पाक कलांकारांवर टाकलेल्या बहिष्काराच्या निमित्ताने ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2016 - 12:43

जेव्हा पाकिस्तानशी आपले बिनसते तेव्हा पहिली कुर्‍हाड सिनेकलाकार आणि क्रिकेटपटूंवरच पडते हे आपल्याला नवीन नाही. वर्षानुवर्षे हे होत आले आहे. जेव्हा आपले त्यांच्याशी संबंध बिघडलेले असतात तेव्हा तेथील कलाकारांना आणि खेळाडूंना, त्यातही प्रामुख्याने क्रिकेटपटूंना आपले दरवाजे बंद होतात. जेव्हा आपण मैत्रीचे प्रस्ताव आणि अमन की आशा मोडमध्ये असतो तेव्हा कलाकारच काय तेथील राजकीय नेत्यांच्या सुद्धा गळाभेटी घेतल्या जातात.

सध्या बहिष्काराची तीव्रता नेहमीपेक्षा जास्त भासत आहे. पण पुढे कायम राहील याची खात्री नाही. दोन वर्षांनी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला वर भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामना दोस्ती-कप म्हणून खेळवला गेला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. ईतके हे सवयीचे झाले आहे.

असो, यावर धागा काढायचे मनात होते. पण आधीच चालू असलेल्या वादात उगाच आपण तेल टाकायला नको म्हणून आतापर्यंत काढला नव्हता.
पण अनुराग कश्यपच्या एका ट्वीटने आज पुन्हा माझ्या डोक्यातील विचारांना बाहेर काढलेय.

तो काय म्हणतो बघा,
@narendramodi Sir you haven't yet said sorry for your trip to meet the Pakistani PM.. It was dec 25th. Same time KJo was shooting ADHM? Why?

बातमीची लिंक - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/anurag-ka...

एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे. ज्या काळात भारत-पाक संबंध एवढे छान होते की आपले पंतप्रधान श्री मोदी हे शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला पाकिस्तानात जाऊ शकतात, तर त्याच काळात पाकिस्तानी कलाकारांना घेऊन ज्या चित्रपटाचे शूटींग झाले, त्याविरोधात आता प्रदर्शनाच्या वेळी आवाज उठवणे चुकीचे आहे. ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.
मागे माझा स्वत:चा ईथे आतिफ अस्लम या गायकाबद्दल धागा होता. एक "गायक" म्हणून तो आजही माझा आवडीचा आहे. जो पर्यंत तो या भारत-पाक वादात भारताविरुद्ध गरळ ओकत नाही तो पर्यंत एक "कलाकार" म्हणूनही आवडीचा राहील. त्याने ईथे कैक हिट गाणी दिली आहेत. त्यानिमित्ताने कित्येक चित्रपटांत, कित्येक दिग्दर्शक निर्मात्यांसोबत काम केले असेल. कोणाकोणाविरुद्ध बहिष्कार टाकणार. ज्यांच्याविरुद्ध आपल्याला भडकावले जाईल त्यांच्या विरुद्ध? की सरसकट सर्वांविरुद्ध?

मध्यंतरी व्हॉटसपवर एक खोडकर(!) मेसेज फिरत होता -- जिओच्या जाहीरातीत मॉडेल म्हणून "शाहरूख खान" झळकतोय. हा तोच शाहरूख खान आहे ज्याच्या आगामी चित्रपटात पाकिस्तानी कलाकार आहे. चला तर मग जसे आमीरविरोधात स्नॅपडीलवर बहिष्कार टाकला होता तसे शाहरूखबाबतही करूया. त्याच्या चित्रपटासोबतच "रिलायन्स जिओ सीम" वर सुद्धा बहिष्कार टाकूया. आणि जे नाही टाकणार त्यांची देशभक्ती फुकटात मिळणार्‍या डेटासाठी विकली गेली असा त्याचा अर्थ होईल.
बाकी रिलायन्स जिओच्या जाहीरातीसाठी जेव्हा मोदी आणि शाहरूख एकत्र येतात तेव्हा अश्या बहिष्कारामागील फोलपणा जाणवल्यावाचून राहत नाही.

जर सरकारनेच पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारला तर ते योग्य राहील.
जर आपल्या फिल्म ईंडस्ट्रीनेच असा स्टॅन्ड घेतला - आम्ही पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम नाही करणार तर ते योग्य राहील.
पण जर राजकारणाचा एक भाग म्हणून हे आपापल्या सोयीने होत असेल तर त्याला काही अर्थ नाही.
तसेच पाकिस्तान्यांशी संबंध तोडण्याची अपेक्षा फक्त बॉलीवूड आणि क्रिकेटर्स यांच्याकडून ठेवण्यातही हशील नाही.
आणि अश्या कधी लादल्या जाणार्‍या तर कधी उठवल्या जाणार्‍या बहिष्काराने पाकिस्तान नावाचा प्रॉब्लेम सुटणारही नाही.
पाकिस्तानसोबत ठेवायच्या संबंधांचे एक निश्चित धोरण राष्ट्रीय एकात्मतेसाठी फार गरजेचे आहे.

* तळटीप - मी अनुराग कश्यपच्या ट्वीटवर "एका दृष्टीने विचार करता पॉईंट आहे" असे म्हटले असले तरी मी त्याच्या ट्वीटशी सहमत आहे किंवा विरोधात आहे असे दोन्ही नाही. कारण त्याच्या ट्वीटमागचा नेमका हेतू मला माहीत नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या अनुराग कश्यपचा येत्या काळात कोणता चित्रपट प्रर्दशित होणार आहे का? सध्या नरेंद्र मोदींवर (बिनबुडाची) टिका केली की रातोरात प्रसिद्धी मिळते असा ट्रेंड सेट झालाय. त्यातूनच कोणीही ऐरागैरा उठून ट्विटर वर त्यांना टॅग करुन कसलाही ट्विट करत असतो.

ऋन्मेष,

अनुराग कश्यपचे ट्वीट सकाळी वाचले होते. ह्याबाबत असे म्हणावेसे वाटते:

उरी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक्स ह्यामुळे कारगिल युद्धानंतरच्या वर्षांमध्ये प्रथमच संबंध इतक्या पातळीला ताणले गेले आहेत. त्यातच मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक्स ह्या बाबीला जाहिरातीसारखे जगभर फिरवून 'संबंध सुरळीत वगैरे होण्याच्या' सर्व शक्यतांवर पाणी ओतलेले आहे. तसेच, नेमके ह्याच काळात सोशल मीडियाचे सामर्थ्य आणि उठसूठ कोणीही व्यक्त होऊ शकणे व त्याचे वक्तव्य जगाच्या कानाकोपर्‍यात त्वरीत पोचणे ह्या गोष्टींचा अतिरेक झालेला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेल्यासारखे होत आहे. त्यातच भाजपच्या सरकारला खाली खेचणे हा एकमेव उद्देश हाताशी उरलेले जे काही बोलत आहेत त्यामुळे वाद अधिकच पेटत आहे. हा अंतर्गत वाद असला तरी पडसाद पाकिस्तानी मीडियामध्ये उमटत आहेत. बलुचिस्तानचा मुद्दा स्वतःहून चर्चेत आणत मोदींनी संबंध अधिकच ताणले जातील असे बघितलेले आहे. ह्या सर्वाच्या मुळाशी असलेल्या उरी हल्ल्यात १९ जवान एकदम मारले जाणे हेही आहे, ज्यामुळे अचानक प्रक्षोभ उसळला.

थोडक्यात काय, टाचणी पडली तरी कानठळ्या बसतील अश्या वातावरणात स्फोटक विधाने, प्रत्यक्ष हल्ले आणि दहशतवादी कारवाया होत आहेत. अश्या तापलेल्या वातावरणातच सलमान खान, ओम पुरी अश्या लोकांनी सामान्य नागरिकांच्या भावनांचा मान राखला नाही असे चित्र उभे राहत आहे. त्यामुळे वातावरण अधिकच तापत आहे. ह्या परिस्थितीत कला, क्रीडा वगैरे आता क्षेत्र ही केवळ मनोरंजनासाठी असतात आणि मानवता त्या सर्वांपेक्षा अधिक मूल्यवान असते हा विचार प्रकर्षाने बळावत आहे. त्यामुळे पाक (!) कलाकारांना येथे रसिकाश्रय मिळूच नये ही भावना जनतेत आणि सरकारातही निर्माण होत आहे. हा एक प्रकारे काळाचा महिमा आहे. हेच बारा वर्षांपूर्वी इतक्या तीव्रतेने झाले नसतेही!

मात्र आता सरकारने हे वातावरण निवळू दिले जाऊ नये. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडून दहशतवादाचा खात्मा करण्याकडे वाटचाल सुरू ठेवावी हे योग्य ठरेल. ते करत असताना कला आणि क्रीडा क्षेत्रांनी देशभावनेला अधिक महत्व द्यावे. विरोधकांनी त्यांचा विरोध हा पाकिस्तानच्या हिताचा ठरणार नाही हे बघावे. सामान्य माणसांना अभावानेच अनुभवता येणारी देशभावना सध्या चांगली तेवत आहे, ती तशीच तेवत राहावी.

>>ते पाकिस्तानी कलाकार आपला मोबदला घेऊन पसार झाले. आता जर हा चित्रपट डब्यात गेला तर आपल्या ईथल्या निर्मात्या आणि कलाकारांचेच नुकसान होणार.

अगदी बरोबर आहे, त्यामुळे जे पुर्ण झाले आहेत अशा चित्रपटांवर बंदी घालणे योग्य नाही हे.मा.वै.म.

इथल्या लोकांना पाकी कलाकारांचा भारी पुळका येतो तर तिथल्याना यांच्यावर लाथ मारून स्वतःचे देशप्रेम दाखवायला भारी आवडते. मगाशीच कोक स्टुडिओवर उमेर जस्वालचे गाणे ऐकून त्याचे फेसबुक पेज पाहिले तर त्यानेही अगदी ठळक अक्षरात कला बिला ठीक आहे पण मी आधी पाकिस्तानी आणि मग कलाकार आहे म्हणून लिहिलेले वाचले.

चित्रपट डब्यात याआधी गेलेले नाहीयेत का? वर्षाला प्रदर्शित होणाऱ्या एकूण चित्रपटांपैकी कितीतरी तसेही डब्यातच जातात की. सध्या तरी पूर्ण तयार फक्त एकच चित्रपट आहे.

कलाकारांवर तणावाचा परिणाम होऊ नये, राजकारण वेगळे आणि या गोष्टी वेगळ्या हे मलाही हल्ली हल्ली पर्यंत वाटत होते. पण कला हि केवळ कला राहिलेली नाही तर त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात पैसा घुसलेला आहे. पाक कलाकार इथे पैसे कमावून मायदेशी नेतात, त्यातला किती पैसा सरकारजमा होतो, किती पैसा कुठल्या न कुठल्या मार्गाने शेवटी भारताविरुद्ध कारवायांसाठी वापरला जातो हे कसे कळणार? या कलाकारांच्या कार्यक्रमाची, चित्रपटांची तिकिटे काढून माझ्या खिशातले पैसेच मी असे माझ्याविरुद्ध वापरायला द्यावे का?

पण भारतपाक व्यापार तर चालू आहे ना? की बंद झाला? आणि चित्रपट प्रदर्शनाला तयार आहे म्हणजे, पाकिस्तानी कलाकार त्यांचे काम पूर्ण करून पैसे घेऊन गेले.नुकसान इथल्या निर्माता वितरकांचं होणार.
दुसरीकडे आम्ही दिवाळीसाठीच्या चीनी मालावर बहिष्कार घालणार आणि चीनचे अध्यक्ष आणि कंपन्या इथे येऊन मोठे मैठे करार करणार.

एखादा चित्रपट बनायला दोनेक वर्ष लागत असतील.तेव्हा भारत पाक संबंध आताइतके ताणले गेलेले नव्हते मोदी, नवाज एकमेकांंशी चर्चा करत होते. संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु होते त्या काळात पाकीस्तानी कलाकारांना निर्मात्याने साईन केले होते.आता मात्र दोन्ही देशातील संबंध सुरळीत नाही आणि चित्रपट प्रदर्शनास सज्ज आहेः पाक.कलाकार तर पैसे घेउन काम संपवुन गेलेत तोटा मात्र निर्मात्याचा होणार. म् णुन आपल्याच देशातील निर्मात्यांची कोंडी करणे योग्य नाही. चित्रपट बनवणे हे टिमवर्क आहे टिममधल्या एखाद्या पाकिस्तानी कलाकारामुळे बाकीच्यांचे नुकसान होउ नये. बंदी वैगरे फालतुगीरी आहे.

अगदी सलमा आगापासून मला नेहमी वाटायचे की पाक कलाकारांना इथे संधी मिळू नये.इथला पैसा कमाऊन ते गब्बर होतात.अर्थात चूक आपल्या लोकांचीच आहे.इथे कोणी हिरो हिर्रॉईन नसल्याप्रमाणे पाक कलाकारांचा उदो उदो केला जातो,त्याचा कंटाळा येतो.मागे गुलामअलींच्या भारतदौर्‍यात मंगेशकर भगिनींपैकी एकीने म्हटले होते की कलेला धर्म,प्रांत अशी बंधने नसतात.
एरवी खरेही असले तरी राष्ट्रापेक्षा व्यक्ती मोठी होऊ शकत नाही.

पाक कलाकार असलेला एखादा चित्रपट पडला/ डब्यात गेला आणि आर्थिक नुकसान झालं निर्मात्याचं की पुढच्या सिनेमात पाक कलाकारांना घेताना १० वेळा विचार करतील निर्माते.
पाक कलाकारांना भारताचा व्हिसा नाकारणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. पण हल्ली अनेक हिंदी सिनेमांचे शुटिंग भारताबाहेर होते. त्यामुळे भारताचा व्हिसा नाकारला तरी दुसर्‍या कोणत्या देशात शुटिंग करू शकतात निर्माते.

पाक कलाकार इथे पैसे कमावून मायदेशी नेतात, त्यातला किती पैसा सरकारजमा होतो, किती पैसा कुठल्या न कुठल्या मार्गाने शेवटी भारताविरुद्ध कारवायांसाठी वापरला जातो हे कसे कळणार? या कलाकारांच्या कार्यक्रमाची, चित्रपटांची तिकिटे काढून माझ्या खिशातले पैसेच मी असे माझ्याविरुद्ध वापरायला द्यावे का?
>>>>

हो, हा योग्य मुद्दा आहे आणि यात तथ्यही आहे.
दाऊदही एकेकाळी बॉलीवूडमधून खोर्‍याने कमवायचा आणि मग याच देशात बॉम्बस्फोट घडवायचा.
हल्लीचे माहीत नाही कोण पोसते त्याला

ऋन्मेऽऽष मित्रा, हा धागा काढताना बेसिक मधे वांदा झालाय असं माझ मत आहे. म्हणजे ट्वीट करताना त्या अनुराग कश्यप पण तेच झालय पण तो असेल कोणत्यातरी तारेत असं मानुन सोडून देउ. पण आपण त्याच्या बरळण्यावर एवढा विचार करण्याआधी जरा नीट विचार करावा ना.. एक एक मुद्दा घेऊन सांगतो. पटलं तर बघ नाहीतर सोडून दे.
१. पंतप्रधानांनी माफी मागणे - एक तर मोदींची पाकिस्तान भेट पूर्णपणे राजकिय देखावा होता. आपली प्रतिमा जगासमोर चांगली करणे आणि आपण कसे मैत्री करू ईच्छितो ह्याची ती फक्त जाहिरात होती. राजकारणात असच असतं. जानी दुष्मनाला पण मिठ्या माराव्या लागतात. तेव्हा पाकिस्तानशी कोणतं "अ‍ॅक्टीव्ह" भांडण नव्हतं. त्यामुळे गोड गोड बोलणं चालू होतं. मोदी वाट बघत होते ते उरी सारखं काहीतरी घडायची कारण पाकिस्तान चा इतिहास बघितला तर हे असे हल्ले होतच रहाणार. त्यातही दुसरा भाग असा कि पाकिस्तानी पंतप्रधानाशी जवळिक दाखवून पाकि आर्मीला असं दाखवण्याचा प्रयत्न झाला कि आम्ही पंतप्रधान एकमेकांना जास्त जवळ आहोत आणि तुम्ही सतत मधे यायची गरज नाही. थोडक्यात त्यांना डिवचलं.. म्हणूनच नंतर जे काही झालं त्यासाठी मोदींनी माफी मागणं हा विचारच चुकिचा आहे.
२. भारत सरकार ने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातलेली नाही. त्यांचे व्हिसा अजुनही कायम आहेत आणि दिले जात आहेत. मग पंतप्रधानांनी माफी का मागावी? भारताची पाकिस्तानी कलाकारां विषयी भुमिका तीच आहे जी आधी होती. झालय असं कि सर्जिकल स्ट्राईक ह्या मुद्द्यावर प्रत्येक राजकिय पक्षाने आपापली पोळी भाजून घ्यायचा चंग बांधला आहे. मग विरोधकांनी वाट्टेल ती विधाने केली. आणि मनसे, शिवसेनेने आपला जुना अजेंडा उकरून काढला! मुंबई व्यतिरिक्त इतर देशात पाकिस्तानी कलाकारांना कोणी मज्जाव केला नव्हता. पण ह्या विषयावर सगळ्या देशातले लोक लगेच एकत्र होतील हे लक्षात घेऊन आणि इतर राज्यांतील फिल्म इंडस्ट्री मधे वाव कमी असल्यामुळे पाकि कलाकार आपणहून परत गेले.
३. सोशल मिडीया आणि न्युज चॅनेल ह्यांनापण सतत काहीतरी पेटलेले हवेच असते. त्यामूळे दिसेल त्याला ह्या विषयावर बोलतं केलं आणि नुसती भांडणं सुरु झाली!
४. करण जोहर इ. मंडळी पाकिस्तानी कलाकारांनी घेऊन चित्रपट काढतात कारण त्यांचे चित्रपट तिकडे आणि परदेशातही मग जोरात चालतात. सगळा पैसे मिळवण्याचा खेळ आहे. त्याला बाकि काहीही पडलं नाहिये. आणि एक सिनेमा नाही झाला प्रदर्शित तर करण जोहर आणि बाकि भारतीय कलाकार रस्त्यावर येणार नाहियेत. त्यांनी त्यांचे करोडो आधीच घेऊन झालेत. चार सहा महिने थांबून हाच चित्रपट प्रदर्शित करतील ते आणि तिकिटाचे दर वाढवून पैसे तुमच्या आमच्या खिशातूनच काढतील.. नाहीतर एखाद्या चॅनेल ला विकून पैसे मिळवतील. तेव्हा करण जोहरचं नुकसान नक्कि होणार नाही. आता हे सगळं अनुराग कश्यप ला कळत नाही असं नाही पण तरिही तो बडबडला. आता त्याला किती सिरियसली घ्यायचं ते आपण ठरवायचं.

सध्या पाकिस्तान विरुद्ध वातावरण आहे हे मान्य तसेच ह्यवेळी लोक भावनेचा आदर राखन्यास हरकत नाही, परंतु ह्या आदी तयार झालेले सिनेमे प्रदर्शित होऊन दिले पाहिजेत ज्यांना पाहायचं नाही ते नाहीत जाणार. मुळात पाकिस्तानी आर्मी आणि दहशतवादी यांच्यापासून पाकिस्तानी सामान्य लोक, व्यापारी आणि व्यवसायिक यांना अलग केलं पाहिजे. घनघोर 4 युद्ध करून सुद्धा दोन्ही देशांना चर्चा करावी लागली होती हि कोणत्याही सरकारची दुर्बलता नव्हती तर अपरिहर्ता होती. अजून हा पाकिस्तान विरोधी राग ओसरला कि चर्चा होईलच. पाकिस्तान ला carrot and stick policy वापरली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मुळात क्रिटिकल वेळ आली की पाकिस्तान च्या कलाकारांवर बहिष्कार किंवा चिनी वस्तूवर बहिष्कार ह्यातून शॉर्ट टर्म ध्येय ( जर काही असली तर) साध्य होतील पण लॉंग टर्म काही होणार नाही. असो मोदी नि पाकिस्तान दिलेली भेट चर्चेच आमंत्रण योग्यच होत आणि ते भविष्यात सुद्धा असे करू शकतील.
तसेच कपिल शर्मा किंवा अनुराग कश्यप यांनी थेट मोदींना प्रश्न विचारून जबाबदार ठरवणे चुकीचं आहे असे म्हणेन.

चौकट राजा सहमत आहे.
@ अनुराग कश्यप आणि ट्वीट - तर त्याबद्दल धाग्यातही मी म्हटलेय की मी त्याच्याशी ना सहमत आहे ना विरोधात. तसेच हा धागा काढायलाही त्याचे ट्वीट जबाबदार नाही, तर त्यावरून आधीच डोक्यात आलेला धागा बाहेर आले ईतकेच. फार तर अनुराग ट्वीटला आणि कावळा बसला असे म्हणू शकतो.

तरीही एक मुद्दा ईतकाच आहे की अश्या बहिष्कारांच्या बाबतीत काही ठाम आणि ठोस निर्णय का घेतले जात नाहीत. जर बहिष्कार नाही टाकायचा तर नाही म्हणावे आणि यावर राजकीय पोळी भाजणार्‍यांना तंबी भरावी. जर बहिष्कार टाकायचा आहे तर तसे म्हणावे आणि मग त्याविरोधात कोणी टिवटिवण्याचा पर्यायच ठेवू नये.

बाकी करण जोहार मंडळी करोडो कमावून बसले आहेत हे खरे असले तरी एखाद्या गरीबाच्या पोटावर यात लाथ बसू शकते ज्याने ना करोडो कमावलेत ना पाकिस्तानी कलाकारांना या चित्रपटात घेण्याच्या निर्णयात त्याचा सहभाग असवा, मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्या न होण्यावर वा चालण्या न चालण्यावर ज्याचे दोन पैसे सुटणार असतील. अर्थात हा मुद्दा काही मला उचलून धरायचा नाहीये, बस्स करण जोहारच्या पैसे कमावण्याच्या मुद्द्याला प्रत्युत्तर म्हणून लिहिलेय. एखाद्याचे चार पैसे बुडणे ही फार छोटी किंमत आहे. मात्र या किंवा अश्या कोणत्याही वादामुळे देशातील एकात्मकतेला धक्के बसणे हे परवडण्यासारखे नाही.

..............बहिष्कार ह्यातून शॉर्ट टर्म ध्येय ( जर काही असली तर) साध्य होतील पण लॉंग टर्म काही होणार नाही.

बरोबर आहे.
पण काय आहे की सध्या क्रिकेटमधे बोलण्यासारखे काही नाही, तेंव्हा काहीतरी उकरून काढून उगीचच आपआपसात वाद घालायचे. इथे हो की नाही काही ठरले तरी जे होणार आहे त्याच्यात काहीहि फरक पडणार नाही. करणारे करतात, इथे नुसतीच बकबक.

तुमच्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत. या सिनेमा धन्द्यातल्या लोकानी लोकाना कसे करमवायचे याकडे लक्ष द्यावे व राजकारणात लक्ष घालु नये. याना देशविषयी किम्वा कलेविषयी फार प्रेम नसते फक्त पैशावर हे प्रेम करतात. तेम्व्हा हे लोक काय बोलतात याकडे लक्ष न घालणे बरे.

देश, कला, पैसा आणि प्रेम अशी परस्परांना कमी अधिक छेदणारी वर्तुळं काढून वेन आकृती काढा कोणी तरी.
आणि आजच्या जमान्याप्रमाणे १० प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही या स्केलवर कुठे आहात ते आजमावून घ्या असली टेस्ट चालू करा. टेस्टच्या आजूबाजूला अ‍ॅडसेन्स टाकायला विसरू नका.

पाकिस्तानी कलाकार त्यांचे काम पूर्ण करून पैसे घेऊन गेले.नुकसान इथल्या निर्माता वितरकांचं होणार.>>> Bharat I think Johar & Co is well aware of the risk of signing pak actors. This ban etc. is not happening first time. Only difference is single screen cinema owners in 4 states are not showing films featuring pak actors. There is no need to synthesize with these producers.

But this China ban is useless as our traders has bought Chinese goods 3/4 months back and now they have to suffer losses. Next time China will sell these products with Made in India tags :-). All major private power plants uses Chinese machinery (Indiabulls, Lanco etc.) so Bhakts should find out and not use that electricity also.

पाकीस्तानी कलाकारांचा दुटप्पीपणा हे अजून एक कारण आहे त्यांना विरोध करण्याचे.

पेशावरच्या दुर्दैवी हल्ल्यानंतर फवादखानला दु:खाचे उमाळे आले होते.. अतीफ अस्लमने अजून १० कलाकारांना सोबत घेऊन एक गाणे रेकॉर्ड केले श्रद्धांजली म्हणून .. नंतर हाच इसम भारतीय मिडिया समोर अश्रू ढाळत हे गाणे आपण किती जड अंतःकरणाने रेकॉर्ड केले याचे गोडवे गात होता.. अमेरीकेतल्या दुर्दैवी हल्ल्यांनंतर मिहीराखानला पण दु:खाचे कढ आले होते..

पठाणकोट, उरी हल्ल्यांनंतर मात्र या सर्वांची एकदम दातखिळी बसली.. अहो दु:खाचे कढ जाऊदे केवळ "निषेध" हा एक शब्द देखील त्यांना उच्चारावासा वाटला नाही.. जेंव्हा हि मंडळी माझ्याच देशात सुखाने राहून पैसा कमावतात, तेंव्हा माझेच सैनिक देशाच्या सीमेवर प्राण तळहातावर घेऊन आमच्याबरोबर त्यांचे पण रक्षण करत असतात.. त्यांच्या बलीदानाची यांना काहीच किंमत नाही का? तेंव्हा यांना आपण प्रथम पाकीस्तानी आहोत मग कलाकर याची जाणीव होते.. स्वतःच्याच देशातल्या मूलतत्ववाद्यांना घाबरून यांची दातखिळ बसते.. स्वतःच्या देशात सुरक्षित परतल्यावर मग त्यांना वाचा फुटते आणि मग एखादा फवाद खान माजोरी विधान करतो की त्याला पैसा आणि प्रसिद्धीसाठी बॉलीवूड्च्या कुबड्यांची गरज नाही.. तरी सल्लूमिया आणि मंडळी त्यांची तळी उचलतात हे दुर्दैव!

गृहमंत्री राजनाथ सिंग
We hate Pakistan-sponsored terrorism and not Pakistan or its people.

< फवाद खान माजोरी विधान करतो की त्याला पैसा आणि प्रसिद्धीसाठी बॉलीवूड्च्या कुबड्यांची गरज नाही.> फवाद खानने असे कोणतेही विधान केल्याचा इन्कार केला आहे.
"I've received numerous requests from the media and from well wishers worldwide asking me for my thoughts on the sad incidents+ that took place in the past few weeks. As a father of two little children, I pray and wish like many others that together we can build and live in a more peaceful world. I believe we owe it to our children who will shape our tomorrow.

This is the first time I have spoken on the matter. Please disregard any other words attributed to me during this time because I have not said them. I thank all my fans and fellow artists from Pakistan, India and people in general all over the world who have shown continued support for their belief in love and understanding to unite a divisive world." "

अनुराग कश्यपची या सर्व वादावरील फेसबुक पोस्ट

It's unfortunate that I have to explain my intention behind my tweet, because others and my industry colleagues have to suffer for me having an opinion.. here it is

"I am tired of the film industry being soft targets. We are damned if we do, damned if we don’t! When we don’t involve ourselves, they ask “why is Bollywood quiet now?” When we involve ourselves, we become the scapegoats to distract you from the real news. Either way they use us to sensationalise news. Still, I’d rather put my opinions out there on my own platform, than give the media a bite. NO, Anurag Kashyap did not “ask the PM to apologise”( which most of the headlines would want you to believe, no one has their mind anyways) ,I merely questioned the fairness in judgement of a situation: the PM visited Pakistan for talks at the same time that a filmmaker was working with a Pakistani actor. Neither was aware of future events or mood. Yet only one pays the price. I’m also well aware that the government did not cry “BAN" or demand that Pakistani artists be sent back. Just as I’m aware that the PM himself doesn’t censor my films. But we elected them and so it is their responsibility to protect us from bullies - media or political parties. And when the governing party's designated members don't respond in hours of crisis because they are second guessing the mood of the PM then I would rather talk straight to the PM himself. There was also sarcasm in the tweet that followed; ‘Bharat Mata Ki Jai’ was for those mindless trollers who constantly ask for proof of your patriotism. Apparently thats all it takes. It was a jibe at them. Patriotic slogans don’t absolve you from it all. I hope this explains .. "

>>NO, Anurag Kashyap did not “ask the PM to apologise”<<

अरे ये आदमी है या पजामा?..

हिज ट्विट क्लियरली सेज - "@narendramodi Sir you haven't yet said sorry for your trip to meet the Pakistani PM.. It was dec 25th. Same time KJo was shooting ADHM? Why?"

'व्हाय', ॲट द एंड पुट्स एंफसीस आॅन ए अपाॅलजी; इझंट दॅट आॅब्वियस?..

Pages