रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजयचं रक्त आणि केस काढून घेतले होते?? (ड्रॅक्युला इन कोकण???)>>> आता काय तर म्हणे 'विश्वासरावच्या बदललेल्या रुपाने नाईक मंडळी थक्क'. विश्वासराव रुप बदलणार? आता तो Dracula होणार आहे >>> बघा, मी म्हटल नव्हत? Lol

सूलू_८२ Happy एव्हढा बुटका ड्रॅक्यूला? लानत है. बिचारा ख्रिस्तोफर ली कबरीत वैतागला असेल.

काल तो पोलिस घरातल्या बायकांची चौकशी पण करायला हवी म्हणतो तेव्हा विश्वासराव त्याल विचारतो की लेडी कॉन्स्टेबल्स आणल्या आहेत का? पण सुषमाची मात्र चौकशी करतो. सुषमा बाई नाहिये का?

दत्ताला त्याने विचारलं की खून झालेल्या रात्री कुठे गेला होतास. तेच सुषमाला पण विचारलं. म्हणजे एक तर हा घरात बसून किंवा पोलिस घराबाहेरून नाईकांवर लक्ष ठेवून होते. जे बाहेर पडले ते कुठे गेले हेही त्यांना माहित असणार. मग त्यांना का विचारतोय? गणेशला अजयच्या खुनाबद्दल विचारण्याचं काय कारण? त्याचा छायावर जीव आहे. मग तो अजयला का मारेल? का ह्याच्याकडे काही पुरावा नाहिये आणि म्हणून थयथयाट करतोय?

बाकी काल त्याला घड्याळ भिरकावून देताना आणि गणेशला मारताना स्लो मोशन मध्ये दाखवत होते ते पाहून मला आधी वाटलं की टीव्ही किंवा टेलिकास्ट मध्ये काहीतरी टेक्निकल लोचा आहे Happy रणजित विश्वासरावचा 'रजनीकांत विश्वासराव' करायचाय की काय. येन्ना रास्कला....माईंड इट.

<< गणेशला अजयच्या खुनाबद्दल विचारण्याचं काय कारण? >> ' या नाईकाक तुम्ही ओळखूंक नाय ', असां सुसल्या विश्वासाक सांगता तेंव्हां तो म्हणता ' त्या घरात राहून तिथल्या प्रत्येकाची कुंडली मी मांडलेली आहे '. मी आधीं म्हटलंय तसां, प्रत्येकाक खूनाच्या आरोपाची भिती दाखवून नाईकाक 'सरळ' करण्याचो त्येचो इचार असतलो [ बरेच नाईक ही मात्रा लागू पडान तशे लाईनीवर येतहतच ]. गणेशच्याय डोक्यातलां जादूटोण्याचां भूतय तो असांच उतरवूंक बघताहा, असां माकां वाटता.
[ अर्थात , कोणाक काय वाटता ह्येचां सिरीयलवाल्यांक काय पडलेलां नाय; त्येंका काय वाटात, तांच दे दाखवतले आणि आपण बसतलंव कपाळार हात मारत ! Wink ]

सुषमा बाई नाहिये का?>>>>सुसल्या टॉमबॉय आहे अशी विश्वासरावची कल्पना असावी. आणी तशीही ती मन मानेल तसे उठसुठ कुठेही भटकत असते त्यामुळे येता-जाता तिनेच अजयला ढगात पाठवले का अशी शंका त्याला पिसाळत असेल.:फिदी: काल नाथाची अ‍ॅक्टिंग मस्त होती, निदान खरी वाटली. भुयारातली मागली भूते त्याच्या मानगुटीवर बसुन ताथैय्या करत असल्याने तो घाबरला होता.

गणेशला अजयच्या खुनाबद्दल विचारण्याचं काय कारण? त्याचा छायावर जीव आहे. मग तो अजयला का मारेल? का ह्याच्याकडे काही पुरावा नाहिये आणि म्हणून थयथयाट करतोय?>>>>> स्वप्ना, वशीकरण हा प्रकार विचीत्र आहे. छायाला अजयशीच लग्न करायचे आहे हे गणेशला माहीत असते. पण जेव्हा सुषमासाठी अजय स्थळ म्हणून आला होता, तेव्हा छायाला ती भीती वाटुन ती गणेशला बोलली होती की अजय छायाला नाकारेल. त्यावरुन तिचे अजयशी वाद पण झाले होते, आणी ते माधवने पाहीले होते. वशीकरणात एखाद्या व्यक्तीचे केस वगैरे काढुन घेतात. ( अशी या लोकांची अंधश्रद्धाच आहे) म्हणजे त्या केसांवर काही जादू प्रयोग केले तर ती व्यक्ती ताब्यात राहील असे गणेशला बहुतेक त्याच्या त्या वाकडमान्या गुरुने सांगीतले असेल म्हणून गणेशने अजयचे केस व रक्त घेतले असा विश्वासरावला संशय आहे. म्हणून त्याने गणेशला धोपटले असेल.

<< सिरीयलवाल्यांक ... वाटात, तांच दे दाखवतले आणि आपण बसतलंव कपाळार हात मारत ! >>

क्रिकेट मालिकेपेक्षां असल्या मालिकेचो धंदो खूप बरो; 'खेळ चाले....' म्हणायचां
आणि लोकांक उलट्ये-सुलट्ये गुगली टाकत बसायचां !!
coach.JPG

<< पांडु खयं गेलो? >> तो लेखक आसा ह्यां लोकांक कळलां, ह्यां त्येकां कळलां; आतां मार पडतलो म्हणान दडान बसलोहा ! Wink

आमच्या शेजार्‍यांचा मुलगा ५ वर्षाचा आहे, तो कशालाच घाबरत नाही म्हणून शेवटी त्याच्या आई वडिलांनी त्याला अण्णांची भिती घातलीय. पण परवा तो अण्णा इले, अण्णा इले म्हणून उड्या मारत होता. आता बहुतेक विश्वासरावची भिती घालावी लागणार आहे.:फिदी:

>>आमच्या शेजार्‍यांचा मुलगा ५ वर्षाचा आहे, तो कशालाच घाबरत नाही

ससुराल सिमरका दाखवून बघा म्हणावं एकदा Proud

मी पण हेच लिहायला आले होते की पांडूची चौकशी राहिली आहे. एकदम गायबच झालाय. सायंटिस्ट बाई अजयच्या खुनानंतर टरकल्या होत्या. आता पुन्हा माधवने भानामतीचा विषय काढला की त्याला झापणं, रात्री फिरायला बाहेर जाऊ या म्हणणं चालू झालंय. विश्वासराव होता तेव्हा भानामतीचे प्रकार बंद झाले होते ते त्याला घाबरून असा अर्थ कसा काढला ह्या लोकांनी? सुषल्या रात्री लिपस्टिक का लावत होता? देविकाच्या टिकलीची काय भानगड आहे?

त्या गणेशाचे केस कापा रे कोणीतरी. अगदी बघवत नाहिये. दत्ता नुसता 'छायाक सावरुक होया' म्हणत बसतो पण ती जेवली का नाही ह्याची कोणालाच पडली नाहिये. ती माई पण 'अवो,अवो' करत त्या अण्णाला शोधत बसलेय.

पांडूने 'द हॉन्टींग' चा एपिसोड बघितलेला दिसतोय डिस्कव्हरी चॅनेलवर. भिंतीवर रक्ताचे ओहळ ही कल्पना तिथली आहे. ह्यात सायंटिस्ट बाई किंवा पूर्वाचा हात असू शकतो.

<< देविकाच्या टिकलीची काय भानगड आहे? >> भानगड बिनगड काय नाय. ' ज्येंकां कुंकू आसा त्येंका त्येची काळजी नाय आणि ज्येंका तां नाय त्येंका त्येची मोठी हौस इलीहा', हो छायासाठीचो टोमणो सरिताच्या ताँडात घालूंचां पांडूक सुचलां, म्हणान हो उपदव्याप !

<< ते तर रक्ताचे ओघळ होते.>> अगदीं खरां.
[ हो दोष पांडूच्या लिखाणाचो नाय. आर्चिस आसा इंग्रजी माध्यमात शिकलेलो; त्येकां मराठी शब्दा- शब्दातलो इतको बारकावो कसो समाजतलो ! Wink ]

पांडूची चौकशी कशी नाही झाली? सुषल्या बोलते तेव्हा तिथे ऐकत उभं रहायचं नाईकांना काही कंपल्शन आहे का? तिला तुझी आई धुतल्या तांदळासारखी नव्हती, आपल्या करणीने ती मेली असं हे लोक कधी सांगणार? चोराच्या उलट्या बोंबा किती दिवस ऐकणार?

मला एक विचारायचं होतं - नेने जेव्हा अजयला सुषल्याकडे घेऊन येतात तेव्हा ते त्याला म्हणतात की तुमच्या वाडीत शेवंता होती तिला ओळखत होतास ना? तिची ही मुलगी. तेव्हा अजय शेवंताला पाहिलं होतं असं सांगतो. पण सुषल्या लहान असताना शेवंता गेली. मग अजयने तिला कसं पाहिलं? त्याने थाप मारली तरी अजय तेव्हा गावात रहात नव्हता हे नेन्यांना कसं माहित नाही?

काल नाथाने घाबरल्याची अ‍ॅक्टींग चांगली केली.
आता माईंचा नंबर लागणार का?

>>काल अर्चिस माधवंना विचारत होता कि भिंतीवर रक्ताचे शिंतोडे कसे काय?

लाल रंगाचा द्र्व म्हणजे रक्त? निदान सायंटिस्ट बाईंनी तरी हे मानायला नको होतं.

हो की. स्वप्ना, तुझ्या लक्षात बर राहीलं.:स्मित: ती सुसल्या कायम भयाण चेहेरा करुन वावरत असते. हसली तर उपरोधाने हसते आहे असे वाटते. पुढच्या भागात ( बहुतेक उद्या असेल तो भाग) माई डोळे अर्धवट उघडे ठेऊन झोपलेल्या दाखवल्यात. आजच्या भागात माई, देविकालाच शेवंता समजून ओरडतात.

आता माईंचा नंबर लागणार का?>>> माईचा पत्ता कट होणारे असे दिसते.

कालच्या भागात गणेशाला हळद लागली>>> काय? कधी आहे लग्न्? मुलगी कोण आहे?

कालच्या भागात गणेशाला हळद लागली>>> काय? कधी आहे लग्न्? मुलगी कोण आहे?>>>>>>दत्ताने झोडपला ना. म्हणुन सरीताने हळद लावली Proud

पांडूक लय घाई लागलीहा हळद लावन घेंवची. त्येकांय गणेशाक लागली तशीच हळद लागतली बहुतेक !.[ आणि अनुत्तरीत प्रश्नांचीं उत्तरां सिरीयलच्या शेवटापर्यंत नाय मिळाली तर लेखक पांडूकय ! Wink ]

Pages