जेव्हा पाकिस्तानशी आपले बिनसते तेव्हा पहिली कुर्हाड सिनेकलाकार आणि क्रिकेटपटूंवरच पडते हे आपल्याला नवीन नाही. वर्षानुवर्षे हे होत आले आहे. जेव्हा आपले त्यांच्याशी संबंध बिघडलेले असतात तेव्हा तेथील कलाकारांना आणि खेळाडूंना, त्यातही प्रामुख्याने क्रिकेटपटूंना आपले दरवाजे बंद होतात. जेव्हा आपण मैत्रीचे प्रस्ताव आणि अमन की आशा मोडमध्ये असतो तेव्हा कलाकारच काय तेथील राजकीय नेत्यांच्या सुद्धा गळाभेटी घेतल्या जातात.
सध्या बहिष्काराची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त भासत आहे. पण पुढे कायम राहील याची खात्री नाही. दोन वर्षांनी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला वर भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना दोस्ती-कप म्हणून खेळवला गेला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. ईतके हे सवयीचे झाले आहे.
असो, यावर धागा काढायचे मनात होते. पण आधीच चालू असलेल्या वादात उगाच आपण तेल टाकायला नको म्हणून आतापर्यंत काढला नव्हता.
पण अनुराग कश्यपच्या एका ट्वीटने आज पुन्हा माझ्या डोक्यातील विचारांना बाहेर काढलेय.
तो काय म्हणतो बघा,
@narendramodi Sir you haven't yet said sorry for your trip to meet the Pakistani PM.. It was dec 25th. Same time KJo was shooting ADHM? Why?
बातमीची लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/anurag-ka...
एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे. ज्या काळात भारत-पाक संबंध एवढे छान होते की आपले पंतप्रधान श्री मोदी हे शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला पाकिस्तानात जाऊ शकतात, तर त्याच काळात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ज्या चित्रपटाचे शूटींग झाले, त्याविरोधात आता प्रदर्शनाच्या वेळी आवाज उठवणे चुकीचे आहे. ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.
मागे माझा स्वत:चा ईथे आतिफ अस्लम या गायकाबद्दल धागा होता. एक "गायक" म्हणून तो आजही माझा आवडीचा आहे. जो पर्यंत तो या भारत-पाक वादात भारताविरुद्ध गरळ ओकत नाही तो पर्यंत एक "कलाकार" म्हणूनही आवडीचा राहील. त्याने ईथे कैक हिट गाणी दिली आहेत. त्यानिमित्ताने कित्येक चित्रपटांत, कित्येक दिग्दर्शक निर्मात्यांसोबत काम केले असेल. कोणाकोणाविरुद्ध बहिष्कार टाकणार. ज्यांच्याविरुद्ध आपल्याला भडकावले जाईल त्यांच्या विरुद्ध? की सरसकट सर्वांविरुद्ध?
मध्यंतरी व्हॉटसपवर एक खोडकर(!) मेसेज फिरत होता -- जिओच्या जाहीरातीत मॉडेल म्हणून "शाहरूख खान" झळकतोय. हा तोच शाहरूख खान आहे ज्याच्या आगामी चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहे. चला तर मग जसे आमीरविरोधात स्नॅपडीलवर बहिष्कार टाकला होता तसे शाहरूखबाबतही करूया. त्याच्या चित्रपटासोबतच "रिलायन्स जिओ सीम" वर सुद्धा बहिष्कार टाकूया. आणि जे नाही टाकणार त्यांची देशभक्ती फुकटात मिळणार्या डेटासाठी विकली गेली असा त्याचा अर्थ होईल.
बाकी रिलायन्स जिओच्या जाहीरातीसाठी जेव्हा मोदी आणि शाहरूख एकत्र येतात तेव्हा अश्या बहिष्कारामागील फोलपणा जाणवल्यावाचून राहत नाही.
जर सरकारनेच पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारला तर ते योग्य राहील.
जर आपल्या फिल्म ईंडस्ट्रीनेच असा स्टॅन्ड घेतला - आम्ही पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम नाही करणार तर ते योग्य राहील.
पण जर राजकारणाचा एक भाग म्हणून हे आपापल्या सोयीने होत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
तसेच पाकिस्तान्यांशी संबंध तोडण्याची अपेक्षा फक्त बॉलीवूड आणि क्रिकेटर्स यांच्याकडून ठेवण्यातही हशील नाही.
आणि अश्या कधी लादल्या जाणार्या तर कधी उठवल्या जाणार्या बहिष्काराने पाकिस्तान नावाचा प्रॉब्लेम सुटणारही नाही.
पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे.
* तळटीप - मी अनुराग कश्यपच्या ट्वीटवर "एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे" असे म्हटले असले तरी मी त्याच्या ट्वीटशी सहमत आहे किंवा विरोधात आहे असे दोन्ही नाही. कारण त्याच्या ट्वीटमागचा नेमका हेतू मला माहीत नाही.
सरकारने अधि़कृत बंदी घातली
सरकारने अधि़कृत बंदी घातली आहे का या चित्रपटाला?
>>>>
धाग्यात अनुरागचे ट्विट टाकल्याने आणि त्याने मोदींना प्रश्न विचारल्याने बरेच जणांचा ईथे गैरसमज झालाय की मी देखील हा धागा सरकार विरोधात काढला आहे. पण तसे नाहीये. निदान मला तरी सरकारला जाब विचारायचे नाहीये. मी सरकारच्या कारभारावर पुर्णपणे खुश आहे, अश्यातला भाग नसला तरी
करण जोहरच अपिल बघुन हसुच आल,
करण जोहरच अपिल बघुन हसुच आल, किती ते नाटकी , त्यातही सहजता अजिबात नव्हती मुद्दाम ठरवुन ग्रे बॅकग्राउन्ड, काळे कपडे ...
किती ते नाटकी , त्यातही सहजता
किती ते नाटकी , त्यातही सहजता अजिबात नव्हती >>> कधी असते, त्याच्या वागण्यात सहजता
फिल्म फेअरचे अॅवार्ड शो बघा, फुल्ल नाटकी सूत्रसंचालन. मध्यंतरी कोणीतरी हिरोईन (बहुधा सोनम कपूर) म्हणालीही की करण जोहर हा प्रत्येक पार्टीमध्ये एक नकली हास्य घेऊन फिरत असतो. बेसिकली शाहरूख खान जर या फिल्म जगतात नसता तर करण जोहर हे नाव देखील कोणालाही ठाऊक नसते. तसेही मागे त्या एआयबी शो मध्ये त्याचे प्रताप पाहिले तेव्हाच तो माझ्या मनातून उतरला होता.
असो !
हे माझे मत झाले, विषयांतर झाले. पण सांगायचा मुद्दा हा की ईथला चर्चेचा मुद्दा करण जोहारचा चित्रपट, त्याचे नुकसान, अनुरागचे ट्विट, ईतकाच किंबहुना तो नाही आहे
अरे बाबा तु रईस आल्यावर
अरे बाबा तु रईस आल्यावर बहिष्कार टाकणार कि नाहि ते सांग आधी...
केजो फार श्रीमंत असेलही. पण
केजो फार श्रीमंत असेलही. पण त्याने तरी हे नुकसान का सोसावे ? कोणतीही बेकायदा गोष्ट केलेली नसताना? >> त्यानं धंदा काढलाय. पकाऊ आणि डोकेखाऊ पिक्चर्स काढून अफाट नफा कमवलाय. धंद्यात जसा फायदा होतो तसाच तोटाही होतो. नफा झाला तेव्हा तो रडला का की माझाच धंदा का चालतोय - प्रेक्षकांची मर्जी दोन्ही केस मधे.
प्रेक्षकांची मर्जी दोन्ही केस
प्रेक्षकांची मर्जी दोन्ही केस मधे >> असं असेल तर मग होऊ द्या पिक्चर रिलीज. ज्यांना बघायचा ते बघतील ज्यांना नाही बघायचा ते नाही बघणार
जर मेजॉरिटी प्रेक्षकांना नसेल बघायचा तर होईल फ्लॉप
धनि. आता जर कोणी (म्हणजे
धनि. आता जर कोणी (म्हणजे काही राजकीय(!) संघटनांनी) विरोध न करता हा शांततेत प्रदर्शित होऊ दिला तर मूळात हा पिक्चर जेवढा चालणार होता त्यापेक्षा जास्त चालेल कारण येनेकेनेप्रकारे मिळालेली पब्लिसिटी. आणि त्यानंतर मग विरोधकांना उगाच हा आपला पराभव आणि करण जोहरला उगाच हा आपला विजय वाटणार. अहंकाराचा इश्यू होणार.. त्याचबरोबर चर्चेत राहायला त्यांनाही हा एक मुद्दा भेटला आहेच. त्यामुळे ते प्रेक्षक घाबरून काहीतरी राडा होईल उगाच म्हणून सिनेमागृहापर्यंत जाऊच नये अशी तजवीज करायला बघणार. मग दोन्ही बाजूंनी सिनेमा किती चालला वा फ्लॉप गेला याचे खोटे नाटे आकडे फेसबूकवर रंगणार. शेवटी राजकारण म्हणजे तरी काय, एक बिजनेसच. नुकसानीत राहायला कोणाला आवडेल
ऋन्मेऽऽष >>
ऋन्मेऽऽष >>
<<<<< नाही सॉफ्टवेअर नाही.
<<<<< नाही सॉफ्टवेअर नाही. जे काम आम्ही करतो ते भारतात आणखी कोण फारसे करत नाही, करू शकत नाही. बहुधा! >
भारतात अस काम होत म्हणजे जगात ईतरत्र कोणीतरी करत असेलच !!
पण ते भारतात स्वस्त आहे म्हणुन हे काम येत भारतात !!
पाकिस्तानातले लोक भारतात काम द्यायला भोळे लोक वाटले का ? स्वस्तात काम होत म्हणुन येत ! जर तुम्ही अॅटीट्युड दाखवला मग काँट्रॅक्ट रद्द्च समजा !!
बाकी पाकिस्तानात पॉवर प्लांटच्या प्रोजेक्टवर काम करणार्या भारताच्या लोकांबद्दल काय भावना आहे हे ईथे बघा ! पाकिस्तान ह्या लोकांबद्दल काय म्हणत आहेत हे बघा की हे भारतीय लोक "रॉ" चे एजंट आहेत !! उद्द्या हे भारतीय लोकांना पाकिस्तानच्या जेल मध्ये टाकल तर काय कराल ?
जर सरकारने बंदी आणली नसेल तर
जर सरकारने बंदी आणली नसेल तर चित्रपट प्रदर्शित होईलच. मला वाटते वितरक, प्रेक्षक यांनी त्याकडे पाठ दाखवली तर त्यांचा तो अधिकार आहे. मनसे सारख्या संघटना गुंडागर्दी करून जर चित्रपट बंद पाडायला भाग पाडत असतील तर चुकीचे आहे. अनुराग कश्यप च्या ट्वीट वरून केंद्र सरकारने बंदी आणली असे वाटले. हल्ली ज्याच्या त्याच्यात उगाचच मोदींना गुंतवले जाते.
करण जोहर पेक्षा रणबीर जास्त दु:खात असेल.. इतक्यात त्याचे बरेचसे चित्रपट आपटले असल्याने या चित्रपटाकडून त्याच्या हाय होप्स असणार !
101
101
चित्रपट सोडल्यास इतर अनेक
चित्रपट सोडल्यास इतर अनेक क्षेत्रात भारत पाक व्यवहार होत असतो. ही काही झिरो सम गेम नव्हे. आपल्या इथल्या काही मुली व महिला फवाद खान वर जीव ओवाळून टाकतात तसेच तिथल्या काही मुली व महिला स्वप्नील जोशी वर ओवाळून टाकतच असतील ना? त्याचे चित्रपट पाकिस्तानात न दाखवले तर पर्यायाने भारताचेच नुकसान आहे ना ?
एक नॉन इशू आपण उगाच ताणतो
एक नॉन इशू आपण उगाच ताणतो आहोत,
एखादं दोन महिने जाऊद्या,
सांस्कृतिक देवाण घेवाणीच्या नावाने एखादे कला पथक पाकिस्तानातून भारतात येईल, आणि आपल्या मोदीजींच्या हस्ते त्याचे उदघाटन होईल
तेव्हा इकडे तावतावाने बोलणारे मोदीजींचा मास्टर स्ट्रोक म्हणून परत बोलायला लागतील.
पाकिस्तानच्या "अदनान सामी"
पाकिस्तानच्या "अदनान सामी" नावाच्या कलाकाराला ईथल्याच सरकारने भारताच नागरीकत्व बहाल केलेल
आहे, त्या पुढे जाउन आता "सलमा आगा" ह्या अभिनेत्रीने सुद्धा आता भारताच नागरीकत्व मिळाव असा प्रयत्न
करत आहे, ह्या दोन्ही कलाकारा बद्दल पाकिस्तानातल्या सो कॉल्ड प्रगल्भ मिडीया मध्ये काय काय बोलल जात हे बघा म्हणजे कळेल पाकिस्तानी लोक काय आहेत ते.>>>>> मिलींद, सलमा आगा ही आपला जुना नट आगाची मुलगी आहे, ती मुळची भारतीयच आहे. लग्नानंतर पाकीस्तानात गेली. पण तिचा बहुतेक घटस्फोट झालाय. तिला एक मुलगी पण आहे. ( पडोसन सिनेमात सायरो बानोच्या वडलांचे काम करणारा नट आगा होता, आणी जलाल आगा हा सलमाचा भाऊ होता)
पाकिस्तानातले लोक भारतात काम
पाकिस्तानातले लोक भारतात काम द्यायला भोळे लोक वाटले का ? स्वस्तात काम होत म्हणुन येत !
>>>>>>
चीप लेबर !
खूप चांगला मुद्दा आणला चर्चेत.
जर एखादे काम स्वस्तात होत असेल तर शत्रूराष्ट्राची माणसे वापरायलाही हरकत नाही. पाकिस्तानला सुद्धा हा व्यवहार समजतो. ते कट्टर धर्माभिमानी आणि भारतद्वेषी असले तरी आम्ही भारतीय स्वस्तात काम करून देत असल्याने ते आम्हाला काम देतात.
पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम मिळते यामागचे कारण हेच तर नाही ना.
जर एक भारतीय आणि एक पाकिस्तानी कलावंत एकाच दर्जाचे काम करत असतील पण पाकिस्तानी तुलनेत कमी पैसे आकारत असेल तर या चीप लेबर नियमानुसार त्याला काम देण्यास हरकत नाही.
मला वाटते वितरक, प्रेक्षक
मला वाटते वितरक, प्रेक्षक यांनी त्याकडे पाठ दाखवली तर त्यांचा तो अधिकार आहे.
>>>>
प्रेक्षक पाठ दाखवू शकतात पण वितरकांबाबत तो अधिकार आहे असे ठामपणे म्हणता येणार नाही.
असं म्हणतात चोरों के भी उसूल होते है, मग धंद्याचे तर असतातच असतात. साधा रिक्षावाला आपल्याला नकार देतो तेव्हा आपण त्याच्या नावाने बोटे मोडतो. आणखी चार जणांनी नकार दिला तर समस्त रिक्षावाला जमातीला शिव्या घालतो. तो मायबोली गणेशोत्सव स्पर्धेत संगीतकाच विषय बनतो, त्यातही त्यांच्यावर विनोदाच्या शैलीत का होईना ताशेरे ओढले जातात. का? रिक्षा त्यांची आहे. कोणाला घ्यायचे, कोणाला नाही, कुठे जायचे, कुठे नाही हा अधिकार त्यांचा नाही का?
>>>> म्हणून भारतीय
>>>> म्हणून भारतीय निर्मात्यांनी जाणून बुजून घेतलेला निर्णय आहे तो. पण आता ती रिस्क झाली आहे! <<<<
होय, ती बिझनेस रिक्स आहे. दंगल्/नैसर्गिक संकटे याच प्रमाणे देशाच्या शत्रुंवरील बहिष्काराची लाट.... या बिझनेस रिस्क आहेत.
अहो मध्यंतरी नवरात्र होती, , मैदानाच्या भिंतीकडेला "चायनिज" गाड्या लावुन नेपाळी लोक धंदा करतात, तर नवरात्रीचे नऊ दिवस त्यांना तिथे धंदा करु दिला गेला नाही. बिझनेस रिक्स.....
कुडदुरेदार और दाणेदार दंतमंजन मसुडाँको अपाय करते है, वगैरे म्हणत अन देशी मंजनांना नावे ठेवत सतत पन्नास एक वर्षे हिंदुस्थानच्या माऊथवॉशच्या मार्केटवर अधिराज्य गाजवणार्या कोलगेटला जेव्हा पतंजलीने (व अन्य देशी प्रॉडक्ट्सने) हिसका दाखवला तेव्हा यांनाही आयुर्वेद आठवुन क्या आपके टुथपेस्टमे नमक है? कोयला है? करत जाहीरातींचा भडीमार करावा लागतोय.... बिझनेस रिस्क.... फरक इतकाच, की कोलगेट वाले पतंजलीच्या/आयुर्वेदाच्या नावाने शंख न करता, त्याच लाटेवर स्वार होऊ पहाताहेत... रिअल बिझनेसमन....
इकडे सिनेमावाल्यांचे तसे नाहीये, त्यांचे निव्वळ आर्थिक हितसंबंध असते, तर अनेक चित्रपट डब्ब्यात जातात, तसा हा ही गेला म्हणून नव्याने सिनेमा निर्मिती करु पाह्तील, पण शंका येण्याइतपत "हितसंबंध" असावेत म्हणूनच कोलगेट प्रमाणे चालू लाटेवर स्वार न होता, ते त्यास पराकोटीचा विरोध तथाकथित विचारवंत/समाजवादी/मोदीविरोधक/लाल्यापत्रकार यांना हाताशी धरुन करताहेत. धिस्स इज नॉट बिझनेसमन....
मी लिहिल्यानंतर अनेक प्रतिसाद
मी लिहिल्यानंतर अनेक प्रतिसाद आलेत.
त्यातल्या काहींच्या उत्तरासाठी मी जे लिहिलं असतं, ते धनि यांनी अधिक चांगल्या प्रकारे लिहिलं आहे.
तरीपण : पाकिस्तानवरच्या रागासाठी त्याने अभिनय केलेल्या भारतीय चित्रपटावर अप्रत्यक्ष बंदी आणि त्यामुळे कोणाही भारतीयांचे नुकसान का व्हावे? चित्रपट व्यावसायिकांच्या संघटनेने 'आम्ही पाकिस्तानी कलाकार घेणार नाही' असा निर्णय घेणं वेगळं. वितरकांनी, चित्रपटगृहांच्या मालकांनी संघतितरीत्या, आम्ही असे चित्रपट प्रदर्शित करणार नाही असं म्हणणं वेगळं आणि एखाद्या राजकीय संघटनेने असे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही , असं म्हणणं वेगळं. तसंही राजकीय संघटनांना बंद्या घालायला आणि त्यानिमित्ताने प्रकाशझोतात यायला काही निमित्त हवेच असते. पाकिस्तानी कलाकार हे असेच एक निमित्त.
आता अनुराग कश्यपच्या ट्विट आणि त्याच्या स्पष्टीकरणाच्या संदर्भाने थोडं मागे जाऊ.
२५ डिसेंबर २०१५ रोजी आदरणीय पंतप्रधान मोदी , पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवशी अचानक गेल्यासारखे, सरप्राऽऽऽऽऽझ म्हणून हजर झाले. त्यांच्या नातीला लग्नानिमित्त आशीर्वादही दिले.
म्हणजे हे सगळं करण्यासारखे दोन देशांतले संबंध बरे होते. त्यानंतर आठवडाभरातच म्हणजे २ जानेवारी २०१६ रोजी पठाणकोट लष्करी हवाईतळावर हल्ला झाला. सुदैवाने फारसे जानमालचे नुकसान झाले नाही. पण हल्लेखोर पाकिस्तानातून आले होते, हे तर उघड होते. या हल्ल्याची चौकशी करायला पाकिस्तानातूनच एक मंडळ आले, ज्यात चक्क आय एस आयचे अधिकारीही असल्याचे म्हटले गेले. म्हणजे अजूनही दोन्ही देशांतले संबंध बरेच होते. २०१४ नंतरचा हा पहिलाच हल्ला होता, असंही नाही. त्यापूर्वी गुरुदासपूर झालंच होतं.
आदरणीय मोदींचे भारत पाक संबंध सुधारायचे प्रयत्न पठाणकोट हल्ल्यानंतरही कायम होते. उरी हल्ल्यानंतर मात्र ते पूर्णच वाया गेले. पण म्हणून ती भेट घेणं चुकीचं होतं असं पश्चातबुद्धीने म्हणायचे की ही त्यांची चतुर खेळी होती असं म्हणायचं?
याच काळात या सिनेमाचे चित्रीकरण सुरू होते. त्यातले फवाद खानचे काम जून जुलैला संपल्यावर तो मायदेशी परतलाही.त्या काळात पाकिस्तानी कलाकाराला काम देण्याबाबत कोणी आक्षेप असल्याचे म्हटले नाही. आता हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच्या काळात उरी हल्ला झाल्यावर , केवळ त्या तयार असलेल्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहेत म्हणून त्याला डब्यात घाला असे म्हणणे चूक आहे.यापुढे पाकिस्तानी कलाकारांना इथे काम करू देऊ नये असे म्हणणे एकवेळ ठीक म्हणता येईल.
दुसरा मुद्दा : आणखी थोडं मागे जाऊन. आदरणीय मोदींनी आपल्या राज्याभिषेक समारंभाला अन्य शेजारी देशांप्रमाणे पाक पंतप्रधानांना आमंत्रण दिले होते. भेटवस्तूंची देवघेव आणि त्याबद्दल पुरेसा गवगवाही झाला. त्यानंतरच्या वर्षभरात सीमेवर सीझफायर व्हायोलेशनचे प्रमाण अगदी गेल्या कित्येक वर्षांत झाले नाही एवढे वाढले.
सीमेवरची गावे हलवण्यापासून त्यांना नुकसानभरपाई देण्यापर्यंतची पावले उचलावी लागली. हे उरीच्या आणि वाढदिवसाच्या बर्यापैकी आधीचे आहे.
तरीही भारताचे पाकिस्तानशी संबंध सलोख्याचे ठेवण्याचे प्रयत्न सुरू होते हे उघड आहे. विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचा संघ इथे येऊन खेळून गेला.
उरी हल्ला झाल्यानंतरही भारत पाक व्यापार सुरू आहे. समझौता एक्स्प्रेस बंद झालेली नाही. बससेवाही सुरू आहे.व्यापारात पाकिस्तान आपल्याला मोस्ट फेवर्ड नेशन म्हणायला तयार नसूनही पाकिस्तानला आपण पाकिस्तानला अजूनही मोस्ट फेवर्ड नेशन धरतोय. पाकिस्तानी कलाकारांना व्हिजा नाकारणार नाही, असं भारत सरकार म्हणतंय. आम्ही पाकिस्तानी नागरिकांचा द्वेष करत नाही असं भारताचे गृहमंत्री सांगतात. तरीही तयार असलेल्या चित्रपटावर काय तो आमचा रोष!
अनुराग कश्यपने म्हटल्याप्रमाणे काही चित्रपटांवर बंदी घालून देशापुढचे सगळे प्रश्न सुटणार असल्याचं समाधान मिळत असेल काहींना.
अनेकांनी धंद्यातल्या रिस्क्सचा उल्लेख केला. चित्रपट प्रेक्षकांना न आवडणामुळे नुकसान होणं वेगळं आणि करमणुकीशी संबंध नसलेल्या, कायदाबाह्य गोष्टींमुळे चित्रपटाच्या कामगिरीवर परिणाम होणं वेगऴं.
जसं नवाझ शरीफना हॅपी बड्डे करताना पुढे पठाणकोट, उरी होणार आहेत हे मोदींना माहीत नव्हतं, तसंच फवादला कास्ट करताना करण जोहरलाही ते माहीत नव्हतं.
पाक कलाकाराची भूमिका असलेल्या चित्रपटावरील अनधिकृत बंदीला विरोध केला म्हणजे पाक दहशतवाद्यांबद्दल प्रेमाचे उमाळे आलेत असा सोयिस्कर अर्थ लावलाय. त्यांना उत्तर द्यायची गरज मला वाटत नाही. पण अनेकदा वाटलेली एक गोष्ट पुन्हा लिहितोय : देशप्रेम सिद्ध करण्यासाठी एखादी कृती करण्यापेक्षा दुसरी एखादी कृती न करणं आणि ती दुसर्यांनी करू नये असा हेका धरणं हा एक सोपा मार्ग झालाय.
हर्पेन यांनी विचारलेल्या प्रश्नांबद्दल : भारत पाक संबंध सुधारावेत, शांतता नांदावी असे वाटणारे लोक आणि त्यासाठी प्रयत्न करणारे लोक दोन्हीकडे आहेत. एका देशाच्या भूमिकेला विरोध करताना, त्या देशातील प्रत्येक नागरिकाचा आणि कलाकाराचा द्वेष करायची गरज मला वाटत नाही.
भारतीय कलाकारांना पाकिस्तानात कार्यक्रम करण्याची संधी न मिळण्याबद्दल : हे चूक आहे. ते करतात तीच चूक आपणही करावी असं मी म्हणणार नाही.
पुन्हा या सगळ्या सापेक्ष गोष्टी आहेत. उद्या परिस्थिती आणखी चिघळली, भारत सरकारने पाकिस्तानला शत्रुराष्ट्र घोषित केलं तर या सगळ्या गोष्टी थांबतीलच. त्याबद्दल तक्रार असण्याचं कारण नाही. कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्या सरकारच्या याबाबतीतल्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह मी तरी लावणार नाही.
रश्मी यांनी अलमा आगाबद्दल
रश्मी यांनी अलमा आगाबद्दल लिहिलेली माहिती IMDB वरच्या माहितीशी जुळत नाही.
सलमा आगाचं नाव जलाल आगा आणि आगाच्या संदर्भात कधीही ऐकलेलं नाही.
पाकी लष्कर, तिथले राज्यकर्ते
पाकी लष्कर, तिथले राज्यकर्ते हेच भारत विरोधी आहेत, सामान्य जनतेचे तसे नाही, ते भारतातल्या लोकांशी मैत्री वाढवु पहात आहेत, असे चित्र कायम रंगवले जाते. मध्यंतरी पेशावर मधल्या शाळेवर जेव्हा अतीरेकी हल्ला झाला तेव्हा सर्व भारतीयांनी दु:ख व्यक्त केले. पण विरोधाभास बघा. ज्यांची मुले या हल्ल्यात मारली गेली, तेच रडत रडत मिडीया समोर बोलत होते की असा हल्ला भारतातल्या शाळेवर झाला असता तर भारतीयांना आमचे दु:ख कळले असते. आता असल्या घटनेवर माणसाने हसावे की रडावे?
भरत, सलमा आगा बद्दल जुन्या
भरत, सलमा आगा बद्दल जुन्या लोकप्रभा व काही हिंदी फिल्मी नियतकालिके मध्ये वाचलेय. त्यात ती, जलाल आगाची बहीण आहे असे लिहीले होते. जर तसे नसेल तर झालेल्या चूकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते.
रश्मी, तुम्ही म्हणताय तसं
रश्मी, तुम्ही म्हणताय तसं त्या पालकांनी म्हटल्याचं मी फक्त ग्रेपव्हाइनवरून ऐकलंय. जसं फवाद खान बॉलीवुडबद्दल बोलल्याचं आता बोललं जातंय, कसाबच्या बिर्याणीबद्दल बोललं जायचं, तसंच हे नाही कशावरून? तुमच्याकडे त्या व्हिडियोची लिंक असेल तर शेअर कराल का?
सगळेच पाकिस्तानी काही अमनपसंद आणि भारतद्वेष न करणारे असतात असं मलाही वाटत नाही. पण सगळेच तसे नसतात असंही नाही.
इथे जर एका चित्रपटावरील बंदीच्या विरोधात बोलल्याने दहशतवाद्यांचे समर्थक, देशद्रोही असं लेबल लागतंय, तर तिथेही फार काही वेगळं होणार नाही.
आताच एक बातमी वाचली.
आताच एक बातमी वाचली. पाकिस्तानमधल्या टीव्ही ब्रॉडकास्टर्सच्या संघटनेने तिथे वाढत्या भारत पाक तणावामुळे आणि भारतातील घटनांची प्रतिक्रिया म्हणून भारतीय एंटरटेनमेंट चॅनेल्सवर बंदी घातलीय. तीही लोकांकडून मागणी आल्यामुळे. आहे की नाही आपलं आणि त्यांच सेम?
तिथल्या बायका एकता कपूरच्या मालिकांचा अॅडिक्ट आहेत हे वाचलं होतं. पाकिस्तानी मालिकांतही भारतीय मालिकांचे संदर्भ येतात. बहुतेक "जिंदगी गुलजार है" मध्ये फवादच्या पात्राला उद्देशून, तू भारतीय मालिकांतल्या हीरोसारखा का बोलतो आहेस?" असा संवाद होता.
Bharat +1 Runmesh chya post
Bharat +1
Runmesh chya post hi chhan aahet.
साधा रिक्षावाला आपल्याला नकार
साधा रिक्षावाला आपल्याला नकार देतो तेव्हा आपण त्याच्या नावाने बोटे मोडतो >>
हे नियमित केस मध्ये. पण एखादा रिक्षावाला तत्व म्हणून रेड लाईट एरियात येणार नाही अस म्हणाला तर आपण तत्वाकरता फायदा नाकरला म्हणून कौतुकच करू.
मनमानी करण्याचा अधिकार नसावा पण तत्वाकरता नाकारण्याचा अधिकार नक्कीच असावा.
भरत - आपण देशाच नुकसान विरुद्ध सिनेमाच नुकसान का कंपेर करतोय?
मोदीच्या केस मध्ये ह्या शक्यता लक्षात घ्या:
१ मोदींनी प्रयत्न केला पण समोरून प्रतिसाद आला नाही
प्रयत्न सक्सेसफुल झाला असता तर देशाचा फार मोठा फायदा झाला असता. हे घडले नाही म्हणून ते करेक्टिव पावले उचलत आहेत.
२ मोदींना हे घडणार ह्याची कल्पना होती - पण आंतरराष्ट्रीय प्रतिमा आता आपल्याला अनुकल अशी करण्यासाठी त्यांनी मैत्रिचा प्रयत्न केल्याच्व दाखवले.
इतपत राजकारण ओफिस मधे आणि काहींच्या घरातही घडते.
तटी: मी मोदी भक्त नाही.
बरेचसे पेमेंट जे साधे कलाकार
बरेचसे पेमेंट जे साधे कलाकार / तंत्रज्ञ असतात त्यांचे हे चित्रपट पूर्ण झाल्यावर होते त्यामुळे तो प्रदर्शित झाला नाही तर केजो हात वरती करेल आणि त्यांचे पेमेंट होणार नाही. >>
मला एक शंका आहे. इथे माबोवर चिनुक्\नीरजा\\वैभव जोशी\पूनम्\श्यामली माध्यम पायोजक किंवा चित्रपटाशी संबंधीत व्यक्तींनी याचे उत्तर द्यावे ही विनंती. माझा असा अंदाज आहे की साधे कलाकार किंवा चित्रपट तंत्रज्ञ, स्पॉटबॉय किंवा अगदी हलकी कामे करणारे कामगार यांना रोजंदारीवर पगार मिळतो. हातावरचे पोट असलेले अनेक लोक काम करता त्यांना चित्रपट प्रट्र्शित होईपर्यंत पैसे मिळत नाहीत यावरच विश्वास नाही माझा.
>>>> आपण देशाच नुकसान विरुद्ध
>>>> आपण देशाच नुकसान विरुद्ध सिनेमाच नुकसान का कंपेर करतोय? <<<<

मग्ग? भारतीय नागरिकांचे "हक्क" नकोत का जपायला? अन हे करता करता तमाम भारतीय नागरिकांच्या हक्कांवर आकाशीची कुर्हाड कोसळत्ये असे लालेलाल वातावरण नको का निर्माण व्हायला?
>>> मोदीच्या केस मध्ये ह्या शक्यता लक्षात घ्या: <<<
मूळात या विषयात "मोदींना" ओढण्याची गरजच काय? अन ओढलेच, तर वर्षापुर्वी केलेल्या (आंतर्राष्ट्रीय राजकीय गरजेपोटीच्या अत्यावश्यक) घटनांची साक्ष देत आज अमुक तमुक करु नका, हे म्हणणे कुठल्या तर्कटावर आधारीत आहे?
अन अशीच तर्कटे लावायचीच, तर काश्मिरवर हल्ला करुन व लाखो हिंदूंना निर्वासित म्हणून पाठवुन शत्रुराष्ट्र म्हणूनच सिद्ध होत असलेल्या तत्कालिन पाकिस्तानला "तथाकथित मानवतावादी(?) तत्वाच्या" आधारे ५५ कोटी द्याच असे म्हणण्याचा हिरवट शेवाळलेला शहाजोगपणा व आत्ताचा, तथाकथित फायद्यानफ्यातोट्याच्या बनिया हिशेबातुन अन विचित्र मानवतावादी भुमिकेतुन पाकीकलाकारांच्या सिनेमावर बंदी नको बोवा असे लालेलाल नक्राश्रु ढाळणे, मला एकाच तोडीचे वाटते.
माझे मत तर असे की , रस्त्यावरच्या "भटक्या कुत्र्यांवर" मानवतावादी भुमिकेतुन दया करत, त्यांना पोसणारे व बाकी लहानथोर नागरिकांना त्या भटक्या कुत्र्यांच्या चाव्यांच्या तोंडी बिनदिक्कत देणारे नरपुङ्व महावीर अन पाकीकलाकार-सिनेमावर बंदी घालू नका म्हणणारे यांच्या तथाकथित तात्विक मानवताधारी(?) भुमिका मला सारख्याच तोडिच्या वाटतात. काही फरक नाही, एकाला झाका की एकाला उघडा करा...
>>>> माझा असा अंदाज आहे की
>>>> माझा असा अंदाज आहे की साधे कलाकार किंवा चित्रपट तंत्रज्ञ, स्पॉटबॉय किंवा अगदी हलकी कामे करणारे कामगार यांना रोजंदारीवर पगार मिळतो. हातावरचे पोट असलेले अनेक लोक काम करता त्यांना चित्रपट प्रट्र्शित होईपर्यंत पैसे मिळत नाहीत यावरच विश्वास नाही माझा <<<<
कान्द्या,
वैचारिक बुद्धिभेद करण्याकरता नुसता "धुरळाच" उडवायचा असेल, तर अशा प्रश्नांची उत्तरे मिळणे अवघड अस्ते.... वाट्ट बघ....
कांदापोहे - इंडस्ट्री मधे
कांदापोहे - इंडस्ट्री मधे वेळेवर पेमेंट न मिळणे - पूर्ण पेमेंट न मिळणे ह्या गोष्टी खूप कोमन - आणि संतापजनक असतात असं इंडस्ट्रीतल्या माणसांकडून ऐकलय
ऋन्मेष - कि मी देशद्रोही
ऋन्मेष -
कि मी देशद्रोही आहे? कारण मला तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता जो मी दिला नाही? उग्गाच कांगावा / मेलोड्रामे करू नकोस. कोणी तुला राजीनामा द्यायला सांगत नाहीये, देशद्रोही पण म्हणत नाहीये.
भारताचे मन मोठे आहे. गुणवंत कलाकारांना चीप लेबर सारखी वागणूक न देता आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो. उदीत नारायण असो वा कतरीना कैफ असो वा जॅकलीन फर्नांडिस काम कोणालाही किंवा सगळ्यांना देतो.
पण एखादा देश कायम वर्षानुवर्षे आपली कुरापात काढतोय. केवळ सैन्यदलावर नव्हे तर संसदेवर हल्ला, मुंबईवर हल्ला असे नागरी हल्ले करण्यासाठी 'काही' जणांना प्रशिक्षित करतो त्याच देशातल्या कलाकरांशिवाय आपले काहीही अडायला नकोय अगदी चीप लेबर असले तरीही.
आणि व्यवहार ह्या नजरेतून बघीतले तरीही
आपल्या फायद्यासाठी देखिल पाकी कलाकारांना आपल्या चित्रपटात काम देऊन प्रसिद्ध होण्यास मदत करायला नकोय. कारण प्रत्यक्ष शाखाचे देखिल असे म्हणणे आहे की चित्रपटात काम करण्याचे पैसे कमी मिळतात पण जाहिराती, ब्रँड अँबेसिडर, जगभरात केलेले स्टेज शोज यातूनच पैसे जास्त मिळतात. बॉलीवूड मधल्या ज्या भारतीय लोकांना ह्या सगळ्यासाठी मागणी असेल त्यात अजून पाकीस्तानी वाटेकरी कशाला निर्माण करायचे?
फखा पेक्षा स्वजो मिळतील ना रे स्टेज-शोज आणि जाहीराती
भरत.
पाकीस्तानी कलाकारांवर भारतात येऊन काम करण्यावर बंदी घालणे / अशी मागणी करणे म्हणजे द्वेष कसा काय? हा माझा प्रश्न होता.
अंडरवर्ल्डच्या फायनान्सिंग कपॅसिटीमुळे आणि दहशतीखाली बॉलीवूडमधे पाकी कलाकारांना काम करायला मिळत असायच्या शक्यते बाबत आणि पाकीस्तानातून वर्षानुवर्षे होत असलेल्या पायरसी मुळे झालेल्या / होत असलेल्या नुकसानी बद्दल आपले काय म्हणणे आहे तेही ऐकायला आवडेल.
Pages