पाक कलांकारांवर टाकलेल्या बहिष्काराच्या निमित्ताने ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2016 - 12:43

जेव्हा पाकिस्तानशी आपले बिनसते तेव्हा पहिली कुर्‍हाड सिनेकलाकार आणि क्रिकेटपटूंवरच पडते हे आपल्याला नवीन नाही. वर्षानुवर्षे हे होत आले आहे. जेव्हा आपले त्यांच्याशी संबंध बिघडलेले असतात तेव्हा तेथील कलाकारांना आणि खेळाडूंना, त्यातही प्रामुख्याने क्रिकेटपटूंना आपले दरवाजे बंद होतात. जेव्हा आपण मैत्रीचे प्रस्ताव आणि अमन की आशा मोडमध्ये असतो तेव्हा कलाकारच काय तेथील राजकीय नेत्यांच्या सुद्धा गळाभेटी घेतल्या जातात.

सध्या बहिष्काराची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त भासत आहे. पण पुढे कायम राहील याची खात्री नाही. दोन वर्षांनी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला वर भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना दोस्ती-कप म्हणून खेळवला गेला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. ईतके हे सवयीचे झाले आहे.

असो, यावर धागा काढायचे मनात होते. पण आधीच चालू असलेल्या वादात उगाच आपण तेल टाकायला नको म्हणून आतापर्यंत काढला नव्हता.
पण अनुराग कश्यपच्या एका ट्वीटने आज पुन्हा माझ्या डोक्यातील विचारांना बाहेर काढलेय.

तो काय म्हणतो बघा,
@narendramodi Sir you haven't yet said sorry for your trip to meet the Pakistani PM.. It was dec 25th. Same time KJo was shooting ADHM? Why?

बातमीची लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/anurag-ka...

एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे. ज्या काळात भारत-पाक संबंध एवढे छान होते की आपले पंतप्रधान श्री मोदी हे शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला पाकिस्तानात जाऊ शकतात, तर त्याच काळात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ज्या चित्रपटाचे शूटींग झाले, त्याविरोधात आता प्रदर्शनाच्या वेळी आवाज उठवणे चुकीचे आहे. ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.
मागे माझा स्वत:चा ईथे आतिफ अस्लम या गायकाबद्दल धागा होता. एक "गायक" म्हणून तो आजही माझा आवडीचा आहे. जो पर्यंत तो या भारत-पाक वादात भारताविरुद्ध गरळ ओकत नाही तो पर्यंत एक "कलाकार" म्हणूनही आवडीचा राहील. त्याने ईथे कैक हिट गाणी दिली आहेत. त्यानिमित्ताने कित्येक चित्रपटांत, कित्येक दिग्दर्शक निर्मात्यांसोबत काम केले असेल. कोणाकोणाविरुद्ध बहिष्कार टाकणार. ज्यांच्याविरुद्ध आपल्याला भडकावले जाईल त्यांच्या विरुद्ध? की सरसकट सर्वांविरुद्ध?

मध्यंतरी व्हॉटसपवर एक खोडकर(!) मेसेज फिरत होता -- जिओच्या जाहीरातीत मॉडेल म्हणून "शाहरूख खान" झळकतोय. हा तोच शाहरूख खान आहे ज्याच्या आगामी चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहे. चला तर मग जसे आमीरविरोधात स्नॅपडीलवर बहिष्कार टाकला होता तसे शाहरूखबाबतही करूया. त्याच्या चित्रपटासोबतच "रिलायन्स जिओ सीम" वर सुद्धा बहिष्कार टाकूया. आणि जे नाही टाकणार त्यांची देशभक्ती फुकटात मिळणार्‍या डेटासाठी विकली गेली असा त्याचा अर्थ होईल.
बाकी रिलायन्स जिओच्या जाहीरातीसाठी जेव्हा मोदी आणि शाहरूख एकत्र येतात तेव्हा अश्या बहिष्कारामागील फोलपणा जाणवल्यावाचून राहत नाही.

जर सरकारनेच पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारला तर ते योग्य राहील.
जर आपल्या फिल्म ईंडस्ट्रीनेच असा स्टॅन्ड घेतला - आम्ही पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम नाही करणार तर ते योग्य राहील.
पण जर राजकारणाचा एक भाग म्हणून हे आपापल्या सोयीने होत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
तसेच पाकिस्तान्यांशी संबंध तोडण्याची अपेक्षा फक्त बॉलीवूड आणि क्रिकेटर्स यांच्याकडून ठेवण्यातही हशील नाही.
आणि अश्या कधी लादल्या जाणार्‍या तर कधी उठवल्या जाणार्‍या बहिष्काराने पाकिस्तान नावाचा प्रॉब्लेम सुटणारही नाही.
पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे.

* तळटीप - मी अनुराग कश्यपच्या ट्वीटवर "एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे" असे म्हटले असले तरी मी त्याच्या ट्वीटशी सहमत आहे किंवा विरोधात आहे असे दोन्ही नाही. कारण त्याच्या ट्वीटमागचा नेमका हेतू मला माहीत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलाकार हे पण शेवटी माणूस असतात
आपल्या जीवाची काळजी आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेची काळजी त्यांना ही असते
एखाद्याने त्याचं मत एका बाजूने किंवा त्या विरुद्ध व्यक्त करायलाच हवं असं का?
हे करण्याने व न करण्याने फारसा काही फरक पडत नाही
आपण स्वतः त्या ठिकाणी असू तर आपण काय करू परिणामांच्या भीती मुळे ?
त्यामुळे त्यांना benefit of doubt देऊन मग काय वाटतं याचा विचार आपण सर्वानी करावा असे सुचवतो

ओमपुरीने आज आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली

<<

ज्याच्या बचावासाठी ओम पुरीने सैनिकां बद्दल अपशब्द वापरले होते तोच दातात तृण धरून देशातील, देशप्रेमी जनतेला शरण आल्यावर ओम पुरी कडे माफी मागण्या व्यतिरिक्त पर्याय काय होता.

आता ह्या धाग्यावर पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करणारे लोक माफी केंव्हा मागतात ते पहायचे.

>>स्वतः ला एकदा त्या ठिकाणी ठेवा आणि विचारा प्रश्न तुम्ही घ्याल का एखादी जाहीर भूमिका ज्याने तुम्हाला माहीत आहे की इकडचे किंवा तिकडचे तुमचे जगणे मुश्किल करतील<<

त्याचं काय आहे असुफ, जाहिर भूमिका जरुर घ्यावी, थेट प्रश्न हि विचारावेत पण संपुर्ण अभ्यास करुनच. आपल्या भूमिकेवर ठाम राहिलात आणि घेतलेल्या भूमिकेत काहि तथ्य असेल तर लोक पाठिंबा देतात.

पुर्वग्रह दुषित नजरेने, सखोल अभ्यास न करता जर एखाद्याने त्याच्या पे ग्रेडच्या वरचा प्रश्न विचारला आणि त्यावर गदारोळ उडाल्यानंतर "मै वैसा बोल्याच नै" अशी कोलांटउडी मारली तर मग शाब्दिक पिटाई होणारच ना?..

बरोबर आहे राज.
मूळ पोस्ट कदाचित व्यवस्थित लिहिली गेली नव्हती, आता बदल केला आहे मला काय म्हणायचं होतं त्यात

पाकिस्तानी कलाकारां वरील बंदी संदर्भात एक विचार
अस समजा आपल्या समृद्ध कुटुंबा शेजारी एक खुनशी कुटुंब रहाते, तुमच्या सतत कुरापती काढत रहाते, तुम्ही समंजस कुटुंब म्हणुन त्यांच्याशी जमेल त्या पद्धतीने आपसातील संबध चांगले रहातील याचा नेहमी प्रयत्न करता, पण एक दिवस ते कुटुंब तुमच्या घरच्या रक्षण करत्यांनाच ठार करते. तर अशा कुटुंबा बरोबर तुम्ही कसे वागाल? विशेषतः कुटुंब सदस्यांशी त्यांच्या नातेवाईकांशी, मित्रांशी तुमचे तुमच्या नातेवाईक,मित्रांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असतिल तर?

१) फौजदारी कार्यवाही
२) मला वाटतं अगदी तात्काळ प्रतिक्रिया म्हणजे सगळे हितसंबंध अगदी आर्थिक सुदधा तोडुन टाकाल.
आता आपले नातेवाईक,मित्र त्यांच्या नातेवाईकांशी मित्रांशी कसे संबंध ठेवतात ते आपल्या बद्दल काय विचार करतात आपल्याला काय समजतात यावर अवलंबुन आहे. तसेच आपले नातेवाईक, मित्र यांनी त्याच्यांशी कशी वर्तणुक केली यावरही आपले बारीक लक्ष असणार आहे.

अनिल रामचंद्र, आपल्या कुटुंबप्रमुखाने म्हटले की "त्या कुटुंबाशी आणि त्यातल्या सगळ्याच लोकांशी आपण संबंध तोडलेले नाहीत. ते संपूर्ण कुटुंब खुनशी आहे असे नाही. तर त्या कुटुंबातील काहीच मंडळींबाबत आपली तक्रार आहे."

अशा वेळी काय करायचं?

(बहुतेक) पाकीस्तानाच्या निर्मितीपासूनच आपल्या चित्रपटांना आणि कलाकारांना पाकीस्तानात ( फॅन फॉलॉईंग असूनही) सादरीकरणाची बंदी. आपल्या सगळ्याच्या सगळ्या चित्रपटांची / गाण्याची पायरसी करायची सुरुवात पाकीस्तानातून झाली / होत असते. आपल्या जगजीत सिंगांना पाकीस्तानात मैफीली करायला बंदी. आपण मात्र गुलाम अली / मेहेंदी हसन ई. लोकांचे पायघड्या घालून स्वागत करतच आलो आहे.

इतके वर्षे आपण असे करूनही पाकीस्तानी कलाकारांनी त्यांच्या घरातल्या खुनशी माणसांचे मत परिवर्तन करायसाठी असे काय आणि किती प्रयत्न केले?
ह्या पार्श्वभुमीवर मग आपण का म्हणून त्यांच्या कलाकारांना इतका भाव द्यावा / बोलवावे?
अर्थात हे भारत सरकारनेच करायला हवे हे ही तितकेच खरे. पाकीस्तानी कलाकारांना वर्क व्हिसा देणे बंद करायलाच हवे.

पाकीस्तानाबरोबर आपले व्यापारी व्यवहार चालू आहेत. ज्यात देवेघेव आहे. आयात होते निर्यातही. चालू रहावेत.

त्यांचे बहुतेक सर्व राष्ट्रप्रमुख आपल्याकडे येऊन ताजमहल समोर फोटो काढून जातात. अजमेरशरीफ ला भेटी चढवून जातात. आपल्याही राष्ट्रप्रमुखांनी तिकडे जावे ज्याला जे पहावेसे वाटेल ते उदा. तक्षशीला, मोहनजोदाडो अथवा नृसिंह मंदीराला भेट द्यावी. अथवा न द्यावी. भेटी देत रहावे.

आमच्या कलाकारांना तिकडे जाऊन कमवायची संधी नाही त्यांच्या कलाकारांनाही मिळायला नको. इतकंच म्हणणे आहे बस्स!

भरत.
"ते संपूर्ण कुटुंब खुनशी आहे. त्या कुटुंबातील एखाद्याच माणसाबाबत आपली तक्रार नाहीये. त्या एका व्यक्ती व्यतिरिक्त त्या कुटुंबाशी आणि त्यातल्या सगळ्याच लोकांशी आपण संबंध तोडावे अशा प्रकारची त्यांची वागणूक आहे.. तर "
अशा वेळी काय करायचं?

तटी. मला स्वत:ला अनेक पाकीस्तानी कलाकार आवडतात. पण वैयक्तिक आवड-निवड आणि व्यापक देशहित यामधे प्राधान्य कोणाला हवे याबाबत स्पष्टता आहे Happy

अनिल रामचंद्र
दोन्ही पर्याय अगदी अचुक आहेत,

सरकारच्या लेव्हलवर करायच ते सरकार करेलच !
पाकिस्तानच्या जनतेला दोष न देणे हे वैचारीक परिपक्वतेच लक्षण आहे.

पण भारतीय जनतेच्या लेव्हलला पाकिस्तानच्या जनतेच्या लेव्हलला प्रतिसाद देणे ही महत्वाचे आहे.
हा प्रतिसाद म्हणजे त्या पाकिस्तानातल्या कलाकारांनी काम केलेल्या सिनेमा न बघण. जेणेकरुन पाकिस्तानच्या कलाकारांना घेऊन निर्माते परत सिनेमा बनवायच्या फंदात पडणार नाहीत. अस किती नुकसान होईल त्या कलाकारांना घेतल नाही तर ? पाकिस्तानात तुमचा सिनेमा चालणार नाही ईतकच ना ?
चांगला सिनेमा कोणी ही कुठेही बघतोच !!

<<< आपल्या कुटुंबप्रमुखाने म्हटले की "त्या कुटुंबाशी आणि त्यातल्या सगळ्याच लोकांशी आपण संबंध तोडलेले नाहीत. ते संपूर्ण कुटुंब खुनशी आहे असे नाही. तर त्या कुटुंबातील काहीच मंडळींबाबत आपली तक्रार आहे."
अशा वेळी काय करायचं? >>>>

भारतातील जनतेचा संबंध फक्त पाकिस्तानच्या कलाकारांशीच येतो तिथल्या सामान्य जनतेशी नाही येत,
मग भारतातील जनतेच्या भावना त्या कलाकारांच्या वरच व्यक्त होणार !!
त्यात न समजण्यासारख काय आहे ?

बर भारतातील जनतेने पाकिस्तानच्या कलाकारांना इग्नोर केल तर काय मोठा अपराध केला अस होणार ?

हर्पेन, सौ टके की बात. मला गावस्करचा किस्सा आठवला. ( सर्वांना माहीत असेलच तरी लिहीते, ऋन्मेषला माहीत आहे ना?)

पाकिस्तानात मॅच खेळत असतांना एका पार्टीत सुनिल गावस्कर आणी नूरजहां यांची भेट झाली. हे कोण आहेत ते माहीत आहे का असे विचारल्यावर बाई म्हणाल्या मला फक्त इम्रान खान माहीत आहे. मग सुनिल गावस्करला विचारले या कोण प्रसिद्ध गायिका आहेत ते माहीत आहे का तेव्हा तो म्हणाला, नाही, मला फक्त लता मंगेशकरच माहीत आहे. ये था असली जवाब !

देशाबाहेर काही पाकी मुलींशी ओळख झाली होती. काही विशेष नाही, अगदी टिपीकल भारत द्वेष होता त्यांच्या बोलण्यात. फक्त एक टॅक्सीवाला म्हणाला की आमच्या देशात आता भयानक वातावरण आहे, परत सुट्टीवर गेलो की आई वडलांना पण इकडे ( यु एस ) घेऊन येणार आहे. कारण देशाचे तुकडे कधी पडतील सांगता येत नाही. तो टॅक्सीवाला प्रामाणीक निघाला, पण आपल्या काही लोकांना भल्ताच विश्वास आहे बॉ पाकीस्तानवर.:फिदी: अजीब बात है, आजकल किसी पर भरोसा नही कियां जाता!

आमच्या कलाकारांना तिकडे जाऊन कमवायची संधी नाही त्यांच्या कलाकारांनाही मिळायला नको. इतकंच म्हणणे आहे बस्स!
>>>>>>>>>> +11111

अनुराग कश्यप चा खुलासा आणखीनच चुकीचा वाटलां ..
जेव्हा फिल्म इडस्ट्री पे करते तेव्हा ते वैयक्तिक - इंडस्ट्री पुरतं मर्यादित असतं. पंतप्रधान पे करतात तेव्हा आख्खा देश इंपेक्ट होतो
what does he expect?

<<पण आपल्या काही लोकांना भल्ताच विश्वास आहे बॉ पाकीस्तानवर. ...अजीब बात है, आजकल किसी पर भरोसा नही कियां जाता!>> अगदि अगदि...

भरत.
तर त्या कुटुंबातील काहीच मंडळींबाबत आपली तक्रार आहे हे कसं कळलं तसंच
ते फक्त आधीच्या उदाहरणातलं म्हणून घेतलंय, भावना समजून घ्या. Proud

ते भारताच्या होम मिनिस्टरचं विधान आहे. माझंही मत काही वेगळं नाही.
लिंक दिलीय मागल्या पानावर.
आता हे पान वाचून भारतात पाकिस्तानचा सरसकट द्वेष करायला शिकवलं जातं असं म्हणता येईलच की नाही?
भारतद्वेष ही तिथल्या काहींची गरज आहे तस्ंच पाकद्वे ही इथल्या कआहींची.

आता ह्या धाग्यावर पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करणारे लोक माफी केंव्हा मागतात ते पहायचे.

>>>>>

हे नाही होणार.

करण जोहारने पाकिस्तानी कलाकार घेतले ते त्याची प्रसिद्धी कॅश करायला. पाकिस्तानी गायक जे पॉप्युलर आहेत वा जे चांगले गातात त्यांना ईथे काम मिळते. हा व्यवसाय आहे, हा व्यवहार आहे. ईथे देशप्रेम किंवा पाकिस्तानद्वेष वगैरे लुडबुड करायला येत नाही. आताही करण जोहारने माफी मागितली आहे ते आपल्या चित्रपटाला फटका बसू नये म्हणूनच. हा देखील एक व्यवहारच आहे.

तर सांगायचा मुद्दा हा की सेलिब्रेटींना जसे आपल्या प्रत्येक विधानाची किंमत चुकवावी लागते तसे ईथे कोणाबाबत होणार नसल्याने विधान मागे घेणे, माफी मागणे वगैरे प्रकारांना ईथे थारा नाही Happy

यावरून एक सहज विचार मनात आला, जे पाकिस्तानी कलाकारांविरोधात आहेत ते देशप्रेम म्हणून की पाकिस्तान द्वेष म्हणून की बस्स पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणल्याने त्यांचे स्वताचे वैयक्तिक नुकसान होत नाहीये म्हणून देशप्रेम दाखवायचा सोपा मार्ग निवडायला.
प्रश्न कठोर आहे. पण प्रत्येकाने स्वताला विचारायचा आहे. मला कोणाकडून उत्तर नकोय.

हायला, या ऋन्मेषचे बरे आहे. स्वतला उत्तरे देता आली नाही, की नवीन प्रश्न निर्माण करायचे, आणी धागाकर्ता आणी वाचक दोन्ही पण उत्तरे द्यायला बांधिल नाहीत हे स्वतःच जाहीर करायचे, मज्जानी लाईफ!

१.) बरं आपण आता पाकड्यांकडे वळु. या देशाने माझ्या देशाला, देशबांधवांना आणी जवांनाना शोक, दु:ख, संताप, दहशतवाद या खेरीज काहीच दिले नाही, ज्यातुन काही चांगल्या आठवणी रहातील.

२) काही भारतीय, जवान, सरकार मधले काही मंत्री, पाकड्यांच्या विरुद्ध असलेले काही बॉलीवुड मराठी- हिंदी कलाकार, गौतम गंभीर सारखे खेळाडु हे सगळे मुर्ख आहेत, जे पाकीस्तानच्या भावना समजून घेत नाहीयेत. मुर्ख आहेत असे लोक जे पाकी कलाकार व दहशतवादी यात फरक करत नाहीत.

३) हो ना, तिकडे म्हणजे आपल्या पाकीस्तान मध्ये हो, जेव्हा शाळेतल्या स्फोटा मध्ये लहान मुले मेली तेव्हा भारतीय लोकांनी दु:ख व्यक्त केले, दहशत वादाचा निषेध केला. पण इकडे उरी, पठाणकोट, मुंबई वगैरे ठिकाणी जेव्हा माणसे मेली तेव्हा उच्च दर्जाचे फवाद खान वगैरेनी याचा निषेध केला नाही. का? अरे का काय विचारताय? मुर्ख आहात का तुम्ही? असे नेहेमीच होते. आम्हाला काय त्याचे? आमचा देश शांततेचा प्रतिक आहे ना? आम्ही भारतात पैसे कमवायला जातो, कोणा निरपराधी माणसाचा निषेध करायला जात नाही हो. मरे ना का ते वाय झेड तिकडे. आम्हाला काय? आम्हाला भारतीय सरकारने व्हिसा दिलाय, आम्ही फक्त शिणुमात डोळ्यात ग्लिसरीन घालुन, भाड्याचे स्टंटमॅन आणुन हवेत उड्या मारु. भारतीय आहेतच कलेचे भोक्ते. हजार लोक मेली तरी चालेल, पण आम्ही गुलाम अली, फवाद, अतिफ अस्लम यांना पुरेपूर चान्स देऊ.

४ ) भारतीय संकृती आदरातिथ्याला मानते, कुठलाच भारतीय मुलाला हे शिकवत नव्हता की पाकीस्तान हे शत्रु राष्ट्र आहे, पण उरी हल्ल्या नंतर लोकांची मते बदललीत. आणी ज्यांनी झापडे बसवलीत त्यांनी ती कृपया उघडावीत.

५) बलुचीस्तान, पश्तुन इथले लोक पाकीस्तानच्या विरोधात उगाच्च नाहीयेत. तरीही ज्यांना आपल्या शेजार्‍यापेक्षा पाकड्यांचे प्रेम आहे त्यांनी कारणे शोधत बसावीत.

यावरून एक सहज विचार मनात आला, जे पाकिस्तानी कलाकारांविरोधात आहेत ते देशप्रेम म्हणून की पाकिस्तान द्वेष म्हणून की बस्स पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणल्याने त्यांचे स्वताचे वैयक्तिक नुकसान होत नाहीये म्हणून देशप्रेम दाखवायचा सोपा मार्ग निवडायला.
प्रश्न कठोर आहे. पण प्रत्येकाने स्वताला विचारायचा आहे. मला कोणाकडून उत्तर नकोय.>>>>>>>लास्ट बट नॉट द लिस्ट. बाळ ऋन्मेष जरा डोक्याने पण मोठा हो. ( कडवट बोलल्याबद्दल सॉरी ) जरा तुझ्याच एरीयात सर्व्हे कर या बाफाच्या विषयाचा.

जे पाकिस्तानी कलाकारांविरोधात आहेत ते देशप्रेम म्हणून>>>>>>> हो देशप्रेम म्हणूनच मी पाकड्यांच्या विरोधात आहे, मला काही घेणे देणे नाही कुठल्याच राजकीय पक्षाशी पण. न भाजपा, न काँग्रेस, न समाजवादी.

अमक्यातमक्याचा द्वेष करणं हा देशप्रेमाचा सगळ्यात सोपा मार्ग. जे असं करत नाहीत, त्यांना स्वतःचं देशप्रेम सिद्ध करावं लागतं.

रश्मि तै,

अगदी बरोबर बोललात,

आता आपलच कस खर ह्याच्या कोलांट्या उड्या सुरु झाल्या !!

बाकी,

एखादा पुन्हा दुसरा कसाब परत आलाच तर !! त्यावेळी त्याला कृपया सांगा की "मी पाकिस्तान विरोधी नाही" !
मग बघु गंम्मत !! त्याच हृदय परिवर्तन होत आणी सोडुन देतो की कस ते !!

पाकीस्तानी कलाकारांवर भारतात येऊन काम करण्यावर बंदी घालणे / अशी मागणी करणे म्हणजे द्वेष कसा काय?
लतादिदींना इतक्या प्रदीर्घ कालावधीत पाकीस्तानात कार्यक्रम करता आला/ येत नाही याचा अर्थ असा नाही की पाकीस्तानी माणसे लतादिदींचा द्वेष करतात. पाकीस्तानात भारतीय कलाकारांचे चाहते आहेत हे सत्य आहे पण भारतीय कलाकारांना तिकडे जाता येत नाही आणि त्यांचे फॅन असलेल्या पाकीस्तानी लोकांचे / नेत्यांचे भारतीय कलाकारांना तिकडे कार्यक्रम करता यावेत या करता केलेल प्रयत्न कायमच तोकडे पडलेले आहेत हे ही सत्यच.

आता बंदीची मागणी ज्यांच्याकडून होते आहे त्यांचा आपण द्वेष करतो म्हणून तिला विरोध करायचे हे बरे नव्हे Wink

तुम्ही करा हो प्रेम खुशाल !!

अजुन किती बळी दिले पाहीजेत ते पण सांगा !! म्ह्णजे तुमच प्रेमप्रकरण सुरळीत चालु राहु शकेल !!

{एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे. ज्या काळात भारत-पाक संबंध एवढे छान होते की आपले पंतप्रधान श्री मोदी हे शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला पाकिस्तानात जाऊ शकतात, तर त्याच काळात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ज्या चित्रपटाचे शूटींग झाले, त्याविरोधात आता प्रदर्शनाच्या वेळी आवाज उठवणे चुकीचे आहे. ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.}
यावर बोला.

कांदा पोहे,

हिंदुज आर कॉवॉर्ड हे तुम्हाला मान्य असल्याचा पुरावाच देताय !!

Light 1

>>> आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.} <<< Lol
म्हणजे मोदींना "बनिया/चावाला" म्हणून नावे ठेवता ठेवता, ही फायद्यातोट्याची/नफेगिरीची "बनियेगिरी" काहि चुकवता आली नाहीच्च, हो ना? Proud

Pages