काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात हम्माने सांगितलय की त्या घरी जायचं नाही म्हणून जात नाही, नोकरी सोडणार कारण सासरी विचारले नाही...

त्याआधी, स्वतःच्या घरात आली तरी साडी नेसू नको ना..

कहर होता .. तरी शुगोचा एक फुकटचा डयलॉग होता की कुठला काळ आहे म्हणून...

आणि रस्त्यात उभे राहून नुसते पुर्वीच्या दिवसांची आथवण अगदी मक्ख्ह चेहर्‍याने सांगत होती पण आपल्या शेजारी जो कोणी ठोंब्या उभा आहे तो सुद्धा हा आठबणींचा भाग आहे आणि त्याच्या चेहर्‍याची माशी हलत नाहीये हे सुद्धा तिला कळत नाही.

हम्मा आली की मांजरीचा साँउड का देत नाही केकताच्या सिरियलीत असतो तसा. आता तर पुर्ण सिरियल हिंदी कट कारस्थानं ंमारगावरच आहे.

ह्या मालिकेला फेसबुकवर मागे लाखोली मिळत होती म्हणून झीने जास्तीतजास्त awards दिले बहुतेक सर्व प्रेक्षकांच्या नाकावर टिच्चून, हल्ली मी fb वर गेले तिथे तरी ह्या मालीकेखालचे कमेंट्स वाचत नाही.

शिवचे घर आणि बनारस हे सगळं मुंबईत सेट उभं करून शूट केलंय असं आताच लोकप्रभा दिवाळी अंकात वाचलंय. नेपथ्याला १०/१० गुण.

शिवचे घर आणि बनारस हे सगळं मुंबईत सेट उभं करून शूट केलंय असं आताच लोकप्रभा दिवाळी अंकात वाचलंय.>>> मी सुद्दा वाचलय.

नेपथ्याला १०/१० गुण.>>> सहमत

शिवचे घर आणि बनारस हे सगळं मुंबईत सेट उभं करून शूट केलंय असं आताच लोकप्रभा दिवाळी अंकात वाचलंय. नेपथ्याला १०/१० गुण. > मढला सेट उभारला आहे

हा सेट दिया और बाती मधलाच परत वापरलाय. नुसते घर नाही बाहेरची गल्ली सर्व तेच आहे.
तेव्हा नवीन उभारला असेल Happy
आता फक्त नवीन सामान आणि रंग बदलला आहे

फारच बोअर झालय आता
वहिनी वर किती दिवस काढणार?

येवढं मोठं प्रकरण झाल्यावर फालतु लपवा छपवी करुन वेळं कोणी घालवेल का? लगेच पोलिसाना कळवेल ना कोणीही..वहिनीचं रडण किती खोटं आहे कोणीही ओळखेलं
गौरी चे डायलॉग फार वेड्यासारखे लिहिलेले वाटतात.. ती काल घरच्या आठवणी शिव्ला सांगत होती तेव्हा सगळं फार कृत्रिम वाटत होतं...
शिव च्या भावना पोहचल्या त्यापेक्षा..

त्या गौरीला असा काय मेकअप दिलाय आता चांगली नाही दिसत ती, काल एक प्रोमो बघितला त्यात गौरी, वेणू आणि शिव होते.

ती काल घरच्या आठवणी शिव्ला सांगत होती तेव्हा सगळं फार कृत्रिम वाटत होतं...>>> तेव्हाच गवरीचा तो दहीहंडीतला World famous dance पण दाखवला. Rofl

ती काल घरच्या आठवणी शिव्ला सांगत होती तेव्हा सगळं फार कृत्रिम वाटत होतं.>>> तो शिववर पाणी फेकण्याचा सीन सुद्दा पुन्हा दाखवला. किती खुनशी दिसत होती त्या सीनमध्ये. जरा सुद्दा खट्याळपणा किवा खोडकर हसू नाहीये चेहर्यावर. Uhoh

आज चा भाग मस्त झाला . शिव अम्माला फडाफडा बोलला .
सावंतांचे पण काम खूप छान झाले . पसरणीने महाबोर केले नेहेमीप्रमाणे .

बादवे त्या पसरणीने ८०लाख घेतल्याचे काहीतरी पुरावे असतील की त्या नव्या मालकाकडे जसे की स्टँप पेपरवर सही किंवा अ‍ॅग्रीमेंटवर सही वगैरे. ते का नाही फेकत तिच्या तोंडावर.
एकदाचा सोक्षमोक्ष लावायचा की समोरासमोर त्या गुंडाला आणि पसरणीला आणुन. उगाच चार एपिसोड खाल्लेत. बाकी पैसे उशीत लपवाय्ची आयड्या मस्त Lol Lol

शिव अम्माला फडा फडा बोलला .पण त्याच्या बोलण्यात जोर नव्हता आणि एक्प्रेशन्स मध्ये पण . नुसतच टाकणं टाकलं. जरा जोरदार बोलायला पाहिजे होत आणि एक्सप्रेशन्स मध्ये पण जोर दिसायला हवा होता Happy

शिव अम्माला फडा फडा बोलला .पण त्याच्या बोलण्यात जोर नव्हता आणि एक्प्रेशन्स मध्ये पण .

>>> तो फ्रस्ट्रेट होऊन बोलतो... आणि ते त्याने मस्त दाखवलं. न राहवून / असह्य होऊन त्याच्या तोंडून ते निघून जातं.

>>> तो फ्रस्ट्रेट होऊन बोलतो... आणि ते त्याने मस्त दाखवलं. न राहवून / असह्य होऊन त्याच्या तोंडून ते निघून जातं.>>> + १११

Uhoh म्हणजे पसरणीने ७० लाख + आजीचे दागिने पचवले? डबा आणि दागिन्यांची झलक पाहिली ते १५ लाखाचे तरी असतील. तरी त्यात दोन हलके नेकलेस कसे झाले म्हणून कोणालाच शंका आली नाही?

काहीही दाखवतात...आता शिव आणि गौरी ने आप्पाला कमिट केलं की आम्ही कसेही करुन तुमचे पैसे परत करु...म्हणजे काय? हे कष्ट करुन पुन्हा पैसे देणार आणि पसरणीने आधीचे ७० लाख गट्टम केले त्याचं काय?? तसंच तिने आधीही गौरीच्या बाबांकडून वेळोवेळी पैसे घेतले......विकी ने फसविलं म्हणून.
सरळ तिला व आप्पाला समोरासमोर आणायचे ते दिलं सोडून ...!!!
आणि पसरणीची आई घरी काहीच करीत नाही वाट्टं .. ?.काल निशा म्हणे, "आई दोन मसाला डोसे आण गं...." काहीही !!!! Biggrin

माणसं काळ्या किंवा पांढ र्‍या शेडची कधीच नसतात ती नेहमी ग्रे शेडची असतात. पण या सिरेलीवाल्यांचा किती अट्टाहास त्यांना अतीचांगल किंवा अतिवाईट दाखवायचा.
निशाचा खोटारडेपणा कुणालाच कळु नये निदान स्वतःच्या घरातुन बाहेर पडायची सॉरी लोकांनी हाकलुन द्यायची वेळ आली तरी.
दागिन्यांच्या वजनातला फरक, किमतीतला फरक, तिच ऐन प्रसंगी पळुन जाणं, अप्पाशी सोक्षमोक्ष लाव म्हणल्यावर आकांदतांडव करण, त्या बुळचट नवर्‍याला अजुन वेड्यात काढणं अस काहीही कुणाच्याही लक्षात येत नाही म्हणजे कमाल आहे.
गौरी आणि शिव तरी जरा सेन्सिबल दाखवायला पाहिजे होते. निशा सगळं करतेय हे माहिती असुनही अस मिळमिळीत कोण वागेल तिच्याशी. बिन्डोक लेकाचे. मरा म्हणाव अजुन. सावंत चुका करत राहतील आणि श्रीवास्तव निस्तरत राहतील आणि मधल्यामधे निशाचं आणि तिच्या आईच घर भरेल.

सावंत चुका करत राहतील आणि श्रीवास्तव निस्तरत राहतील>> हे श्रीवास्तव कोण आलेत मध्येच?? नवीन एंट्री का??

मी बघायची पारच सोडली.. अधूनमधून पण पहायची इच्छा होत नाही. इथे येऊन वाचायच काम करते. बरेचसे डिटेल कळतात आणि करमणूक पण होते.

निधी.. श्रीवास्तव नाही, शुक्ल.....!! शुभांगी ने रागाच्या भरात लिहीलं असावं बहुधा! Happy

मी पण सोडून दिलं ही सिरीयल पाहणं Sad
लय बोर करतात. सामोरा समोर आणून तडक फडक निकाल लावायचा सोडून बसलेत झिम्मा फुगड्या खेळत.
कैच्याकैच :नामुभा:

हा ना शिव आणि गौरी का भरणार ते पैसे.....
तसही आता तशी वेळ येणार नाही हे काल कळालं कारण अप्पाने घर भाड्याने द्यायचं ठरवलं आहे..

पण एका शब्दाने दोघानी विचारलं नाही की नीशाने पैसे घेतल्याचा काही पुरावा आहे का?
म्हणजे उगाच स्वतःला महान ठरवण्या साठी..
आणि कहणी खेचण्यासाठी..

आणि मोजोंनी अभिनय चांगला केला तरी कथेला काही अर्थच नसल्याने सगळं फोल वाटतं..

Pages