Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या बीबीवर 'नायकांच्या घरात
ह्या बीबीवर 'नायकांच्या घरात कोंबड्या नाय' हे वाक्य मागे वाचलं होतं. त्याचा काय संदर्भ? काल माधव विश्वासरावची वाट बघत बाहेर उभा असतो तेव्हा त्याच्यामागून एक कोंबडी पळाली. म्हणून म्हटलं विचारावं.
देविकाने आणून दिलेला चहाचा कप निलिमा खोलीत येईतो गायब झाला होता. बहुतेक अण्णांनी कपाटातून येऊन चहा पळवला असेल. माई सुध्दा काल 'रक्ताचे डाग' च म्हणाल्या. बरं झालं, देविकाला माईंकडून 'प्रसाद' मिळाला. भारी घाई होती लग्न होऊन यायची. मला असं वाटतं की नाईकांच्या घरात देविका यायच्या आधी जे होत होतं ते तिची आई करत होती म्हणून तिला त्याची भीती वाटत नाही असं म्हणायची. पण आता तिला माहित आहे की हे आपली आई करत नाहिये म्हणून टरकलेय तिची.
काल निलिमा म्हणते की विश्वासराव इथे होता ते बरं होतं. माई अंगारा घेतात की नाही ह्याच्यावर त्याचं लक्ष असायचं. हे त्याचं काम आहे का? तुझा बैलोबा नवरा काय करतो मग?
सिरियल परत घोटाळायला लागलेय.
<< तेव्हा त्याच्यामागून एक
<< तेव्हा त्याच्यामागून एक कोंबडी पळाली. म्हणून म्हटलं विचारावं.>> मिलीटरी दक्ष असानय पाकिस्तानातून अतिरेकी येतत, मग शेजारच्या घरातली कोंबडीं इली नाईकांच्या खळ्यात तर आश्चर्य कसलां !
[ नाईकांच्या घरांतल्या मालवणी जेवणात कोंबडी, मटणच नाय तर मासे पण कधीं दिसणत नाय, ह्यां मात्र जाम खटकता !]
<< पण आता तिला माहित आहे की हे आपली आई करत नाहिये म्हणून टरकलेय तिची.>> अभिरामाची आयती जागा आसाच पुण्यात, ह्यां आतां कळल्यार तिकां थंय जांवक एक निमित्त गावलां, असांय असात कदाचित !
<< तुझा बैलोबा नवरा काय करतो मग? >> ऐकलास नाय ? तो विशासरावाक सांगता, ' मीं पण स्वतःला एकदां लावला होता तो अंगारा ' ; बहुतेक, आत्तांच पोळ्याचो सण झालो ना , तेंव्हा तो अंगारो लावन मिरवलो असतलो गांवभर !!
बहुतेक, आत्तांच पोळ्याचो सण
बहुतेक, आत्तांच पोळ्याचो सण झालो ना , तेंव्हा तो अंगारो लावन मिरवलो असतलो गांवभर !!>>>
पान्डु म्हणल्या प्रमाणे थेरडी
पान्डु म्हणल्या प्रमाणे थेरडी गेलि
ata anakhi kiti complications honar konas thauk. ata kadachit aaishi aivaji aplyalach yed lagnaar ase disate.
आतां अनुत्तरीत प्रश्नांचां
आतां अनुत्तरीत प्रश्नांचां परत पेंव फुटाक लागलां.-
भिंतीवरचां तां खरांच रक्त आसा काय, ह्यां सकाळीं बघूंचां ठरलेलां; तां सगळे इसारले ? ;
विश्वासराव छायाक सांगता,' अजयच्या खून्याक गांवांत फरफटत नेईन' ; अरे, पण नेनेच्या खून्याक तीन आठवड्यात पकडतलयच, म्हणान त्येंच्या बायलेकय सांगलेलस त्येचां काय झालां ?
माईच्या आधीच्या अवतारान घाबरलेल्या देवकीक निलीमा माईंक अंगारो देवक सांगता. ती तयार होणां नाय. निलीमा तिकां समजावता, ' अग आपण सगळ्यानीच धीर धरून ह्या गोष्टी करायला हव्या'.. मग बये, तुकांच जावून तो अंगारो देवक काय झालां ?
हंय असले प्रश्न इचारत रवा कारण सिरीयलवाले नक्की हो धागो वाचतत; काल मीं म्हटलंय << नाईकांच्या घरांतल्या मालवणी जेवणात कोंबडी, मटणच नाय तर मासे पण कधीं दिसणत नाय, ह्यां मात्र जाम खटकता !>> तर कालच्याच भागात सरिताच्या तोंडात विश्वासरावासाठी ह्यां वाक्य टाकल्यानीच ' जेवनच जावा. तिसर्यो केलंय आणि जवळो पण आसा ' !!!,
भाऊ काका अग आपण सगळ्यानीच
भाऊ काका
अग आपण सगळ्यानीच धीर धरून ह्या गोष्टी करायला हव्या'.. मग बये, तुकांच जावून तो अंगारो देवक काय झालां ?>>>>अगदी हाच विचार आलेला.
हो न जेवल्यानंतर सगळ्यांना
हो न जेवल्यानंतर सगळ्यांना बडीशेप पुरवता येते मग त्याच वेळेत माईला अंगारा द्यायचा ना तिने.. कुठल्याच कामाची दाखवली नाहि..
तर कालच्याच भागात सरिताच्या
तर कालच्याच भागात सरिताच्या तोंडात विश्वासरावासाठी ह्यां वाक्य टाकल्यानीच ' जेवनच जावा. तिसर्यो केलंय आणि जवळो पण आसा ' !!!,>>>हो पण यमुना जेव्हा जेवण घेऊन जाते तेव्हा ती डाळ आणि कसली तरी भाजी वाढताना दिसतेयं..
<< तेव्हा ती डाळ आणि कसली तरी
<< तेव्हा ती डाळ आणि कसली तरी भाजी वाढताना दिसतेयं..>> तसो नाईकांच्या बोलण्यात आणि करण्यात कधीं ताळमेळ असता काय ? पण नाईकांच्या घरांत निदान तोंडान तरी सरितान माशांचीं नांवा घेतल्यान ह्यांय खूप झालां !
पान्डु म्हणल्या प्रमाणे थेरडी
पान्डु म्हणल्या प्रमाणे थेरडी गेलि>>> काय माई गेल्या? पण कश्या?
तर कालच्याच भागात सरिताच्या तोंडात विश्वासरावासाठी ह्यां वाक्य टाकल्यानीच ' जेवनच जावा. तिसर्यो केलंय आणि जवळो पण आसा ' !!!,>>>हो पण यमुना जेव्हा जेवण घेऊन जाते तेव्हा ती डाळ आणि कसली तरी भाजी वाढताना दिसतेयं..>>>> म्हणजे विश्वासरावचा पोपट झाला म्हणायचा.:फिदी:
म्हणजे विश्वासरावचा पोपट झाला
म्हणजे विश्वासरावचा पोपट झाला म्हणायचा.>>>तो जेवायला थांबलाच नाही ना
आजचो भाग - चला, आतां नेने आणि
आजचो भाग -
चला, आतां नेने आणि अजयचो खूनी रवतलो बाजूक . विश्वासरावाचां ह्या वाक्य ऐकूंक परवां तयार रवा- ' माईंच्या खून्याला दोन आठवड्यात पकडीन, हा शब्द आहे माझा !'
पेशंटची तिरडी बांधूंक घेतल्यावरच बोलावण्याच्या लायकीचो डॉक्टर मात्र बरो शोभून दिसता नाईकांच्या गांवांत !!!
माईंना काही होणार नाही पण
माईंना काही होणार नाही पण ह्याने खूनी घरातीलच आहे ह्यावर शीक्कामोर्तब होईल.
माईंची अवस्था बघून खरे तर
माईंची अवस्था बघून खरे तर मुलांनी तातडीने नजीकच्या दवाखान्यात न्यायला हवे होते.
हायला! माईंना काय झालं???
हायला! माईंना काय झालं???
त्यांच्यावर विषप्रयोग झालाय.
त्यांच्यावर विषप्रयोग झालाय.
<< माईंना काय झालं??? >>
<< माईंना काय झालं??? >> निपचित पडलीहा आणि तोंडात्सून फेंस येताहा. तो गांवठी डाक्टर म्हणता, ' आतां खूप उशीर झालो '.. फायनल मरणाचो निकाल मात्र अजून येवक नाय.
]]
[ नाईकांक बहुतेक माणसां बिछान्यातय मरतत, ह्यां ठावकच नसतलां. त्येनी फक्त कापून नायतर जाळून गाडणां, झाडावर लटकवणां असलेच मरणाच्ये प्रकार ऐकले, बघले असतले. त्यामुळे हादरलेत बिचारे !
सगळ्यांचा निदान आसा , अंगार्यातून माईंक विष दिलां गेलां. त्यामुळे, आतां घरातले सगळे आणि विश्वासराव देखील संशयित झालेत.
दत्ताची नेहमींची अॅक्टींग आणि डायलॉग - डोळ्यांत खून चढवून , शीरो ताणून , ' ह्यां ज्येना केलाय, त्येकां मीं सोडूंचय नाय; जीव घेईन त्येचो '.[ अशावेळीं विश्वासरावची एंट्री दाखवूक होई होती; दत्ताच्या वाघाचां एकदम मांजर झालेलां बघूंक मजा इली असती ]
ह्या सिरीयलींत बर्यापैकीं मालवणी बोलतत त्येंचीच ताँडा बंद कित्याक करतहत ? छाया आणि आतां माई !
माधव हा अत्यंत यूसलेस माणूस
माधव हा अत्यंत यूसलेस माणूस आहे हे माहित असतानाही काल निलिमा मदतीच्या अपेक्षेने त्याच्याकडे का पहात होती? यूपीएससीची परिक्षा दिलेला अभिराम मती कुंठित होऊन का उभा होता? बाहेर चारचाकी गाडी उभी असताना माईला तालुक्याला न्यायला उशीर होईल म्हणून इतका वेळ हे घरात का थांबले? विश्वासरावकडून अंगारा पूर्वाने घेतला असताना तो माईच्या खोलीत कसा आला हा प्रश्न तिला आणि दत्ताला कोणी का विचारला नाही? निदान विश्वासरावला कोणी फोन का नाही केला? छायाक सावरुक होया असं सारखं म्हणणार्या लोकांनी वर तिच्या खोलीत जेवायला न बसता एखाद्या परक्यासारखं तिच्या खोलीत ताट वाढून का ठेवलं?
ह्या प्रश्नाची उत्तरं माहित असून दिली नाहीत तर ३ मुंडक्याच्या बाईच्या तिन्ही डोक्यांची शकलं होऊन पांडूच्या पायावर लोळण घेतील.
माईला विषबाधा झाली आहे का फिट
माईला विषबाधा झाली आहे का फिट आली आहे? ह्यात पूर्वा, सुषल्या, पांडू किंवा छाया ह्यांचा हात असू शकतो. मी छाया म्हटलं कारण दु:खाच्या भरात छायाला असं वाटू शकतं की घरातल्या कोणीतरी अजयला मारलंय. विचार करायची शक्ती गमावून बसल्याने तिने हे केलं असण्याची शक्यता आहे. पूर्वाला आजीने आईला दागिने न दिल्याचा राग असू शकतो.
आणखी काही शक्यता:
१. विश्वासरावला ह्या केसमधून बाजूला करायला त्याच्यावर हत्येचा आळ आणायचा प्रयत्न
२. देविकाच्या आईने तिला दिलेल्या पुडीतली पूड माईच्या अंगार्यात कोणीतरी मिक्स केली. नाईकांचे प्रॉब्लेम्स वाढवायला.
काल अंधारात नाथाचे केस जास्तच
काल अंधारात नाथाचे केस जास्तच पांढरे दिसत होते का?
कालचा भाग आत्यंतिक कंटाळवाणा
कालचा भाग आत्यंतिक कंटाळवाणा होता. ५ मिनिटानंतर अक्षरशः बघू नये असे वाटले. मूर्खपणाचा कळस होता. एखाद्या चिरकुट नाट्यप्रशिक्षण शाळेतल्या शिकाऊ लेखक, दिग्दर्शकांनी सुद्धा चांगले प्रसंग आणि संवाद लिहिले असते.
<< कालचा भाग आत्यंतिक
<< कालचा भाग आत्यंतिक कंटाळवाणा होता. >> +१.सरिता हबरडो काय फोडता, दत्ता बदलो घेंवची भाषा काय बोलता, आणि त्येच्यातच डाक्टराचां फार्सिकल पात्र काय घुसडलेलां !!!
होय ! माईसारखो ह्यां औषध
होय ! माईसारखो ह्यां औषध घेतल्यार तुमच्याय तोंडातून फेंस येतलोच ;
पण तां बरे झाल्यार डाक्टराचां बिल बघून !
भाऊकाका
भाऊकाका
भाऊकाका मस्त व्यंगचित्र.
भाऊकाका मस्त व्यंगचित्र.
भाऊकाका
भाऊकाका
भाउकाका
भाउकाका
माझो टीव्ही पडलोहा आज बंद.
माझो टीव्ही पडलोहा आज बंद. उद्यां होयत रेपेअर. तेंव्हां त्या माईक जरा सांगा, एक दिवस दम काढ; मीं उद्यां इलंय कीं बघूंया तुझां पुढे काय व्हायचां असात तां. आणि त्या विश्वासरावाक जरा नाईकांच्या घरांत पोलीस बंदिबस्तय ठेवंक सांगा; कपाटातल्या दागिन्यांवरसून थंय मोठो राडो होण्याची दाट शक्यता आसा [आणि आजचो रिपोर्टय द्येवा कोणीतरी माकां ]
hi serial smpty...24 oct
hi serial smpty...24 oct pasun new serial..
२४ पासून 100 days चालू होतेय.
२४ पासून 100 days चालू होतेय. आदिनाथ कोठारे इन्स्पेक्टर आहे बहुतेक आणि तेजस्विनी पंडित आहे. आदिनाथ आहे की आदिसारखा दिसणारा ते मी confused. तो असेल तर कोठारे विजनची असेल कदाचित. सस्पेन्स वाटतेय हि पण.
एकंदरीत आमच्या D 3 ला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आता आशा सोडायला हवी तिची
.
Pages