पाक कलांकारांवर टाकलेल्या बहिष्काराच्या निमित्ताने ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2016 - 12:43

जेव्हा पाकिस्तानशी आपले बिनसते तेव्हा पहिली कुर्‍हाड सिनेकलाकार आणि क्रिकेटपटूंवरच पडते हे आपल्याला नवीन नाही. वर्षानुवर्षे हे होत आले आहे. जेव्हा आपले त्यांच्याशी संबंध बिघडलेले असतात तेव्हा तेथील कलाकारांना आणि खेळाडूंना, त्यातही प्रामुख्याने क्रिकेटपटूंना आपले दरवाजे बंद होतात. जेव्हा आपण मैत्रीचे प्रस्ताव आणि अमन की आशा मोडमध्ये असतो तेव्हा कलाकारच काय तेथील राजकीय नेत्यांच्या सुद्धा गळाभेटी घेतल्या जातात.

सध्या बहिष्काराची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त भासत आहे. पण पुढे कायम राहील याची खात्री नाही. दोन वर्षांनी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला वर भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना दोस्ती-कप म्हणून खेळवला गेला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. ईतके हे सवयीचे झाले आहे.

असो, यावर धागा काढायचे मनात होते. पण आधीच चालू असलेल्या वादात उगाच आपण तेल टाकायला नको म्हणून आतापर्यंत काढला नव्हता.
पण अनुराग कश्यपच्या एका ट्वीटने आज पुन्हा माझ्या डोक्यातील विचारांना बाहेर काढलेय.

तो काय म्हणतो बघा,
@narendramodi Sir you haven't yet said sorry for your trip to meet the Pakistani PM.. It was dec 25th. Same time KJo was shooting ADHM? Why?

बातमीची लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/anurag-ka...

एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे. ज्या काळात भारत-पाक संबंध एवढे छान होते की आपले पंतप्रधान श्री मोदी हे शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला पाकिस्तानात जाऊ शकतात, तर त्याच काळात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ज्या चित्रपटाचे शूटींग झाले, त्याविरोधात आता प्रदर्शनाच्या वेळी आवाज उठवणे चुकीचे आहे. ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.
मागे माझा स्वत:चा ईथे आतिफ अस्लम या गायकाबद्दल धागा होता. एक "गायक" म्हणून तो आजही माझा आवडीचा आहे. जो पर्यंत तो या भारत-पाक वादात भारताविरुद्ध गरळ ओकत नाही तो पर्यंत एक "कलाकार" म्हणूनही आवडीचा राहील. त्याने ईथे कैक हिट गाणी दिली आहेत. त्यानिमित्ताने कित्येक चित्रपटांत, कित्येक दिग्दर्शक निर्मात्यांसोबत काम केले असेल. कोणाकोणाविरुद्ध बहिष्कार टाकणार. ज्यांच्याविरुद्ध आपल्याला भडकावले जाईल त्यांच्या विरुद्ध? की सरसकट सर्वांविरुद्ध?

मध्यंतरी व्हॉटसपवर एक खोडकर(!) मेसेज फिरत होता -- जिओच्या जाहीरातीत मॉडेल म्हणून "शाहरूख खान" झळकतोय. हा तोच शाहरूख खान आहे ज्याच्या आगामी चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहे. चला तर मग जसे आमीरविरोधात स्नॅपडीलवर बहिष्कार टाकला होता तसे शाहरूखबाबतही करूया. त्याच्या चित्रपटासोबतच "रिलायन्स जिओ सीम" वर सुद्धा बहिष्कार टाकूया. आणि जे नाही टाकणार त्यांची देशभक्ती फुकटात मिळणार्‍या डेटासाठी विकली गेली असा त्याचा अर्थ होईल.
बाकी रिलायन्स जिओच्या जाहीरातीसाठी जेव्हा मोदी आणि शाहरूख एकत्र येतात तेव्हा अश्या बहिष्कारामागील फोलपणा जाणवल्यावाचून राहत नाही.

जर सरकारनेच पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारला तर ते योग्य राहील.
जर आपल्या फिल्म ईंडस्ट्रीनेच असा स्टॅन्ड घेतला - आम्ही पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम नाही करणार तर ते योग्य राहील.
पण जर राजकारणाचा एक भाग म्हणून हे आपापल्या सोयीने होत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
तसेच पाकिस्तान्यांशी संबंध तोडण्याची अपेक्षा फक्त बॉलीवूड आणि क्रिकेटर्स यांच्याकडून ठेवण्यातही हशील नाही.
आणि अश्या कधी लादल्या जाणार्‍या तर कधी उठवल्या जाणार्‍या बहिष्काराने पाकिस्तान नावाचा प्रॉब्लेम सुटणारही नाही.
पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे.

* तळटीप - मी अनुराग कश्यपच्या ट्वीटवर "एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे" असे म्हटले असले तरी मी त्याच्या ट्वीटशी सहमत आहे किंवा विरोधात आहे असे दोन्ही नाही. कारण त्याच्या ट्वीटमागचा नेमका हेतू मला माहीत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा मात्र शुद्ध हलकटपणा आहे. त्यांना बरे नसल्याने ते उभे राहु शकत नाहीत, हे कळल्यावर तरी या मुर्खांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. निषेध! घडलेल्या प्रकाराचा.

हा काय येडेपणा?
कळल्यावर दिलगिरी म्हणजे?

तुम्हाला मुळात अधिकारच कोण देतं असा शहाणपणा करायचा?

फिल्मी, तुम्ही हे कोणाला उद्देशुन बोलताय? कळल्यानंतर काय किंवा आधी काय, त्या लोकांनी कोणालाच जबरदस्ती करायला नकोच आहे, पण ज्या व्यक्तीला त्रास झाला त्यांना काय वाटले असेल आणी हे असे चालते ते बघुन राग आला. त्यात मी कोणाला शहाणपणा शिकवलाय?

म्हटलं ना देशभक्ती दाखवणं फार सोपं आहे. दुसरा काय करतो आणि काय नाही त्यावर लक्ष ठेवायचं आणि त्यांना धडा शिकवायचा. प्रतिकार करायची त्यांची क्षमता नसली तरी.
सैन्यात जाऊन तुमची देशभक्ती सिद्ध करा असं म्हणायचीही सोय नाही.

रश्मी मला वाटते ते थेटर मधल्या लोकांना उद्देशुन म्हणत आहेत.
मध्यंतरी बंगालोर ला एक केस झाली होती, एक मुस्लिम कुटुंब राष्ट्रगीत ला उभे राहिले नाही म्हणून धमकावून त्यांना हकालाउं दिले होते.व्हाट्सअप्प वर याचा विडिओ पण फिरत होता तेव्हा.

तेव्हा सोशल मीडिया वर कायद्याचे जे उत्खनन झाले त्यात असे कळले,

" एखादा माणूस राष्ट्रगीताला उभा राहिला नाही ,तर तो त्याचा अधिकार आहे, त्या मुळे राष्ट्रगीताचा अपमान झाला असा गुन्हा दाखल होत नाही.
मात्र जर तो मनुष्य इतर लोकांना राष्ट्रगीत प्रति आदर दाखवण्यास अडथळा निर्माण करत असेल तर तो गुन्हा आहे "
(* जाधव, हे सोशल मीडिया वर वाचलेले मत आहे, मला कलम माहित नाही, कदाचित 19/20 असू शकते, नाहीतर लगेच पाय खाल्लास म्हणून बोंब ठोकाल)

म्हणजेच अपंग वा धडधाकट , इतर माणसांना मुदलात त्याला जबरदस्ती करायचा अधिकार नाही.

आणि अशीच देशभक्ती राममाधवानी( नाव बद्दल sure nahee) नव्हती का दाखवली?
हमीद अन्सारींनी सॅल्यूट केला नाही , म्हणून ट्विटर वरून उपराष्ट्रपतींच्या देशभक्ती वर शंका घेतली होती.मग काय bjp चे ट्रोल्स त्याच्या धर्मा पासून सगळ्या गोष्टींचा उद्धार करत होते,
आणि उपराष्ट्रपतींचा शिव्या घालून, अपमान करून भारताचा मान वाढवत होते

मनसेला कोणीही सिरीअसली घेत नसावे. अगदी त्यांच्या पक्षातील लोकंही. थोडीशी प्रसिद्धी मौजमजा यासाठी त्यांचे उपक्रम चालू असतात. त्यांच्यावर चर्चा न केलेलीच बरी Happy

हर्पेन, sorry, my bad! मी सगळे प्रतिसाद नीट वाचायला हवे होते.

हर्पेन, तुम्ही लिहिल्यावर तुमचे सुरुवातीपासुनचे प्रतिसाद पुन्हा वाचले.
माझ्या डोक्यात , ते संपूर्ण कुटुंबच खुनशी आहे, हाच फिट बसला होता.

जिज्ञासा, प्लीजच सॉरी वगैरे नकोय म्हणायला.
भरत. ते माझे शब्द नव्हतेच इथ ल्याच उदाहरणात वापरलेलं होतं. असो होतं असं कधी कधी, चालायचंच.
मी देखिल काळजी घेईन असे शब्द न उचलण्याची
जाऊ दे झालं Happy

>>>> मनसेला कोणीही सिरीअसली घेत नसावे. अगदी त्यांच्या पक्षातील लोकंही. थोडीशी प्रसिद्धी मौजमजा यासाठी त्यांचे उपक्रम चालू असतात. त्यांच्यावर चर्चा न केलेलीच बरी <<<
अरे मग हा धागा कशाला काढला होता?
अन तुम्हाला हे कळायला १६० पोस्ट्स व्हाव्या लागल्या, चला, अगदीच हजारी गाठावी लागली नाही हे चांगले Proud

5 करोड मध्ये मनसे ने चित्रपट प्रदर्शित करायची परवानगी दिली म्हणे? पैसे आर्मी फ़ंडात जमा होणार आहेत
(परवानगी देणारी मनसे कोण? आणि धमक्या दिल्या बद्दल त्यांना अटक करायचे सोडून मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर मांडवली का करत आहे हा प्रश्न कृपया विचारू नये)
म्हणजे, शेवटी देशभक्ती रिलेटेड प्रॉब्लेम ना सुद्धा पैसे हेच उत्तर आहे.

5 करोड मध्ये मनसे ने चित्रपट प्रदर्शित करायची परवानगी दिली म्हणे? पैसे आर्मी फ़ंडात जमा होणार आहेत
(परवानगी देणारी मनसे कोण? आणि धमक्या दिल्या बद्दल त्यांना अटक करायचे सोडून मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर मांडवली का करत आहे हा प्रश्न कृपया विचारू नये)
म्हणजे, शेवटी देशभक्ती रिलेटेड प्रॉब्लेम ना सुद्धा पैसे हेच उत्तर आहे.

चित्रपट प्रदर्शित होणार होताच आणि आता तर प्रश्नच मिटला… ज्यांना व्यक्तिश: चाड आहे मरणाऱ्या सैनिकांची त्यांनी स्वतःपुरता निर्णय घ्यावा.

साधनाजी, मनसे ने सौदेबाजी करून जवानांच्या हौतात्म्याची किंमत ठरवली आहे असे वाटत नाही का?
जर शेवटी लोकांनी त्यांच्या सद्सतविवेक बुद्धीने चित्रपट पाहणे ठरवावे असे म्हणायचे होते, तर हा आधीचे नाटक किंवा आताची दक्षिणा याची खरंच गरज होती का?

जर एखाद्या पक्षाला/व्यक्तीला एखादि गोष्ट देशहिताच्या विरुद्ध वाटत असेल, तर देशाच्या एखाद्या संस्थेला तुलनेने छोट्या रकमेची देणगी दिली की तीच घटना स्वीकार्ह वाटते,
म्हणजे मुळात त्या पक्षाने/व्यक्तीने घेतलेली भूमिका एक राजकीय पवित्रा होता असे म्हणायचे काय?

हे खरेच चिंताजनक आहे.

दुकानदाराला गल्लीतले रिकामटेकडे गुंड गणेशोत्सवाच्या "वर्गणी" साठी धमकावत असतात. त्यांचे उपद्रवमूल्य लक्षात घेऊन दुकानदारही इच्छा नसताना वर्गणी देतो. आता असल्या केसेस मध्ये मुख्यमंत्री मांडवली करणार व दुकानदाराला फोन करणार की "ठीक आहे, पन्नास नको पंचवीस हजाराची पावती फाडा"..

महाराष्ट्रात कुणी चित्रपट प्रदर्शीत करायचे व किती दंड द्यायचा हेही राज ठाकरेच ठरवणार असतील तर त्यांनाच गृहमंत्री का करू नये ?

अत्यंत संतापजनक आहे, मागे टोल वसुली बद्दल हि मनसे ने असेच केलेलं होत आणि वर आम्हीच काय सारखा लढा द्यायचा अशी मखलाशी केली होती. असेही मनसेची लोकप्रियता रसातळाला गेलीच आहे, याने अजून जाईल

Viku +1
Who has given such rights to Raj Thakare? Hafte maagnare gund ani he lok kahi vegale nahit.

मुख्यमंत्र्यांना जर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडांबरोबर मांडवली करावी लागत असेल तर त्याच्याऐवढं दुर्दैव नाही Sad

series of powerful tweets that have gone viral on social media, former Air Vice Marshal Manmohan Bahadur slammed Thackeray’s decision.
“I served four decades in uniform- and never did I live on extorted money. What’s this happening in my country????
Indian Armed Forces cannot, and SHUD NOT, become crutches 4pol ambitions. Unfortunately, this is the trend seen in recent past,” he wrote.

शेवटचे स्टेटमेंट खूपच इंटरेस्टिंग वाटतेय नाही?

Indian Armed Forces cannot, and SHUD NOT, become crutches 4pol ambitions.

हे पहिल्यान्दाच किव्वा शेवटचे असे नाही घडले. अमिताभचा शहेनशाह (बोफोर्स मधे पैसे घेतले म्हणुन का अन्य काही भ्र्ष्टाचाराच्या कारणाने), किव्वा सन्जय दत्त चा कुठ्लासा चित्रपट यावर बाळासाहेबान्च्या काळात सुरवातीला बन्दी आणली होती. बोलणी झाल्यावर गैरसमज दुर होतात आणि बन्दी मागे घेतली जाते. मग सन्जय दत्तला त्याचा गुन्हा नसल्याचे (किव्वा तो अडकवला गेला असल्याचे) सर्टिफिकेट मिळते...

आज २०१६ मधे नावे बदलली आहेत पण सुरवातीला बन्दी, चर्चा, गैरसमज दुर होणे आणि शेवट बन्दी मागे घेण्याचा गोड निर्णय जाहिर होणे असाच होतो आहे.

Some of the points people may have overlooked:
(sorry.. some problem in typing marathi.. it is getting garbled for some reason)

1, This is money game. The buzz of the movie is good. It will hit upwards of 300/400 crores worldwide. Parties need funds for running their own game.. where would the money come from?
This has nothing remotely to do with Patriotism. This has to do with money. They wouldn't care if some unknown B grade movie would have employed 10 pakistani actors because no one would give a damn about that movie anyways.

2. Karan Johar has not employed Pakistani actor(s). He has just employed one. Nobody knows and everyone knows as to why it is so. He has launched quite a few movies with this guy. Needless to say crores of rupees are riding on it. (I heard in ADHM, the story did not include this guy at first but KJo made an exception and brought him in the movie). So even though he did it for whatever reasons, due to this sudden political development this decision blew up for him and he has to salvage the situation.

3. I admire Karan Johar more for his business skills than his directorial ones. He makes garbage movies but packages and markets them so well that even his garbage fetches him crores.Do you guys think he is worried or happy with all this free publicity he is getting? plus he gets to play the victim card and some of you who may not have been interested in watching this movie would go and watch to express solidarity with him.

If people are really feeling patriotic and they want to show the solidarity with our jawans that are killed.. stop watching the movies which employ pakistani actors. Let their business drop and their movies bite the dust at the box office. That will certainly discourage them from engaging these actors. You cant have it both ways.

So don't worry this is a win win for all.. parties will get their money.. KJo will get his share and even he will bring back his favorite actor when all of this blows over.

मनस्मि,
अगदी खरे,
1) मनसे ने 5 क्रीडा सैनिकी फ़ंडाला मिळवून दिले असले तरी, that is a tip of iceberg, या तोडपाण्यात मनसे ला निश्चितच काही कोटी मिलले असणार
2) आणि 3) हा वाद 3 आठवडे चालला होता, कारण जोहर आणि ADHM ला 3 विक्स सगळ्या नॅशनल डेली आणि न्युज पेपर मधून भरपूर प्रसिद्धी मिळाली. Kjo ला हि प्रसिद्धी 5 करोड ला पडली (which is really economical)

So indeed it's win win deal.

Whats worrying is this deal happened right under nose of CM.

सिम्बा - ३ वाटे पडतात. सैनिकान्ना मदत करणे हे केवळ पब्लिकला दाखवण्यासाठीचा स्टन्ट आहे. मनसेला पण काही फायदा झालाच असेल आणि मुम फुकट वेळ घालवणार नाहीत. शिवसेने डिवचली जाणे हा अजुन बोनस फायदा...

Pages