"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांचं पोट हातावर आहे, ज्यांचे रोजगार बुडालेत, ज्यांच्या घरचे लोक नोटांच्या रांगेत किंवा उपचारा अभावी मेलेत, त्यांना हे कसं समजावून सांगायचं? >>>>

@ भरत - ह्याचे उत्तर मी दुसर्‍या मुद्द्यात दिले आहे.

जर तुम्ही म्हणता तसा लोकांना खरच खुप खुप त्रास झाला तर पुढच्या निवडणुकी मोदी त्याची जबरी किंम्मत मोजेल. ही लोकशाही आहे.
पण पुन्हा मोदीच निवडुन आले तर लोकांना फार त्रास झाला नाही असा अर्थ काढायला हरकत नाही.

निर्णय फसला की निवडणूक जिंकेन>>

जणु काही नोटबंदीला विरोध करणार्‍यांना फक्त २०१९ च्या निवडणुकीची पडलीय.
भाऊ, आम्ही विरोध करतोय कारण आमच्या आजुबाजूंच्यांची प्रचंड गैरसोय होत्येय म्हणून, लोकांना त्रास होतोय म्हणून ,लोकाचे जीव चाललेत म्हणून.
आणि आपल्या इकॉनॉमीचेही कडबोळे होतेय म्हणून.

30 dec नंतर actual outcome कळेल,

" प्रचंड गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची? हा धागा ११ नोव्हेंबरला च काढलात ?

<<<< आम्ही विरोध करतोय कारण आमच्या आजुबाजूंच्यांची प्रचंड गैरसोय होत्येय म्हणून, लोकांना त्रास होतोय म्हणून ,लोकाचे जीव चाललेत म्हणून. आणि आपल्या इकॉनॉमीचेही कडबोळे होतेय म्हणून. >>>>>>

Rofl

Rofl

Rofl

Maayboli MMS LOOT.jpg

२. फक्त अमुक इतक्या मूल्याचं चलन आणलं की झालं. नाही का? मी बँकेतून कॅश काढतो, तेव्हाही चेकच्या मागे १०० च्या किती ,५० च्या किती आणि १० च्या किती हव्यात ते लिहून देतो. बस कंडक्टरला आनि भाजीवाल्यांना ५०० ची नोट देत नाही. पण हा माझा मूर्खपणाच आहे. जे काम ५०० च्या १० नोटांत होऊ शकतं तिथे मी साधारण १५० नोटा घेतो. >>>>>>>

@ भरत - तुम्ही हे माझ्या उत्तराला प्रतिसाद म्हणुन लिहीले आहेत असे समजुन उत्तर देतो.

१. ५०, २० आणि १० च्या नोटांच्या संख्येत कमी झालेली नाही.
२. जे काम १०- २० -५० रुपयांच्या नोटेत होणे आवश्यक आहे, ते तसेच होयला पाहिजे आणि ते होत राहिल पण. म्हणजे भाजी आणणे, दुध आणणे. रिक्षा, बस वगैरे. पण बरेच व्यवहार असे असतात ५०० -१०००- २००० च्या रेंज मधले. जिथे दुसरे ऑप्शन शक्य असुन आपण वापरत नाहीत. मी स्वता पेट्रोल १५०० रुपये कॅश देऊन भरायचो. अगदी ४००-५०० रुपयांची औषधे सुद्धा कॅश देऊन आणाय चो. पण हा निर्णय झाल्यापासुन मी कार्ड वापरायला लागलो. माझ्या सारख्या १० लाख , १ कोटी लोकांच्या वर्तनात जर माझ्या सारखा फरक पडला तर सध्या आहेत त्या नोटा कार्ड न वापरणार्‍या जनतेत सर्क्युलेट होतील.
३. नोटा छपाईचे काम जोरात चालू आहे. ५०० रुपयाच्या नोटा चलनात आल्या की बराच फरक पडेल.

सती जाणार्‍या बाईला , तू सती जाणं कसं ग्रेट आहे हे सांगितलं की तीही तयार होते. त्यातलाच प्रकार . थोडं भाजेल पण नंतर स्वर्ग मिळेल.तसंही सती जाणारे आपल्यातले थोडेच आहेत? त्यांनी देशासाठी इतकं सोसायला काय हरकत आहे?

स्वर्ग दिसेल तेव्हा पाहू.
----
या धाग्यापासून प्रेरणा घेऊन तर आदर्णीय पंप्रंनी अ‍ॅपसर्व्हे घेतला.

एक मात्र आहे. मोदींच्या प्रचारयंत्रणेचे अगदी कौतुक वाटते. नोटबंदीचे गुणगान करणारी गाणी रचून ती उत्तर भारतात खेडोपाडी प्रसारित करण्यात आली आहेत. उत्तर भारतात कुठल्याही घरगुती मंगल समारंभात एकत्र येऊन गाण्यानाचण्याची प्रथा आहे. त्यावेळी या गाण्यांच्या तालावर बायाबापड्या नाचताहेत. लाउड स्पीकरवर ही गीते वाजताहेत. नोटबंदीचे फायदे घरोघर पोचून लोकांना तोंडपाठ झाले आहेत. मोदी म्हणजे काळा पैसारूपी असुराचा संहार करणारा कुणी अवतार असे लोकमत बनवले जात आहे.
कौतुक वाटते.

भाऊ, आम्ही विरोध करतोय >>>>>

मी काँग्रेस, ममता वगैरेंच्या विरोधाबद्दल बोलतोय. त्या विरोधामागे ही योजना यशस्वी तर होणार नाही ना अशी भिती आहे का? कारण योजना यशस्वी होणार नाही अशी पक्की खात्री असती तर ते रीलॅक्स्ड असते.

आता तुम्ही कृपाकरुन सिब्बल, ममता, मुलायम, आनंद शर्मा, उद्धव, राज ह्या लोकांना गरीब जनते बद्दल कळवळा आहे असे स्टेटमेंट करु नका. असे केलेत तर काही काळानंतर तुमचे तुम्हालाच हसायला येइल Happy

प्रामाणिकपणे सांगतो माझी शून्य गैरसोय झाली!!

मला वाटते ज्यांना हा निर्णय यशस्वी होण्याची प्रचंड भीती वाटतेय त्यांची आणि ज्यांना ५०० व १००० च्या नोटा खपवायची चिंता आहे त्यांची सर्वात जास्त गैरसोय झाली आहे.

< ५०, २० आणि १० च्या नोटांच्या संख्येत कमी झालेली नाही.
२. जे काम १०- २० -५० रुपयांच्या नोटेत होणे आवश्यक आहे, ते तसेच होयला पाहिजे आणि ते होत राहिल पण. म्हणजे भाजी आणणे, दुध आणणे>
५०० ,१००० च्या नोटा बंद पडल्या, लाखातले ८५ हजार गायब झाले, वर त्या नोटा बदलून १०० च्या देणार. (मग कधीतरी २००० च्या आणि आणखी कथीतरी ५००च्या) तर सगळा ताण त्या ५ ते १०० च्या नोटांवर येतो, अगदी २००० च्या नोटेचाही हे लक्षात येतंय का?
दुसरीकडे लोकांना १००० रुपये म्हणून १० ची १०० नाणी दिली जाताहेत बँकांतून.

तुम्हीच आधी म्हणालेलात की ५०० च्या नोटा रद्द केल्याची उणीव दुसरी ५०० ची नोट छापून भरण्यापेक्षा २००० च्या नोटा छापून लवकर भरून काढता येते. त्याबद्दल हे लिहिलंय.

आधी ऐकलेलं की महिना अखेरपर्यंत सगळं सुरळीत होइल. मग वर्ष अखेरपर्यंत. मग आर्थिक वर्ष अखेरीपर्यंत.
नक्कीच सुनियोजित ऑपरेशन असणार.

<<<<< मी काँग्रेस, ममता वगैरेंच्या विरोधाबद्दल बोलतोय. त्या विरोधामागे ही योजना यशस्वी तर होणार नाही ना अशी भिती आहे का? कारण योजना यशस्वी होणार नाही अशी पक्की खात्री असती तर ते रीलॅक्स्ड असते. >>>>>
well said !! Wink

<<<< आता तुम्ही कृपाकरुन सिब्बल, ममता, मुलायम, आनंद शर्मा, उद्धव, राज ह्या लोकांना गरीब जनते बद्दल कळवळा आहे असे स्टेटमेंट करु नका. असे केलेत तर काही काळानंतर तुमचे तुम्हालाच हसायला येइल >>>>>

Biggrin

३. नोटा छपाईचे काम जोरात चालू आहे. ५०० रुपयाच्या नोटा चलनात आल्या की बराच फरक पडेल. >>>> केव्हाच आल्यात आणी त्यामुळे बराच फरक सुद्धा पडलाय, एटीममधल्या रांगा कमी झाल्यात

हो. समोर रांग आहे असं एटीएम मला आतापावेतो दोनदाच दिसलंय. बाकीच्या वेळी शटर डाउनच असतं बिचार्‍याचं.

>>> मला वाटते ज्यांना हा निर्णय यशस्वी होण्याची प्रचंड भीती वाटतेय त्यांची आणि ज्यांना ५०० व १००० च्या नोटा खपवायची चिंता आहे त्यांची सर्वात जास्त गैरसोय झाली आहे. <<<< Lol

अहो सत्य असे चव्हाट्यावर नस्ते हो मांडायचे ! मग शिकलात काय या धाग्यातुन अन लाल्या मिडियाकडुन तुम्ही? Wink
तुम्ही असे म्हणायचे अस्ते की आजुबाजूंच्यांची प्रचंड गैरसोय होत्येय म्हणून, लोकांना त्रास होतोय म्हणून ,लोकाचे जीव चाललेत म्हणून, आणि आपल्या इकॉनॉमीचेही कडबोळे होतेय म्हणून , ...... Proud

हे जे मी वर लिहीलेय ते जे पहातेय आमच्या ईकडे ते आहे.

असो, मला या वादात पडायचे नाही तुमचे चालु द्या.

ईथे समर्थन किंवा असमर्थन केल्याने तसाही काहीच फरक पडणार नाहीये

ह्या सर्व प्रकारात, लोक सरकारला दोष देत आहेत हे ठीक आहे पण कोणी हे अजिबात लक्षात घेत नाहीये की

जर * लोकांना खरोखर प्रचंड त्रास होत असेल तर एक समाज म्हणुन भारत पूर्ण पणे नापास झाला आहे. रांगेत म्हातारी व्यक्ती आली तर तिला रांगेतल्या लोकांनी स्वताहुन पुढचा नंबर द्यायला हवा होता. युरोप अमेरीकेत हे घडते. जिथे स्त्रीयांसाठी राखीव सीट वर निर्लज्ज पणे बसणारे पुरुष असतात तिथे काय बोलणार?
हॉस्पिटल, डॉक्टर चेक घ्यायला नकार देतायत, कारण त्यांना आधीच्या अनुभवावरुन माहीती आहे की आत्ता गयावया करणारा पेशंट नंतर चेक बाउंन्स झालाकी ओळख पण दाखवणार नाही.

हीक१-२ उदाहरणे. पण जर हा समाज नीट असता तर ह्याहुन अधिक इंटेंसिटीचे धक्के सहज पचवू शकला असता.

समाजाला नावे ठेवणे पॉलिटीकली करेक्ट नाही, मग सॉफ्ट टारगेट काय तर मोदी , मग करा आरडाओरड .

* : जर हा शब्द महत्वाचा

>>>>जर * लोकांना खरोखर प्रचंड त्रास होत असेल तर एक समाज म्हणुन भारत पूर्ण पणे नापास झाला आहे. रांगेत म्हातारी व्यक्ती आली तर तिला रांगेतल्या लोकांनी स्वताहुन पुढचा नंबर द्यायला हवा होता. <<<<

पण हे सगळे झाले कोणामुळे? मोदी सरकारच्या घिसाडघाईत घेतलेल्या निर्णयामुळेच ना? समाज कसला सुधारतोय आपला? समाजातील ९५ % माणसे त्रास सहन करूनही हा निर्णय योग्य होता असे म्हणण्याइतकी कोडगी आणि खोटारडी आहेत. ती काय सुधारणार?

टोचा ,

२००० रूची नोट एटीएम मधे न बसणे ह्या मागे जे काही कारण आहे ( असल्यास ) ते जाहीर करणे गरजेचे आहे अस तुम्हाला वाटत नाही काय ? नक्कीच खोट्या नोटा हे कारण असू नये , कारण इतर सर्व कॉपी करणार्याला साईज फारस अवघड नसाव . मग कारण काय असाव ? सुरूवातीचा सगळा घोळ यामुळेच झाला ना ? एटीएम मधे १०० च्या नोटा कितीही घातल्या तरी लवकर संपणारच .
आपल्यापेक्षा सरकारी बाबूना जास्त कळत हे मान्य केल तरी ते काय हे मला कळायला नको का ?

बिग बझार कि रिलायन्स याने मला फरक पडत नाही , पण सरकारने हे करण चुकीचे आहे अस वाटत नाही का ? असे डिसिजन घ्यायचेच का की ज्यात फेवरिझ्म वाटू शकतो ? असेही फक्त २६० जागी देणार आहेत ते , त्याने किती फायदा होणार आहे ?

Good diversion. लोकांना त्रास होतोय हे मान्यच नाही तर त्यावर उपाय कशाला शोधायचे त्यावर.
सरकारी नोकरांना रोखीत पगार द्यायचाआणि रस्त्यावरच्या माणसाला त्याच्या बँकिंगची , व्यवहाराची पद्धत बदलायला सांगायचं.

पण सरकारने हे करण चुकीचे आहे अस वाटत नाही का ? असे डिसिजन घ्यायचेच का की ज्यात फेवरिझ्म वाटू शकतो ? >>>>>>> हे बरोबर नाही हे मी तिथेच मान्य केले होते. पण माझ्या मते डीमार्ट, मोर सारख्या लोकांनी मागणी केली तर त्यांनाहहीहे मिळु शकेल.

मोदींच्या प्रचारयंत्रणेचे अगदी कौतुक वाटते >>अगदी 'तारक मेहता...', 'काहे दिया..'' यां मालिकाम्धुन देखिल डोस्क्यावर राष्ट्रप्रेमाचे हातोडे मारणे सुरु आहे

समाजातील ९५ % माणसे >> वाचलेल्या बातमीनुसार १२५ करोड लोकसंख्येच्या देशातून ५ लाख लोकांचा सर्वे करुन (तोदेखिल स्मार्ट फोन वरील अ‍ॅप द्वारा) काढलेली टक्केवारी म्हणातायत का हे?? % लक्शात घ्यायचं तर ३२% / ६८% घेऊया कां?? आणि हो, केजरीवालची खिल्ली उडवत होता ना, की उठसुट लोकांकडुन फीडबॅक मागवतो. मग मोदींनी काय केलं?? तो किमान मगरीचे आसू तरी ढाळत नव्हता

जर तुम्ही म्हणता तसा लोकांना खरच खुप खुप त्रास झाला तर पुढच्या निवडणुकी मोदी त्याची जबरी किंम्मत मोजेल.
<<

"जर पुढची निवडणूक झाली तर"

***

आजकाल आयडी घेताना उलटी अक्षरे लिहायची फॅशन आली आहे.

उदा रषातु इ. Wink असा एक आयडी अ‍ॅप्ट बसलेला दिसला जुन्याच रांगेत.

>>पण जर हा समाज नीट असता तर ह्याहुन अधिक इंटेंसिटीचे धक्के सहज पचवू शकला असता.<<

टोचा, कमाल आहे तुमची. तिकडे लाखो लोक कॅशविना उपासमारीने/बॅंकेच्या लाईनीत चेंगरुन मरत आहेत आणि सरकारला दोष देण्याऐवजी तुम्हि समाजालाच दोषी ठरवताय? सरकारने नाक घासुन माफि अजुनपर्यंत का मागितली नाहि हा प्रश्न मुळ समस्येपेक्शा खुप मोठ्ठा आहे. ते केजरीवाल, राहुल गांधी, ममता बॅनर्जी काय मुर्ख शिरोमणी आहेत?..

अग्गोबै पुन्हा वॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम येणार.

मोदीकाका बाँब टाकणार होते.

पण हे तर मांडवली करायला निघाले !

फिफ्टी कुछ तेरे दिल मे फिफ्टी , कुछ मेरे दिल मे फिफ्टी.

जमाना है बुरा !!!

बरं.

डेबिट कार्डावर २००० रुपये मिळणार, ते बिगबाजार फ्यूचर ग्रूप च्या मालकीचे आहेत, जी अडानी यांची कंपनी आहे.

अय्या,मग 'रिलायन्समध्ये नाही मिळत, पार्श्यालिटी नाही' म्हणणार्‍यांचं काय?

'अडाण्यांचा राजा' अशी एक गोष्ट होती ना?

Pages