हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रायगड , वेळ काढून वाच आणि सांग आधीच्या ७ इतकं छान आहे का, नाटकाचे संवाद अशा स्वरूपात आहे ना ?

मला घ्यायच आहे पण नाटकाचे संवाद ह्या आधी कधी आवडले नव्हते वाचायला आणि नाही आवडल तर हॅपॉ च्या इमेजला धक्का बसेल म्हणून ऑर्डर नाही केलय अजून. >> +१

आठवा भाग - हॅरी आणि त्याच्या मुलाची आहे का? मी असं ऐकलं कि हॅरी चा मुलगा त्याच्या अगेन्स्ट असतो..>> डॉली प्लीज डोन्ट डू दॅट.. बर्‍याच लोकांनी वाचलेल नाही आणि तुम्ही हे जे सांगितलं ते खर खोट कुणाला माहिती नाहीए तर वाचनाची मजा निघून जाते.. डोन्ट माईंड पण हे अस काही वाचलं कि रसभंग होतो..

दोन कारणांमुळे ऑर्डर करायचा थांबलो आहे
१. नाटकं फारशी आवडत नाहित वाचायला- पहायला .
२. आणखी किंमत कमी होतेय का ते सुद्धा बघतो आहे Wink

आताच एक रिव्हिवु वाचला..
" The writing seems different to you because it wasn't actually written by Rowling. It has been written by John Tiffany and Jack Thorne. Rowling contributed very little to it and she has been saying that repeatedly " - Amazon Customer

मला नाटक वाचायला पण आवडतं म्हणून हे पुस्तक घ्यायला काही वाटलं नाही. पण पहिल्या २०-३० पानांत ३ वर्षे सरली. एका एका पानात एक एक तुटक प्रसंग. खूप विस्कळीत. हॅरी पॉटर वाचणे म्हणजे प्रसंग डोळ्यासमोर उभा राहणे, पुढे काय होणार म्हणत जीव वरखाली होणे, काहीच, काहीच होत नाहीये Sad सगळं नाटकी वाटतय म्हणावं असच नाटक आहे.
कदाचीत हे नाटक बघायला मजा येत असेल, असेल का?

बघा नै. मला पीडीएफ मिळालिये.कधी वाचेन ते सांगता येत नाही.

अहो तेच ते, लिहीलेलं नाटकी नाटक बघा. एकाग्र होऊन वाचावं असं वाटत नाही म्हणून आजूबाजूचा कल्लोळ लिहीला. वाटत नाही म्हणजे, एकाग्र होताच येत नाहीये असं काहीतरी म्हणायचय.

Just finished reading the cursed child. I liked it. I think J. K. Rowling is a freaking genius. Of course this is not the best book. It has its cons. At one point I was bored (never happened with the other books). But then how she has built a story through an already built (magnificent) castle of HP story is simply brilliant. One thing I liked (and didn't like at the same time) is the format. A play has acts so there is not much time to build up. It's all action. With a solid background of 7 books this play needs no build up so it's only action page after page (kinda like the last chapter of the books) I liked that. But then I missed the very picturesque quality of JK's writing which makes reading the books all the more fun. Anyway I think it's a great book for the fans who will have a lot of new discoveries and possibilities to ponder over after reading this book.
Risking the fear of repetition, I LOVE JK's power of imagination.. ती कधी भेटली तर मी तिला साष्टांग नमस्कार घालणार आहे___/\___. She truly deserves it.

चिमुरी आणि जिज्ञासा , तुमच्या दोघींच्या पोस्टस वाचून कळत नाही घ्यावं की नाही. चांगलं डील मिळालं तरचं घेईन Wink

Mail kara

मी पुस्तक वाचत आहे. जेवढे वाचलेय तेवढे (आधीच्या पुस्तकांइतकेच) आवडले.

(स्पॉयलरभयाने जिज्ञासा यांची पोस्ट वाचली नाही.)

वाचले.

फॅन फिक्शन टाईपच पुस्तक आहे . जेकेची खुमासदार शैली अधूनमधून दिसते. नाटक असल्यामुळे व्यक्तीरेखा जश्या इतर ७ पुस्तकांत येऊन भिडतात तश्या इथे भिडत नाहीत तरीही मी दोन प्रमुख व्यक्तीरेखांच्या प्रेमात आहे.
जेकेने जर या व्यक्तीरेज्खा स्वतः रंगवल्या असत्या तर ही कथा कायच्याकाय गेली असती.
इतर व्यक्तीरेखांना काहीच महत्त्व दिलेले नाही हे फारच खटकतंय. जेम्स पॉटर तर नंतर उल्लेखामधूनदेखील गायब होतो. सेम तीच गोष्ट लिली पॉटरची.

पण माझा मुख्य राग बेसिक प्लॉटवर आहे. या नाटकाचा मूळ प्लॉट अतिशय गंडलेला आहे. जेकेने जेव्हा तिसराभाग लिहिला तेव्हाच या गंडलेल्या लॉजिकची कल्पना आली असणार म्हणूनच मिनिस्ट्री ऑफ मॅजिकच्या त्या लढाईमध्ये जेकेने त्या लॉजिकचा कणाच कापून टाकला होता, इथे परत तीच गोष्ट घेऊन रचल्याने सगळा डोलारा फारच कमकुवत आणि ढिसाळ झाला आहे. तिसर्^या भागामध्ये ज्या लॉजिकचा परफेक्ट वापर तिने हॅरीला पेट्रोनस दिसतो तेव्हा केला होता, ते लॉजिक इथे लागतच नाही. वाचताना मध्येच हॅरीपॉटर आहे की डॉ. हू असा प्रश्न आल्याखेरीज राहत नाही.

पण तरीही "वाचूच नये" असं मी म्हणणार नाही. वाचण्यासाठी चांगलंच पुस्तक आहे. प्रत्येक्ष स्टेजवर पाहताना सर्व एफेक्टसहित कदाचित अधिक परिणामकारक वाटेल. रोलिंगबाईंनी 1,084,170 शब्दांमध्ये (संदर्भः ) काळ्यापांढर्^या शब्दांखेरीज इतर कसल्याही स्पेशल ईफेक्टशिवाय जे काय विश्व मनामध्ये उभारलंय त्याच्या हे पासंगालाही पुरत नाही हेही तितकंच खरं.

पुस्तकामध्ये काही कोपरखळ्या मस्त आहेत.

माझा सर्वात आवडता संवाद:

(दोघे एकदम म्हणतातः) यू आय नॉट राँग
रॉनः ब्लीमी, देअर आर टू ऑफ देम.

मुद्दामच ते दोघे कोण आहेत ते देत नाहीये.

बाकी, या पुस्तकाची पहिली दोन पानं वाचताना, डेथली हॉलोजची शेवटची दोन पानं जशीच्या तशी आठवायला लागली. हे पुस्तक वाचून संपताच सरळ डेथली हॉलोजची कॉपी उघडली आणि वाचायला घेतलं.

नंदिनी आणि गजानन, तुमच्या पोस्ट्स वाचून घ्यायची इच्छा होत्ये, भाग ५ ६ ७ हे मी सतत आलटून पालटून वाचतचं असते. ह्याची भर पाडावी की काय Wink

नंदिनी , तू जेम्स आणि लिली लिहिलं आहेस ती हॅरीची मुलं का पालक ? मुलं ना ?

झालं वाचून

१. At one point I was bored
२. या नाटकाचा मूळ प्लॉट अतिशय गंडलेला आहे.

दोन्ही वाक्यांना +१

जेके बाईंनी फक्त अ‍ॅप्रूवल दिलेलं फॅन फिक्शनच वाटत होतं शेवटपर्यंत. एकच जादूची ट्रिक अती वेळा 'पिळल्या'मुळे, मजा नहीं आया.

संपले. नाटक नसते तर शेवट अतिशय उत्कंठावर्धक होऊ शकला असता.

Anyway I think it's a great book for the fans who will have a lot of new discoveries and possibilities to ponder over after reading this book.
<<<< सहमत.

वाचलं एकदाचं.
जितके निगेटिव्ह रिव्हुव आहेत तितकं कंटाळवाणं नाही वाटलं, त्यांनी आधीच सांगितलय की नाटकाचं स्क्रिप्ट आहे, तशा अपेक्षा ठेउन वाचलं तर ठिक वाटतं हे पुस्तक.
ज्यांनी वाचलं त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे..
spoiler--
अल्बस आणि स्कोर्पियस दोघांचे वांड्स तोडलेले सांगितलय पण गॉड्रिक्स होलो मध्ये परत त्यांच्याकडे ते आहेत. ते त्यांनी बाथिल्डाच्या घरातुन मिळवलेत का?

मी वाचायला घेतलयं, १५० पानांतच डोक गरगरायला लागलयं Sad , बरेच प्रश्न आहेत, पूर्ण झालं की विचारेन.

अग्निपंख,
कुठुन घेतल पुस्तक विकत ?>>>
सॉरी ह्यावेळेस इपब डालो केलय टोरेंटवरुन... लोकांनी खुपच झोडपलय ह्या पुस्तकाला मग म्हटलं आधि वाचुन बघु चांगलं वाटलं तर खरेदी करता येइल..
सो वाचुन झालय खरेदी करु शकतो इतकं तर आवडलय..

Spoiler alert
अग्नीपंख, हो, बथिल्डा आपलं घर कधीच बंद करत नाही हे त्यांना माहीत असते.

सॉरी लोक्स अजुन एक प्रश्न..
spoiler--
अल्बस चौथ्या वर्षाला आहे आणि त्याला अजुनही "expelliarmus" सुद्धा येत नाही असं दाखवलय हेही पटलं नाही. बहुतेक पहिल्या दोन वर्षातच हे शिकवतात ना?
हॅपॉ एकदाच वाचलय पात वाचायला हवं असं वाटायला लागलय कर्स्ड चाइल्ड वाचल्यानंतर.

Pages