हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

J.K. Rowling wrote an alternative ending to the “Harry Potter” series.

The author herself wanted Harry Potter to be together with Hermione in the end of the story. >>

भारी ना ? आत्ताच फॅक्ट्स अबाऊट हॅरी वाचत असताना हे दिसलं..
हे खरं आहे का ?
असेल तर दुसर बुक वाचायला हवं..

अगं म्हणजे ड्राफ्ट व्हर्जन असेल, दुसरं पुस्तक आहे असं तर नाही वाचलयं कुठे.

हॅरीला गिनीचं बरोबर आहे. पॉटरमोअर वर आहे बघ - हर्मायनी आणि रॉन एकत्र येणार ह्याचे पहील्या पुस्तकापासूनचे क्लूज.

हॅरीला गिनीचं बरोबर आहे.>> हो पन तरीही.. झाल असं कि पुस्तक वाचण्याअगोदर चित्रपट पाहण्यात आले.. अन मग तिच प्रतिमा त्या त्या व्यक्तीची मनात बसलीए ज्यात गिनी/ जिनी विझली हे कॅरेक्टर मला अजिब्बात आवडल नाही.. त्यापेक्षा छान केमेस्ट्री हॅरी हर्माईनी ची वाटते.. ते भलेही प्रेमात पडलेले दाखवलेले नाहीये तरी त्यांच mutual understanding is far greater than any other.. त्या दोघांमधला सर्वात छान क्षण(चित्रपटातला) म्हणजे रॉन क्विडीच मधे फेमस झाल्यावर दुसर्‍या मुलींसोबत असतानाचा हर्माईनीचा राग आणि तेव्हा हॅरी तिला सांभाळून घेतो तो..आणि डेथली हॉलोज मधे रॉन त्या दोघांना सोडून निघुन गेल्यावर जेव्हा टेंट मधे ती दोघे रेडिओ वर सुरु असलेल्या गाण्याला ऐकुन नाराज झालेल्या हर्माईनी ला हॅरी घेउन डान्स करतो तो सीन.. आह.. मस्त दोस्ती दाखवलीए त्यांची.. असो..

डेथली हॉलोज मधे रॉन त्या दोघांना सोडून निघुन गेल्यावर जेव्हा टेंट मधे ती दोघे रेडिओ वर सुरु असलेल्या गाण्याला ऐकुन नाराज झालेल्या हर्माईनी ला हॅरी घेउन डान्स करतो तो सीन.
>>
हे सिनेमात आहे का टीना ?

जुनी पोस्ट कॉपी पेस्ट!!!

मला जेकेबाईंच्या एपिलॉगमधे बर्याच गोष्टी पटल्या नाहीत. सगळ्या पात्रांना आपापसांतच लग्नं लावून द्यायची गरज नव्हती. हॉगवर्ट्स नंतर त्यांना नवीन कुणी भेटलंच नाही का?

पण तरीही तिने जेवढं लिहिलंय त्याअमधे मला हॅरी आणी हर्मायनी जोडी आवडली नसती.

हर्मायनीचं एकंदरीत जे काही कॅरेक्टर आहे (फार तत्ववादी, हुशार, रूल्स फॉलो करणारी इत्यादि) आणि तिचं हे काही वागणं आहे (हॅरी, रॉनसारख्या टवाळ पोरांबरोबर उपद्व्याप करत फिरणं वगैरे) ते पाहता ती रॉनच्या प्रेमात पडली ते पटतं. रॉन चित्रपटांमधे फार विनोदी दाखवला असला तरी पुस्तकामधे तोअदेखील बर्यापैकी प्रॅक्टिकल अक्कल असलेला आहे. (चेस किंवा सर्वात शेवटी हॉरक्रक्स माराय्ला चेंबरमधे जातो असे प्रसंग) त्यामुळे हर्मायनी अगदीच काही येड्याशी लग्न करत नाही.

हॅरी आणी हर्मायनीचं नातं एका वेगळ्याच पातळीवरचं आहे. ते रोमॅन्टिक वगैरे कधी बनूच शकत नाही. हॅरी सुरूवातीला हर्मायनीशी थोडा लांब् आहे. तिच्या हुशारीचा, नो-ऑल अ‍ॅटीट्युडचा त्याला राग आहेच, शिवाय तो थोडासा तिला घाबरतोदेखील. पुढे पुढे नंतर जेव्हा त्यांची मैत्री जुळत जाते तेव्हा हे घाबरणं रीस्पेक्टमधे बदलतं. आणि हर्मायनी हळूहळू हॅरीच्या एकंदरीत गुणांबद्दल कदर करायला लागते. समहाऊ, त्याचं अनाथपण ती व्यवस्थितरीत्या समजून घेऊ शकते (सिंगल चाईल्ड असल्यामुळे असेल अथवा मगल आईवडील असल्यामुळे असेल) पण हॅरीचा एकटेपणा तिच्याव्यतीरिक्त कुणीही समजून घेताना दिसत नाही. म्हणूनच सातव्या भागामधे रॉन जेव्हा हॅरीला सोडून निघतो, तेव्हा ती येत नाही. कारण, या टप्प्यावर जर हॅरी एकटा पडला तर त्याला परत सावरणे कठिण जाईल याची तिला पूर्ण कल्पना आहे.

मला या तीन व्यक्तीरेखांमधे रॉनची व्यक्तीरेखा सर्वात गुंतागुंतीची आणि रीअल वाटते. कुठलीही भावना तो लपवत नाही. जे त्याच्या मनामधे आहे ते सरळ बोलतो. प्रेम, राग, तिरस्कार, द्वेष, अपमान, संशय या सगळ्या भावना तो कुठल्या ना कुठल्या प्रसंगामधे दाखवतो. हॅरीबद्दल वाटनारी किंचित असूया तर कित्येक प्रसंगामधे दिसून येते.

मुळात, हॅरी, हर्मायनी आणी रॉन या तिघांचाही हा प्रवास त्यांच्या टीनेजमधला आहे. मॅजिक, मगल्स, आणि व्होल्डमार्ट्सारखा प्रच्ड मोठ्या शत्रूशी युद्ध करत असतानादेखेल जेकेआर चुकूनही विसरत नाही, की हे तिघंही नॉर्मल टीनेजर आहेत. म्हणून रॉनने हॅरी-हर्मायनीवर संशय घेतला तरे ते चुकीचे वाटत नाही. आणि हॅरी जिनीबद्दल विचार करताना रॉनची प्रतिक्रिया काय असेलत्याचा विचार करतो. ११ ते १८ पर्यंतच्या या प्रवसामधे तीनही व्यक्तीरेखा वेगवेगळ्या पद्धतीने इवॉल्व्ह होताना दिसतात.

>>> सिनेमांमध्ये आणि पुस्तकांत चिकार फरक असल्याने इथे मी केवळ पुस्तकांबद्दलच लिहितेय. कारण हा धागा वाचू आनंदे मध्ये आहे. Wink

हॅरी आणी हर्मायनीचं नातं एका वेगळ्याच पातळीवरचं आहे. ते रोमॅन्टिक वगैरे कधी बनूच शकत नाही. हॅरी सुरूवातीला हर्मायनीशी थोडा लांब् आहे. तिच्या हुशारीचा, नो-ऑल अ‍ॅटीट्युडचा त्याला राग आहेच, शिवाय तो थोडासा तिला घाबरतोदेखील. पुढे पुढे नंतर जेव्हा त्यांची मैत्री जुळत जाते तेव्हा हे घाबरणं रीस्पेक्टमधे बदलतं. आणि हर्मायनी हळूहळू हॅरीच्या एकंदरीत गुणांबद्दल कदर करायला लागते. समहाऊ, त्याचं अनाथपण ती व्यवस्थितरीत्या समजून घेऊ शकते (सिंगल चाईल्ड असल्यामुळे असेल अथवा मगल आईवडील असल्यामुळे असेल) पण हॅरीचा एकटेपणा तिच्याव्यतीरिक्त कुणीही समजून घेताना दिसत नाही. म्हणूनच सातव्या भागामधे रॉन जेव्हा हॅरीला सोडून निघतो, तेव्हा ती येत नाही. कारण, या टप्प्यावर जर हॅरी एकटा पडला तर त्याला परत सावरणे कठिण जाईल याची तिला पूर्ण कल्पना आहे. >> +१

तसा तुझा विचार पटतो..पण मुळात मला हॅरी आणि जिनीचं नात व्यवस्थित उलगडलेलं वाटत नाही.. जितकं छान हर्माईनी आणि रॉन मधली केमिस्ट्री खुललीए तेवढी त्याची आणि जिनीची नाही..

सगळ्या पात्रांना आपापसांतच लग्नं लावून द्यायची गरज नव्हती. हॉगवर्ट्स नंतर त्यांना नवीन कुणी भेटलंच नाही का?>> याला मात्र हजार अनुमोदन..

सगळ्या पात्रांना आपापसांतच लग्नं लावून द्यायची गरज नव्हती. हॉगवर्ट्स नंतर त्यांना नवीन कुणी भेटलंच नाही का?>> >>>
ते खुपच घाइ घाइत उरकल्यासारखं केलय, तिला बहुतेक दुसरं कोणी काहीतरी लिहुन वाटोळं करण्यापेक्षा (किंवा पाउंड्स डॉलर मध्ये फायदा घेण्यापेक्षा)आपणच लिहुन टाकु अस काहिसं वाटल असाव

मला पण हर्मायनी आणि हॅरी जोडी आवडली असती. किंवा मग हॅरी आणि दुसरी कोणी मुलगी. जिनीचं कॅरेक्टर नीट उभं राहात नाही.

हॅरी-हर्मायनी- छे छे! लोक्स, शुद्ध निखळ मैत्री नावाची काही चीज अस्ते की नाही? त्या तिघांतही आधी गाढ मैत्री आहे आणि मग प्रेमाचा अ‍ॅन्गल. प्लीज. Its a sacred relation. असे शुद्ध मैत्रीच्या धाग्याने बांधलेले मित्र-मैत्रिण हा हेव्याचा विषय आहे माझ्यासाठी.

असे शुद्ध मैत्रीच्या धाग्याने बांधलेले मित्र-मैत्रिण हा हेव्याचा विषय आहे माझ्यासाठी.>> मी प्रमाणाबाहेर सुदैवी आहे पूनम याबाबतीत Wink कधी कधी तर मला स्वतःचाच हेवा वाटतो .. कही नजर ना लग जाए Lol

सगळ्या पात्रांना आपापसांतच लग्नं लावून द्यायची गरज नव्हती. हॉगवर्ट्स नंतर त्यांना नवीन कुणी भेटलंच नाही का?>>> muggle blood मुळे होणार्‍या भांडणांचा उपद्व्याप नकोच असा रोलिंगबाईंचा विचार असावा...

सगळ्या पात्रांना आपापसांतच लग्नं लावून द्यायची गरज नव्हती. हॉगवर्ट्स नंतर त्यांना नवीन कुणी भेटलंच नाही का?>>> १००% अनुमोदन...
हॅरी आणि हर्मायनीची जोडी खरंच नसती आवडली मलाही... ईव्हन मला हर्मायनीचं रॉनकडे आकर्षित होणंही फारसं पचलं नव्हतं.. म्हणजे तिच्यासारखी हुशार, गंभीर ( थोडी गर्विष्ठ) मुलगी रॉनसारख्या सामान्य मुलाच्या ( हॅरीला मिळणारी प्रसिद्धी आणि त्याचे उपद्व्याप पाहून त्याच्या तुलनेत रॉन सामान्यच वाटतो.. मलातरी) प्रेमात कशी पडली हा प्रश्न आहेच...
शेवटपर्यंत त्या तिघांना एकमेकांचे घनिष्ट मित्र दाखवले असतं तर मला आवडलं असतं, उगाच का म्हणून प्रेम कहाणी घुसडायची? हॅरी स्टोरीचा मेन हिरो म्हणून त्याला हिरॉईन पाहिजेच आणि रॉन -हर्मायनी त्याचेच मित्र म्हणून तेही साईडहिरो.. त्यांच्याही आयुष्यात प्रेम दाखवायचंच... अरे ही काय हिंदी सिनेमाची गोष्ट आहे they lived Happily everafter करायला.. प्रॅक्टिकली त्यांचं एकत्रं येणं मला पटत नाही कधीकधी... !

मी पन वाचलं हे थोपूवर Biggrin

हे आणखी एक बघुन खुप हसली मी Proud

बाकी आता मी माझ्या बेंगॉली रुममेट्ला सुद्धा फुस लावलीए पुस्तक वाचायची..
आता ती रडत आहे ,"मैने फिल्मे क्यु देखी Sad " हाहाहा..
पहिलं पुस्तक संपवल तिने.. दुसरं सुरु केलं आता वाचायला..

आठवा भाग हा इंग्लंडात चाललेल्या नाट्यप्रयोगाचं पुस्तक रूपांतर आहे. लेकाच्या आग्रहापायी परवा रात्री १२ वाजता पुस्तक प्रकाशन सोहोळ्याला पोहोचलो. पुस्तक आणलं. त्याने ते रात्रीत वाचून काढलं. खूश आहे पुस्तकावर. आम्हाला पुस्तकात काय आहे हे कळू देणार नाही म्हणालाय. स्वतः वाचा असं फर्मान काढलंय...त्यामुळे इतंकंच!

रायगड , वेळ काढून वाच आणि सांग आधीच्या ७ इतकं छान आहे का, नाटकाचे संवाद अशा स्वरूपात आहे ना ?

मला घ्यायच आहे पण नाटकाचे संवाद ह्या आधी कधी आवडले नव्हते वाचायला आणि नाही आवडल तर हॅपॉ च्या इमेजला धक्का बसेल म्हणून ऑर्डर नाही केलय अजून. ५-६-७ ची पारायणं चालू आहेत.

Pages