"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर धन्यवाद,

पण तुमच्या प्रतिसादातील या वाक्यांशी असहमत.

{{{ . मी तर ह्याच्यापुढे जाऊन म्हणेन की जेथे जुन्या नोटा चालतील त्यापलीकडेही काहीजण त्या नोटा घेऊन जर स्वतःच्या खात्यात भरून पांढर्‍या करून घेणार असेल तर तेथेही द्याव्यात की त्या नोटा? }}}

हे असे जुन्या नोटांच्या बदल्यात कुठलीही सेवा / वस्तु विकत न घेता थेट नव्या नोटा एक्स्चेंज करणे मात्र अनैतिक आणि बेकायदेशीरही आहे. वरच्या प्रतिसादातही मी तेच लिहिलेय.

ज्या पैशावर कर भरलेला नाही त्या नोटा खपवणे हा देशद्रोह आहे. अडीच लाख ही मर्यादा सरकारनेच दिलेली आहे. बिपीनजींनी दिलेले पैसे किंवा माझे सहा हजार घेऊनही व्यापारी अडीच लाखाच्या मर्यादेतच राहत असेल तर त्याला प्रॉब्लेम नाही. त्या पेक्षा जास्त मर्यादेत पैसे असतील आणि माझ्याकडे जर ते कुठून आले हे सिद्ध करता येत असेल तर मी दहा कोटीही भरू शकेन बँकेत.

अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा घरी का ठेवला याबाबतीत सरकार चौकशी करेल जी चालू झालेली आहे. म्हणूनच या मोहीमेतून काहीच निष्पन्न झाले नाही हा प्रचार घिसाडघाईने होतोय असे वाटते. थांबा कि जरा मार्चपर्यंत. येतील आकडे बाहेर.

माझ्याकडचे सहा हजार काळा पैसा होता असे म्हणणे हास्यास्पद आहे.लॉजिक लावा की थोडंसं. कुणी ओपन फोरम मधे लिहील का काळा पैसा खपवला म्हणून. आणि किती पाचशे रूपये ??? कैतरीच !!!

थांबते आता. ज्यांची झोपायची वेळ झाली त्यांना शुभरात्री, ज्यांची बाहेर जायची झाली त्यांना गुड डे !

जुन्या नोटावर वस्तू घेणे कायदेशईर असेल तर मग मोदींच्या ये अब लिगल तेंडर नही है ! याचा नेमका अर्थ काय राहिला ?

>>>>हे असे जुन्या नोटांच्या बदल्यात कुठलीही सेवा / वस्तु विकत न घेता थेट नव्या नोटा एक्स्चेंज करणे मात्र अनैतिक आणि बेकायदेशीरही आहे. वरच्या प्रतिसादातही मी तेच लिहिलेय.<<<<

अहो बिपीनजी मी एक्श्चेंज म्हणतच नाहीये. मीही सेवा / वस्तू विकत घेऊनच म्हणतोय. माझ्या ह्या खालच्या वाक्यातः

>>>>मी तर ह्याच्यापुढे जाऊन म्हणेन की जेथे जुन्या नोटा चालतील त्यापलीकडेही काहीजण त्या नोटा घेऊन जर स्वतःच्या खात्यात भरून पांढर्‍या करून घेणार असेल तर तेथेही द्याव्यात की त्या नोटा?<<<<

'काही दुकानदार' हे लिहायचे राहिले त्यामुळे गैरसमज झाला असावा.

मला योगासनं चांगली जमतात. त्यात ते गणपतीसारख स्वतःभोवतीच गिरक्या घेऊन फसवणं तर हातचा मळ आहे.

मला योगासनं चांगली जमतात. त्यात ते गणपतीसारख स्वतःभोवतीच गिरक्या घेऊन फसवणं तर हातचा मळ आहे>>> Biggrin एकदम +१

रविवार पेठेतील काही व्यावसायिकांकडे अजूनही जुन्या नोटा चालतात हे सहाव्यांदा लिहीत आहे. शब्दात पकडून नाचत सुटायची वेळ आली पण?

Demonetization has resurrected fears that the ruling Bharatiya Janata Party takes policy advice from quacks. It damaged the credibility of India’s central bank. And it forced many of the country’s ostensibly right-of-center intellectuals to perform advanced mental gymnastics to defend the prime minister. Though a few economists have applauded Mr. Modi, the weight of informed opinion leans heavily against his decision.

http://www.wsj.com/articles/indias-demonetization-debacle-1481851086

हे "मेंटल जिम्नॅस्टिक्स" माबोवर खूप पाहायला मिळाले गेल्या २-३ दिवसात.

झाडू | 17 December, 2016 - 11:16 नवीन

पाचशे हजारच्या जुन्या नोटा आठ नोव्हेंबरनंतर खपविण्याचा प्रयत्न करणं यात लाज वाटण्यासारखं काय आहे हे कळत नाही.
<<

जर तुम्ही देशभक्तीचे डोस इतरांना पाजीत, नोटबंदीमुळे सगळ्या नोटा व्हाईट होतील हे सांगत असाल, तर नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण या नोटा "लीगल टेंडर नाहीत" असे पंप्र यांनी जाहीर केलेले होते.

तुम्ही तुमच्याजवळचे चलन बँकेबाहेर खपवताहात, याचाच अर्थ ते बँकेत आणून व्हाईट करीत नाही. १ जरी नोट तुम्ही अशी - रस्त्यावरचा कुणी घेतोय म्हणुन त्याला देऊन (जे अधिकृत सरकारी परवानगी दिलेले ठिकाण नाही)- खपवली तरी तुम्ही त्यावरचा टॅक्स चुकवताय असा अर्थ होतो जे नक्कीच लाज वाटण्यासारखे आहे. नव्हे देशद्रोह आहे!

मा. पंप्र यांनी ऑलरेडी सांगितले होते, की हे कायदेशीर चलन नाही. फक्त बँकेत भरता येईल. ज्या दिवशीचे प्रतिसाद आहेत, त्या दिवशीपर्यंत तरी अनेक ठिकाणी चालतील अशी सवलत न देता, फक्त दवाखान्यांना या नोटा घ्यायची सक्ती करण्यात आलेली होती. ज्यामुळे विनाकारण चौकशीचे शुक्लकाष्ठ माझ्यामागे लागणार हे सरळ होते.

या नोटा घेऊन मी बँकेत भरल्यावर माझी ट्रँजॅक्शन्स २॥ लाखापेक्षा कित्येक वर आहेत, व माझ्यामागे एन्क्वायरी लागलेली आहेच.

आता ही विनाकारण पाठी लागलेली ही मगजमारी "थोडीशी" गैरसोय नक्कीच नाही.

आता या पार्श्वभूमीवर निर्लज्जपणे माझ्याकडे येऊन नोटा खपवू पाहणार्‍यांची उदाहरणे दिल्यानंतरही हे असले थयथयाट करायचे असतील, तर करत रहा. नंदनवन तुमचेच आहे.

>>>>>>>
झाडू,
तुमच्या आणी इतर व्यवसायकांच्या थयथयाट करायचे कारण समजले.

सुज्ञास जास्त सांगणे न लागे,बाकी चालू द्या...

अरेआणखी खुर्च्या आणा . लई दिसानी जुम्पली आहे. आता एक तर आय डी जाणा र न्हाई तं धागा.
ए पॉप कॉर्न वाला हिकडं ये की मर्दा . सगळं पोतंच ठिव हितं लेका
>>>+१११११ Biggrin

http://www.ndtv.com/india-news/in-video-outside-western-up-bank-cop-fire...
पुण्यातल्या आणि अमेरिकेतल्या खास भक्तांनी वरील विडीओ पहावा. आणि जाहीर करावे की हे ही विरोधी पक्षांनीच तयार केले आहे

तुमच्या आणी इतर व्यवसायकांच्या थयथयाट करायचे कारण समजले.
<<

ऑफ कोर्स.

काही ही संबंध नसताना, जबरदस्तीने मला खोट्या नोटा घ्यायलाही लावायच्या अन वरतून इन्कमटॅक्स चौकशीही मागे लावायची.

या महामूर्खपणाबद्दल थयथयाट करू नको तर काय मोदींची आरती करू का? Lol

माझ्यावर अन्याय होतो आहे, ही माझी गैरसोय आहे, हेच तर विव्हळून सांगतोय ना?
पण डोक्यात शिरेल तर शपथ!

कठीण आहे.

डॉक्टर डोळ्यांना दिसला तर पेशंट्स येतील आणि ते आले तर नोटा येतील ना !
भुताटकीच्या दवाखान्यात पैसे दिले तर त्याला फीज नाही नैवेद्य म्हणतात.

हे असे जुन्या नोटांच्या बदल्यात कुठलीही सेवा / वस्तु विकत न घेता थेट नव्या नोटा एक्स्चेंज करणे मात्र अनैतिक आणि बेकायदेशीरही आहे. वरच्या प्रतिसादातही मी तेच लिहिलेय.
<<

पुन्हा एकदा,

भारत सरकारच्या आदेशाने, जी नोट बेकायदेशीर झाली, तिला बिगर सरकार पुरस्कृत जागी खपवणे, मग ते कोणत्याही कारणाने असो, हे बेकायदेशीर, लाजिरवाणे, व राष्ट्रद्रोही कृत्य आहे.

त्याचेही समर्थन करणारे, वा तसे करणारे निर्लज्ज आहेत, असे म्हटले, तर चुकीचे कसे?

नोटेचा अल्टिमेट प्रवास भाजप/काँग्रेसच्या टॅक्सफ्री व्हाईट अकाउंटमधेच होणारे, म्हणून कुणी करोडो रुपये २०-३०% कमिशनवर किंवा नुसतेच प्रेमाखातर फ्री घेत असेल, तर त्याला दिलेले चालेल का?

>>सध्याच्या केंद्र सरकारच्या कारभारावर "मनोरंजन कर" लावावा अशी शिफारस नागरिकांनी का करू नये...???

अहो काका! कर आपणच भरणार ना? कशाला? आत्ता फुकटात चाललंय ते चालूदेत की.
अमीर खान ने (दंगल होऊ नये म्हणून) दंगल साठी आज मोदींची चमचेगिरी केली.
आधीच डिमो त्यात दंगल झाली तर पंचाईत.
आणि एवढे मोठे नटसम्राट हास्य आणि करुण रसांची उधळण करत असताना कोण अमीर सारख्या कच्च्या कलाकाराला का बघायला जाईल?

आपण केलेला भ्रष्टाचार २-४ हजारांचाच, छोटा, म्हणून गोरा आहे, ही कन्सेप्ट डोक्यातून काढून मग नंतर राष्ट्रभक्तीची ढापणं लावाली, अन डीमॉनिटायझेशनची भजने गाईलीत, तर बरे होईल.

इमानदारीत सगळे पैसे बँकेत भरणारे आमच्यासारखे खुले विरोधक बरे!

असा ही मनोरंजन कर भरत आहेच ना आपण. कृषी सेस, स्वच्छ भारत सेस लावताना कुठे आपल्याला विचारलेले ? किमान यात थोडी करमणूक तरी होत आहे. बाकीच्या करांमधे काय झाले ?

भक्त आता सोशल मिडीयावर आमिर खानचे गुणगाण करत आहे. सच्चा भारतीय म्हणत आहे.

अपने अपने सिनेमा बचाओ. नमो के गुन गाओ

इमानदारीत सगळे पैसे बँकेत भरणारे आमच्यासारखे खुले विरोधक बरे! >>> अगदी

आधी छाती बडवून अडीच लाख पर्यंत भरणार्‍यांना काहीच विचारले जाणार नाही म्हणणारा आज २ लाख भरणार्‍यांना नोटीस पाठवणार आहे म्हणे Wink

एके ठिकाणी तुम्ही लोक म्हणताय धंदा बसलाय.... नोटबंदीमुळे पेशंटस निंम्याने कमी झाल्येत.... खुप झळ बसलीय

दुसरीकडे असेही म्हणताय की
या नोटा घेऊन मी बँकेत भरल्यावर माझी ट्रँजॅक्शन्स २॥ लाखापेक्षा कित्येक वर आहेत, व माझ्यामागे एन्क्वायरी लागलेली आहेच

आता जर तुमचा धंदा बसूनही तुमची बॅंकेतली transactions तुमच्या मागे enquiry लागण्याइतकी जास्त दिसत असतील तर त्याचा अर्थ असा होता की

१) जर तुमचा दर महीन्याचा भरणा याच्यापेक्शा जास्त असेल तर या महीन्यातल्या भरण्यावरुन कुणी चौकशी नाही सुरु करणार आणि केलीच तर तुम्हाला घाबरायचे काहीच कारण नाही कारण इतका भरणा तर तुमच्यासाठी रुटीन आहे हे तुम्ही सहज सिद्ध करु शकता पण तसे नसेल तर तुमचा जोरात चाललेला धंदा बॅंक अकाउंटवर कधी आलाच नाही , त्यावरचा टॅक्स तुम्ही कधी भरलाच नाही आणि म्हणून आता एकदम व्यवहारात अनियमितता दिसल्यावर enquiry मागे लागली
२) तुमचा धंदा मंदावला ही शुध्द लोणकढी थाप आहे उलट पैसे खपवण्याच्या निमित्ताने का होइना पेशंटस तुमच्याकडे आले आणि मग नेहमीपेक्षा जास्त पैसा तुमच्या बॅंकेत जमा झाला
३) तुमच्या मागे enquiry लागली ही शुद्ध लोणकढी थाप आहे

किंवा एकंदरीतच सगळीच थापेबाजी चालू आहे!

यातला पहीला पर्याय जर बरोबर असेल तर it means की surgical operation successful Happy

आता यांना कसल्या सुतकी कळा लागल्या ?
नाही म्हटलं आज सुटीचा दिवस म्हणजे ईमेल्स नसतील. भीत भीत पाहीलं तर हे..

bharat.jpg

स्वरुप,

संपूर्ण प्रतिसादस सहमत.

<<<
एकंदरीतच सगळीच थापेबाजी चालू आहे!

यातला पहीला पर्याय जर बरोबर असेल तर it means की surgical operation successful
>>>+११११

नरेंद्र मोदीने काल इंदीरा गांधींनी ११९७१साली नोटबंदी केली नाही असे सांगितले.

इतिहासाच्या ७वीच्या विद्यार्थ्याला सुध्दा १९७१ साली काय झाले होते तेव्हाची परिस्थिती काय होती हे ठाऊक होते. परंतू बहुदा ४-५वी नंतर शाळेत न गेल्यानी काहींना ठावूक नसेल. ( आता हे उमा भारतींना पण विचारू शकत नाही कारण त्यांना ४थी पर्यंत कसेबसे ढकलून घालवावे लागले)
७१ साली पाकिस्ताना बरोबर युध्द लढायचे, बांग्लादेशी निर्वासितांचा प्रश्नाकडे बघायचे, अमेरिका बरोबर जागतिक नेत्यांबरोबर मुत्सद्दीगिरी करायची. ... की तुघलकी विचाराने भरलेल्या नोटबंदी ला महत्त्व द्यायचे?

सुज्ञ माणसाला उत्तर माहीत आहे.

पण १९९८-९९ साली आलेल्या वाजपेयी सरकारने नोटबंदी का जाहीर केली नाही? याचे उत्तर मात्र मोदीने दिले नाही. उलट वाजयेपींनी १०००ची नोट चलनामधे आणली. हा चांगला निर्णय होता ? असेल तर नोटबंदी ७१ सालीच का करायला हवी होती ? ७८ ला तर मोरारजी देसाई यांच्या सरकारने केली होती. मग त्यानंतर २००० ला वाजपेयींनी १०००ची सर्वात मोठी नोट म्हणून चलनात आणली. त्याने भ्रष्टाचार वाढला नाही का ?

उगाच फुशारक्या मारायच्या म्हणून कैच्याकै बोलत रहायचे. मग चुक कोणी दाखवल्यावर नंतर जगभर हसे होते म्हणून मुळुमुळू रडायचे.
अरे आखिर तुम करना क्या चाहते हो भाई? अजेंडा क्या है?

Lol

५००ची सर्वात आधीची नोट सर्वात बेस्ट होती. सी रंगनाथन यांच्या स्वाक्षरीची होती.
भली मोठी, डिझाईन छान, आणि कागद एकदम भारी होता. आताच्या २००० नोटेसारखा झेरोक्स मशिन वर ५० पैशाच्या कागदासारखा न वाटणारा. ती नोट हातात घेतल्यावर एकदम श्रीमंत सारखे वाटायचे.
९ वीत असताना पार्ट टाईम कामाला जाऊ लागलो. तेव्हा पहिला पगार या ५०० रुपयाच्या नोटेत घेतलेला. (अर्थात ती एकच नोट इतकाच पगार होता) पुढचा पगार होऊ पर्यंत ती नोट देव्हार्‍यात जपून ठेवली होती.

तेव्हा अशी बिभत्स जाहीरातबाजी, चिअर लिडर्स सारखे सतत टिव्हीवर येऊन "मी मी" करण्यासारखी नेत्यांची सवय नव्हती. त्यामुळे नविन बदल हे दिवाळीसारखे वाटत होते.लोक खुल्या दिलाने स्वागत करत होते
आता नविन बदल शिमग्यासारखे येतात आणि लोकांचा "तळतळाट घेऊन जातात.

एकाला एका यात्रेमुळे तळतळाट लागलेला होता. तो खुर्चीच्या जवळ पोहचून सुध्दा त्याला ती मिळाली नाही. कालपरवा तो हताश झालेला दिसला.

असो.

सपना तै ,

एका जेश्ट नागरीकाचा बुरखा फाडल्या बद्दल धन्यवाद !!

>>
एके ठिकाणी तुम्ही लोक म्हणताय धंदा बसलाय.... नोटबंदीमुळे पेशंटस निंम्याने कमी झाल्येत.... खुप झळ बसलीय

दुसरीकडे असेही म्हणताय की
या नोटा घेऊन मी बँकेत भरल्यावर माझी ट्रँजॅक्शन्स २॥ लाखापेक्षा कित्येक वर आहेत, व माझ्यामागे एन्क्वायरी लागलेली आहेच

आता जर तुमचा धंदा बसूनही तुमची बॅंकेतली transactions तुमच्या मागे enquiry लागण्याइतकी जास्त दिसत असतील तर त्याचा अर्थ असा होता की

१) जर तुमचा दर महीन्याचा भरणा याच्यापेक्शा जास्त असेल तर या महीन्यातल्या भरण्यावरुन कुणी चौकशी नाही सुरु करणार आणि केलीच तर तुम्हाला घाबरायचे काहीच कारण नाही कारण इतका भरणा तर तुमच्यासाठी रुटीन आहे हे तुम्ही सहज सिद्ध करु शकता पण तसे नसेल तर तुमचा जोरात चाललेला धंदा बॅंक अकाउंटवर कधी आलाच नाही , त्यावरचा टॅक्स तुम्ही कधी भरलाच नाही आणि म्हणून आता एकदम व्यवहारात अनियमितता दिसल्यावर enquiry मागे लागली
२) तुमचा धंदा मंदावला ही शुध्द लोणकढी थाप आहे उलट पैसे खपवण्याच्या निमित्ताने का होइना पेशंटस तुमच्याकडे आले आणि मग नेहमीपेक्षा जास्त पैसा तुमच्या बॅंकेत जमा झाला
३) तुमच्या मागे enquiry लागली ही शुद्ध लोणकढी थाप आहे

किंवा एकंदरीतच सगळीच थापेबाजी चालू आहे!

यातला पहीला पर्याय जर बरोबर असेल तर it means की surgical operation successful
<<
स्वरूप,

खरे, तर मी तुम्हाला काही एक्स्प्लनेशन देणे लागत नाही, पण तुमच्यासारख्या इतरही अल्पमती शंकाखोरांची शंका फेडावी म्हणून थोडं टंकतो.

१. कोणताही धंदा रोज सारखा नसतो. एक दिवस मी २ लाख ऑपरेशनचे कमवले, तर पुढचे ३ दिवस रिकामेही असू शकतात.

२. नोटबंदी झाल्याबरोब्बर, एक अचानक उसळी (Peak) आली होती, ज्यात लोक ५००-१००० च्या नोटा खपवायला प्लॅण्ड ऑपरेशन्स करवून घेत होते. त्यातून ते पैसे घेतलेच पाहिजेत ही सक्ती होती. लोक पैसे घेतले नाहीत तर पोलीसात जात होते अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच.

३. तो अडीच लाखाचा आकडा माझ्या (पार्टनरशिप मालकीच्या) मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डेली ट्रँजॅक्शनचा केवळ एक भाग आहे. माझ्या पर्सनल हॉस्पिटलचे वेगळे Wink पण हे असले आकडे तुमच्यासाठी फार मोठे होतील कदाचित.

४. माझी ट्रँजॅक्शन्स सरळ असल्याने, मला "घाबरायचं" कारण शून्य आहे, पण सरळ सुरू असलेल्या कामकाजात विनाकारण जेव्हा इन्कमटॅक्सवाले "एन्क्वायरी"ला येतात, तेव्हा काय डोक्याचं काय होतं, अन काय काय देवघेव जबरदस्तीने करावी लागते, याची कल्पना तुम्हाला असेल असे मला वाटत नाही. रुटीन असेसमेंटला किती जीव घेतात ते मला ठाऊक आहे. आता तर कोलित आहे हातात.

५. आज ४० दिवसांनंतर धंदा रफली ५०% वर आला आहे, तर त्याचवेळी कर्जाचे हप्ते, नोकरांचे पगार, लाईट्/फोन बिले इ. रोजचे खर्च सुरूच आहेत. रोज खुर्चीत बसल्यावर किती पैसे आधी मला या नोकर/कर्ज्/इ. साठी कमवावे लागतात, ज्यानंतरचा पहिला रुपया माझ्या खिशात येतो, याचा हिशोब तुम्हाला सांगून उपयोग नाही. उगच जळजळ वाढेल.

तर,

मी खोटे बोलतो, असे म्हणून तुम्हाला आनंद मिळत असेल, तर म्हणा, पण त्यातून तुमची तोकडी आकलनशक्ती दिसून येते, इतकेच म्हणतो. त्यामुळे, तुम्ही माझ्यावर खोटे बोलण्याचा आळ घेतला, म्हणून तुमची फक्त कीव करतो.

कंबरेखालच सुटायला लागल तरी बुरखावाटणी चालू आहे. Happy

आदरणीय, वंदनीय, प्रमोद महाजन पुरस्कृत भ्रष्टाचार समर्थक वाजपेयीजी कुणाला तरी दुर्गा म्हणाले होते.

Pages