पाक कलांकारांवर टाकलेल्या बहिष्काराच्या निमित्ताने ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2016 - 12:43

जेव्हा पाकिस्तानशी आपले बिनसते तेव्हा पहिली कुर्‍हाड सिनेकलाकार आणि क्रिकेटपटूंवरच पडते हे आपल्याला नवीन नाही. वर्षानुवर्षे हे होत आले आहे. जेव्हा आपले त्यांच्याशी संबंध बिघडलेले असतात तेव्हा तेथील कलाकारांना आणि खेळाडूंना, त्यातही प्रामुख्याने क्रिकेटपटूंना आपले दरवाजे बंद होतात. जेव्हा आपण मैत्रीचे प्रस्ताव आणि अमन की आशा मोडमध्ये असतो तेव्हा कलाकारच काय तेथील राजकीय नेत्यांच्या सुद्धा गळाभेटी घेतल्या जातात.

सध्या बहिष्काराची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त भासत आहे. पण पुढे कायम राहील याची खात्री नाही. दोन वर्षांनी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला वर भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना दोस्ती-कप म्हणून खेळवला गेला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. ईतके हे सवयीचे झाले आहे.

असो, यावर धागा काढायचे मनात होते. पण आधीच चालू असलेल्या वादात उगाच आपण तेल टाकायला नको म्हणून आतापर्यंत काढला नव्हता.
पण अनुराग कश्यपच्या एका ट्वीटने आज पुन्हा माझ्या डोक्यातील विचारांना बाहेर काढलेय.

तो काय म्हणतो बघा,
@narendramodi Sir you haven't yet said sorry for your trip to meet the Pakistani PM.. It was dec 25th. Same time KJo was shooting ADHM? Why?

बातमीची लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/anurag-ka...

एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे. ज्या काळात भारत-पाक संबंध एवढे छान होते की आपले पंतप्रधान श्री मोदी हे शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला पाकिस्तानात जाऊ शकतात, तर त्याच काळात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ज्या चित्रपटाचे शूटींग झाले, त्याविरोधात आता प्रदर्शनाच्या वेळी आवाज उठवणे चुकीचे आहे. ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.
मागे माझा स्वत:चा ईथे आतिफ अस्लम या गायकाबद्दल धागा होता. एक "गायक" म्हणून तो आजही माझा आवडीचा आहे. जो पर्यंत तो या भारत-पाक वादात भारताविरुद्ध गरळ ओकत नाही तो पर्यंत एक "कलाकार" म्हणूनही आवडीचा राहील. त्याने ईथे कैक हिट गाणी दिली आहेत. त्यानिमित्ताने कित्येक चित्रपटांत, कित्येक दिग्दर्शक निर्मात्यांसोबत काम केले असेल. कोणाकोणाविरुद्ध बहिष्कार टाकणार. ज्यांच्याविरुद्ध आपल्याला भडकावले जाईल त्यांच्या विरुद्ध? की सरसकट सर्वांविरुद्ध?

मध्यंतरी व्हॉटसपवर एक खोडकर(!) मेसेज फिरत होता -- जिओच्या जाहीरातीत मॉडेल म्हणून "शाहरूख खान" झळकतोय. हा तोच शाहरूख खान आहे ज्याच्या आगामी चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहे. चला तर मग जसे आमीरविरोधात स्नॅपडीलवर बहिष्कार टाकला होता तसे शाहरूखबाबतही करूया. त्याच्या चित्रपटासोबतच "रिलायन्स जिओ सीम" वर सुद्धा बहिष्कार टाकूया. आणि जे नाही टाकणार त्यांची देशभक्ती फुकटात मिळणार्‍या डेटासाठी विकली गेली असा त्याचा अर्थ होईल.
बाकी रिलायन्स जिओच्या जाहीरातीसाठी जेव्हा मोदी आणि शाहरूख एकत्र येतात तेव्हा अश्या बहिष्कारामागील फोलपणा जाणवल्यावाचून राहत नाही.

जर सरकारनेच पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारला तर ते योग्य राहील.
जर आपल्या फिल्म ईंडस्ट्रीनेच असा स्टॅन्ड घेतला - आम्ही पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम नाही करणार तर ते योग्य राहील.
पण जर राजकारणाचा एक भाग म्हणून हे आपापल्या सोयीने होत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
तसेच पाकिस्तान्यांशी संबंध तोडण्याची अपेक्षा फक्त बॉलीवूड आणि क्रिकेटर्स यांच्याकडून ठेवण्यातही हशील नाही.
आणि अश्या कधी लादल्या जाणार्‍या तर कधी उठवल्या जाणार्‍या बहिष्काराने पाकिस्तान नावाचा प्रॉब्लेम सुटणारही नाही.
पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे.

* तळटीप - मी अनुराग कश्यपच्या ट्वीटवर "एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे" असे म्हटले असले तरी मी त्याच्या ट्वीटशी सहमत आहे किंवा विरोधात आहे असे दोन्ही नाही. कारण त्याच्या ट्वीटमागचा नेमका हेतू मला माहीत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ५ कोटी रु खुप जुजबी रक्कम वाटते. सलमान, शाहरुख, अमिर सारखे मोठे कलाकार प्रत्येक चित्रपटाचे ४०-५० कोटी रु. मिळवतात. राज, मुख्यमन्त्री एकत्र येतात आणि केवळ ५ कोटी रुपयात समाधान ? महाराष्ट्रात रहाणार्‍या प्रत्येकाने ४५ पैसे जमा केले तरी आरामात ५ कोटी रुपये जमा होतात. असो.
<<

तुम्हाला खायचे अन दाखवायचे दात, अशी मराठी म्हण येते का?

म्हणी व वाक्प्रचार असं नवनीतच्या ७वी स्कॉलरशीप गाईडात प्रकर्ण असतं. ते बघा. किंवा सुमती क्षेत्रमाडे (?? कदाचित चुकलंय नांव) यांचं 'एक होता राजा' नावाचं पुस्तक वाचा. त्यात म्हणींच्या गोष्टी आहेत.

४५० पैसे जमा करा. शेवटचा फक्त शून्य खाऊन टाका Wink हाकानाका.

माझी तिथे तक्रार करण्याआधी,

मी शून्य पैसे खाण्याबद्दल लिहिलेलं आहे. अर्थात, शून्य पैसे खाल्ले गेले आहेत. Happy तेव्हा यातून विकृत अर्थ काढणार्‍यांनी तो आपल्या (विकृत) बुद्धीचा दोष समजावा.

14680620_1250203375042550_5945132527027592253_n.jpg

TV18 म्हणतो फडणवीसांनी दंड द्यायला भाग पाडले,
फडणवीस म्हणतात मी काहीच बोललो नाही
कोण खरं कोण खोटं??

आता मनसे , केजो आणि फडणवीस काय करणार?
>>>
काय करणार माहीत नाही पण हे कॉम्बिनेशन खूप भारी आहे.
यांची शिवसेना, शाहरूख आणि मोदींशी मॅच घेतली तर मजा येईल.

'रईस'च्या प्रदर्शनासाठी कसलीही तडजोड करणार नाही : फरहान
http://dhunt.in/1Cpoj
via NewsHunt.com

रईसच्यावेळी पुन्हा वाद पेटणार...
मनसे आणि मुख्यमंत्री काय करतात हे बघणे आता रोचक.

1. मुख्यमंत्र्यांनी एकदा मांडवली केल्याने आता त्यांना पुन्हा मांडवलीसाठी बोलावले जाणार. त्यांनी नकार दिल्यास पक्षपातीपणाचा आरोप होणार.

2. मनसे ने काहीच केले नाही. तर तो करण जोहरवर अन्याय होणार. तो कोर्टात आवाज उठवू शकतो.

3. फरहान खान अडूनच राहिला की पैसे देणारच नाही तर मुख्यमंत्री मांडवलीला असल्याने मनसेला विरोधात तोडफोडही करता येणार नाही.

4. जर मधला मार्ग निघाला आणि एक-दोन कोटीत सौदा झाला तर ते पैसे आता कोणत्या फण्डात टाकायचे हा प्रश्न उद्भवणार. कारण आर्मीने आधीच अश्या खंडणी रक्कमेला नकार दिलाय.

5. जरी काहीच झाले नाही तरीही मनसे आणि मुख्यमंत्र्यांनी आतल्या आत गेम केला आणि पैसे थेट स्वत:च्या खिशात जमा केले असा आरोप होणार. हा आरोप करायला अर्थातच शिवसेनाच सर्वात पुढे असणार. त्यांन हे स्वत:हून नाहीच सुचले तर तेवढे काम पवार करणार.

correct

Pages