पाक कलांकारांवर टाकलेल्या बहिष्काराच्या निमित्ताने ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2016 - 12:43

जेव्हा पाकिस्तानशी आपले बिनसते तेव्हा पहिली कुर्‍हाड सिनेकलाकार आणि क्रिकेटपटूंवरच पडते हे आपल्याला नवीन नाही. वर्षानुवर्षे हे होत आले आहे. जेव्हा आपले त्यांच्याशी संबंध बिघडलेले असतात तेव्हा तेथील कलाकारांना आणि खेळाडूंना, त्यातही प्रामुख्याने क्रिकेटपटूंना आपले दरवाजे बंद होतात. जेव्हा आपण मैत्रीचे प्रस्ताव आणि अमन की आशा मोडमध्ये असतो तेव्हा कलाकारच काय तेथील राजकीय नेत्यांच्या सुद्धा गळाभेटी घेतल्या जातात.

सध्या बहिष्काराची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त भासत आहे. पण पुढे कायम राहील याची खात्री नाही. दोन वर्षांनी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला वर भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना दोस्ती-कप म्हणून खेळवला गेला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. ईतके हे सवयीचे झाले आहे.

असो, यावर धागा काढायचे मनात होते. पण आधीच चालू असलेल्या वादात उगाच आपण तेल टाकायला नको म्हणून आतापर्यंत काढला नव्हता.
पण अनुराग कश्यपच्या एका ट्वीटने आज पुन्हा माझ्या डोक्यातील विचारांना बाहेर काढलेय.

तो काय म्हणतो बघा,
@narendramodi Sir you haven't yet said sorry for your trip to meet the Pakistani PM.. It was dec 25th. Same time KJo was shooting ADHM? Why?

बातमीची लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/anurag-ka...

एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे. ज्या काळात भारत-पाक संबंध एवढे छान होते की आपले पंतप्रधान श्री मोदी हे शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला पाकिस्तानात जाऊ शकतात, तर त्याच काळात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ज्या चित्रपटाचे शूटींग झाले, त्याविरोधात आता प्रदर्शनाच्या वेळी आवाज उठवणे चुकीचे आहे. ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.
मागे माझा स्वत:चा ईथे आतिफ अस्लम या गायकाबद्दल धागा होता. एक "गायक" म्हणून तो आजही माझा आवडीचा आहे. जो पर्यंत तो या भारत-पाक वादात भारताविरुद्ध गरळ ओकत नाही तो पर्यंत एक "कलाकार" म्हणूनही आवडीचा राहील. त्याने ईथे कैक हिट गाणी दिली आहेत. त्यानिमित्ताने कित्येक चित्रपटांत, कित्येक दिग्दर्शक निर्मात्यांसोबत काम केले असेल. कोणाकोणाविरुद्ध बहिष्कार टाकणार. ज्यांच्याविरुद्ध आपल्याला भडकावले जाईल त्यांच्या विरुद्ध? की सरसकट सर्वांविरुद्ध?

मध्यंतरी व्हॉटसपवर एक खोडकर(!) मेसेज फिरत होता -- जिओच्या जाहीरातीत मॉडेल म्हणून "शाहरूख खान" झळकतोय. हा तोच शाहरूख खान आहे ज्याच्या आगामी चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहे. चला तर मग जसे आमीरविरोधात स्नॅपडीलवर बहिष्कार टाकला होता तसे शाहरूखबाबतही करूया. त्याच्या चित्रपटासोबतच "रिलायन्स जिओ सीम" वर सुद्धा बहिष्कार टाकूया. आणि जे नाही टाकणार त्यांची देशभक्ती फुकटात मिळणार्‍या डेटासाठी विकली गेली असा त्याचा अर्थ होईल.
बाकी रिलायन्स जिओच्या जाहीरातीसाठी जेव्हा मोदी आणि शाहरूख एकत्र येतात तेव्हा अश्या बहिष्कारामागील फोलपणा जाणवल्यावाचून राहत नाही.

जर सरकारनेच पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारला तर ते योग्य राहील.
जर आपल्या फिल्म ईंडस्ट्रीनेच असा स्टॅन्ड घेतला - आम्ही पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम नाही करणार तर ते योग्य राहील.
पण जर राजकारणाचा एक भाग म्हणून हे आपापल्या सोयीने होत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
तसेच पाकिस्तान्यांशी संबंध तोडण्याची अपेक्षा फक्त बॉलीवूड आणि क्रिकेटर्स यांच्याकडून ठेवण्यातही हशील नाही.
आणि अश्या कधी लादल्या जाणार्‍या तर कधी उठवल्या जाणार्‍या बहिष्काराने पाकिस्तान नावाचा प्रॉब्लेम सुटणारही नाही.
पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे.

* तळटीप - मी अनुराग कश्यपच्या ट्वीटवर "एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे" असे म्हटले असले तरी मी त्याच्या ट्वीटशी सहमत आहे किंवा विरोधात आहे असे दोन्ही नाही. कारण त्याच्या ट्वीटमागचा नेमका हेतू मला माहीत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादा पुन्हा दुसरा कसाब परत आलाच तर !! त्यावेळी त्याला कृपया सांगा की "मी पाकिस्तान विरोधी नाही" !

<<

मिलिंद ,
असे म्हणतात की जहाज बुडायला लागले की, त्या बुडणाऱ्या जहाजातून सर्वात आधी उंदीर पळतात तसे एखादा कसाब पुन्हा दिसलाच तर सर्वात आधी ह्या देशातील सोकाॅल्ड पूरोगामी पळत सुटतील. नंतर मेणबत्त्या पेटवायला मात्र सर्वात आधी हजर होतील.

माझ्या मते भारत-पाक संबंध 'एवढे छान' हे पाकीस्तानाकडून कधीच नव्हते असे म्हणता येईल अशा प्रकारचीच वर्तणूक पाकीस्तानाने वेळोवेळी दाखवली आहे. पाकीस्तान राष्ट्रप्रमुख आणि लष्कर यांच्यातल्या सत्ता संघर्षामुळे असावे कदाचित पण कायमच एका बाजूला राजनैतिक चर्चा चालू आणि सीमेवर मात्र गोळीबार हेच पहात आलो आहे.

माझा पाकीस्तानी कलाकारांना भारतात कमवायला येऊ देण्यास विरोध इतका ताजा नाही. ते माझे जुनेच मत आहे. खूप वर्षामागे जगजीत सिंग यांच्या एका मुलाखतीत त्यांनी ही खंत मांडली होती. पाकीस्तानी कलाकारांना आपल्याकडे मैफीली करण्याची परवनगी देतो पण आपल्याला मात्र तिकडे जाता येत नाही वगैरे त्यानंतर ते तयार झाले आहे.

भारतातल्या लोकांनी कायमच पाकीस्तानातल्या सर्व प्रकारच्या गायकांना / कलाकारांना उदार आश्रय दिलेला आहे.
त्याबदल्यात कृतज्ञता म्हणून नव्हे तर निदान एक माणूस म्हणून भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत निषेधाचा / त्यात बळी पडलेल्या निरपराध माणसांबाबत सहवेदनेचा चकार शब्द न उच्चारणार्‍या कलाकारांवर बंदी घालायची भावना जागृत झाली तर त्यात चूक ते काय ?

भारतातल्या तमाम निर्माता दिग्दर्शकांचे पायरसी मुळे होणारे नुकसान हे एखाद दुसर्‍या निर्माता दिग्दर्शकाच्या एखादा चित्रपट प्रदर्शित होऊ न शकल्याने होणार्‍या नुकसानी पेक्षा कैक पटींनी जास्त आहे. वर्षानुवर्षे (ऑडीयो आणि व्हिडियो कॅसेटच्या जमान्यापासून ते इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाईन उपलब्ध अस्सलेल्या गाण्यांपर्यंत) पाकीस्तान हे अशा पायरेटेड फिल्मस / गाणी वितरीत करण्यामधे आघाडीवर आहे. (ज्यामागे भारतीय कलाकारांवरचे त्यांचे प्रेम आणि पाक सरकारनी भारतीय सिनेमांवर घातलेली बंदी हेच कारण आहे)

त्यामुळे एखाद दुसर्‍या निर्माता दिग्दर्शकाच्या अथवा त्या चित्रपटामधे सहभागी असलेल्या सर्वांचे जरी कितीही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असेल तरी पायरसी मुळे होणार्‍या नुकसानीपुढे अगदी नगण्यच असावं.

जरासे अवांतर-
मुळात पाकीस्तानी कलाकारांना घ्यायची गरजच काय?
भारतात टॅलंट असताना देखिल चित्रपटात काम / प्रमुख भुमिका मिळवणे हे किती अवघड असते हे आपण सगळेच जाणतो. अनेक होतकरू कलाकारांना चित्रपट मिळवणे अवघड जाते. चित्रपटसृष्टीशी निगडीत लोकांच्या मुलामुलींना मात्र निदान पहिला चित्रपट मिळणे सोपे जाते हे ही मान्य असायला हरकत नसावी.

सर्वश्रृत आहे की बॉलीवूडमधे दाऊदादी अंडर्वर्ल्ड मधल्या अनेकांचा पैसा गुंतलेला असतो. त्यामुळे अशा हितसंबंधांनी प्रभावित होऊनच पाकीस्तानी कलाकारांना आपण घेत असणार असा माझा कयास आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या लोकांना वेळोवेळी धमक्या मिळत असतात हे ही सर्वज्ञात आहेच ( गुलशन कुमार यांची हत्या, राकेश रोशन ह्यांच्या वर झालेला गोळीबार ई. उदाहरणे आपल्या समोर आहेतच)

भारतात गुणवान लोकांची काय कमी आहे?

हर्पेन अगदी अचूकपणे मांडले आहेस.

आणि हे फक्त पाकिस्तानी कलाकार नव्हे, खेळाडू, कॉमेंटेटर आणि अजूनही कुणी असतील ते त्यांनाही लागू होते

हर्पेन, सहमत.>> पाकिस्तानी कलाकारांना घ्यायची गरज काय हा मुळात प्रश्न आहे. आणि त्याचे उत्तर आहे पैसा. आपले चित्रपट तिकडे आणि आखातात पाहिले जावेत इतकेच काय युरोप - अमेरिकेतही जास्त पाहिले जावेत म्हणून भारतीय निर्मात्यांनी जाणून बुजून घेतलेला निर्णय आहे तो. पण आता ती रिस्क झाली आहे! ह्या आधी सुद्धा भारतात पाकिस्तानी कलाकारांना घेण्यावरुन वाद झाले आहेत पण ह्यावेळी उगाच पंतप्रधानांनी माफी मागावे असं म्हणायची काही गरज नव्हती. मनसे आणि शिवसेनेने घेतलेली भुमिका त्यांची स्वतःची आहे. लोकांनी ती उचलून धरली म्हणून पंतप्रधानांना टारगेट करणे ह्याला अर्थ नाही.
अनुराग कश्यप नी काल फेसबूक वर स्वतःची भुमिका मांडली पण त्यात मला अर्थ वाटला नाही. ट्वीट करताना मोदी तुम्ही माफी का मागत नाही असं विचारायचं आणि मग म्हणायचं कि मला तसं म्हणायचं नव्हतं हा दुटप्पीपणा आहे. करण जोहर नी खरतर हुशारी दाखवून नरमाईची भुमिका घेतली आहे कारण त्याला हे कळालं कि ह्यातुन आता तोटाच जास्त होणार आहे. खरतर त्याला तोटा अजिबात होणार नाही हे मी आधीच म्हणालो होतो. हाच चित्रपट डब्यात बंद करून ठेवला काही महिने आणि मग एखाद्या चॅनेल ला विकला तरी तो भरपूर कमावेल. अनुराग कश्यप नी उगाच हात दाखवून अवलक्षण करून घेतल आहे.

एवढा कसा काय वेळ मिळतो बुवा धागे काढायला आणि येऊन येऊन उत्तर द्यायला. एवढे धागे अख्खे वाचण्याकरिता सुद्धा वेळ नसतो आमच्या कडे . त्यातून विचार करून करून धागा लिहायचा वरती उत्तर द्यायची या धाग्यावर त्या धाग्यावर परत धावत धावत या धाग्यावर आणि आणि अशा अगणित धाग्यांवर आणि ते सुद्धा ऑफिस सांभाळून ? Happy

हर्पेन, सहमत

फक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर कोणीही देणार नाही, ना धागा कर्ता ना पाकिस्तान धार्जीणे ईथले लोक !!

शत्रू देशाचा प्रत्येक नागरिक शत्रूच असतो. कारण त्यांची निष्ठा त्या देशाशी बांधलेली असते. कला ही चैन शांततेच्या काळातच परवडते, युध्दाचा नाही, असं इतिहास सांगतो. बॉलिवूड नी हे प्रेमप्रकरण वेळीच आवरलं नाही तर "इंद्राय तक्षकाय स्वाहा " होणार.
ते पाकिस्तानी कलाकारां ना चित्रपटात घेतात कारण त्यांना त्यात फायदा दिसतो. इथल्या लोकांना craze आहे. it makes business sense. त्याचा ना कलेशी सम्बंध असतो ना देशाशी. ऊरी सारख्या घट्नां नन्तर public नी नाही response दिला तर तो एक चुकलेला business decision आहे. त्यांनी पुढ्च्या वेळी अक्कल शिकावी.

मोदी पकिस्तन ला जाणे हा त्यान्च्या राजकारणातील भूमिकेच भाग आहे. सलोखा निर्माणकरण्या चा प्रयत्न कर त रहावेच लाग्णार आहे. ते व्यक्तिगत फायदा बघत नाहियेत

थोड्क्यात राजकिय संबंध आणि धन्देवाइक संबंध (business relations) एक तरजूत नाहि तोलता येणार.

मला इम्रान व अक्रम आवडतात. पण भारताच्या हितसंबंधांच्या आड येत नाहीत तोपर्यंतच. बाकी पाकड्यांचे काही कौतुक नाही. तेव्हा ते नाही आले तरी काही फरक पडत नाही.

पण जेव्हा संबंध सुरळीत होते तेव्हा बनवलेला चित्रपट आहे. ही इण्डस्ट्री अनरेग्युलेटेड आहे. अगदी हिट्ट पिक्चर झाला तरी मुख्य कलाकार सोडून इतरांच्या पेमेण्ट्स चा भरवसा नसतो. "कामगार" टाइपचे जे लोक असतात त्यांना तर कधी काय मिळत असेल काही सांगता येत नाही ("शोले" चे संकलक एम एस शिंदे यांच्याबद्दलच्या बातम्या वाचल्या असतील बहुतेकांनी. सर्वात यशस्वी चित्रपट, आणि त्यातही संकलनाबद्दल फेमस असलेल्या शोलेच्या संकलकाची ही कथा असेल तर बाकीच्यांबद्दल कल्पनाच करवत नाही). अशात जर बहिष्कारामुळे चित्रपट पडला तर परिणाम होईल तो आपल्याच लोकांवर, त्यातही पैसेवाले मुख्य लोक सोडून इतरांवर.

बहिष्काराच्या बातम्यांनी बसायचा तो दणका ऑलरेडी बसला असेल. पुन्हा त्यांना घेताना विचार करतील हे लोक. आता इतरांचे नुकसान कशाला?

हे. ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.}
यावर बोला.
>>>

भरत,

कलाकारांचे, टेक्निशियनचे नुकसान कसे होईल? पैसे तर त्यांनाही मिळालेच. की बॉलिवुड मध्ये फक्त परकियांना पैसे पिक्चर प्रदर्शित होण्याआधी देतात आणि भारतीय कलाकार / टेक्निशियनना पिक्चर कसा चालेल त्यावरुन "कट" देतात असे काही आहे? आणि पिक्चर रिलिज झाल्यावर जर तोटा झाला तर तो परत ते कलाकार आणि टेक्निशियनच भरून काढतात असे काही आहे का?

अजब लॉजिक आहे हे.

नुकसान फक्त निर्मात्याचे होणार. आणि हा व्यवसाय असल्यामुळे निर्मात्याला "नुकसान आणि फायदा" हे दोन्हीही आपोआपच मिळणार. आणि बायदवे, केजो काही भारत-पाक मैत्री वगैरे उद्दात विचार घेऊन पिक्चर काढत नाही. तो व्यावसायिक आहे.

तसेही करण जोहर आणि अनुराग कश्यप ह्यांचे ट्विट योग्य नव्हते. पिरिएड. अनुरागची तर सारवासारवही भंकस आहे. आणि करण जोहर, आता फक्त भावनांना हात घालत आहे.

--

तटी - मी कुठलाही पिक्चर बंद पाडण्याच्या / प्रदर्शित होऊ न देण्याच्या विरोधी आहे. पण तुमच्या मुद्द्यात गफलत आहे.

केजो फार श्रीमंत असेलही. पण त्याने तरी हे नुकसान का सोसावे ? कोणतीही बेकायदा गोष्ट केलेली नसताना?
शिवाय हे नुकसान ट्रिकल डाऊन असते. केजो ने कदाचित आपल्या घराला रंग लावायचे काम काढले असेल. या नुकसानी मुळे तो ते कॅंसल करेल व हातावर पोट असणार्‍या लोकांचे नुकसान होईल ना?

> केजो काही भारत-पाक मैत्री वगैरे उद्दात विचार घेऊन पिक्चर काढत नाही. तो व्यावसायिक आहे.

यात चूक काय आहे ? आणी इन्फोसिस वाले भारत अमेरिका मैत्रीसाठी सोफ्टवेअर करतात का? इन्फोसिस कडे पाकिस्तानी क्लायंट असतील आणी थोडा अ‍ॅडवान्स घेऊन काम केलेले असेल तर आता संबंध बिघडले म्हणून ते रद्द करा व नुकसान सोसा असे सांगू का आपण ? इथून पुढे पाकिस्तानी क्लायंट घेउ नये असा नियम करा हवा तर.

शिवाय हे नुकसान ट्रिकल डाऊन असते. केजो ने कदाचित आपल्या घराला रंग लावायचे काम काढले असेल. या नुकसानी मुळे तो ते कॅंसल करेल व हातावर पोट असणार्‍या लोकांचे नुकसान होईल ना? >>

खरं आहे. आपण वर्गणी काढू. जरा १००० $ द्या बरं. Proud

यात चूक काय आहे ? आणी इन्फोसिस वाले भारत अमेरिका मैत्रीसाठी सोफ्टवेअर करतात का >>

अहो विकु महाराज,

मी तेच म्हणतोय की तो व्यावसायिक आहे. फायदा तोटा हा व्यवसायाचा भाग आहे. येथील कलाकारांचे नुकसान होईल असे भरत म्हणत आहेत. ते चुकीचे आहे. आणि त्या पुष्ट्यर्थ्य ते वाक्य असे आहे की " निर्मात्याचे नुकसान होईल".

वर मी म्हणालो आहे की, असे पिक्चर प्रदर्शित न होऊ देणे ह्याच्या मी विरोधी आहे. पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले असणार. जाउ द्या. सिलेक्टिव रिडींग प्रकार नविन नाही. Happy

थून पुढे पाकिस्तानी क्लायंट घेउ नये असा नियम करा हवा तर. >> - असा नियम जर चुकून केला, तर तुमचा प्रतिसाद त्यावर काय असेल, ह्याचा विचार न करता हे लिहिले का?

केदार,

अहो नका सांगु त्यांना !!

त्यांच्या मते पाकिस्तानी मिडीया हा भारताच्या मिडियापेक्षा जास्त पोक्त वैगेरे आहे !!

<<<< इथून पुढे पाकिस्तानी क्लायंट घेउ नये असा नियम करा हवा तर. >>>>>

म्हणजे, जे सर्व करायला पाहीजे ते सर्व सरकारने करायच !!
आम्ही फक्त आम्हाला जे फायद्याच आहे तेच करणार !!

व्वा !! व्वा !!

देशाला आता पाकिस्तानपासुन वाचवणार्या भारतीय सैनिकात ४० ते ५० % लोक निव्वळ देश प्रेम आहे म्हणुन सैन्यात भरती होतात, जर हे लोक ईतर नोकरीच्या आमिशांनी भारतीय सैन्याला सोडुन जाऊ लागतील तर काय होईल् ?

नुकसान फक्त निर्मात्याचे होणार >> केदार, केजोचे नुकसान होणार नाही कारण चित्रपट ऑलरेडी विकला गेला असणार. नुकसान होणार जे कोणी वितरक किंवा प्रदर्शक आहेत त्यांचे. इतका मोठा आणि भरपूर स्टार्स असलेला चित्रपट प्रदर्शित करण्याचे हक्क आधीच विकले गेलेले असतात. त्यामुळे वितरण व्यवस्थेचे नुकसान होणार. बरेचसे पेमेंट जे साधे कलाकार / तंत्रज्ञ असतात त्यांचे हे चित्रपट पूर्ण झाल्यावर होते त्यामुळे तो प्रदर्शित झाला नाही तर केजो हात वरती करेल आणि त्यांचे पेमेंट होणार नाही. त्यावर पैसे लावणार्‍या बँक ही भारतीयच असतात. ही खुप गुंतागुंतीची व्यवस्था आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित न होण्यामध्ये फवादचा काही तोटा नाही पण बर्‍याच भारतीयांचे मात्र नुकसान होणार आहे असे मला वाटते.

धनी +१

पाकिस्तान चा निषेध म्हणून पुण्यात मोर्चा काढून एस टी बसेस जाळणे जितके वेडेपणाचे आहे तितकेच हेही आहे.

अरेच्च्या, नुकसान निर्मात्याचं नाहि, कलाकारांचं नाहि, कामगारांचं नाहि (युनियनाय्ज्ड) फक्त वितरकांचं होणार जे गर्भश्रीमंत आहेत, तर मग लोकं बोंबा का मारतायत?..

. बरेचसे पेमेंट जे साधे कलाकार / तंत्रज्ञ असतात त्यांचे हे चित्रपट पूर्ण झाल्यावर होते त्यामुळे तो प्रदर्शित झाला नाही तर केजो हात वरती करेल आणि त्यांचे पेमेंट होणार नाही. >> हे नक्की आहे का ? कारण शेकडा ९० % चित्रपट फ्लॉप जात असतात मग त्यांचे पेमेंट पण होत नसेल नुकसान झाल्यामूळे.

केदारचीच तळटीप इथे आहे असे समजा.

मला अर्थशास्त्र फारसे समजत नाही. पण जर शंभरेक करोड खर्चून एखादी मेड ईंन ईंडिया कलाकृती डब्यात जाणार असेल तर अल्टीमेटली ते नुकसान कोणा ना कोण्या भारतीयाचेच असणार आणि ते नक्कीच कोण्या एका करण जोहार, वा एका निर्मात्याचे, वा एखाद्या वितरकाचे नसून प्रत्येकाला आपल्या ऐपतीनुसार फटका बसणार.

वर कोणीतरी इन्फोसिसचे उदाहरण दिले आहे. चित्रपट सोडून कैक उद्योगधंदे असतील जे पाकिस्तानशी वा पाकिस्तान्यांशी काही कारणाने जोडले गेले असतील. काही पाकिस्तानी त्यात कमावत असतील तर काही भारतीय त्यात कमावत असतील. बाकीच्यांचेच का, मी स्वत: एका एमेनसीत कामाला आहे आणि मागच्या वर्षी चार-सहा महिने पाकिस्तानमधील एका पॉवरप्लांटच्या प्रोजेक्टवर भारतात बसून काम करत होतो. आणि उद्याही काही अडचण गडबड सोडवायला रिवर्क करायला पुन्हा येऊ शकते ते काम. तेव्हा मी काय करावे? मागे तुमचे आमचे संबंध चांगले होते म्हणून केले ते काम, पण आता नाही करणार म्हणून माझी नोकरी सोडावी का?

मी करत असलेला जॉब आणि चित्रपट हा एक जॉब, यांना वेगळे कसे करणार? कि मी देशद्रोही आहे? कारण मला तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता जो मी दिला नाही?

ऋन्मेष, सही प्रतिसाद.
आपले नुकसान होत नसले, की सर्वांनाच देशभक्ती सुचते. पाकिस्तानला अमेरिकेतून मदत मिळते म्हणून किती देशभक्त भारतात परत आलेत??
पाकिस्तानला मदत करतात म्हणून भारत सरकार चिनी आणि मध्यपूर्वेतल्या कंपन्यांच्या भारतातील गुंतवणुकीला विरोध करणार का?

मुख्य कलाकार सोडून इतरांच्या पेमेण्ट्स बद्दल खूप किस्से ऐकलेले आहेत. त्यामुळे चित्रपट पूर्ण होउन प्रदर्शित व्हायच्या आत सर्वांची पेमेण्ट्स जात असतील हे जवळजवळ अशक्य आहे.

मि. जा.
टोकाची भुमिका घेणे टाळावे असे मला वाटते. समजा कुणाला पाक कलाकारांवर बंदी घालू नये असे वाटत असेल तर तसे म्हणणारे लगेच पाक धार्जिणे कसे काय होतात.
पाकी कलाकारांना भारत सरकारनेच वर्क परमिट दिले आहे म्हणजे भारतीय सरकारही पाक धार्जिणे का?

मुख्य मुद्दा आहे तो भारत पाकीस्तानातला फरक. एका बाजूला आपली लोकशाही आणि एकीकडे लष्कराच्या तालावर नाचणारी राजवट. मूलभूत फरकच असा आहे की सहिष्णुता विचार वैविध्य आपल्या अस्तित्वाचा कणा आहे. तर तो देशच मुळी कट्टर धर्मावर / साठी घडवून आणलेल्या फाळणी मुळे तयार झालेला. हट्टाने फुटून निघालेला. कुरापाती हा त्या देशाचा स्वभाव आहे. नियम आहे. नियमाला अपवाद असणारी माणसे म्हण्जे मेजॉरिटी नव्हे.

क्षणभर असे मानले की पाकीस्तानी कलाकारांना खरेतर दु:ख आहे पण त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा साठी व्यक्त होता येत नाहीय पण म्हण्जे याचाच अर्थ असा की त्यांच्या सरकार किंवा इतर प्रभावशाली कट्टर पंथीय घटकांना घाबरून भारतावर झालेल्या हल्ल्याचा निषेध देखिल व्यक्त करायला, शाब्दिक माणुसकी दाखवायलाही कचरावे अशी दहशत त्यांच्यावर आहे. अशा दहशतीत आपण नक्केच नाही आहोत.

भारतीय कलाकार काय किंवा सर्वसामान्य माणसे ही भारताच्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या पंतप्रधानांवर टीका टिप्प्णी करण्याचे स्वातंत्र्य बाळगून आहोत /असतात .

आपल्याकडे तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस देखिल म्हणू शकतो पाकी स्तानी कलाकारांवर बंदी घालू नये. हे विचार स्वातंत्र्य ते देणारी लोकशाही हे आपले सामर्थ्य आहे. ते अबाधित रहावे याकरता हा देश टिकला पाहिजे. देशाची सीमा राखणारा जवान टिकला पाहिजे. त्याच्यावर हल्ला म्हणजे आपल्या देशावर हल्ला.

हल्ला करणार्‍या देशाचा प्रत्येक जण शत्रू म्हणून गणला नाही, मैत्री ठेवण्याच्या लायकीचाही असला तरी अशांचा संपर्क टाळलेलाच बरा.

किंबहुना भारत सरकारने वर्क व्हिसा द्यावा पण त्यांना इथे कामच मिळू नये अशी स्थिती निर्माण होईल तो खरा सुदिन!

<<<< मी करत असलेला जॉब आणि चित्रपट हा एक जॉब, यांना वेगळे कसे करणार? कि मी देशद्रोही आहे? कारण मला तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता जो मी दिला नाही? >>>>>>

पाकिस्तानच्या कलाकारांनी उरी ईथे झालेल्या हल्ल्याबद्दल संवेदना व्यक्त केल्या नाहीत हा एकच मुद्दा आहे.

पाकिस्तानच्या "अदनान सामी" नावाच्या कलाकाराला ईथल्याच सरकारने भारताच नागरीकत्व बहाल केलेल
आहे, त्या पुढे जाउन आता "सलमा आगा" ह्या अभिनेत्रीने सुद्धा आता भारताच नागरीकत्व मिळाव असा प्रयत्न
करत आहे, ह्या दोन्ही कलाकारा बद्दल पाकिस्तानातल्या सो कॉल्ड प्रगल्भ मिडीया मध्ये काय काय बोलल जात हे बघा म्हणजे कळेल पाकिस्तानी लोक काय आहेत ते.

प्रत्येक भारतीयाने त्याच्या लेव्हल ला आपण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या पाकिस्तानला मदत करत आहोत का
ह्याचा विचार करावा !!

जर तुम्ही पॉवर प्लँटच्या सॉफ्टवेरबद्द्ल काम करत असाल तर ते काम भारतातल्या कंपन्यांनी नाकारल तर दुसर्या कंपन्या करणारच ! आणी ते काम भारतातल्या कंपन्या स्वस्तात काम करतात म्हणुनच मिळत !! त्यात गल्लत कशी करता ?

पण जर तुम्ही पाकिस्तानी कलाकारांना घेता म्हण्जे भारतीय कलाकारांना डावलताय हे कळायला जड आहे का ?

चाणक्यासारखा विद्वान जन्मलेल्या देशाच्या लोकांचे विचार ऐकुन खरच प्रश्न पडलेत !!

ज्या देशाने ६७ वर्ष युद्धात , अतिरेकी कारावाया करत भारताला त्याच्या लोकांना भरडलय ते आता सुद्धा असा विचार करतात ! कमाल आहे ब्वा !! अस तर नाही ना की आताच्या सरकारच्या यशाचे भागीदार व्हायच नाही म्हणुन हा वेगळा विचार ?

सरकारने अधि़कृत बंदी घातली आहे का या चित्रपटाला ? मी जेंव्हा वाचले होते तेंव्हा असे नव्हते. COEAI आणि IMPPA या संस्थानी बंदी घातली आहे त्या वितरकांच्याच संघटना आहेत ना ? प्रेक्षक आणि वितरकांन्नीच जर चित्रपटाला विरोध केला तर तो निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे !

जर तुम्ही पॉवर प्लँटच्या सॉफ्टवेरबद्द्ल काम करत असाल तर ते काम भारतातल्या कंपन्यांनी नाकारल तर दुसर्या कंपन्या करणारच !
>>>>>
नाही सॉफ्टवेअर नाही. जे काम आम्ही करतो ते भारतात आणखी कोण फारसे करत नाही, करू शकत नाही. बहुधा!

तसेच पाकिस्तानातही त्यांना कोणी करू शकणारे भेटले नसावे म्हणून एका विदेशी कंपनीला काम देत जे भारतीयांकडून काम करवून घेणार आहे हे माहीत असूनही त्यांनी आम्हाला दिले.

Pages