काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथानकाला सनसनाटी बनवण्यासाठी शिवचा स्वभावच बदलला आहे जवळ जवळ..
आधीचा म्रुदु पण कॉन्फिडंट आता काही वेगळाच वाटत आहे.... आधी बरच बोलायचा.. आता डायलॉग पण कमी आहेत त्याचे..
गौरी ला आधीही डिफाईंड पात्र नव्हत आता ही नाही..म्हणजे गौरीबाबत डायरेक्टर्ने पण काहितरी ठरवल असेल तरी गौरीला समजल नसणार..
म्ह्ण्जे शिवशी उठसुट भांडणारी मुंबईची मुलगी.. की काळाच्या खुप्प्प्प मागे असलेली मुलगी.. कि शिवकडे बघुन पदर धरुन लाजणारी मुलगी..आखिर वो है कोन?

आधी ही बरेचदा अशा मालिकांमधुन पात्रांचा स्वभाव कथानकात पाणी घालण्यासाठी बदललेले आहेत

हो ना! आधी ही गवरी किती उद्दधट पणे शिवशी वागा बोलायची!
सतत त्याचा पाण उतारा करायची.. का तर तो मराठी बोलायचा नाही व परप्रांतीय होता! अन आता?
एकवेळ शिव विसरला असेल पण आम्ही नाही!

हुश्श. एकदाचं शिवकुमार शुक्लनी तोंड उचकटलं.

काही मालिकांमध्ये प्रेम त्रिकण असतो. इथे hate triangle आहे. हम्मा मालिकेतलं दुष्ट पात्र असल्याबे, दादी हम्माचा पदोपदी अपमान करत असलेला पाहून मजा वाटली तरी ते सगळं किती रिग्रेसिव्ह आहे! सासूकडून असा अपमान होत असल्यावर तिने तरी आपल्या सुनेशी वेगळं का वागावं? आणि आई आपल्या बायकोला घालूनपाडून बोलत असताना बाबूजी प्रत्येक वेळी तोंड लपवून हसणार.
या लोकांना तिथे काही कामधंदे नाहीत. मुंबईत निदान ऑफिस तरी होतं. तर सगळे दिवसभर हेच करत बसणार.

पण अम्मा दुष्ट वागते म्हणुन दादी तिच्याशी तसं बोलते ना..
शिव आता साड्यांच्या दुकानात बसणार का? इकडचा जॉब सोडुन..

शिव आता साड्यांच्या दुकानात बसणार >>>>>>>अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र Uhoh

हे लग्न म्हणजे लुज-लुज सिचुअशन झालीय....सावंतांसाठी, शुक्लं साठी, आणि शिव-गौरी साठी सुद्धा...
विन-विन कुणासाठीच नाही...

सोडुन दिली बघायची हि मालिका.. >> मी पण....कधीच सोडून दिली बघायची....आता इथे येउन कमेंट्स वाचते फक्त...झी मराठी च बघणं सोडलं....

दागिने खोटे आहेत ते कळणार आज..
बॅक टु स्क्वेअर वन..
फारच बोअर.. माझ्या सहनअशक्तीची परिक्षा घेत आहे मीच

मला तर एक कळत नाही की लोक इतके अंधविश्वासू कस काय असु शकतात. त्या मीतूला कळलं एका नजरेत की दागिने खोटे आहेत आणि तिने ते बोलुन पण दाखवल तरीही सावंतांना आणि गौरीला (जिला निशाचा पुर्वातिहास माहिती आहे) एकदाची क्रॉस व्हेरिफाय करावस वाटल नाही.
त्या आज्जींना पण बोलता आलं नाही की माझ्या इतक्या मोठ्या (वजनाने) दागिन्यात तू दोन नेकलेस करणार तर बाकीच सोन, त्याची पावती, मोडीची पावती कुठाय म्हणुन??
निदान आमच्यात तरी असली मोठमोठे व्यवहार असे डोळे झाकुन करत नाहित.

असो गौराक्का पुरती युपीवाली झालिये. स्वत:चा असा काही कणाच नाही तिला, समोरचा म्हणेल तर ही मुलगी वाकणार स्वतःला बदलणार. श्या असली बुजगावणी स्वतः तर मुर्ख असतातच पण समोरच्यातला देखिल कॉन्फिडंस काढुन घेतात.

हो ना......आज्जी मोठ्या खमक्या दाखवल्या आहेत निशाच्या बाबतीत.... मग आत्ताच का नाही विचारलं की बाकीचं सोनं कुठेय ते! काहीही..... आणि शुगो ला जायला काय झालं नेकलेस टाकायला...?

गौरी तर पूरी बनारसी झाली...डोक्यावरुन पदर, नाकात चमकी, बिंदी, गळा भर ते कुंदेन चे खोटे नेकलेस!

चुकिचा संदेश जातो बर्याचदा,,,
असच मरत मरत रडत खडत.. इच्छा मारत रहायच असा सल्ला दिल्यासारखा वाटतो..

शिव इतक्या लवकर मुंबईच बस्तान गुंडाळुन इथे कसा काय सेटल झाला..

काहितरी जॉबच्या कमिटमेंट आहेत की नाही..
आमच्या इथे ३ महिने आधी नोटिस द्यावी लागते जॉब सोडण्या आधी..

असो गौराक्का पुरती युपीवाली झालिये. स्वत:चा असा काही कणाच नाही तिला, समोरचा म्हणेल तर ही मुलगी वाकणार स्वतःला बदलणार. श्या असली बुजगावणी स्वतः तर मुर्ख असतातच पण समोरच्यातला देखिल कॉन्फिडंस काढुन घेतात.>>> गवरी अशीच आहे की पहिल्यापासुन. तिला कधी स्वतःची मतं होती Uhoh बाबा काही बोलले की हा नंदीबैल बुगुबुगु करायचा Proud तिला फक्त शिवच्या अंगावर डाफरता यायच. बाकी तिला कणा कधीच नव्हता नाहीतर एवढ १० लाख कर्ज काढून लग्न केल नसत Angry

काहितरी जॉबच्या कमिटमेंट आहेत की नाही.. हाच प्रश्न मलाही पडला होता.. त्याच्या नोकरी बद्द्ल काहीच दाखवल नाही.लग्न दाख्वायच होत तर बाकी सगळ्या मुद्द्यांना बगल दिली. घाई घाईत गुंडाळ्लं लग्न.
गौरी बनारस ला रहाणार हे तर तिला स्वतः ला माहित नव्ह्तं.. काहीही......

एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना खटकत नाहीये का? गवरी एवढी लाडकी, जीव की प्राण लेक. आणि तिला लग्नानंतर अशी एकटीलाच जाउ दिली? तेही बनारसला? कोणाही एका दिवसासाठी / एका रात्रीसाठी पण सोबत जाउ नये?

असं त्या उमीचं पण दाखवलं होत.

खरंच आहे नताशा..... तिला काहीच मतं नाहीत स्वतःची...आणि काल शिव ला मनवल्या नंतर अचानक,... " मग ? मी मुंबईची मुलगी आहे...अशा तशाने घाबरुन जाणार नाही..." या अर्थाचं काहीतरी कंबरेवर हात ठेवत, मान उंचावून नाकात म्हणाली...ते किती बेकार व कृत्रीम वाटलं...ते प्रेक्षकच जाणे...! तिला काय कळणार असे असंबद्ध सीन्स व मठ्ठ चेहेरे पहाण्याने येणारं दारुण नैराश्य !! बरं हा 'मुंबईची मुलगी' काय प्रकार आहे? उगाचंच काही तरी टर्म काढायची!
Sad

काहितरी जॉबच्या कमिटमेंट आहेत की नाही..>>>
अगोदर गवरीला नव्हत्या . उठसुठ कधीही घरी परतायची .
फक्त अक्शतला म्हणालेली , मला असा सारखासारखा हाफडे घेता यणार नाही म्हणून .

आता शिवचाही ऑफिसच्या नावाने आनंद .

एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना खटकत नाहीये का? गवरी एवढी लाडकी, जीव की प्राण लेक. आणि तिला लग्नानंतर अशी एकटीलाच जाउ दिली? तेही बनारसला? कोणाही एका दिवसासाठी / एका रात्रीसाठी पण सोबत जाउ नये? >>> हो मलाही जाणवल ते.

असं त्या उमीचं पण दाखवलं होत.>>> तिची गोष्ट थोडी वेगळी होती. पुण्याजवळ होती आणि ती स्वतः भरपुर स्ट्राँग होती.

" मग ? मी मुंबईची मुलगी आहे...अशा तशाने घाबरुन जाणार नाही..." या अर्थाचं काहीतरी कंबरेवर हात ठेवून नाकात म्हणाली...ते किती बेकार व कृत्रीम वाटलं...ते प्रेक्षकच जाणे
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हा भाग तर अगदी बावळट..गौरी लहान मुलं नाटकात अभिनय करतात तसा करत होती..हसायलाच आलं

ती उर्मी मस्त होती पण.
हो ना स्मिता मला पण खटकलं ते की अस कस एक्टीलाच बनारसला पाठवल त्यांनी तिला आणि तेही जेंव्हा त्यांना कळ्ळ की ती कायमचीच तिकडे राहंणार आहे तेंव्हा. अश्यावेळी तर किती काय काय बोलायच असेल तिच्या घरातल्यांना तिच्याशी.

हो नताशा अगदीच कणाहीन कॅरॅक्टर दाखवलय त्या गवरीच.

Pages