काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे राम! पुन्हा थंडाक्का चे क्लोज अप्स आणि संथ- सानुनासिक डायलॉग्ज ऐकणं नशिबी आहे तर! >> असं काही नाही हो... चॅनेल बदला नशिब बदलेल Lol

त्या गौरीला स्वंयपाक घरात का येवु देत नाहीत? हि काय अजून प्रथा?

जरा प्रकाश टाका.

मी मध्ये बघितलीच नाही हि सिरियल... खूपच फालतुपणा चालला होता.( आताही तेच असतं , पण मध्येच टाईमपास म्हणून बघते इथे पिंका टाकायला)

आजीबाईंनी लेकीच्या आणि नातीच्या सासरच्या मंडळींना वचन दिलंय की या परजातीतल्या मुलीला आम्ही स्वैंपाकघरात आणि देवघरात पाय ठेवू देणार नाही. (कारण ते बाटेल. त्याच बोलीवर त्यांनी लग्नाला असलेला विरोध मागे घेतलाय. नाहीतर त्या लेकीचं आणि नातीचं माहेर कायमचं बंद झालं असतं.)

शिवला हम्माची कारस्थानं समजताहेत आणि त्याबद्दल तो कृतीही करतोय आणि बोलूनही दाखवतोय हे वेगळेपण म्हणता येईल.दादीही आहेच जोडीला. लग्न जमण्याआधी शिवने हम्माला न आवरल्याबद्दल (गंगाजल, राख, स्वैपाक, आणि मग विवाहाच्या वेळच्या मागण्या) त्याला मी बरीच नावं ठेवलेली. त्याला बाइज्जत बरी करतो.

त्याला बाइज्जत बरी करतो.>>> Lol

या परजातीतल्या मुलीला आम्ही स्वैंपाकघरात आणि देवघरात पाय ठेवू देणार नाही. >>> बर आहे ना, निदान तिला रोजचा सगळयान्चा स्वंयपाक तरी करावा लागत नाही. तिला job तरी सुऱळीतपणे करता येईल. भाग्यवान आहे गौरी.

धन्यवाद भरत.

मला वाटलेलच काहीतरी फालतु कारण असेल. बरय ना गौरीला तो बनारसी जेवणाचा खटाटॉप नाहीये..

ती गौरी नोकरी सोडून बसलीय घरी?

गौरीला ऑफिसमधून रजा मिळालीय. आधी वाटलेलं काही दिवसांचीच असेल. काल कळलं की दोन किंवा चार महिने. (हे अर्थातच तिच्यावर अवलंबून असेल). त्यासाठी हम्माला राजी करायचा एक पहाड आहे.

>>>त्याला बाइज्जत बरी करतो. >>> हाहा
---बादवे मला ती हम्माची बिनडोक सुन आवडायला लागलेय. छान अभिनय आहे तिचा. पण केवढा तो मेकअप! हम्मा अजुनही सुन असल्याबद्द्ल नशिबाला दोष देते तो किचनमधला सीन मस्तं होता.

अरे यार!!
नवरा गाढ झोपलाय आणि बायको अगदी सुस्नात होऊन त्याला उठवायला येत्ये व तो तिला ओढतो आणि मग नजरेचा खेळ... या पारंपारिक रोमँटिक कल्पनेतून आपल्या मालिका व सिनेमे कधी बाहेर येणार!!!
असं काही घडत नसतं...हे यांना कोण समजाविणार?
आणि गवरी इतकी गरीब गाय कधी पासून झाली...? मुंबईत शिवने चहा मागितला तर मीठ घालून देणारी हीच ना उर्मट गवरी? Angry

या सिरेलीत आता काही राहिलंच नाही.......त्यामुळे असे पाणी घालणे सुरुय.
मठरी के आटे मे ओवा घालायला विसरली तर वरुन भुरभुरुन पुन्हा कणीक मळता येत नाही का......?

का ही ही...तर्कशून्य व कल्पनाशून्य संवाद व प्रसंग......................................................................

नवरा गाढ झोपलाय आणि बायको अगदी सुस्नात होऊन त्याला उठवायला येत्ये व तो तिला ओढतो आणि मग नजरेचा खेळ... या पारंपारिक रोमँटिक कल्पनेतून आपल्या मालिका व सिनेमे कधी बाहेर येणार!!!
असं काही घडत नसतं...हे यांना कोण समजाविणार?

>>> अगदी !! Biggrin

शिवाय सासवांनी सुनांना कायम घालून पाडून बोलायचं ही कोणती रीत ! Uhoh

त्या सरलाबहूचं पात्र लेखकाने वाया घालवलंय असं मला सतत वाटतं. तिचा खूप छान उपयोग करून घेता आला असता. गौरीला सुस्वभावी दाखवण्यासाठी तिला बिनडोक, यडपट, चहा पण नीट न जमणारी दाखवण्याची काहीही गरज नव्हती !

सं काही घडत नसतं...हे यांना कोण समजाविणार?>> +१

ललिता +१

ती दादी पण नेहमीच हम्माला नीचा दिखाती है

>>>>ती दादी पण नेहमीच हम्माला नीचा दिखाती है--

हो ना, किती तो सारखा एकमेकींचा अपमान.

>>>त्या सरलाबहूचं पात्र लेखकाने वाया घालवलंय असं मला सतत वाटतं. तिचा खूप छान उपयोग करून घेता आला असता. गौरीला सुस्वभावी दाखवण्यासाठी तिला बिनडोक, यडपट, चहा पण नीट न जमणारी दाखवण्याची काहीही गरज नव्हती !-----

कपटी, कारस्थानी जाउ दाखवण्यापेक्षा हे बरे असे मला वाटते.

आणि दादी फक्त जौनपुर वाली आणि मुंबईवालीशीच बोलते. सरला शी बोलताना आजतागायत एकदा पण नाही पाहिलं मी.>>>>> बोलते कमी ओरडतेच जास्त Proud अरे ओ सीतामहुवाली म्हणत असते तिला...

म्हणजे इतर पात्रं अजिबातच करमणूक करत नाहीत...हो ना?
>>> श्या माझं अगदी उलट म्हणण आहे याबाबतीत. सरला काय ते नेमुन दिलेल काम इमानेइतबारे करते, बाकी सगळे फक्त आपली करमणूक करतात. Wink

कालचा भाग तेच तेच सिन वाला रोमान्स होता..गौरी ढिम्म..

पण शिव बाप रे.. काय डोळे आहेत..एक ना एक एक्स्प्रेशन्स सही
प्रत्येक गोष्ट फील करत होता..

कुठल्या बाबा आदम जमान्यातला रोमान्स...

गौरी सारखं सारखं, काय करतोस? काय करतोस? कोणी बघितलं ? करत.

आणि तो डोक्यात जाणारा सिन, केस धूवून पाणी उडवत नवर्‍याला उठवणं... जमाना गेला त्या सिनचा. नशीब, दोन गुलाबं आपटताना नाही दाखवत. Proud
आणि काय तो गाउन घालून यायचा सीन. मैने प्यार क्या मधला चोरल्या सारखा...

मुंबाईच्या मुलीला फॅशन माहितच नाही का? त्या गाउन वर किती ते लाजणं....

मला वाटलं काहीतरी मस्त घालून आल्ली असेल तर काय... एक साधा तलम गाऊन त्यावर शाल गुंडाळून लाजत लाजत... कर्म!

मला वाटलं, हिंदी सिरियली सारखं काहीतरी प्रथा सांगून , कुच्छ दिनो के लिये तुम्हे अलग सोना पडेगा इसमे परीवार का बिझनेस बढेगा ऐसे ज्योतिषीने बोला है ... असे हम्मा सांगेल असे वाटल्ली,

मुंबाईच्या मुलीला फॅशन माहितच नाही का? त्या गाउन वर किती ते लाजणं....

>> +१ मुंबईत कितीतरी बायका तसल्या गाऊनवर पोरांना स्कुलबसला सोडायला वगैरे रस्त्यावर येतात. काही बायका तर जवळपासच्या भाजीवाल्याकडे सुद्धा जायला लाजत नाहीत अश्या गाऊनवर. त्यात गौरी असा अभिनय करत होती कि जणू बिकिनी घातलीये Uhoh

वरच्या झंपी यांच्या पुर्ण प्रतिसादाला मम.. +१००००००००००००००००००००००००००

गौरी किती वेळा म्हणाली काय करतोयस.. बाप रे.. कल्पनादारिद्र्य अ‍ॅट इट्स पिक
गाउन काय होता.. कसला भंगार कलर..
लग्न होउन इतके दिवस झाले ना.... सोबत रहायला येउन पण बरेच दिवस झाले की..

लग्नाआधी काहितरी लपुन करत आहोत असं गौरी वागत होती..

पण शिव लाल ड्रेस मधे टोटल बदाम..

Pages