तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
बंगळुरात आमच्या भागातली तरी
बंगळुरात आमच्या भागातली तरी एटीएम्स शनिवारी आणि रविवारी चालू होती नक्कीच. पण २००० च्याच नोटा मिळत होत्या . रविवारी बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधे १०० च्या नोटा मिळत आहेत ही बातमी कुणीतरी येऊन ICICI ATM च्या रांगेत सांगितली आणि बरीच गर्दी तिकडे गेली म्हणे
बालनरेंद्र आणि उंदीर-घुशी
बालनरेंद्र आणि उंदीर-घुशी
एकदा बालनरेंद्रच्या वाड्यात उंदीर आणि घुशींचा फार सुशसुळाट झाला होता. दामोदरदास पंतांना व्यापारानिमीत्त बाहेरगावी जायचे होते. काम मोठे असल्याने त्यांना 2 महिने लागणार होते. पण घरी उंदीर घुशी फार झाल्यामुळे त्यांचा बंदोबस्त त्वरित करणे गरजेचे होते. दामोदरदास पंतांनी हिराबाईंना आवाज दिला. हिराबाई काठी टेकवत बाहेर आल्या. नार्धक्यामुळे हिराबाई फक्त बालनरेंद्रच्या वाढदिवसाला आणि बालनरेंद्र फुलबाग दाखवायला नेई तेंव्हा बाहेर पडायच्या. "बालनरेंद्र नदी मा मगरमछ पकडवा गया छे एने वार लागसे. सु काम छे? " हिराबाईंनी लागलीच माहीती पुरवली. " तो आला की त्याला घरातल्या उंदीर घुशी मारायला सांगा. त्यांचा प्रादुर्भाव फार वाढलाय. अन्नधान्याचे नुकसान होत आहे. घरातल्या तिजोरीत घुसून या उंदरांनी नोटा कुरतडल्यात. मी येईपर्यंत कसेही करून त्यांचा नायनाट कर म्हणा." इसे बोलून दामोदरदास पंत परगावी निघुन गेले.
बालनरेंद्र मोठा बालमगरमछ पकडून घरीच घेऊन आला. येता येता त्याने सगळा वाडा गोळा केला आणि "वाडेके भाइयों और बहनो.. आंज कां मटंणं मेंरी तंरंफं सें.. " म्हणत तो बालमगरमछ वाड्याचल्या पटेलाच्या जसोदेकडे सुपुर्द केला. हिराबाईंनी बालनरेंद्रला पुज्य पिताजींचा आदेश सांगितला. बालनरेंद्र करतो बंदोबस्त म्हणून निघून गेला. रात्री संपुर्ण वाडा गाढ झोपेत असताना अचानक धुर येऊ लागला. दोन चार लोकं जी वाड्यात झाडू लावायची, त्यांनी वाड्याला आग लागली म्हणून ओरडायला सुरूवात केली. सगळा वाडा क्षणात जागा झाला. बालनरेंद्र ने सर्वांना आश्वस्त करत वाड्यातल्या उंदीर घुशींचा नायनाट करण्यासाठी वाड्याला आग लावल्याचे सांगीतले. झोपेतून डोळे चोळत उठलेली भक्तू आणि संघू बाळांनी बालनरेंद्रचा या ऐतिहासिक कार्याबद्दल एकच जयघोष सुरू केला. वाड्यातल्या प्रत्येकाला उंदीर घुशी मारण्याच्या या महान कार्यात थोडी कळ काढण्याबरोबर त्यांनी मेलेल्या पाली, झुरळं आणि कुत्री मांजरं दाखवली. या महान कार्याने आपल्याला नंतर अच्छे दिन येणार म्हणून भक्तू संघू ठणकावून सांगू लागले. सुरूवातीला बरेच लोक इंप्रेस झाले. काहींनी कळ काढण्याची तयारीही केली. पण आगीचा भडका वाढतच चालला होता. वाड्याच्या कोठाराला आग लागली, तेंव्हा काही लोक भानावर आले. पण त्यांनी आवाज करण्याआधीच भक्तू आणि संघू ने त़्यांचे तोंड दाबले. बालनरेंद्र वाड्याला आग लावून शेजारच्या जपानवाडीला निघुन गेला. तिथे त्याने वाड्यातली निर्वासित टाळकी गोळा करून आपल्या वाड्याला आग लावूल्याच्या युक्तीबद्दल सांगितले. काही बालनरेंद्र भलताच विनोदी. आपली विनोद सांगण्याची खाज तो मौका मिळेल तिथे शमवतो. जपानवाडीतली वाडेकरी खळखळून हसले तसा बालनरेंद्र हरभ-याच्या झाडावर चढला.
इकडे वाड्यावर आग थांबायचे नाव घेत नव्हती. आता आगीने वाड्यातली घरं जाळायला सुरूवात केली. बरीच छोटी मुलं आगीत जळून खाक झाली. बालनरेंद्र जोशातच होता. तिकडून तो गोयवाडीला गेला. तिथे तो भडाभडा रडला. वाड्याला आग लावून मी चुक केली असेल तर मला हवी ती शिक्षा द्या म्हटल्यावर गोयवाडीतली लोकं ढसाढसा रडली. काल विनोद सांगणारा बालनरेंद्र आज ढसाढसा रडत होता. आग वाढत होती. लोकांच्या संयमाचा बांध सुटत चालला होता. हे पाहून बालनरेंद्र थोडा डाऊटमधे आला. त्याने हिराबाईला वाड्यातल्या लोकांची समजूत काढायला सांगीतले. हिराबाई साध्याभोळ्या. त्यांनी बालनरेंद्र सांगेल तसे केले. पण आता घरच जळतंय म्हटल्यावर वाडेकरी खवळले होते. बालनरेंद्रने उंदीर घुशी मारण्यासाठी 50 दिवस आग सुरू ठेवणे जरूरी असल्याचे सांगताच वाड्यातल्या लोकांचे अवसान गळाले.
दोन महिन्यांनी दामोदरदास पंत आले. वाडा पुर्ण जळून बेचिराख झाला होता. वाड्यातली 100 लोक मरण पावली होती. बालनरेंद्र ने मेलेली झुरळं आणि पाली दामोदरदास पंतांना दाखवली. दामोदरदास म्हणले, गाढवा, तुला उंदीर घुशींचा नायनाट करायला सांगितला होता. तू पुर्ण वाडा जाळलास. "मेल्या ना पण सगळ्या उंदीर घुशी.. " बालनरेंद्र नेहमीच्या वाढीव आत्मविश्वासाने उत्तरला. तोच 4-5 मोठ्या घुशींनी दामोदरदास पंतांनी आणलेला सामान पोखरून पळवला. आगीची वार्ता उंदीर घुशींना आधीच लागल्याने धुराचा वास येताच त्यांनी वाड्यातून काढता पाय घेतला होता.
समाप्त
©tarzan
काळाबाजार व भेसळखोरी करून
काळाबाजार व भेसळखोरी करून अगणित काळा पैसा कमवणार्या दोन अग्रणी व्यवसायांपैकी पेट्रोलपंपांना आधी परवानगी दिली होतीच.
आता बियाणे व्यापार्यांना.
म्हणजे कालपर्यंत पंपवालेच फक्त २५% कमिशनवर जुन्या नोटा बदलून द्यायचा धंदा करत होते. आता बियाणेवाल्यांनाही तो धंदा करण्याची परवणी मिळाली!
सरकारचे अभिनंदन.
किती खोटारडा आहे तो टिनू पै
किती खोटारडा आहे तो टिनू पै लेआऊटच्या कॉर्पोरेशन बॅंक ATM मध्ये कधीच पैसे नसतात. साडेतीन वर्षांचा अनुभव आहे. स्टेट बँक ATMमध्ये नेहमी ५० माणसं तरी लायनीत ऊभी असतात. जेव्हा लाईन नसते तेव्हा out of cash. बाकी तो असा का फिरला तोच जाणे. जरा Whitefield to electronic city to जेपी nagar to koरमangala to malleshwaram to yashwantpur असं काही केला असता तर मानला बाबा!
बाकी तो सोमवार ते शनिवार न फिरता रविवारी का फिरला? मग सिध्दरामैय्याला ला आधी नाव ठेवावी लागली असती म्हणून का? अचिकची लाडक्याला नावं ठेवणार?
देशात अनेक लोक बॅंक
देशात अनेक लोक बॅंक अकाउंटविना आहेत हे अनेकांना मान्य नाहीय बहुतेक. खुद्द मुंबईत, आमच्याकडे तात्पुरत्या ठेवलेल्या मदतनिसांचे अकाउंट नाही. स्वतःचे नाही, बायकोचेही नाही. बँकेत ठेवण्यासाठी पैसा शिल्लकच राहात नाही म्हणतात. नोटारद्दीकरणामुळे मला व्यक्तिशः खूपच त्रास झाला. घरातल्या एका व्यक्तीवर मोठी शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी आणि नंतरच्या उस्तवारीसाठी साधारण मोठी रक्कम बँकेतून मोठ्या नोटांमध्ये काढून घरी ठेवली होती. इथे अटेंडंट्सचे रोजचे वेतन (१२ तासांचे) ५०० रुपये आहे. सुरुवातीला एक दोन दिवस ५०० रुपये त्यांनी घेतले. नंतर म्हणू लागले की रोज बस्/रेल्वे तिकिटासाठी, किरकोळ भाजीसाठी नोट मोडून मिळत नाही तेव्हा शंभरचे सुटे द्या. आता पुन्हा शंभरमध्ये पैसे काढून आणणे आले. तेव्हढ्यात नोटाच रद्द झाल्या. आणि लगोलग बॅंकांपुढे रांगा. ए टी एम बंद. शंभरच्या नोटांचे रेशनिंग. मी म्हटले पुढच्या दहा दिवसांच्या पगाराचा आगाऊ चेक घ्या. तर म्हणे बँकेत खातेच नाही. अपना बाजार, सहकारी भांडारसारख्या दुकानांत जुन्या नोटा चालत होत्या तिथे तोबा गर्दी. लोकांनी पुढच्या तीन तीन महिन्यांचे सामान घेउन शेल्व्ज़ रिकामी केली होती. शिवाय अगदी घराजवळ अशी दुकाने नाहीत आणि असती तरी पेशंटला सोडून रांगा लावणे शक्य नव्हते. असो. जे हाल झाले ते झाले. रात्रीबेरात्री एटीएम वर रांगा लावणे वगैरे. आजच ओळखीतल्यांकडे लग्न होते. जाणे शक्य नव्हते म्हणून चारपाच दिवसांपूर्वी फोन केला होता. त्यांनीही अडचणींचा पाढा वाचला. अधिक रक्कम कबूल करून उधारीवर कामे करवून घ्यावी लागली. अवाच्यासवा पैसा गेल्याचे आणि वर जास्तीची धावपळ करावी लागल्याचे दु:ख नाही पण लग्न तरी व्यवस्थित पार पडेलसे वाटते म्हणाले. पुढचे पुढे.
15/11/2016 To, Shri Narendra
15/11/2016
To,
Shri Narendra Modi,
Honble The Prime Minister of India,
7, Lok Kalyan Marg,
New Delhi.
Dear Narendra Bhai,
I hope this letter finds you in best of health and happiness.
On 8th of November 2016, after I heard your speech on demonetization, I was really very happy and from within complimented you for such a bold and historic step. Unfortunately, happiness did not last long. In the morning of 9th Nov, someone very near and dear informed me that yesterday i.e. on 8th Nov at around 12 in the afternoon wife of one of the leading industrialist of Ahmedabad in her presence came to a very leading jewellery shop and as per pre-order purchased gold worth 20 crores. Gold was ready and packed and it took two minutes to transfer gold and cash to each other. She was incidentally present at the shop buying pre ordered jewellery worth Rs. 5 lakhs. She is a doctor of a very high repute and eminence.
Having worked so closely with you and being a part of your kitchen cabinet at one point of time in past it immediately clicked to my mind that information of demonetization must have been conveyed well before announcement to your near and dear industrialist who in total controls 50% of black money of this country. Having spent whole day inquiring, thinking on the above lines the information that I gathered is shocking, by adhering to such a popularistic measure you have really befooled the people of this nation.
In fact your above move was to enrich your near and dear ones, your party and your party workers by apparently putting forward the national cause and interest. I have a video recording with me which will clearly and beyond reasonable doubt prove that all the near and close associates of Shri Amit Shah since 8th Nov till today are engaged into exchange business. There is a big queue outside their office and residence for conversion of black money into white at a discounted rate of 37%, people have queued up outside their office and residence. One has to go without identity with at least a sum of Rs. 1 Crore which will be counted by the employees and a bag containing Rs. 63 lakhs of valid denomination would be handed over. I could have easily parted with that video but as I know you, you will punish those standing in queue rather than booking those persons engaged in the business who are near and dear to Mr. Amit Shah. However, I will show the video to two or three senior journalists and intimate you about the same so that you can cross check and verify the genuineness of my statement from the journalists.
http://www.kractivist.org/open-letter-to-modi-by-yatin-oza-ex-modi-confi...
हे खरे आहे का?
https://twitter.com/TruthOfGu
https://twitter.com/TruthOfGujarat?ref_src=twsrc%5Egoogle%7Ctwcamp%5Eser...
मी सध्या गुवाहाटीला आहे.
मी सध्या गुवाहाटीला आहे. सध्या मला गरज नव्हती म्हणून गेलेच नव्हते पैसे काढायला पण आता संपत आले म्हणून idbi च्या ATM मध्ये गेले कोणीच आत नव्हतं. मिळाले तर बरं ...दीड हजारच काढले ( हावरटपणा केला नाही, गरजूना मिळू देत) माझ्या नंतरही बरेच जणांनी काढले.
बेफि, माझ्या बाबतीत तेच झालं दोन धागे निघाले.
ठाण्यातली ATM आणि ब्रांचची
ठाण्यातली ATM आणि ब्रांचची गर्दी खूप कमी झाली. ऑफिसात मायक्रो ATM आलं होतं त्यातून लगेच 2K मिळाले. आत्ता ठाण्यात बॅंक ऑफ महाराष्ट्र, नौपाडा ATM ला लाईनीत १० मिनिटं उभी राहून 2K काढले. घरात २ दिवसांसाठी भरपूर पाहुणे येणार असल्याने पैसे काढून ठेवले.
ग्रामीण भागातला problem मायक्रो ATM धाडून कमी करता येईल. डेली व्हेजीसवर काम करणाऱ्या लोकांच्या कॉंट्रॅक्टर्सकडील एनरोलमेंट पाहून तेवढ्या रोकडीची व्यवस्था करायला हवी.
कामवाली चेक घेईन म्हणाली तरी तिला कॅशमध्ये पैसे देणार आहे कारण तिला बॅंकेत जायला जमले नाही तर तिची अडचण होईल. त्यापेक्षा मीच जातायेता वाटेतल्या ATM मधून पैसे काढून तिला देईन.
लोक मस्त हॉटेलिंग वगैरे
लोक मस्त हॉटेलिंग वगैरे करताहेत.

सर्वत्र कार्ड्स स्विकारली जाताहेत. लेकीला घेऊन गेले होते तेव्हां स्वतःच पाहीलेय

एक एटीम तर ग्राहकाअभावी बंद केलं होतं. जी काही रांग होती ती अगदीच नॉर्मल म्हणायला पाहीजे. ज्या वेळी त्रासदायक परिस्थिती होती तेव्हां मी ते मान्य केलं होतं.
एव्हढ्याच रांगा आहेत आता.
कुणाला पहिल्या दिवशी होत्या तशा रांगा आजही दिसल्या तर तारीख दिसेल असा फोटो अपलोड करा प्लीज.
कृपया, कॅश देताना बशीत पैसे
कृपया, कॅश देताना बशीत पैसे ठेवतो, तशी क्रेडीट्/डेबिट कार्डे ठेवत जाउ नका. क्लोनिंग झालं तर मोदी वाचवणार नाहीत.
प्लास्टीक मनी सोबत तो कसा वापरायचा ते शिकायला हवं, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं.
दुर्दैवी.. http://abpmajha.ab
दुर्दैवी..
http://abpmajha.abplive.in/maharashtra/nagpur-man-commits-suicide-due-to...
बापट कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
प्लास्टीक मनी सोबत तो कसा
प्लास्टीक मनी सोबत तो कसा वापरायचा ते शिकायला हवं, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं.>>> करेक्ट
परवा स्वाती०२ यांनी पण याबद्दल लिहिले होते.
आमच्या भागात एसबीआय सोडली तर बाकी कुठेही शनीवारी कॅश व्हॅन आली नव्हती. आज ३ वाजेपर्यंत पण बॅंकांमध्ये कॅश नव्हती. कधी नाही ते आज एचडीएफसी समोर फक्त १०-१५ जणांची रांग दिसल्याने परिस्थिती आटोक्यात आलेली दिसतेय असा माझा समज झाला होता. नंतर कळालं आज त्यांच्याकडे पण कॅश नव्हती. फक्त डिपॉझीटची रांग होती.
संध्याकाळी एका एटीएम मध्ये तासभर रांगेत उभे राहून पैसे काढले. एटीएममध्ये दोन कार्ड एका व्यक्तीने वापरू नयेत म्हणून गार्ड डोक्यावर उभा असतो. पिन बिन सगळं बघतो. ज्यांना एटीएमचा वापर करता येत नाही त्यांना तर सरळ पिन विचारून पैसेही काढून देतो. सगळ्या एटीएम्स मध्ये सध्या असंच चालू आहे असे रांगेतले लोक म्हणत होते. हे सुद्धा डेबीट कार्डाच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने चांगलं नाही ना?
अल्पनातै, 3.2 million अर्थात,
अल्पनातै,
3.2 million अर्थात, ३२ लाख डेबिट कार्डे काँप्रोमाईज झाली होती एका फटक्यात. ही Oct 21, 2016 ची बातमी आहे.
हो. ती बातमी वाचली होती. काही
हो. ती बातमी वाचली होती. काही बॅंकांनी त्यानंतर बरीच कार्ड रद्द केली/ परत दिली अशा आशयाची बातमी पण वाचल्याche आठवतंय. आयसीआयसीआय, एचडीएफसी यांची नावं होती बातमीत.
यूनियन बँकेच्या एका शाखेसमोर
यूनियन बँकेच्या एका शाखेसमोर आज अकरा वाजता मोठी रांग पाहिली. एन के जी एस बी मध्ये कॅशच नाही .अर्थात रांगाही नाहीत. पंजाब महाराष्ट्र कोऑपसारख्या बँकांतही पुरेशी कॅश नाही. आय्सीआय्सीआयमध्ये तशाही रांगा कमीच होत्या. बँक ऑफ इन्डिया, स्टेट बॅंक, महाबँक येथे रांगा आहेत. आय्सीआय्सीआय, आय्डीबीआय, एच्डीएफ्सी, अॅक्सिस, कोटक महीन्द्र, येस येथे राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत पहिल्यापासूनच किरकोळ रांगा होत्या.
हीरा, मायबोलीच्या
हीरा,
मायबोलीच्या टायपिंगलाईनबाहेर जाऊन जाहिरातींनाही व्यापून उरतील अशा साईजचे हललेले मोबाईल फोटो टाकल्याशिवाय तुमच्या पोस्टींना वेटेज नाय बगा. आयटीत कामाला असूनही, width=600 हा टॅग अॅड करायला काय जातं कोण जाणो.
मला,माझ्या
मला,माझ्या वनिताला,वॉचमनला,माळ्याला फ़ारसा त्रास झाला नाही म्हणजे तो इतरांना झाला नाही असे नाही ना? शहरात इतके दिवस व्यवहार बाह्यतः सुरळीत चालू दिसत होते.वडेवाल्यापासून ते हॉटेलपर्यंत नेहमीची जत्रा होती.तरीही आज २१ तारीख असूनही स्टेट बॅंकच्यासमोर ७०ते ८० माणसांची रांग,बँक ऑफ पतियालासमोर २०-२५ ची रांग,तशीच पंजाब नॅशनल्,सारस्वत को-ऑप्,बँकांसमोर रांगा होत्या.रांगेतील माणसे आनंदी वगैरे अजिबात वाटली नाहीत.
ज्यांचे डेली वेजेसवर उदरनिर्वाह असतो किंवा ज्यांचे कोणत्याही बँकेत खाते नसते त्यांचे काय्?तसेच अशावेळी कोणाचे आजारपण आले की वर हिरांनी म्हटल्याप्रमाणे हाल होतात.
बँक कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण या काही दिवसांत पडतोय तेही खेदजनक आहे.
अमेरिकेतून आता आयटीत रवानगी
अमेरिकेतून आता आयटीत रवानगी केली का ?
पुण्यातले फोटो टाकल्याने थयथयाट झालेला दिसतोय. आत्ता सकाळी उठल्यावर पाहीलं.
काल एकाच्या तोंडून ऐकलेलं
काल एकाच्या तोंडून ऐकलेलं वाक्य.
मगरीला पकडायला तलावातले सगळे पाणी काढून घेतलेत. त्यामुळे मासे मात्र मेले. आणि मगर? ती गपचूप तळ्यातून बाहेर पडून नव्या ठिकाणी गेलीसुद्धा.
एका परिचितांकडून ऐकलं
एका परिचितांकडून ऐकलं मुद्दामून जरा रात्री साधारण पावणे दहा / दहाच्या आसपास एटीएम मधून पैसे काढायला गेले . भरपूर लाईन वगैरे होती . दहा वाजले काय ( रात्रीचे ) आणि रांगेतले पुढची जास्तीत जास्त माणसं ( गठ्ठा च्या गठ्ठा किव्वा झुंडीने म्हणूया हवं तर ) पटा पट पांगली . रांगेत पुढे फक्त चारच माणसं शिल्लक राहिली . आश्चर्याने चौकशी करता समजल. पांगलेली लोक पेड होती . विरोधकांनी पैसे देऊन उभी केलेली . त्यांना फक्त रात्री दहा पर्यंत एटीएम च्या लाईनीत उभे राहण्याचे पैसे मिळाले होते
एटीएमच्या लायनीत उभं रहायला
एटीएमच्या लायनीत उभं रहायला "विरोधकां"नी पैसे कोणत्या नोटांत दिले म्हणे? नव्या की जुन्या?
नुस्तं असं लायनीत उभं राहता
नुस्तं असं लायनीत उभं राहता येतं का? पैसे / किंवा कोणतंही ट्रँजॅक्शन न करता नुसती लाईन कुणी अडवली तर लायनीतले इतर लोक धरून मारहाण करणार नाहीत का? कैच्याकै
नुस्तं असं लायनीत उभं राहता
नुस्तं असं लायनीत उभं राहता येतं का? पैसे / किंवा कोणतंही ट्रँजॅक्शन न करता नुसती लाईन कुणी अडवली तर लायनीतले इतर लोक धरून मारहाण करणार नाहीत का? कैच्याकै >>नाहीतर काय बरोबर आहे हो तुमच.तुम्ही कायमच बरोबर
लोक मुंबईत राहूनही
लोक मुंबईत राहूनही 'कोथरूडच्या बाहेर' पडत नाहीत का?
सुजा, तुम्ही जे तुमच्या
सुजा, तुम्ही जे तुमच्या परिचितांकडून ऐकले , तेच इतर अनेकांनी त्यांच्या परिचितांकडून ऐकले आहे.
ज्याना ज्याना पुण्यात एटीएम
ज्याना ज्याना पुण्यात एटीएम च्या रांगा पहायच्या आहेत , पिंपळे सौदागरला या.
माझ्या घराच्या २०० मी मधे ८ एटीएम आहेत (कुणाल आयकॉन रोड)
फक्त १ आयसीआयसीआय चालू आहे अन त्याला प्रचंड रांगा आहेत.
आणि ती नॉर्मल माणस आहेत . मी स्वतः काल दीड तास थांबून पैसे काढलेत . बोलघेवडा स्वभाव असल्यामुळे बर्याच ओळखीही झाल्या . त्यामुळे वेळ बरा गेला पण गेलाच ना ? हा एरिया म्हणजे ९०% आय टी पब्लिक आहे .
त्यामुळे कुणाचीच फारशी अडचण नव्हती , पण अंमलबजावणीवर नाराजी मात्र नक्कीच आहे.
परत एकदा , निर्णय चांगला आहे पण अंमलबजावणी चुकली आहे हे मान्य करण्यात काय अडचण आहे ?
उगाच पेड माणस वगैरे म्हणून तुम्ही रांगेत थांबणार्यांचा अपमान करत नाही का ?
जस हे आम्ही ऐकलेलं आहे तसच
जस हे आम्ही ऐकलेलं आहे तसच याला त्रास झाला /त्याला त्रास झाला हे पण आम्ही आमच्या परिचितांकडून ऐकलेलं आहेच आणि अनेक जणांनी ऐकलेलं आहे. पण सैनिकांसारख्या सामान्य माणसाला झालेला त्रास ( त्यांच्या वर झालेली दगडफेक )कोणालाच दिसत नाही हीच तर खरी शोकांतिका आहे असोच तुमच आपलं चालुद्या
सुजा, उगाच सैनिकांना यात आणु
सुजा, उगाच सैनिकांना यात आणु नका. त्यांना होणारा त्रास सर्वांसाठीच वेदनादायी आहे आणि राहिलही. पण त्याचा बादरायण संबंध इथे का जोडु पाहताय?
http://m.jagran.com/uttar-pra
http://m.jagran.com/uttar-pradesh/aligarh-city-15060306.html
सैनिकांनाही बँकेच्या रांगेत मार पडू लागलाय.
Pages