व्यापार्‍यांना दिले आणि त्या बदल्यात वस्तु किंवा सेवा विकत घेतल्या. घाऊक प्रमाणात (लाखो करोडो) जुन्या नोटा देऊन त्याबदल्यात नव्या नोटा घेणे हा नक्कीच देशद्रोह आहे. मी देशद्रोह केलाय असे मला अजिबात वाटत नाही. मी ठाम आहे. सरकारने पुरेशा प्रमाणात नव्या नोटा उपलब्ध केलेल्या नसताना १३ दिवस जुन्या नोटा बँकेत न वापरता व्यवहारात वापरणे (तेही केवळ साडेसात हजार रुपये) हा देशद्रोह नव्हे. त्यातही काही दुकानदारांनी माझ्याकडच्या नोटांचे नंबर आणि माझा मोबाईल नंबरही लिहून घेतला. समजा त्यांच्याकडे असलेल्या नोटा बँकेत भरताना त्या बनावट असल्या तर ते त्या नोटा मी त्यांना दिल्याचे बँकेला सांगणार आहेत. अजुन किती पारदर्शकता हवी?

Pages