तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
चार पाच दिवसांपूर्वी बातमी
चार पाच दिवसांपूर्वी बातमी होती कि सरकारी कर्मचा-यांना नोटाबंदीमुळे दहा हजार (क्लास थ्री पर्यंत) दहा हजार उचल मिळणार. पगारातून कापून घेतली जाणार. ही बातमी बहुतेक त्याबद्दल असावी.
सरकारी कर्मचारी हीच माणसं आहेत का ? बाकीच्यांना त्यांची स्वतःची कॅश मिळत नाहीये.
७५० चे गृहीतक २४००० च्या
७५० चे गृहीतक २४००० च्या हिशेबानी आहे ना? अहो इथे दिल्लीत लोकांना २४ सोडा ४-५ हजार मिळायची पण मारामार होतेय. डिमांड सप्लाय मॅच होत नाहीये. इतके देता नाही येणार, तुम्ही प्लिज ५-६ हजार घेवून जा आज अशी विनवणी करत आहेत बॅंक कर्मचारी.
असो.... कुणालाही स्पेशल
असो.... कुणालाही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची गरज नाही. नियम सगळ्यांना सारखाच असावा एवढाच मुद्दा होता.
तीच मारामारी जी होत आहे
तीच मारामारी जी होत आहे त्यातून ७५० माणसे कमी होतील. त्यामुळे सूक्ष्म फरक पडेल. पण हे वाईटातून चांगले काढणे झाले. मुळात ह्यांना एकरकमी रोख २४००० दिले जाऊ नयेत. मुळात नेहमीसारखेच पगार व्हावेत. पण खरंच कॅश द्यायची असेल तर जुन्या नोटा द्याव्यात आणि महिन्याभरात त्या त्यांनी एक्स्चेंज करून घ्याव्यात.
तरीही, ही बातमी पूर्ण आहे की नाही हे तपासायला लागेल. एखादे (कोणत्याही पक्षाचे) सरकार असे करणार नाही. विशेषतः सामान्यांना त्रास होत असताना स्वतःच्या कर्मचार्यांना अशी सवलत देऊन अप्रिय होणे सध्या परवडणारेही नाही.
कॅशमधे जुन्या नोटांच्या पगार
कॅशमधे जुन्या नोटांच्या पगार दिला तर मज्जा येईल. तो अकाउंट मधे भरायला एक रांग नी चेकने काढायला दुसरी.
कुठून अवदसा आठवली म्हणून रडत बसतील!
बँक जुन्या नोटा कशी देईल ?
बँक जुन्या नोटा कशी देईल ? काही पण काय ? त्यांना खडी फोडायला जायचंय का ?
कॅशमध्ये जुन्या नोटांचा पगार
कॅशमध्ये जुन्या नोटांचा पगार थेट पार्लमेंटने द्यावा. बँकेने जमलेल्या जुन्या नोटा सरकारला द्याव्यात आणि त्यातून पगार केला जावा.
(No subject)
भारी आहे चित्र भाऊ.
भारी आहे चित्र भाऊ.
सूरतमधिल शेतकर्यांची गैर्सोय
सूरतमधिल शेतकर्यांची गैर्सोय होत नाही म्हणुन त्यांनी काढला मोर्चा!
मस्तच भाऊ.
मस्तच भाऊ.
वीकांताला लेक व मैत्रिणी
वीकांताला लेक व मैत्रिणी कोल्डप्ले च्या कार्यक्रमाला गेल्या होत्या तिथे बरोबर असावेत म्हणून २००० च्या दोन नोटा दिल्या होत्या. तिथे बराच वेळ पाणी सुद्धा उपलब्ध नवते व जवळ जवळ ११-१२ तास सर्व लोके उभीच्या उभी होती. ते अलाहिदा पण मग स्टारबक्स मधून ह्या चे सुट्टे मिळाले. आज जाताना त्यातलेच १०० रु चे नोटा तिला बरोबर दिल्या. त्यामुळे मी तिच्या साठी काढून आणलेल्या तश्याच आहेत त्या मी आता महिना अखेर किंवा पाच सहा तारखे परंत पुरवणार. ६० रु रोजचे रिक्षाचे सोडले तर तसा खर्च नाही.
शिवनेरीचे तिकीट ऑनलाइन काढले होते पण ते चुकून कालच्या तारखेचे होते मग लाइन मध्ये उभे राहून ४४६ रु. कॅश देउन दुसरे काढले व तिला रवाना केले. म्हणजे तिच्याकडे १५-२० दिवसांच्या
हिशेबाने दिलेले त्यातले ५०० रु आमच्याच चुकीने कमी झाले. ही तुलनेने अर्बन एलिट टाइप परिस्थिती आहे. पण जे विद्यार्थी इतर वसति गृहातून राहतात, घरून पाठवलेल्या मनि ऑर्डर वर किंवा इतर मार्गानी पैसे जोडून राहतात व अभ्यास करतात त्यांच कसे मॅनेज होत असेल.
दुसरा गृप घर कामे करणा र्या लोकांचा. इथे सोसाय टीचे काहीतरी इशूज चालू असतात म्हणऊन सफाई काम गारांचे पैसे वेळेवर दिले च जात नाहीत. मग ते इथे तिथे उधार घेत राहता त मी पूर्वी मदत करत असे पण माझ्या शक्तीबाहेर त्यांची गरज गेल्या ने आता बंद केले कारण त्यापेक्षा ते काम आपण केलेले फुकटात स्वस्त पडते. तर त्यांच्या हातात पगार नाही. दिवाळीचे कलेक्षन संपले आहे. पण नोकरी सोडता येत नाही. कारण आधीची वसूली राहिलेली असते.
मी महिना अखेरीस मोलकरणीला ८०० रु देणार ते बाजूला ठेवले आहेत. पण जे हात उचलून मदत करत होतो ते पार बंद पडले. ह्या बाय का अशक्य अंतरे रोज चालून येतात. मग ८ तास श्रमाचे काम करतात व
परत बस ( म्हणजे ग्रेट सुविधा) नाहीतर चालत घरी. अशांचे संसार, ओढाताण किती होत असेल? ह्याचा अशी योजना एकदम अमलात आण ताना विचार केला गेला होता का?
यू टयूब वर मिनिस्टरच्या मुलीचा लग्न सोह ळा पाहिला अगदी शिसारी येते ते दागिने व कपडे पाहून.
त्याला अशांना काय त्रास होत असेल बरे?
<<यू टयूब वर मिनिस्टरच्या
<<यू टयूब वर मिनिस्टरच्या मुलीचा लग्न सोह ळा पाहिला अगदी शिसारी येते ते दागिने व कपडे पाहून.
त्याला अशांना काय त्रास होत असेल बरे?>>
----- सहमत.
मा गडकरीकडे लग्न होऊ घातलंय
मा गडकरीकडे लग्न होऊ घातलंय ...
मोठा प्रश्न आहे
मोठा प्रश्न आहे मला...अमांकरीता. ते वेगन मध्ये स्कूटर नको म्हणून पोलिसांना दिली मग रिक्शात वेगन पेट्रोल घालता का स्वतः घेऊन???
मोदीने कणा मोडलाय. ज्यांना
मोदीने कणा मोडलाय.
ज्यांना दिसत नाही ते आंधळे आहेत पण जे ढोंग घेऊन बसलेत ते मोदी इतकेच पापी आहेत!
मोठा प्रश्न आहे
मोठा प्रश्न आहे मला...अमांकरीता. ते वेगन मध्ये स्कूटर नको म्हणून पोलिसांना दिली मग रिक्शात वेगन पेट्रोल घालता का स्वतः घेऊन???
>> वेगन पेट्रोल कुठे मिळेल दादा? माहीत नाही. त्या धाग्यावर सांगा इथे नको.
झाडु काका जरा घुश्श्यात
झाडु काका जरा घुश्श्यात लिहितात खरे पण प्रतिसाद जेनुइन असतात. विचार करण्यसारखे.
(मी भक्त किंवा हेटर कुणी नाही.)
खुप म्हणजे खूप म्हणजे खुप
खुप म्हणजे खूप म्हणजे खुप आनंदाची बातमी ( माझ्यासाठी, त्या बिचाऱ्यांसाठी खूsssप वाईट)
१ तारखेपासून नवीन घरात शिफ्ट झाले. घर शोधताना बऱ्याच सायटी पाहिल्या होत्या पण कधी जागा मला हव्या त्या भागात नाही, कधी भाडं परवडणारं नाही तर कधी बॅचलर्स नकोत यामुळे अडलं. शेवटी नाईलाजाने ब्रोकरकडे गेले आणि हवं तसं सगळं मिळालं पण एका महिन्याचं भाडं इतकी फी देऊन. आत्ता त्या ब्रोकरचा फोन आला होता की घराचे कागदपत्र घेऊन जा लवकर, इथेच पडलीत केव्हापासून. दुकान बंद करतोय, आता आम्हाला कोण देणार रोख पैसे! दुसरं काही बघतोय.
त्याच्या धंद्यावर गदा. इतके पैसे मिळतात त्याला पण तो उत्पन्न दाखवत नव्हता. ते दाखवून अजूनही धंदा करू शकतो तो, पण नाही करायचा.
पुढच्यावेळी मला हवे असणारे घरमालक लोक ऑनलाईन जाहीरात देवोत व मला बिना ब्रोकरेज घर मिळो. जय मोदी.
हा धागा आता रद्द करा
हा धागा आता रद्द करा अॅडमिन!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात 'नोटबंदीला विरोध करणारे देशद्रोही.'
इथे विरोध करणार्यांत कुणी महाराष्ट्रातले लोक असले तर प्रॉब्लेम व्हायचा उगीच.
लिहिणार्यांनाही आणि मायबोलीलाही.
(आम्हाला काही त्रास होणार नाही. आमचे आणि शेजारच्या राज्याचे असे दोन्ही मुख्यमंत्री 'लोकांना त्रास होतोय आणि निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित झाएली नाही' हे स्चतःच कबूल करतायत.)
कॉसमॉसच्या शाखेत आज रांगेत
कॉसमॉसच्या शाखेत आज रांगेत पाच माणसे होती, दररोज तीन हजार मिळतात. दोन हजाराची एक नोट आणि शंभराच्या दहा! आठवड्याला वीस हजारपर्यंत मिळतात. पाचशेच्या नोटेचा पत्ता नाही. ए टी एम बंद! कोलाहल नाही. चेहरे हसरे! हा धागा वाचलेले तेथे माझ्याशिवाय कोणी नसावे.
शहरी भागात परिस्थिती निवळत आहे.
शहरी भागात परिस्थिती निवळत
शहरी भागात परिस्थिती निवळत आहे.
सूरत शहर नसावं
गाडी भरुन क्याश घेउन जाणारा
गाडी भरुन क्याश घेउन जाणारा भाजपा मंत्रीही देशप्रेमीच का ?
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/cities/delhi/demonetisation-jobless-lab...
९ तारखेपासून तणावामुळे भारतात ११ बँक कर्मचार्यांचा मृत्यू झाला आहे. चलन रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असून बँक कर्मचार्यांना झालेल्या त्रासाची जबाबदारी घेऊन रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कर्मचार्यांच्या एका संघटनेनं केली आहे.
http://indianexpress.com/article/business/banking-and-finance/demonetisa...
मी आत्ता कांदिवली पश्चिमेला
मी आत्ता कांदिवली पश्चिमेला आहे, माझ्या समोर देना बँकेच्या समोर लाईन लावून मिन 30-35 जण उभे आहेत.
१) मुंबई शहर नसावे
2)10 दिवसं नंतर 30 लोक दुपारी 2 ला उभे राहणे हि परिस्थिती निवळलेली आहे, म्हणजे पहिले 5 दिवस परिस्थिती हात बाहेर होती हे मान्य करताय का?
मी आज सकाळी ९.२५ ला एच्डीएफसी
मी आज सकाळी ९.२५ ला एच्डीएफसी नरीमन पॉइंट समोर एटीएममधे रांगेत उभी राजिले. ९.४० पैसे काधुन बाहेर.
कदाचित ऑफिस अरीया असल्याने गर्दी कमी आहे.
म्हणजे पहिले 5 दिवस परिस्थिती
म्हणजे पहिले 5 दिवस परिस्थिती हात बाहेर होती हे मान्य करताय का?
>> अजूनही हाताबाहेरच आहे. कंबाइन्ड इफेक्ट ऑफ ट्रंप इलेक्षन आणि चलन बंदी असा आहे की शेअर मार्केट पण जवळ जवळ बेअर ग्रिप मध्ये घुसले आहे. आजही ३४५ पॉइंट ने . डाउन आहे. एक
डॉलर ७० रु ला आहे आजमितीस. सातत्याने मार्केट डाउनच चालले आहे. आता ३० डिसेंबर परेन्त हे चालेल. मग एक महिना गेला कि १ फेब्रुवारीस बजेट आहे. त्यात किती धक्के बसवायचे प्लॅनिन्ग चालू आहे कोण जाणे. ( बाळाचा वाक्प्रचार उसना घेउन मग म्हणू नका आधी वार्न केले नाही म्हणून. ) मागील वर्शी पीएफ वर कर बसवायचा प्रयत्न झालाच आहे. म्हणजे सामान्य जनतेच्या आर्थिक नाड्या किती आवळायच्या ह्याचे हिशेब चालू आहेत आणि पक्के होत आहेत.
काउंटरच्या दोन्ही साइडला जे लोक वारले आहेत त्यांच्या प्रति दुखवटा. हे साधारण माझ्या वयोगटात ले व पुढचे लोक असल्याने सर्वांचे संसार अर्धवट मुले उघड्यावर, व कोणी वाली नाही. अशी परिस्थिती आहे.
त्यांच्या साठी तरी हा एक जीवन बदलणारा दु:खद ट्रिगरच आहे.
शेतकरी जणूं नोटा देऊन बियाणे
शेतकरी जणूं नोटा देऊन बियाणे खरेदी करू शकणार,
सरकार ने परवानगी दिली
सरकार ने परवानगी दिली> सरकार
सरकार ने परवानगी दिली> सरकार एक एक पाऊल मागे घेते आहे, मोदीजी संसदेत यायला तयार नाहीत कां बरं?
>>>> सिम्बा | 21 November,
>>>> सिम्बा | 21 November, 2016 - 14:21 नवीन
शेतकरी जणूं नोटा देऊन बियाणे खरेदी करू शकणार,<<<<
जणू नाही हो, जुन्या!
हे असंच काहीतरी ऐकता आणि टंकता बहुतेक!
नोटा देऊन आधीही मिळत होतीच.
आता जुन्या नोटांवरही मिळणार.
Pages