हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांजरीला तीन मुलं झालेत.

आमच्या लेकीला त्यांची नावे विचारली .... ती बोलली

हर्मायनी , मीना आणि रॉन

शाळेत मुलीला -इ. ३री- क्विझ मधे विचारलं - हॅरी चा बेस्ट फ्रेंड कोण (इंग्रजीत त्यामुळे जेंडर स्पेसिफिक नव्हतं) , तिने हर्मायनी उत्तर दिलं, तर रॉन हे उत्तर हवं म्हणे, खरंतर दोन्ही चालतील असं मला वाटलं.

रॉन आणि हर्मायनी दोघेही बेस्ट फ्रेंड आहेत. पण रॉन कणभर जास्त.
Triwizard tournament मध्ये सुद्धा टास्क-२ मध्ये हॅरीची जिवलग व्यक्ती म्हणून रॉनची निवड झाली, पाण्यात किडनॅप करून ठेवायला.

Behold 3 more potterbooks on the way>>
हे तरी चांगल असायला हवय, जेकेचे बिडल बार्ड ठिक ठाक होतं, क्विडिच आणि फँटास्टिक बिस्टस मला तरी नाही आवडले..
आता हे तिन नविन बघु कसे आहेत ते. फक्त ईबुक असणारे वाटतय. (नंतर प्रिंटसही येतिलच Wink )

ई बुक फुकट का विकत ? का पॉटरमोअर वर ती मधे मधे लिहिते तसं ?>>
फुकट नाहियेत, पण त्यात पॉटरमोअर वरच्या काहि लिखाणाचं एकत्रीकरण केलय बहुतेक अर्थातच काही नविन पण आहे.
युके अ‍ॅमेझॉन वर २ पाउंड्स ला दाखवताहेत एक ईबुक.

पुन्हा deathly hallows वाचत्येय. Everyone turns into Harry Potter to get him out of Privet drive safely. I just had a thought, it would have been a better plan to turn Harry into one of the 13 people and then start traveling in pairs to 7 different locations. That would be much safer and easier. तुम्हाला काय वाटतं?

Harry sodun bakichyana direct maranyachi order hoti.. mhanun kadachit.. 7 harry potters were to create confusion and hence to give some more time to reach them safely.. to increase probability of safety

हॅरीला कुणीतरी केला असता , समजा रॉन , तर दोन रॉन पैकी एक हॅरी आहे हे लगेच लक्षात आले असते व डेथ इटर्सना त्यांचे टार्गेट शोधणे सोपे झाले असते.

सात पॉटरमुळे टार्गेट शोधणे अवघड बनले.

चिमुरी, हो हे बरोबर आहे! हेच सांगून mad eye mundungus ला Harry व्हायला लावतो. पण मग कदाचित जास्त गोंधळ उडाला असता नाही का? चुकून हॅरीला मारण्याच्या भीतीने कोणावरच unforgivable curses टाकले नसते death eaters नी!!

अनिलचेंबुर, दोन एकसारखे नाही, कोणत्याही दुसर्‍याच व्यक्तीचा केस घेऊन (म्हणजे मॉली किंवा अॉर्डरचे दुसरे कोणी मेंबर) पॉलीज्यूस पोशन बनवायचे आणि ते हॅरीने प्यायचे. १४ वेगवेगळ्या व्यक्तींनी दोन दोन च्या गटात ७ वेगवेगळ्या दिशांना जायचे.

माझ्या मुलाच्या मते स्नेप ने अगोदरच व्हॉलडामोर ला सांगितलेले असते की ७ हॅरी असतील म्हणून . व्हॉडामोर चा स्नेप वर विश्वास कायम रहावा म्हणून असे केले

मीही त्व्च म्हणतोय ..

हॅरी जुस पिउन दुसर्‍यासारखा झाला उदा. रॉन ... तर हा डुप्लिकेट रॉन एक व एक ओरिजिनल असे दोन रॉन होतील.

दोन रॉन बघितले की डेथ इटर्स लगेच ओळखतील की एक खरा व एक खोटा आहे. प्रॉबॅबिलिटी १/२
पण सात लोक हॅरीच झाल्याने प्रॉबॅबिलिटी १ / ७ .... काम मुष्किल.

हॉगवर्टात गणित शिकवतात का ?

माझ्या मुलाच्या मते स्नेप ने अगोदरच व्हॉलडामोर ला सांगितलेले असते की ७ हॅरी असतील म्हणून . व्हॉडामोर चा स्नेप वर विश्वास कायम रहावा म्हणून असे केले>> पण स्नेप ची असलीयत फक्त डम्बलडॉरलाच तर माहिती असते.. इतरांना त्याच काय देणघेण?

एक शंका: हॅरी जेव्हा पहिल्यांदा मरतो तेव्हा एक्चुली त्याच्यातला वोल्डीचा हॉरक्रक्स मरतो ना? किंग्ज क्रॉस स्टेशनवर हॅरी-डंबलू गप्पा मारतात तेव्हा वोल्डीपण असतो तिथे; गचाळ बाळाच्या रुपात... त्याला तिथेच सोडून 'फक्त' हॅरी परत येतो. राइट?
आणि मग शेवटच्या लढाईत वोल्डी हॅरीच्याच वाँडने हॅरीलाच मारायला बघतो म्हणून तो स्वतःच मरतो. राइट?
म्हणजे आता हॅरी 'फक्त' हॅरीच राहिला. तरीपण शेवटी 'हॅरीचे डोके अधुनमधुन खूप रेअरली दुखते' असे का म्हणले आहे?

अनिलचेंबुर, अहो कोणा एका व्यक्तीचा जी तिथे उपस्थित नाही तिचा केस आणायचा, हॅरीच्या घरी पॉलीज्यूस पोशन बनवायचे आणि ते हॅरीने प्यायचे. म्हणजे १४ वेगवेगळ्या व्यक्ती असतील ज्यातील एक हॅरी असेल. पण कोण ते पटकन कळणार नाही.

ते रेअरली दुखते हे थोडेसे उपहासाने आहे.. म्हणजे कधी सर्दी सायनुसायटिस भांडण वगैरे झाले तरच दुखते ... वॉल्डीच्या कारणाने दुखायचे बंद झालेले आहे.

ते रेअरली दुखते हे थोडेसे उपहासाने आहे.. म्हणजे कधी सर्दी सायनुसायटिस भांडण वगैरे झाले तरच दुखते ... >> हा हा हा हे भारीय =))

चिमुरी, मला कळलं नाही नक्की कशाने कन्फ्युजन नसतं झालं? एकट्या हॅरीने पॉलीज्यूस पोशन प्यायल्याने?

चिमुरी, मला कळलं नाही नक्की कशाने कन्फ्युजन नसतं झालं? एकट्या हॅरीने पॉलीज्यूस पोशन प्यायल्याने? एकच कारण असू शकतं की हॅरी अंडरएज असल्याने पॉलीज्यूस पोशन पिऊ शकत नाही..कारण त्यावर ट्रेस आहे. पण मला हे नक्की माहिती नाही.

एकच कारण असू शकतं की हॅरी अंडरएज असल्याने पॉलीज्यूस पोशन पिऊ शकत नाही..कारण त्यावर ट्रेस आहे. >> पण हॅरी रॉन हर्मीने आधीच एकदा पॉलीज्यूस बनवून पिलाय की! ज्यात हर्मी चूकून मांजरासारखी बनते. तेव्हा कुठे मिनिस्टरी त्यांना ट्रेस करते?

===
मला वाटतं हॅरी त्या घरात+मावशीसोबत राहतोय तोपर्यंतच त्याचे आईने दिलेले सुरक्षाकवच काम करणार असते. वोल्डी रिसरेक्ट झाल्यानंतर हॅरी मावशीचे घर आणि हॉगवर्ट याखेरीज इतर कुठे राहूच शकत नसतो (लपवलेल्या घराखेरीज). त्यामुळे डेथइटर्स लक्ष ठेवूनच असतात की मावशीचे कुटुंब कधी बाहेर पडतेय ते. त्यानंतर ते लगेच हमला करणारच असतात. त्या घरातून किमान एकतरी हॅरी बाहेर पडलेला दिसायलाच हवा. नाहीतर सगळेच मारायचे असा डेथइटरना आदेश असेल.

अॅमी, तेव्हा ते हॉगवॉर्ट्समध्ये असतात त्यामुळे त्यांनी पॉलीज्यूस पोशन प्यायलं तरी ट्रेस झालं नाही.
डेथ इटर्सनी खऱ्या हॅरीला मारण्याच्या भीतीने कोणावरच जीवघेणा हल्ला केला नसता कारण वॉल्डीचा तसा आदेश असतो की हॅरी जिवंत हवा. तो स्वतः हॅरीला मारणार.

<म्हणजे कधी सर्दी सायनुसायटिस भांडण वगैरे झाले तरच दुखते>
विचेस आणि विझार्ड्सना असलं काही झालं की चुटकीसरशी बरं होत असेल. मोडलेली हाडं जुळंं पण पटकन व्हायचं.
पण त्यांच्या जगातले त्रास बरे व्हायला वेळ लागायचा आणि काही त्रास तर बरे न होणारे.

एक शंका: कोणाला पाॅलीज्युस पाॅशन पिऊन वाॅल्डी बनायाचे असेल तर तो कसे बनेल? वाॅल्डीच्या डोक्यावर केसच नाहीत ना? Biggrin

Pages