जेव्हा पाकिस्तानशी आपले बिनसते तेव्हा पहिली कुर्हाड सिनेकलाकार आणि क्रिकेटपटूंवरच पडते हे आपल्याला नवीन नाही. वर्षानुवर्षे हे होत आले आहे. जेव्हा आपले त्यांच्याशी संबंध बिघडलेले असतात तेव्हा तेथील कलाकारांना आणि खेळाडूंना, त्यातही प्रामुख्याने क्रिकेटपटूंना आपले दरवाजे बंद होतात. जेव्हा आपण मैत्रीचे प्रस्ताव आणि अमन की आशा मोडमध्ये असतो तेव्हा कलाकारच काय तेथील राजकीय नेत्यांच्या सुद्धा गळाभेटी घेतल्या जातात.
सध्या बहिष्काराची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त भासत आहे. पण पुढे कायम राहील याची खात्री नाही. दोन वर्षांनी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला वर भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना दोस्ती-कप म्हणून खेळवला गेला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. ईतके हे सवयीचे झाले आहे.
असो, यावर धागा काढायचे मनात होते. पण आधीच चालू असलेल्या वादात उगाच आपण तेल टाकायला नको म्हणून आतापर्यंत काढला नव्हता.
पण अनुराग कश्यपच्या एका ट्वीटने आज पुन्हा माझ्या डोक्यातील विचारांना बाहेर काढलेय.
तो काय म्हणतो बघा,
@narendramodi Sir you haven't yet said sorry for your trip to meet the Pakistani PM.. It was dec 25th. Same time KJo was shooting ADHM? Why?
बातमीची लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/anurag-ka...
एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे. ज्या काळात भारत-पाक संबंध एवढे छान होते की आपले पंतप्रधान श्री मोदी हे शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला पाकिस्तानात जाऊ शकतात, तर त्याच काळात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ज्या चित्रपटाचे शूटींग झाले, त्याविरोधात आता प्रदर्शनाच्या वेळी आवाज उठवणे चुकीचे आहे. ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.
मागे माझा स्वत:चा ईथे आतिफ अस्लम या गायकाबद्दल धागा होता. एक "गायक" म्हणून तो आजही माझा आवडीचा आहे. जो पर्यंत तो या भारत-पाक वादात भारताविरुद्ध गरळ ओकत नाही तो पर्यंत एक "कलाकार" म्हणूनही आवडीचा राहील. त्याने ईथे कैक हिट गाणी दिली आहेत. त्यानिमित्ताने कित्येक चित्रपटांत, कित्येक दिग्दर्शक निर्मात्यांसोबत काम केले असेल. कोणाकोणाविरुद्ध बहिष्कार टाकणार. ज्यांच्याविरुद्ध आपल्याला भडकावले जाईल त्यांच्या विरुद्ध? की सरसकट सर्वांविरुद्ध?
मध्यंतरी व्हॉटसपवर एक खोडकर(!) मेसेज फिरत होता -- जिओच्या जाहीरातीत मॉडेल म्हणून "शाहरूख खान" झळकतोय. हा तोच शाहरूख खान आहे ज्याच्या आगामी चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहे. चला तर मग जसे आमीरविरोधात स्नॅपडीलवर बहिष्कार टाकला होता तसे शाहरूखबाबतही करूया. त्याच्या चित्रपटासोबतच "रिलायन्स जिओ सीम" वर सुद्धा बहिष्कार टाकूया. आणि जे नाही टाकणार त्यांची देशभक्ती फुकटात मिळणार्या डेटासाठी विकली गेली असा त्याचा अर्थ होईल.
बाकी रिलायन्स जिओच्या जाहीरातीसाठी जेव्हा मोदी आणि शाहरूख एकत्र येतात तेव्हा अश्या बहिष्कारामागील फोलपणा जाणवल्यावाचून राहत नाही.
जर सरकारनेच पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारला तर ते योग्य राहील.
जर आपल्या फिल्म ईंडस्ट्रीनेच असा स्टॅन्ड घेतला - आम्ही पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम नाही करणार तर ते योग्य राहील.
पण जर राजकारणाचा एक भाग म्हणून हे आपापल्या सोयीने होत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
तसेच पाकिस्तान्यांशी संबंध तोडण्याची अपेक्षा फक्त बॉलीवूड आणि क्रिकेटर्स यांच्याकडून ठेवण्यातही हशील नाही.
आणि अश्या कधी लादल्या जाणार्या तर कधी उठवल्या जाणार्या बहिष्काराने पाकिस्तान नावाचा प्रॉब्लेम सुटणारही नाही.
पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे.
* तळटीप - मी अनुराग कश्यपच्या ट्वीटवर "एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे" असे म्हटले असले तरी मी त्याच्या ट्वीटशी सहमत आहे किंवा विरोधात आहे असे दोन्ही नाही. कारण त्याच्या ट्वीटमागचा नेमका हेतू मला माहीत नाही.
सर्व स्युडो देशभक्तांना आणि
सर्व स्युडो देशभक्तांना आणि राष्ट्रवाद्यांना सुवर्णसंधी
ऐ दिल है मुश्किलच्या सुरुवातीला उरीत बळी पडलेल्या सैनिकांना श्रद्धांजलीची पाटी दाखवण्यात येणार आहे. तर त्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याची सुवर्णसंधी
ऐ दिल है मुश्किल च्या उत्पन्नाचा काही हिस्सा आर्मी वेल्फेअर फंडला दिला जाणार असल्याने आर्मी वेल्फेअर फंडला सहाय करण्याची सुवर्णसंधी
पडद्यावर फवाद खान येताच त्याची हुरो उडवून, त्याला शिव्या देऊन आपल्या मनातील संतापाला वाट करून देण्याची सुवर्णसंधी
देशद्रोही भारतीयच ऐ दिल है मुश्किल सारखा चित्रपट पाहायला येण्याची शक्यता अधिक आहे. असे प्रेक्षक अर्थातच राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभे राहणार नाहीत. त्यांना तिथेच बुकलून परमवीरचक्र विजेत्यांनाही लाजवण्याजोगा पराक्रम गाजवण्याची सुवर्णसंधी.
आम्हाला करण जोहारला धडा
आम्हाला करण जोहारला धडा शिकवायचा आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवायचा आहे, पण तेच काम मनसेने केले तर नकोय, आम्ही स्वत: सोशलसाईटवर आवाज उठवण्याशिवाय वेगळे असे काही करणार नाही, पण मनसेने रस्त्यावर उतरत या कामाचे श्रेय लाटले तर ते आम्हाला नकोय, अशी काहीशी मनस्थिती आज बरेच जणांची फेसबूकवर दिसत आहे.
अर्थात, मनसेने आपली राजकीय पोळी भाजली यात मला जराही शंका नाही. मात्र याचे श्रेय मनसेला जाऊ नये हा जो आटापीटा मला आज फेसबूकवर जाणवला तो देखील फारसा रुचला नाही.
मनसेला लोकं सिरीअसली घेऊ लागलेत हेच मनसेचे पहिले यश म्हणावे लागेल.
आप पक्षाबाबत भाजपाने तेच केले आणि त्याचा परीणाम काय झाला हे सर्वांना माहीत आहेच.
काहि वर्षांपुर्वि राज
काहि वर्षांपुर्वि राज ठाकरेंनी घोषणा केली होती - मुंबईत मस्ती फक्त आमचीच चालणार.
राज्याची सत्ता आणि ग्रहखातं स्वत:कडे असुनहि काल फडणवीसांनी ते सिद्ध केलं...
मुख्यमंत्र्यांना जर कायदा आणि
मुख्यमंत्र्यांना जर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडांबरोबर मांडवली करावी लागत असेल >> दुर्दैव म्हणजे मुख्यमंत्र्याकडेच गृह खातं आहे.
म न से = मध्यस्थी नडणे आणि
म न से = मध्यस्थी नडणे आणि सेटलमेंट
आर्मी वेल्फेअर फंडात
आर्मी वेल्फेअर फंडात आतापर्यंत जेवढे पैसे जमा झालेत त्याच्या चारपट पैसे एकटा केजो देतोय म्हणे.
हीच का आमचे जाज्ज्वल्य देशभक्ती आणि सैनिकांप्रती क्रुतज्ञता.
आता दिवाळीनिमित्त सैनिकांना संदेश पाठवायची स्कीम आदरणीय पंप्रंनी काढलीय. त्याला मात्र भरघोस प्रतिसाद मिळेल याची खात्री आहे. कारण यात फक्त शब्दच खर्च करायचेत.
मिलिंद जाधव, या धाग्याला
मिलिंद जाधव,
या धाग्याला admin चौ विपु त स्थान मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन,
आपण जे भरभरून प्रतिसाद देत होतात, त्यावरून तुम्हाला या विषयात फार रस आहे असे जाणवते,
सध्या जो तोडगा काढण्यात आला आहे (माझ्या मते मांडवली) त्या बद्दल तुमचे काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
कळावे
आपलाच
सिम्बा
माझ्या मते मनसेच्या आंदोलनाला
माझ्या मते मनसेच्या आंदोलनाला भरघोस यश मिळाले, व "इथुन पुढे एकाही पाकीस्तानी कलाकार/तंत्रज्ञाला सिनेमाकरता घेतले जाणार नाही" ही खात्री मिळाली. पाकी कलाकारांवर(?) पूर्ण बहिष्कार टाकण्याचे दृष्टीने उचललेले पाऊल यशस्वी ठरले.
"मांडवली झाली असेल्/केली" वगैरे बाष्कळ बाता पितपत्रकारितेतुन आलेल्या, व जे तसे वागतात, त्यांना ते तसेच लगेच भावणार यात नवल ते काय? सो मांडवली वगैरे बाता मी इग्नोर मारतोच आहे, पण सूज्ञ जनतादेखिल ते बुद्धिभेदाचे वीष भिनवुन घेणार नाही याचीखात्री.
मात्र या निमित्ताने देखिल ब्राह्मण मुख्यमंत्र्यास टारगेट करण्याची संधी एकाही पक्षाने सोडली नाही हे ढळढळीत वास्तव देखिल सामोरे आले.
<<माझ्या मते मनसेच्या
<<माझ्या मते मनसेच्या आंदोलनाला भरघोस यश मिळाले,>>
---- तुमच्याही नकळत तुमचा वापर झाला आहे. आधी बहिष्कार टाकायची हाकाटी, कुणी चार-दोन प्रश्न विचारले तर प्रश्नकर्त्याला 'देशद्रोही' सम्बोधुन खिजवायचे, या भोळ्या-भाबड्या जनतेच्या भावना पेटवुन तापवलेल्या तव्यावर स्वत :च्या स्वार्थाची पोळी शेकायची...
अशा गलिच्छ व्यावहारातुन ५०० कोटी रुपये मिळाले तरी असे पैसे स्विकारु नयेत.
<<मात्र या निमित्ताने देखिल ब्राह्मण मुख्यमंत्र्यास टारगेट करण्याची संधी एकाही पक्षाने सोडली नाही हे ढळढळीत वास्तव देखिल सामोरे आले.>>
---- मुख्यमन्त्र्यान्ची जात कुठलीही असली तरी त्याने काय फरक पडतो आहे ? त्यान्चे कृत्य अशोभनिय आहे... त्यान्च्या जागेवर अजुन कुठ्ल्या इतर जातीची व्यक्ती असती तरी टिका झालीच असती. त्यान्च्यावर टिका त्यान्च्या जाती मुळे नाही तर त्यान्च्या कारभारामुळे होते आहे.
मनसेच्या बंदी बरोबर वितरक
मनसेच्या बंदी बरोबर वितरक बंदी देखील उठली काय?
<<"इथुन पुढे एकाही पाकीस्तानी
<<"इथुन पुढे एकाही पाकीस्तानी कलाकार/तंत्रज्ञाला सिनेमाकरता घेतले जाणार नाही" >>
----- जर निर्मात्याने ८ कोटी (८ अथवा ९ याबाबत दुमत शक्य आहे) रुपये देण्याची तयारी दाखवली तर असे घडणारच नाही याची मला काही गॅरेन्टी नाही.
<<मनसेच्या बंदी बरोबर वितरक
<<मनसेच्या बंदी बरोबर वितरक बंदी देखील उठली काय?>>
---- बन्दी मनसेने उठवली आहे....
पण एव्हाना बहिष्कार-बहिष्कार-बहिष्काराचे विष तर जनसामन्यान्च्या सम्पुर्ण शरिरात भिनले असेल. पैकी केवळ १-२ टाळकी काही अघटित कृत्य करणार नाहीत हे राठा पण सान्गु शकत नाही. कोटीमधे आपली लोकसन्ख्या आहे. ते काही इलेक्ट्रिकचे स्विच नाही. हवे तेव्हा ऑन-ऑफ करायला.
http://m.indiatimes.com/enter
http://m.indiatimes.com/entertainment/celebs/coeai-agrees-to-releasing-a...
सिनेमा ओनेर्स (सिंगल स्क्रीन) ची पण बंदी मागे
आता मोर्चा अमीर खानच्या
आता मोर्चा अमीर खानच्या दंगलकडे.
---- तुमच्याही नकळत तुमचा
---- तुमच्याही नकळत तुमचा वापर झाला आहे. आधी बहिष्कार टाकायची हाकाटी, कुणी चार-दोन प्रश्न विचारले तर प्रश्नकर्त्याला 'देशद्रोही' सम्बोधुन खिजवायचे, या भोळ्या-भाबड्या जनतेच्या भावना पेटवुन तापवलेल्या तव्यावर स्वत :च्या स्वार्थाची पोळी शेकायची..
>>>>>>>>>
उदय हे तर सगळ्याच बाबतीत होतंय,
2014 च्या आधी युद्ध का करत नाही म्हणून आकांत,
लागोपाठ हल्ले झाल्या नंतर "युद्ध हा पर्याय नाही "म्हणून पोस्टीं फिरवणे.
Sugical स्ट्राईक झाल्यावर परत अतिशयोक्ती केलेल्या पोस्टीं फिरवणे,
या समूहाला स्वतः:ची मते नाहीत, त्यांच्यामते विश्वसनीय, आदरणीय व्यक्तीने दिलेले कोणतेही लॉजिकं त्यांना पटते, रादर ते पटवून घेतात,
खरंय अगदी, आजकाल माहितीचा,
खरंय अगदी, आजकाल माहितीचा, परस्पर विरोधी मतांचा, कुठल्या कुठल्या आकडेवारीचा इतका प्रचंड भडिमार होतोय ना, खरे काय खोटे काय, रचलेले काय आणि अस्स्सल काय काहीच कळत नाही.
कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही हे देखील नाही.
>>> पण एव्हाना
>>> पण एव्हाना बहिष्कार-बहिष्कार-बहिष्काराचे विष तर जनसामन्यान्च्या सम्पुर्ण शरिरात भिनले असेल. <<<
)
तुम्ही लोकं यास "वीष" मानता आहात हेच अनाकलनीय आहे.
(और बहिष्कार अनशन वगैरे तो "म. गांधीजीकी देन है, इतनेमे भूल गये उनको और उनके रसुलोंको? यह उम्मिद नही थी, कमसे कम आपसे तो...
>>>> ---- तुमच्याही नकळत
>>>> ---- तुमच्याही नकळत तुमचा वापर झाला आहे. <<<<

या "तुमच्या" मध्ये, मी स्वतःला धरत नै बर्का सिम्बाभौ... !
"मांडवली झालीच असेल" अशी साळसुद हाकाटी पसरविण्याचे व त्याद्वारे "जनासामन्य" पब्लिकला त्यांचा बुद्धिभेद करीत (येत्या विलेक्शनस्करता)"वापरून" घेण्याइतके कसब असलेल्यांनी हे नक्राश्रू ढाळावेत याची गंमत वाटते आहे.... !
बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी
बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी एकूण तीन मागण्या निर्मात्यांपुढे ठेवल्या. त्यापैकी दोन मागण्यांनाच कोणाचाच विरोध नव्हता. पण जेव्हा पाच कोटी रुपयांचा विषय आला त्यावेळी मी त्याला विरोध केला असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
2 मागण्यांना कोणाचाच विरोध
2 मागण्यांना कोणाचाच विरोध नव्हता, तिसऱ्या मागणीला kjo चा विरोध नव्हता
म्हणजेच कुठल्याच मागणीला कजो चा विरोध नव्हता, मग मुखमंत्र्यांना या प्रकारात इन्व्हॉल्व होण्याचे काय कारण होते?
अशा मीटिंग्स साठी वर्षा चा हॉल भाड्याने देतात का हल्ली?
आणि प्रश्न कोणती मागणी मान्य
आणि प्रश्न कोणती मागणी मान्य होती आणि कोणती नव्हती हा नाहीये,
एक राजकीय पक्ष / संघटना दंगल घडविण्याची धमकी देऊन मागण्या पुढे ठेवतो, आणि मुख्यमंत्री त्याला अटक करायचे सोडून त्याच्या वतीने दुसऱ्या पार्टीला बोलावतात आणि नेगोशिअशन करतात हे बरोबर आहे का? हा प्रश्न आहे.
म्हणजे उद्या मनसे ने उत्तर भारतीय आणि बिहारी लोकांविरुद्ध हिंसक आंदोलन करायची धमकी दिली, तर फडणवीस त्यांना आणि उत्तर भारतीय महासंघाच्या सचिवांना बोलावणार, आणि up वाल्यानी फक्त भाजी विकावी, मासे विकू नयेत,
Laundry चालवावी, पण टॅक्सी चालवू नये
असा तोडगा काढणार,
आणि भक्त आहेतच टाळ्या वाजवून, चर्चा यशस्वी झाली म्हणायला.
एक राजकीय पक्ष / संघटना दंगल
एक राजकीय पक्ष / संघटना दंगल घडविण्याची धमकी देऊन मागण्या पुढे ठेवतो, आणि मुख्यमंत्री त्याला अटक करायचे सोडून त्याच्या वतीने दुसऱ्या पार्टीला बोलावतात
>>>
अटक करायला कोणी तक्रार करणे गरजेचे असते का? म्हणजे केजेओच्या वतीने तक्रारच आली नाही तर कारवाई होऊ शकते का? आणि प्रश्न चर्चेने सुटत असतील. दोन्ही बाजू खुश असतील. तर अटकसत्र मारझोड जाळपोळ वगैरे कश्याला? जर केजेओच्या चित्रपटाचे रक्षण करणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असेल तर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देऊ नये या लोकभावनेचा विचार करणे हे देखील मुख्यमंत्र्यांचेच कर्तव्य आहे ना. करण जोहारने आधी पाकिस्तानी कलाकारांना घ्यायची जी चुकी केली त्याची भरपाई केली आणि आता ईथून पुढे त्यांना घेणार नाही हे वचनही दिले. यामुळे पाक कलाकारांवर बहिष्कार टाका असे बोलणार्यांचीही बाजू राहिली. आणि आधी केलेल्या कामाचे नुकसान आता नको असे बोलणार्यांचीही बाजू राहिली.
प्रश्न चर्चेने सुटत असतील.>>
प्रश्न चर्चेने सुटत असतील.>> इथं प्रश्न चर्चेनं नाही खंडणी साठी केलेल्या मांडवलीनं सुटलाय
जे निर्माते पाक अभिनेत्यांना
जे निर्माते पाक अभिनेत्यांना घेतील त्यांनीच आर्मी वेल्फेअर फंडाला.पैसे द्यायचेत.
देणगी आहे की दंड?
<<>>>> ---- तुमच्याही नकळत
<<>>>> ---- तुमच्याही नकळत तुमचा वापर झाला आहे. <<<< हाहा
या "तुमच्या" मध्ये, मी स्वतःला धरत नै बर्का सिम्बाभौ... ! डोळा मारा>>
------- नसेल तर चान्गली गोष्ट आहे. हा अत्यन्त क्लिष्ट प्रश्न मांडवली किव्वा निव्वळ चर्चेने सोडवलेला नसुन त्या सोडवण्यात उच्च कोटीचा मुतसद्दीपणा ठळकपणे दिसत आहे.
पण ५ कोटी रु खुप जुजबी रक्कम वाटते. सलमान, शाहरुख, अमिर सारखे मोठे कलाकार प्रत्येक चित्रपटाचे ४०-५० कोटी रु. मिळवतात. राज, मुख्यमन्त्री एकत्र येतात आणि केवळ ५ कोटी रुपयात समाधान ? महाराष्ट्रात रहाणार्या प्रत्येकाने ४५ पैसे जमा केले तरी आरामात ५ कोटी रुपये जमा होतात. असो.
आता पर्रीकर आणि केंद्राने
आता पर्रीकर आणि केंद्राने आपली या मांडवलीला सहमती नसल्याचे म्हटले आहे.
आर्मीनेही असा खंडणी म्हणून आलेला दंड आम्हाला वेल्फेअर फंड म्हणून नको असल्याचे म्हटले आहे.
आता मनसे , केजो आणि फडणवीस काय करणार?
मनसे आणि मुख्यमंत्री ह्या
मनसे आणि मुख्यमंत्री ह्या गोष्टीसाठी एकत्र हेच पचनी पडलेलं नाहीये.
<<आर्मीनेही असा खंडणी म्हणून
<<आर्मीनेही असा खंडणी म्हणून आलेला दंड आम्हाला वेल्फेअर फंड म्हणून नको असल्याचे म्हटले आहे.>>
----- असे असेल तर हा खरोखर स्तुत्य निर्णय आहे...
आता मनसे , केजो आणि फडणवीस
आता मनसे , केजो आणि फडणवीस काय करणार?
आर्मी, पर्रीकर, सामान्य जनता सगळ्यांनी टीका केली म्हणूनच तर फडणवीसांनी स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली ना,
माझा विरोध होता हो , पण कजो नेच सहमती दर्शवली मी काय करणार?
नाहीतर 2 दिवस गप्प बसले होते
आता मनसे , केजो आणि फडणवीस
आता मनसे , केजो आणि फडणवीस काय करणार?>>>>> आणि काय,आम्ही दोघे भाऊ भाऊ दोघे मिळून --------!(पूर्ण करा)
Pages