काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल आज्जीचे विनोद गवारी किती सिरियस घेत होती? Uhoh
नुसतं असं काय ग आजी आणि तसं काय गं आजी.. Uhoh

हे असले लाडे लाडे संवाद प्रत्येक झी च्या शिरेलीत का बरं असतात? Uhoh

दक्षिणा.....हो ना...मला तर इतका संताप आला ते डायलॉग्ज ऐकून....."हे काय आजी....तू कमरेचं दुखणं बरं व्हावं म्हणून प्रदक्षिणा घालणार..आणि मग तुझे गुढघे नाही का दुखायला लागणार....?"
:रागः ... अरे ! क्काय हे!!
किती निर्बुद्ध संवाद!
आणि गवरीला अ‍ॅबसोल्यूटली स्वतःची मतं नाहीयेत का? आईला विचारत होती ड्रेस घातला तर चालेला का वगैरे!

आंबटगोड अगदी अगदी..
आणि दहा बारा दिवसांनंतरचा मुहूर्त आहे म्हणून पण लहान मुलासारखी नाचत होती.
धगुरडी कुठली Angry

नाही अन्जू, ज्या अप्पाने घर घेतलंय त्याच्याकडून मोजो ने ४ दिवस मागून घेतले मग अप्पाने ५ दिवस देऊन सहाव्या दिवशी घराची किल्ली माझ्या माणसांच्या हाती द्या असं सांगून तात्पुरतं त्याचक घरात रहायची परवानगी दिली आहे. पण आता ही गवारी चिकटून बसली आहे ना. धा बारा दिवस हितंच मुक्काम हाय तिचा.

काल मोजो आणि सोसायटी च्या सेक्रेटरी मधला संवाद दाखवला त्यात निशाला तुरुंगात पाठवा असं जेव्ह्वा ते सांगतात तेव्हा मोजो त्यांना म्हणतो, गौरी च्या सासरचे त्रास देतील त्यांना हे प्रकरण कळलं तर. Uhoh

कुठे चाललाय भारत? सिरीयली अजून त्याच जुनाट विचारांच्या Sad

ओहह thanx दक्षे. निशावर विश्वास ठेवल्यावर हेच होणार होतंना. स्वतःचीच घोडचूक मोजोची.

स्वतःचीच घोडचूक मोजोची. > तर काय! मुलगा जात होता बाहेरच्या देशात तर किती आक्रस्ताळेपणा केला. आणि आता सून कशी अहे कळल तरी वेडयासारखा विश्वास ठेवला तर दुसर काय होणार

बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तो ही तसा अशातली आहे.... म्हणजे काय? जरा विस्कटून सांगा की... मला नाही कळालं

मितु म्हणे नचिकेतशी लग्न करणार आहे, मग वेणुचे काय होईल? Lol

धगुरडी कुठली>>> धगुरडी म्हणजे काय?:अओ:

नाही अन्जू, ज्या अप्पाने घर घेतलंय त्याच्याकडून मोजो ने ४ दिवस मागून घेतले मग अप्पाने ५ दिवस देऊन सहाव्या दिवशी घराची किल्ली माझ्या माणसांच्या हाती द्या असं सांगून तात्पुरतं त्याचक घरात रहायची परवानगी दिली आहे. पण आता ही गवारी चिकटून बसली आहे ना.>>>> हो ना, आणि वरुन हम्माने तिला कायमची माहेरी धाडली आहे.:अओ:

मितु म्हणे नचिकेतशी लग्न करणार आहे, मग वेणुचे काय होईल? हाहा>>> मितु नचिशी लग्न का करणार...... निशाचे काय मग

मितु नचिशी लग्न का करणार...... निशाचे काय मग>>> ते काय झाल, गौरी मितु आणि वेणूला ते नकली हार प्रकरण सान्गत होती, तेव्हा मितु रागाच्या भरात बोलली,"निशाला आफ्रिकेच्या जन्गलात पाठवून दयायला हव. वेणुने विचारल, "मग नचिचे काय होईल?' सो, मितू म्हणाली, " मी करेन नचिशी लग्न." हयात डायरेक्टर ने हिन्ट तर दिली नाही ना. Uhoh

भयानक प्रकार दाखवताय इथे..
गौरी चं लग्न दाखवलं आणि नंतर परतमूळ .
असा कोणता मुहूर्त होता यांच्या लग्नाचा? लग्नानंतर लगेच दिवाळी आणि नवी नवरी माहेरी धनतेरस ची पूजा करतेय.
सगळचं गंडलय

काय लगेच त्या गोउरीचा मेकओवर केलाय. कपडे काय, दागिने काय, सिंदुर काय. जॉबची काळ्जी नाही, करिअरचा पत्ता नाही, आईवडिलांचे दु:ख कळ्त नाही. आजकाल मुली अशा नसतात.

तिने निशाला झापले ते पण असे अचानक रुचले नाही. निशा मस्त लब्बाड मांजरीसारखी वाटते. ड्रामा तर सहीच करते. शुगो ओवरएक्टींग. बनारसचे सगळे सिन्स महाबोअर.

धनतेरस नंतर पाडवा दाखवला.. लक्ष्मी पूजन..? नवी नवरी माहेरी असते का लक्ष्मी पूजन ला.? मालिकेत सर्व सण दाखवायचा किती अट्टाहास..!
गौरी च्या लूक बद्दल अगदी सहमत.. लग्नानंतर काही तरीच दिसायला लागली आहे.. असे कुणाला बोलू नये दिसण्यावरुन पण गौरी चांगल्या तून वाईट अशी दिसतेय.!

आजच्या एपिसोडात तर नाश्ता चहा करताना गवरी आणि तिची आई दाखवल्यात.
दोन्ही चा गारगुट्टा करून, चहा तसाच्च गार गाळला Uhoh

गवरी नेहमीप्रमाणे थंड शिवाय सुजरी दिसत होती.

हो ना...किती पिवळे धम्मक ते पोहे! आणि कळस म्हणजे शिव आणि वेणूला ब्रश करुन चुळा भरतांना दाखविण्याची काय गरज होती? अगदी किळस वाटते कुणी दात घासतांना बोललं की...!!!! Sad
दुसरा कुठलाही सीन दाखवायचा की! .. आवराआवरी करताना वगैरे!
आणि शिव काय आता सावंतांना ऐंशी लाख देणारे...? त्यापेक्षा त्या निशाला सर्व मिळून का नाही झापत...? त्यात काय लपवायचे गवरी पासून?

आणि कळस म्हणजे शिव आणि वेणूला ब्रश करुन चुळा भरतांना दाखविण्याची काय गरज होती? अगदी किळस वाटते कुणी दात घासतांना बोललं की.>>> अगदी अगदी. आणि असे सिन्स कितीवेळा दाखवलेय सिरियल मध्ये. वेणु दात घासत बोलताना तर कधी कधी त्याच्यावर camera असतो तेव्हा तेव्हा तर यक्स वाटत. Uhoh

तसेच युपीचे लोक पान खाऊन रस्त्यावर थुकतात तेही सारखे सारखे दाखवायची गरज नाही सिरियलमध्ये. Angry

काल गवरी किती नॉन सेंस बोलत होती शिवशी..!! किती कृत्रिम आणि बेगडी! तिला अजिबातच डायलॉग डिलीव्हरी जमत नाही. सानुनासिक आणि लाडे लाडे विचित्र बोलते. आणि किती इल्लॉजिकल..म्हणे आता तू जावई झालास..तुला आता बाबांच्या बोलण्याचा राग येतो.....हट यार ! ....अशा नसतात मुली....त वरुन ताकभात कळतो बाबांकडे नुसतं पाहून !

Pages