"थोडीशी गैरसोय" नक्की किती? आणि कोणाची?

Submitted by सिम्बा on 11 November, 2016 - 12:14

तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"

हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?

आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,

- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,

- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?

- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो

मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.

अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांपो,
सोनू कुठेकाय म्हणतायत?
त्या बिचार्‍या घरखर्चाची चौकशी या पानावर नको म्हणतायत फक्त!
Wink

सोनू, सीमाभागात प्रवास करण्याबद्दल अ‍ॅड्वायजरी आहे. कॅश क्रन्च मुळे क्लायंट प्रवास करत नाहियेत हे आत्ताच ऐकतोय. पण धन्यवाद. उद्या अजून माहिती काढतो की आम्हाला काही बघावे लागणार का ते.

तुमीच ओ तुमीच आक्का.

परवा डिमॉनेटायझेशनच्या तयारीच्या त्रुटींबद्दल लिहीलं तर ह निर्णय किती उपयोगी नी काय काय सांगायला लागले मला. आता ही महिन्याच्या खर्चाची चर्चा आधीच दुसर्‍या धाग्यावर झालीय तर इथे या धाग्याच्या अनुशंगाने लिहा म्हटलं तर मलाच जमाखर्च सांगताहेत. म्हणून, म्हणून मी त्या स्तुती धाग्यावर मोदींची स्तुती केलीय. त्यांना बरोबर विषय काय आहे ते कळलं. नमो नमः

>>> माझा ५ माणसांचा महिन्याचा किराणा दुधासहित ४८०० मधे बसतो. गॅसचे ५००/६०० वेगळे. कमीजास्त करुन साताठ हजारात घर चालतय महिनाभर.... कैच्च्याकै बोलायचे..! <<<
हे माझे वाक्य.
मी गायीचे दुध घेतो. घरात लहान बाळ्नाही, सबब अर्धा लिटर रोजचे २० रुपये, महिन्याचे ६०० !
रोजची भाजी २० रुप्यात जितकी येईल तितकी बसवतो, त्याचे ६०० !

[उरल्या ३६०० मध्ये तांदुळ्/गहु/किरकोळ कडधान्ये बसत नाहीत?
गॅस वेगळा. कमी जास्त करुन जस्तीत जास्त सात ते आठ हजार महिन्याला.....
मग आठवड्याला ४८०० लागतात कशाला? म्हणजे महिन्याचे १९२००????
अरे इतका पगार "कुणाकुणा" "सामान्याला " मिळतो? अन इतका नेट येत असेल हातात तर तो "सामान्य" कसा ?]

याव्यतिरिक्त लागतय काय, तसेही "आम्ही वरणभात खाऊ काटकसरी पेठी माणसे ", वरण परवडत नाहीत तर कडधान्य, ते देखिल नाही परवडले तर जे काय तोंडीलावणे असेल ते.
अन घरकर वगैरे काय दर आठवड्याला/ महिन्याला भरावे लागतात काय ? वीजबील देखिल दोन्/तिन महिन्यातुन एकदा भरतो, ते काय आत्ताच्या नोटांच्या "क्रायसिसवेळेस" मोजायचे कारण नाही.
विषय होता, जनसामाण्यांना दर आठवड्याला ठराविक रक्कम काढण्याची परवानगी असल्याने त्यांचे हाल होताहेत, अन मी म्हणतो होत नाहीयेत.
हिशोब दिला, तर त्यासंदर्भाने अत्यंत "खालच्या पातळीवर उतरुन वैयक्तिक टीकाटीपण्णी " केल्याने तुमचे मुद्दे व विव्हळणे सिद्ध होत नाहीच हे समजुन असा !
नशिब या येडचापांनी अजुन लिंब्या "वविला येतो" तर त्याचा खर्च कसा भागवतो, अन इथे का धरला नाही हे विचारले नाहीये..... ! Proud

जनसामान्यांना आठवड्याला जेवढे पैसे काढता येतील असं म्हटलंय, ते सगळ्यांना काढता येताहेत. बँकेत गेलं की मिळताहेतच हे पहिलं गृहीतक.
ते मिळवायला फार वेळ लागत नाही हे दुसरं गृहीतक.
ते हव्या त्या डिनॉमिनेशनच्या नोटांत मिळताहेत हे तिसरं.

सरकारी नोकरांना १०,००० रोख उचल का द्यावी लागतेय बरं?

सोनू कुठेकाय म्हणतायत?
त्या बिचार्‍या घरखर्चाची चौकशी या पानावर नको म्हणतायत फक्त!>> त्या सपष्ट तशा बोलल्या नाहीत हो. तसेच ते सोनुंना नव्हते. असो. मी आपला किराणा घराणा धरुन बसलो.

बाकी निर्णयाच्या नंतर Risk Analysis आणी त्यावरील उपाय कमी पडले यात मी सहमत आहे. असो.

महिन्याची 28 तारीख चालू आहे,
लोक डोमेस्टिक स्टाफ चे पगार कसे देत आहेत?

घरी 3 मदतनिस जरी म्हंटले तरी 10K पर्यंत कॅश लागेल (रेट पुण्यातील आहेत, कृपया 3 लोकांना 10k कसे पुरतील/किंवा अबब, 3 लोकांना 10k देता का? या वरून चर्चा करू नका.
आमच्या एक बाई चेक घेते म्हणाल्या, बाकी 3घी कॅश द्या म्हणाल्या.

>>> घरी 3 मदतनिस जरी म्हंटले तरी 10K पर्यंत कॅश लागेल (रेट पुण्यातील आहेत, कृपया 3 लोकांना 10k कसे पुरतील/किंवा अबब, 3 लोकांना 10k देता का? या वरून चर्चा करू नका. <<<<

जनसामाण्यांच्या हाल अपेष्टांवरुनचे विव्हळणे आता तिन तिन नोकर ठेवु शकणार्‍यांच्या "मिनी राजवाड्यात" राहाणार्‍यांच्या त्रासावर उतरलय का? Wink Lol

याच गतिने डिसेंबर महिना अखेरपर्यंत "ज्यांच्याकडच्या जुन्या नोटांची शेकोटी करायला"लागली त्यावर उतरले तर नवल वाटायला नको....नै का? Biggrin

मी मदतनीसबाईंना सोडचिठ्ठी दिली दुसऱ्या काही कारणाने. चेक किंवा ऑनलाईन पैसे घेणारी दुसरी न मिळाल्याने सध्या स्वतःच करतेय सगळं. कॅश मिळायला लागेल सुरळीतपणे तेव्हा परत लावेन. तोपर्यंत ऑनलाईन जास्तीचे पैसे भरून जेवण जर बनवायचा कंटाळा आला किंवा उशीर होत असला तर.

महिन्याची 28 तारीख चालू आहे,
लोक डोमेस्टिक स्टाफ चे पगार कसे देत आहेत?>>
आमच्या घरी येणार्‍या धुणे व भांडीवाल्यांना नोटबंदी झाल्या झाल्या विचारले होते की तुम्हाला काही मदत हवी आहे का. तेव्हा दोघींनी त्यांच्या कडची साधारन १०-१२ हजार कॅश स्वतःच्या खात्यात भरली व पेस्लिप भरुन पैसे काढले असे सांगीतले.

तसेच आता एकतर चेकने देता येतील किंवा त्यांना रोखच हवे असतील तर बँकेत खात्यातुन चेक किंवा पेस्लिपने पैसे काढता येत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे व स्वानुभवाने २०-२४ हजार पर्यंत रक्कम काढता येत आहे.

लिंबुटिम्बु,
जे लोक थोडीशी गैरसोय सोसू म्हणत आहेत पहिल्या दिवसापासून, त्यांचे प्रोफाइल सांगतोय मी,
1)स्वयंपाक 2) कपडे भांडी 3) वरकाम/बेबी सिटिंग 4) गाड्या धुणे
इतका डोमेस्टिक स्टाफ त्यांच्या कडे असतोच,

सर्जिकल स्ट्राईक 8 ला झाल्याने हि गैरसोय लक्षात आली नसेल, म्हणून विचारतोय.

लिंब्या ,

२० रु ची भाजीत भागवतो , नसेल तर कडधान्य , नसेल तर तसेच काहीतरी इ इ वाचून वाइट वाटले.

स्वातंत्र्यानंतर ६० वर्षानेही ए़उकेटेड माणसाचे ही अवस्था असेल तर सिस्टिमबरोबरच व्यक्तीनेही इम्प्रुव्ह व्हावे लागेल.

असॉ.

अआता मोदी अलेत , तर तुमचे इन्कम वाढो व दहा हजाराचे न्ञुट्रिशस खाण्याची तुला लवकर संधी मिळो.

मी उद्या बॅंकेत जाऊन खात्यातून काढणार आहे, चेकने. ४ हजार रु १०० च्या नोटांमध्ये मिळतात जास्तीत जास्त. उरलेले दोन हजार च्या नोटांनी पगार देणार. आता एक्स्चेंज बंद झाल्यामुळे रांग नसेल असा अंदाज आहे. त्रास झाला तर येते इथे शंख करायला. आसपासच्या खेडेगावात पाठवून मग पाचशेच्या नोटा पण मिळतील अस स्टेट बँकेच्या लोकांनी सांगितलंय.

>>> स्वातंत्र्यानंतर ६० वर्षानेही ए़उकेटेड माणसाचे ही अवस्था असेल तर सिस्टिमबरोबरच व्यक्तीनेही इम्प्रुव्ह व्हावे लागेल. <<<<
आम्ही ते कॉन्गींच्या ६० वर्शात डेव्हलप केलेल्या तसल्या सिस्टिमबरोबर, तशाप्रकारे "इम्प्रुव्ह " होणे नाकारले.
आम्ही त्यांच्या "सिस्टीममधे" सहभागी होऊन "पैशे/लाच्/कमिशन" खाल्ले नाही, अन नाही त्यांना सपोर्ट केला !
तेव्हा आम्ही असल्याप्रकारे "इंप्रुव्ह" होणार नाही, ते धंदे इतरांचे.... आमचे नाहीत ! Proud

>>>> अआता मोदी अलेत , तर तुमचे इन्कम वाढो व दहा हजाराचे न्ञुट्रिशस खाण्याची तुला लवकर संधी मिळो. <<<<
माझे इन्कम वाढले तर ते माझ्या "लायकीनुसार" वाढेल वा कमी होईल. मोदी देश चालवायला आहेत, माझे घर चालवायला नाहीत, इतके भान आम्हा मोदी भक्तांमध्ये नक्कीच आहे. Proud अन तोवर "वरणभात" खाऊनही (माझ्याबाबतीत गिळूनही) माझे "जिम" चा व्यायाम व्यवस्थित चालू शकेल.... ! दहा हजाराच्या न्युट्रीशन पावडरींची गरजच नाही Wink

शिवाय वैयक्तिक इनकम वाढविण्यासाठी सरकारदरबारी लाळ घोटत "भीका" मागायचि वा त्यांच्या ताटाखालचे मांजर बनायची ( लाल्यांची/काँगींची ) पद्धत आमच्यात नाही , त्याचबरोबर, वैयक्तिक आयुष्यातल्या यशापशाला/अडीअडचणींना, उठसुठ सरकारला वा मोदींना जबाबदार धरायची पद्धतही आमच्यात नाही.

मी आजच अ‍ॅक्सिस चेंबुरातून पैसे काढले.

५ हजार ... दोन हजाराच्या २ व पाचशेच्या २ ...

९ ते११. ३० ... अडीच तास.

डॉक्टर लेट आले म्हणुन कंप्लेंट गेली.

चेंबुरची बहुतांश ए टी एम बंद आहेत किंवा लांब रांगा आहेत.

मोदींच्या कृपेने सर्व व्यवस्था सुधरुन तुझे आयुष्य सुखी व्हावे असे मी म्हटल.

मोदी सरकारची लाळ घोटायला जा असे मी नव्हते म्हटले.

शिवाय गेल्या ६० वर्षात जे प्रगत झाले तेही फक्त काँग्रेसच्या हुजरेगिरीने झाले , हेही गृहीतक वाचून हसू आले.

लोकांची स्मरणशक्ती फारच कमी असते की काय?

शीला दीक्षितांनी मागे चार जणांच्या कुटुंबाला मासिक किराण्याचा खर्च ६०० रुपयांच्या आसपास सांगितला होता. राज बब्बर का अजुन कुणीसे म्हणे १२ रुपयांत भरपेट जेवणही द्यायचे. आता ४८०० चा किराणा सांगितला तर विश्वास बसत नाही?

बायदवे, पिवळे / बीपीएल / अंत्योदय रेशनकार्ड असणार्‍यांना फारच स्वस्तात महिन्याचा किराणा मिळतो. केशरी रेशनकार्ड वाल्यांनाही रॉकेल वगैरे (कदाचित साखर, तांदुळ आणि दिवाळीत पामतेल देखील - नक्की खात्री नाही) मिळते.

एका आठवड्यात २४००० हजार काढता येत आहेत, चेकने. एकदा समजा रांग लावावी लागली तर महिना निघायला हरकत नाही. अर्थात जिथे -जिथे उपलब्ध आहे तिथे रोख न वापरता व्यवहार करायची सवय लागायला हवी.

>>> शिवाय गेल्या ६० वर्षात जे प्रगत झाले तेही फक्त काँग्रेसच्या हुजरेगिरीने झाले , हेही गृहीतक वाचून हसू आले. <<< असे वास्तव बघुन्/समजुनही "हसु" येणारे तुम्ही, तुम्हाला गरीबीतला "ग" कशाशी खातात हे तरी माहिती आहे का?
यातुनच जे "प्रगत " झाले ना, जिथेतिथे दिसुन येतात त्यांच्या उद्दाम श्रीमंतीचे प्रदर्शन, त्यांच्याकरताच नोटाबंदी आहे... अन हे सामान्यातील सामान्य माणुसही समजुन आहे Wink
जातिवंत श्रीमंत कधी माजोरीपणा करीत नाही, उद्द्दाम नसतो,
मात्र अशा "हुजरेगिरीतुन" बनलेले नवश्रीमंत व त्याच्या का॑य एकेक कथा वर्णाव्या उद्दाम/माजोरीपणाच्या... त्यांची मात्र नक्कीच, लईच गोची झालीये ४८०० च्या लिमिटने... Wink

धाग्यातील चर्चेवरुन हे नक्कीच सिद्ध होते की ज्यांना "गरीबी" काय असते, काटकसर कशाला म्हणतात, याची काडीचीही वास्तुपुस्त माहिती नसलेल लोक इकडे माबोवर अन तिकडे मिडीयात उगाचच "गरीबांचे हाल होताहेत होऽऽ " करीत लाल नक्राश्रू ढाळताहेत .... Proud

या लोकांची बौद्धिक मजल केवळ "पेठी लोक पाणीही विचारीत नाहीत, चहा विचारणे फार लांबचे राहीले" इतपत निंदा नालस्ती करण्यापुरतीच आहे, तेव्हा त्यांनी देशकारण/अर्थकारण वगैरेवर "भाष्य वगैरे" करण्याच्या खरे तर फंदात पडू नये...! असे माझे मत, Wink

मोघलांच्या वर टीका करुन झाली.. इंग्रज गेले.

काँग्रेस गेली.

बाजपेयी व मोदींची मिळुय्न आठ वर्षे झाली.

अन तरीही सिस्टिम वैट आहे हो हा आक्रोश काय संपत नाही.

श्रीमंतीचे प्रदर्शन वाइट की दारिद्र्य / साधेपणा यांचे ? या संभ्रमात आहे.

नोटा रद्द करुनही लोकल एलेक्शनात काँग्रेसच पुढे आहे.

म्हणजे काँग्रेस पैशाशिवायच निवड्य्क जिंकते की काय ?

माझा प्रश्न- कॅशलेस व्यवहार , डि़जिटायझेशन वगैरे खरेच कितपत शक्य होणार आहे? गेल्या आठवड्यात सारस्वत बॅकेच्या शाखेतून काँप्युटर डाऊन आहेत म्हणून आईबाबांना परत यावे लागले. असे या आधी बॅक ऑफ इंडीया, पोस्ट अशा ठिकाणीही २-३ वेळा झालेले आहे. माझा नवरा देशात गेला होता तेव्हाही बॅक ऑफ इंडीयात असेच झाले होते. ही ठाण्यासारख्या शहरातली परीस्थिती तर बाकी ठिकाणी काय असा प्रश्न पडला.

अवांतर मुद्दा- सिक्युरिटी संबंधात बोलायचे तर या महिन्याच्या सुरवातीला आमच्या शेजारच्या गावात सिटीचे कॉम्प्युटर ओलीस धरले गेले होते. पोलीस रिपोर्टापासुन ते पाणी बिलापर्यंत सगळे व्यवहार ठप्प. हॅकर्सनी काही रक्कम मागितली होती काँप्युटर्सची सुटका करण्यासाठी.

भागवत सर, आपले स्वागत पुन्हा एकदा.

माझा प्रश्न अजून कायम आहे (त्याचे उत्तर मिळालेले नाही)..
नोटा सर्क्युलेशन मधे आल्या म्हणून गरीबांना फुकट थोडीच वाटल्या जाणार आहेत ? काम असेल तर त्यांच्याकडे पैसे येतील ना ?

स्वाती२, आईवडिलांना पैसे काढायला त्रास होतोय का? ATM मधून २-२ हजार काढलेले चालणार असतील तर बघा. आता महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामवालीचा पगार, दूधवाला, इस्त्रीवाला, पेपरवाला इत्यादी बिलं कॅशने भागवायची असतील.

मी ठाण्यात राहते आणि संध्याकाळी स्टेशन ते घर चालत जाताना २-३ तरी ATM चालू दिसतात. साधारण १०-१५ लोकांची लाईन असते. १५ मिनिटांत काम होतं. आज M.H. highschool जवळच्या सिंडिकेट बॅंक ATM मधून काढले. समोर Bank of India ATM चालू होतं. पुढे SBI पण चालू होतं. आज २००० ची नोट मिळाली.

लोक नाचत आहेत... ब्यान्केत पैसे आले... आता व्याजदर कमी होणार !!! सेविंगचे व ठेवीचे व्याज ब्यान्क लगेच कमी करते... पण कर्जाचे व्याजदर कमी होणार का ? म्हणजे सामान्य माणसाचे नुकसानच आहे ना ?

अश्वीनीके, आईबाबांकडे एटीएम कार्ड नाही. या वयात(८०+) आता ते वापरणे,सांभाळणे हे जमणार नाही. त्यामुळे मदतनीस मुलीबरोबर बॅन्केत जावून पैसे काढतात. त्याचे बरेचसे व्यवहार चेकने होतात. पण रोजची भाजी, मासे, किराणा वगैरे रोखीनी असते. त्यांची पैशाची सोय झाली फक्त बँकेतले कॉम्प्युटर डाऊन होते म्हणून एक फेरी परत मारावी लागली.

Pages