Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फालतु झाली मालिका...
फालतु झाली मालिका... सुरवातीलाच बरी वाटली.. आता पाहवत नाहि... नुसती कट अन कारस्थान... अन सगळी बुळी पात्र..
सारखं काहीतरी धक्कादायक
सारखं काहीतरी धक्कादायक दाखवणं मस्ट आहे का मालिकांमधे ? फोकस मधे २-३ पात्र आणि बाकीचे एकतर अनभिज्ञ किंवा ढिम्म! कैच्या कै !
काल गौरी साडी घालुन कशी चालत होती!!! सीता और गीता मधल्या एकीची आठवण झाली...
काल दोन तासाच्या एपिसोडात
काल दोन तासाच्या एपिसोडात काय दाखवलं?
कालचे लग्नाचे कपडेपट गौरी
कालचे लग्नाचे कपडेपट गौरी सोडून बाकीच्यांचे एवढे खास न्हवते तिच्या सासूचे ठीक ठीक बाकी दागिने सुद्धा सुमार स्पेसिली आजीच्या गळ्यातली ठुशी जुनी रंग उडालेली होती. आणि त्या शु गो बाईंचे ते काळे डोरले नाही आवडले शिवाय त्यांचे ते लांब हात असलेले ब्लाउज. सगळेच सुमार.
दक्षिणा | 10 October, 2016 -
दक्षिणा | 10 October, 2016 - 15:27
काल दोन तासाच्या एपिसोडात काय दाखवलं? अ ओ, आता काय करायचं
>>>>>>>>>>> कट आणि कारस्थान
अम्माच्या साड्या एकदम मस्तच
अम्माच्या साड्या एकदम मस्तच असतात..खास बनारसी...
शुगो च्या साड्या ब्लाऊज नेहमीच ऑर्डिनरी असतात. निशा च्या ठीक होत्या. निशा इतकी पाताळयंत्री का दाखवलीए...? आणि तिची आई!! असहनीय आहे !
पण समहाउ मला काल अम्माचा मुद्दा पटला.....लेक सून जवळ रहावेत असं तिला वाटलं तर काय बिघडलं? मोजोंना वाटलं तर ते ठीक...असं का?
तिची आई!! असहनीय आहे
तिची आई!! असहनीय आहे !>>>>>>>>>> स ह म त ....
मोजो तर गौरी पुढच्या गल्लीत
मोजो तर गौरी पुढच्या गल्लीत रहायला जाणार कळलं तरी चिंतेत होते.. सगळ्याचा अतिरेक..
मोजो येवढ्या वेळा म्हणत होते की गौरी तर काय इथेच राहणार की असं वाटतच होते की तिला बनारसला पाठवणार.. त्या शिवाय काहे दिया पर्देस कसं होईल?
आणि शिव्च्या नोकरीच काय? ५ वर्षाचा बाँड होता ना
खरतर खरा शिव जो आधी दाखवला होता ...त्यानुसार ,,, तो आत्ता या क्षणी वेगळा वागला असता.. पण उगाच टर्न ट्विस्ट आणण्यासाठी पात्रांचा स्वभावच बदलुन टाकतात
शिव मूर्ख आहे का? ते वचन बिचन
शिव मूर्ख आहे का? ते वचन बिचन जे काही आहे.. त्याविषयी त्याने आधी गौरीला सांगायला नको का?
आय मीन मोजो काय म्हणतील.. त्यांना काय वाटेल वगैरे नंतर.. आधी ज्या मुलीला गृहीत धरून वचन देऊन टाकलंय.. ज्या मुलीला अॅक्चुली तिथे राहावे लागणार आहे तिला आधी सांगुन तिची कंसेंट कोण घेणार?
शेवटी असे होईल कि गौरीच्या चेहेर्यावरचा आनंद बघून + पुन्हा एकदा होणारे लग्न मोडून नाचक्की नको म्हणून + शुगोची विनंती म्हणून मोजो या लग्नाला होकार देईल. मग लग्न होत असतांना गौरीला सोडून सगळ्यांना माहित असेल कि आपल्याला लग्नानंतर बनारसलाच राहावे लागणार आहे. मग लग्न झाल्यावर तिला कळल्यावर ती मोजोला.. "तुम्हाला हे माहित असूनही तुम्ही हे लग्न का थांबवलं नाहीत" असा जाब विचारत तिच्या भेसूर आवाजात "काहे दिया परदेस" हे गाणे म्हणेल.
बादवे लग्न मुंबईत होऊनपण मोजोंकडचे इतके लिमिटेड नातेवाईक कसे?
ते मागच्या वेळेला गौरीचं विकिशी लग्न मोडल्यावर फोन करकरून कळवलं होतं ते नातेवाईक कुठे गेले? आणि शुगोला त्या घरी थांबलेल्या बबन्या का कोण भाऊ सोडून कोणीच नाही का?
मीतूला लग्नाच्या निमित्ताने जरा बरा मेकप केल्याने मला ती सुरुवातीला ओळखुच आली नाही. अम्माच्या गळ्यातला तो हार चीप दिसत होता. त्यामाने निशा काल छान दिसत होती. तिच्या गळ्यात थोडेसेच दागिने असले तरी मला आवडली ती काल दिसण्यात. तिच्या मंगळसुत्राखालोखाल फुलाचं पेंडंट होतं ते खुप छान आणि नाजुक दिसत होतं. शिवची वहीनी नको इतकी बारीक वाटते आणि पर्पल कलरच्या साडीत भंपक दिसत होती. तिच्या आयब्रोज गरजेपेक्षा जास्त बारीक झाल्यात हेमावैम. शिवची बहीण सो-सोच दिसते. आणि तिच्या दातातल्या फटीकडेच जास्त लक्ष जातं दरवेळी. शिवची आत्या छान आहे दिसायला त्यामानाने. शिवाय काय तो नाच गाण्याचा प्रोग्राम चालू होता बायकांचा (दिदी तेरा देवर दिवाना टाईप) तो उगाच ओढून ताणून केल्यासारखा वाटत होता.
ते शिवची अम्मा शुगोला ते गाण्यातून शिव्या द्यायला का सांगते? अशी काही पद्धत आहे का तिकडे?
http://www.india-forums.com/f
http://www.india-forums.com/forum_posts.asp?TID=4591927
हे पाहिलेत का? मायबोलीप्रमाणेच इथेही 'काहे दिया परदेस'वर चर्चा चालू आहे. १५१ पाने भरून. शिवाय इथल्याप्रमाणे भाग १ भाग २ सुद्धा आहे. खाली स्क्रोल केले तर 'नांदा सौख्य भरे' चा थ्रेड दिसतोय.
अम्मा स्वता बनारसि साड्या
अम्मा स्वता बनारसि साड्या वापरते तर सुनेला अश्या साद्या साड्या का वापरु देते?
घरातल लग्न असुन सुद्धा सरला
घरातल लग्न असुन सुद्धा सरला बहु येवद्या बेकार साडि तहोति
एकंदरीत लो बजेट शादी ....त्या
एकंदरीत लो बजेट शादी ....त्या अक्कासाहेबांच्या अंगावर रोजचे दागिने जेवढे असतात तेवढे मिळून साऱ्या का हें दी प च्या कलाकार स्त्रियांच्या अंगावर काल पाहायला मिळाले. फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात.
मला नेहमी त्या शिव च्या
मला नेहमी त्या शिव च्या आत्याच्या नवर्याच्या हातातली बॅग काढून घेऊन कुठेतरी ठेऊन द्यायची इच्छा होते. काय पण पात्र दाखवतात.....! कैच्या कैच !!
पण समहाउ मला काल अम्माचा
पण समहाउ मला काल अम्माचा मुद्दा पटला.....लेक सून जवळ रहावेत असं तिला वाटलं तर काय बिघडलं? मोजोंना वाटलं तर ते ठीक...असं का?>>> मलाही. मोजो जरा जास्तच over protective, over possessive दाखवले आहेत गौरीविषयी. गौरीलासुद्दा मोजोच्या च्या स्वभावाविषयी काहीच objection नाही. असे कसे? आपली मुलगी आपल्याजवळच राहावी हा अट्टाहास म्हणजे कैच्या कैच. जगातला कुठलाही बाप ईतका over possessive नसतो.
आणि शिव्च्या नोकरीच काय? ५
आणि शिव्च्या नोकरीच काय? ५ वर्षाचा बाँड होता ना>>> शिवच्या घरचे त्याच्या boss ला manage करतात, तेव्हा ते त्याला शिवचा राजीनामा स्वीकारायला भाग पाडतील.
मग लग्न होत असतांना गौरीला सोडून सगळ्यांना माहित असेल कि आपल्याला लग्नानंतर बनारसलाच राहावे लागणार आहे.>>> म्हणजे, शिव-गौरीबरोबर आणखी कोण राहणार आहेत बनारसला?
"तुम्हाला हे माहित असूनही तुम्ही हे लग्न का थांबवलं नाहीत" असा जाब विचारत तिच्या भेसूर आवाजात "काहे दिया परदेस" हे गाणे म्हणे:>>>>
मूर्ख पणाचा कळस झालीय ही
मूर्ख पणाचा कळस झालीय ही मालिका म्हणजे. एकतर मालिकेचं लेखन करणारा भांबावलाय किंवा ही लोकं प्रेक्षकांना येडं समजतायत...........
तो ठोंब्या शिव काल त्या हॉटेल मध्ये लहान मुलासारखा सावंतांना शोधत भिर भिर भिरभिरताना दाखवलाय एवढा वेळ ...
बरं , सावंत सोडून सगळे भेटतात याला .
मग जर कुठे ते दिसत नाही तर सतरा जणांना विचारण्याच्या ऐवजी या माठ्याला त्यांना मोबाईल वर फोन करायचं सुचत नाही .
एवढा महत्वाचा निर्णय त्याला गौरी ला पण सांगावासा वाटू नये ?
का ती जोडी शोभावी म्हणून आता शिव लाच मख्ख आणि निर्बुद्ध करून ठेवलेय ?
शिवची सगळी अक्कल फक्त गौरी
शिवची सगळी अक्कल फक्त गौरी आणि वेणूसमोरच चालते. आता बनारसला हम्मा गौरीचा छळ करेल तेव्हा तो काय करेल? त्याला चुकून काही करावंसं वाटलं, तर गौरी आशा काळे होऊन त्याला अडवणार.
अख्ख्या लग्नात फक्त आजींनी गायलेली गाणी एवढीच धमाल होती.
होणार सून पासून लग्न म्हणजे कारस्थानांना ऊत असंच समीकरण करून ठेवलंय.
<< तर गौरी आशा काळे होऊन
<< तर गौरी आशा काळे होऊन त्याला अडवणार. >> आशा काळेच कां ? कुबल मॅडम कां नाहींत ?
अम्माचे असेच सुरु राहिले तर
अम्माचे असेच सुरु राहिले तर गौरीचे काही खरे नाही .. गौरीला सांगावेसे कोणालाही वाटले नाही ना शिव ला ना सावंतांना !
कुठल्या युगातली आहे हि सीरिअल ?
मी (मुद्दाम) मिस केला
मी (मुद्दाम) मिस केला २तासांचा एपिसोड! :p
Double post!
Double post!
कुबल म्याडमचे सिनेमे पाहिलेले
कुबल म्याडमचे सिनेमे पाहिलेले नाहीत. म्हणून आशा काळे.
ज्याना जे हवे ते घ्या.
बरं निशाने घर विकलेय तर ती कुठे राहणार? की तेच घर भाड्याने घेणार?
सावंत वेणूकडे जाणार का, की जान्हवीच्या माहेरासारखे तुटूफुटू आलेल्या एखाद्या घरात जाणार?
धादांत खोटेपणा हा Zee च्या
धादांत खोटेपणा हा Zee च्या सगळ्या मालिकांचा मूळ गाभा आहे...आणि असं असूनही याच मालीका TRP खेचतात... पथेटिक आहे सगळं! आणि मेलोड्रामही भरपूर.. 1 पात्र संपूर्ण चांगलं तर दुसरं टोकाचं वाईट , अधेमधे काही नाहीच..खऱ्या आयुष्यात असं कधी असतं का?
लोकांना काय समजतात हे मालिकावाले????
<< लोकांना काय समजतात हे
<< लोकांना काय समजतात हे मालिकावाले???? >> 'लोकां'ची नाडीपरिक्षा त्यानाच अधिक चांगली आहे, हें कडू सत्य नाकारण्यात अर्थ नाहीं !
का ती जोडी शोभावी म्हणून आता
का ती जोडी शोभावी म्हणून आता शिव लाच मख्ख आणि निर्बुद्ध करून ठेवलेय ?..हे बेस्ट!
आता ती कुठली कुलदेवीची पूजा आहे ती म्हणे शिव ने एकट्यानेच करायची ! बरं...त्यात इतकं दचकण्या सारखं आणि भांबावण्या सारखं काय्ये ? एकट्याने तर एकट्याने......
शिवने एकट्याने करायची कआरण
शिवने एकट्याने करायची कआरण गौरी जातीबाहेरची म्हणून तिने देवघरात पाय ठेवायचा नाही. लैलाचाचीशीपण असंच केलं होतं. आता शिवने एकट्याने पूजेला हो म्हटलं की सावंतांच़ भाकीत खरं ठरायला सुरुवात होणार.
लैला चाची... सावंतांचं काय
लैला चाची...
सावंतांचं काय भाकीत?
हम्मा नकळत दादीला
हम्मा नकळत दादीला भडकवतेय.
गवरीच्या विदाईच्या वेळेला सुद्धा तिच्या चेहर्या वर एक पण भाव नव्हता
मख्खाडी :रागः
राधिका शनाया ला सतत शन्या
राधिका शनाया ला सतत शन्या शन्या असेच म्हणते..
एवढी का बावळट दाखवली आहे राधिका ला??:राग::राग:
Pages