रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल अजयची डेड बॉडी नाईकांना दाखवायला विश्वासरावने नकार दिला. बहुतेक अजय मेलेला नाहिये. कदाचित त्याला झाडाला लटकावलं हे खरं असावं. पण तो वाचला असावा. खुन्याला 'तू जिंकलास' असं दाखवून द्यायचं असेल.>>>>>+1

<< बहुतेक अजय मेलेला नाहिये. >> माकांय आतां तसांच वाटता; पण माझां कारण मात्र जरा येगळां आसा - छायाबद्दलचां नाईकांचां प्रेम अचानक ऊतूं जाताना आणि तिकां नटवलेली दाखवूंक तीन-चार एपिसोड वापरल्यानी; आतां जर अजयाकच खरांच मारलां तर लोक आपणांकच झाडावर टांगतीत ही भिती असतलीच ना सिरीयलवाल्यांक !!

भाऊ Happy

काल विश्वास म्हणतो की "मी इथे यायच्या आधी घरात काय चाललंय, कोण करतंय हे अजयला माहित होतं. पुढे नेन्यांचा खून झाला." पण नेन्यांचा खून व्हायच्या आधी नाईकांच्या घरात काय चाललं होतं त्यात पोलिसांना का इंटरेस्ट होता? ती त्यांची वैयक्तिक बाब होती. का जमिनीचा हा सौदा पूर्वीपासून चालला होता आणि त्यासाठी अण्णांचा खून झाला? पण त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही, खून आहे अशी तक्रार कोणीच केली नाही. मग पोलिसांना तसा संशय येण्याचं काय कारण? खरं तर अण्णा कसे गेले ते कधी सांगितलंच नाहिये. का अण्णा स्मगलिंग करत होते (भुयार!) म्हणून पोलिसांचं त्यांच्यावर लक्ष होतं? किंवा त्यांनी केलेल्या अनेक खुनांसाठी त्यांना पकडायला पोलिस पुरावे गोळा करत होते?

दुसरं असं की अजयने आपला कोणावर संशय आहे हे विश्वासरावला सांगितलंच नसेल हे संभवत नाही. आपल्या वरिष्ठांना एकदम काम पूर्ण झाल्यावरच कोणी फीडबॅक देत नाही तर मधूनमधूनसुध्दा द्यावा लागतो. तेव्हा विश्वासरावला हे सर्व कोण करतंय हे माहित आहे. पण पुरावे हातात नाहीत म्हणुन तो बोलत नाहिये. आता आपण गेलो असं गुन्हेगाराला वाटून तो/ती अधिक बोल्डली हल्ला करेल आणि आपण त्याला/तिला रंगेहाथ पकडू असा प्लान असावा. कारण दुसर्‍या कोणालाही तपास हॅन्डओव्हर न करता तो असा जाऊ शकत नाही. एकतर ह्या सगळ्यात नाईक घराण्यातलं कोणीतरी गुंतलं असावं नाहीतर कोणीतरी त्यांच्या वाड्यावर लक्ष ठेवून आहे. अजय जिवंत असल्याची गोष्ट म्हणून लपवून ठेवली आहे. आणि त्याची डेड बॉडी छायालासुध्दा दाखवली गेली नाही.

बाकी त्या भुयारातल्या सांगाड्याविषयी तो काहीतरी सांगणार होता त्याचं काय झालं? जायच्या आधी काहीच बोलला नाही. अजयला अगदी लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत पुरावे गोळा करायला का पाठवलं? तसं होतं तर लग्न एखादा आठवडा पुढे ढकलायला तो नाई़कांना नक्कीच सांगू शकत होता.

अभिरामकडे नोकरी नसताना त्याने पुण्यात फ्लॅट कसा घेतला? अण्णा गेल्यावर घेतला का आधी? आपल्या वाट्याची जमिन आधीच विकून टाकली आहे का? कारण त्याने फ्लॅटबद्दल घरी का सांगितलं नाही त्याचं दिलेलं स्पष्टीकरण विश्वासरावला पटलं नव्हतं. अण्णा जायच्या आधी त्याने फ्लॅट घेतला असेल तर त्याला मृत्यूपत्रात काय आहे ते माहित होतं असा अर्थ होतो. कदाचित नेनेंनी ते त्याला दाखवून जतिनशेठला ती जमिन विकून पैसे घ्यायचा सल्ला दिलेला असू शकतो. मग अण्णांच्या मृत्यूत अभिरामचा हात असू शकतो.

मुंबईतलं घर फोडलं गेलं ह्यावरून निलिमा 'हे सगळं काम माणसांचं आहे, भुतांचं नाही' असं म्हणेल असं मला वाटलं होतं. प्रत्य्क्षात तसं म्हणाला तो माधव. हेही नवलच.

<< ." पण नेन्यांचा खून व्हायच्या आधी नाईकांच्या घरात काय चाललं होतं त्यात पोलिसांना का इंटरेस्ट होता?>> स्वप्ना-राज, आतां सिरीयसली -
अजय- छाया प्रकरण हें विश्वासराव नाईकांकडे येण्यापूर्वीपासूनचं आहे [ छाया चांगल्या साड्या नेसून लपून छपून फिरताना आधींपासूनच दाखवली आहे] . याचाच अर्थ विश्वासरावाकडे [ व पर्यायाने अजयकडे ] या गांवातील संशयास्पद गोष्टीचा शोध घेण्याचं काम नेनेंच्या खूनाआधीपासूनच होतं. सांपडलेले सांगाडे बहुधा स्थानिक लोकांचेच असणार व त्यांचे नातेवाईक शोधासाठी पोलीसांच्या मागे अर्थातच तगादा लावतच असणार. अण्णा, रघूकाका व नेने हें कारस्थानी त्रिकूट यामागे असणार हाही संशय त्यानी पोलीसांकडे व्यक्त केला असणारच. अण्णांच्या घरावर पाळत ठेवतानाच अजयचा छायाशीं संबंध आला असणार हेंही उघडच आहे.
विश्वासरावला खूनी कोण आहे हें निश्चितपणे माहीत आहे कारण शेतांत त्याला भेटलेल्या पोलीसाना त्याने ' नाईकांच्या घरातलं लग्न पार पडलं कीं लगेचच त्याला अटक करूं ', असं सांगितलं होतं. जरी पूर्ण पुरावा हातीं येवू शकला नसला, तरीही 'पोलीस कस्टडी'ची तरतूद वापरून चौकशीसाठी विश्वासराव त्या संशयिताला अटक करूं शकला असताच. यावरून एक गोष्ट निश्चित कीं अजयवर झालेला हल्ला [त्यांत तो खरंच मारला गेला कीं नाही, हा मुद्दा वेगळा] विश्वासरावला अनपेक्षित होता. आतां प्रश्न असा आहे कीं जर लग्न पार पडतांच त्या संशयिताला पोलिस अटक करणार होते तर ते सतत त्याच्या पाळतीवर असणारच; मग, तो अजयवर प्राणघातक हल्ला कसा करूं शकला ? म्हणजेच, खूनी म्हणून ज्याच्यावर पोलीसांचा निश्चित संशय होता , तो तरी चूकीचा निघाला असावा किंवा नेनेंचा खूनी व अजयचा हल्लेखोर हे वेगवेगळे असावेत.
बघूं आतां सिरीयलवाले तिसरंच कांहीं दाखवतात का तें !

भाऊ एकदम बरोबर. स्वप्ना तुझ्या शंका पण खर्‍या आहेत. खरे तर अनेक त्रुटी असुनही ही सिरीयल लोकांना पसंत पडलीय. खरच, एखादा भाग पाहीला नाही असे होत नाही. पण मागच्या कुठल्याही शंकांची उत्तरे न देता हे लोक पुढे पळतायत. आता संशयाची सुई बहुतेक पांडु / सुसल्या / जतिन सेठ किंवा नाथावर येऊ शकते. तसे स्वप्नाने आधी उल्लेख केला आहेच. पण विश्वास रावने तिथुन निघायला नको होते. पाहीजे तर वरिष्ठाना भेटुन त्याने विनंती करुन तिथे ( नाईक वाड्यात ) परत यायला हवे. अजय जिवंत आहे की नाही याबद्दल मात्र शंका आहे. कारण एवढी तयारी झालेली असतांना विश्वासराव या लोकांची अशी गंमत करेल असे नाही मला वाटत. पण तो जिवंत असेल तर मला खरच खूप आनंद होईल, कारण कशीही असली तरी मला ही सिरीयल खूप आवडते.

भाऊ....पटतंय.

>>पण विश्वास रावने तिथुन निघायला नको होते. पाहीजे तर वरिष्ठाना भेटुन त्याने विनंती करुन तिथे ( नाईक वाड्यात ) परत यायला हवे.

अग तो तिथून निघाल्याचं नुसतं दाखवतोय असं मला वाटतं. त्याच्याकडून सूत्रं काढून घेतली असती तरी त्याला माघारी न बोलावता नव्या माणसाला असिस्ट करायला ठेवलं असतं. कारण आत्तापर्यंत ही केस तोच हॅन्डल करत होता. हॅन्डओव्हर न देता असं कोणाला कसं जाऊ देतील?

>>कारण एवढी तयारी झालेली असतांना विश्वासराव या लोकांची अशी गंमत करेल असे नाही मला वाटत.

तो म्हणतो ना की माझ्या कर्तव्याआड मी कोणालाच येऊ देणार नाही. अजयवर खरंच हल्ला झाला असावा. पण तो वाचला असं सांगितलं तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. म्हणुन त्याने असं केलं असावं. पण भाऊ म्हणतात तसं त्याच्यावर नजर ठेवायला कोणीच कसं नव्हतं? अजयवरचा हल्ला विश्वासरावला अनपेक्षित कसा तेही मला कळलं नाही. ही रिस्क तर असणारच. आणि अजयने छायाला जपून रहा म्हटलं तेव्हा आपल्या जीवालाही धोका आहे हे त्याला ठाऊक असणार आणि त्याने तसं विश्वासरावला सांगितलं असणार. विश्वासरावकडे आतापावेतो थोडेही पुरावे जमा झालेले नसावेत हेही आश्चर्यच. आणि त्याने पुरावे मिळेतो लग्न पुढे ढकललं नाही हेही आश्चर्यच. विश्वासरावचा रिस्क मॅनेजमेंट प्लान गंडलेला दिसतोय जबरदस्त Proud

छायाक मात्र सुसाईड वॉच वर ठेवूक होया नाहीतर जायची विहिरीच्या तळाशी.

आणखी एक....अजयची डेड बॉडी नाईकांना दाखवता येणार नाही म्हणुन तो पोलिस होता हे विश्वासरावला नाईकांना सांगावं लागलं बहुतेक. नाहीतर त्यांनी ती बॉडी आमच्याकडे द्या असा धोशा लावला असता.

माझा संशय अजूनही पांडूवर आहे. कदाचित छायाच्या पहिल्या नवर्‍याचा काटाही त्यानेच काढला असेल.
दत्ताने अण्णांचा खून केला असावा अशीही शंका मला येते कारण अण्णा दिसतात म्हटल्यावर त्याच्या चेहेर्‍यावर भीतीसोबत एक अपराधी भाव येतो.
अभिरामने पुण्यातला फ्लॅट कधी घेतला हे नीट स्पष्ट झालेलं नाहिये. पण त्याला नोकरी नाही तेव्हा वाट्याची जमिन विकून तो घेतला असणार. अण्णा जायच्या आधी घेतला असेल तर त्याला मृत्यूपत्राबद्दल आधी माहिती होती असा अर्थ निघतो आणि अण्णा आणि नेनेंच्या खुनात त्याचा हात असू शकतो. पण फ्लॅट नंतर घेतला असेल तर नेने जमिनीचा व्यवहार पुरा होऊ देत नाहीत म्हणून त्याने त्यांचा खून केला असू शकतो. त्याचं लग्न त्या दिवशी होतं म्हणून त्याला स्ट्राँग alibi होती. तो पुन्हापुन्हा तालुक्याला जमिनीचे कागदपत्र घ्यायला जात होता तेव्हा त्याने फ्लॅटचं/मारेकरी नेमायचं काम मार्गी लावलं असेल.
निलिमा घरातल्या लोकांना घाबरवून त्यांनी जमिनी येईल त्या किंमतीला विकून टाकाव्यात म्हणून शेवंता अंगात आल्याची अ‍ॅ़क्टींग करत होती.

आजचो एपिसोड -
छायाक अजयची शीळ ऐकांक इली म्हणान ती त्येकां हांक मारत उठली आणि तिकां अजय दिसलो. आतां तिकां खरांच तो दिसलो कीं आधी माईन तिकां जवळ घेवन तिच्या डोक्यावरसून हात फिरवलेल्यान म्हणान माईक अण्णा दिसतत तसोच हो प्रकार होतो, ह्यां देवाक ठावक नाय तर पांडूक !!
सुसल्यान सरळ सरळ नाथावर अजयच्या खूनाचो आरोप केल्यान आणि पांडून ' विश्वासरावाक खूनी ठावक आसा', असां सांगान नाथाक घाबरवल्यान.
थोडक्यांत, आजचो एपिसोड कथानक त्याच जागेवर घुटमळत ठेंवकच वापरलो गेलो !

<<कारण कशीही असली तरी मला ही सिरीयल खूप आवडते.>> मला पण . नेहमीच्या त्याच त्याचच सासू सुनांची दळण . त्या पेक्षा खूप वेगळी हटके म्हणून . तसा त्रुटी असतील हि . पण त्या कुठल्या मालिकेत नसतात? आपण सगळ्यांची माप काढतोच ना. Happy
आता मालिके बद्धल घरात प्रत्येक जण आपापल्या फायद्यानुसार वागतोय . निलीमाला जमीन विकायची म्हणून/ दत्या ला स्वतःच्या वाट्याला आलेली जमीन पसंत नाही म्हणून/ सुसल्याने तिच्या आईचे दागिने मिळावेत म्हणून/ नाथाची बायको सारखी त्याच्या पाठी पडते हात मारा म्हणून ( बायकोच्या कट कटी ला वैतागून आणि अण्णाना मदत केली असल्याने अनुभवी ) किव्वा नानाच जिवंत असतील आणि त्यांनी केला असेल Happy

हायला, त्या यमेने काल छायाच्या खोलीच्या दारात तरी झोपायचं. छायावर लक्ष ठेवायला झोपल्या होत्या ना दोघी. ही दार उघडून गेली तरी डाराडूर झोपलेल्या. बाकी छायाची हाक घरात जवळजवळ सगळ्यांना ऐकू गेली म्हणायची. तरी बरंय काल नाना परत 'कुठे चाललीस, तिथे जाऊ नकोस' असं म्हणत बिछान्यावर कवायत करताना नाही दाखवले.

'छायाला सावरायला हवं' असं म्हणत जो तो भाऊ आपल्या कुटुंबात गप्पा मारत बसला. एक माईच काय ती तिच्याबरोबर होती.

पांडोबाचंच नाव अजयने सांगितलं असेल विश्वासरावला. ह्याने आपली पुडी सोडून दिली. महाडँबिस हाय ते बेनं.

आता काय तर म्हणे 'विश्वासरावच्या बदललेल्या रुपाने नाईक मंडळी थक्क'. चालू द्यात दळण. मालिका संपवताना किमान खुनी कोण ते सांगा म्हणजे झालं.

काल मला अजयची शीळ ऐकून आधी संशय आला की छायाने जास्त काळजी करू नये किंवा जीवाचं बरंवाईट करून घेऊ नये म्हणून तो जिवंत असल्याचं पटवून देऊन तिला घेऊन जायला आलाय. मग वाटलं त्यच्यासारखी शीळ वाजवून कोणीतरी तिला पळवून नेणार. नाईकांची आणखी टरकणार. पण नंतर दत्ता गुरवाशी नीट बोलताना दाखवलाय म्हणजे छाया जागेवर असणार. मग तिला भास झाला का?

'विश्वासरावच्या बदललेल्या रुपाने नाईक मंडळी थक्क>>> विश्वासराव रुप बदलणार? आता तो Dracula होणार आहे का ब्रहमरा़क्षस का शेवन्ता? Lol

<<कारण कशीही असली तरी मला ही सिरीयल खूप आवडते.>> मला पण . नेहमीच्या त्याच त्याचच सासू सुनांची दळण . त्या पेक्षा खूप वेगळी हटके म्हणून . तसा त्रुटी असतील हि . पण त्या कुठल्या मालिकेत नसतात? >>>>>+१००० Happy

सस्मित बरोबर आहे तुमचं . सॉरी. पुढच्या भागात " यान अजयला झाडावर लटकावून आत्महत्या केली असं भासवलंय असं म्हणून विश्वास राव कोणाकडे बोट दाखवतो ? दत्याकडे का अभिरामाकडे?

सुजा, विश्वासरावने अभिरामचेच नाव घेतलयं. पण त्या साठी मोटिव्ह काय? अभिरामला काय गरज होती हे सर्व करण्याची? तसेही अजयला निलीमा आणी दत्ता बद्दल पण माहिती असेलच की. त्या मानाने ( परीक्षा आधीच देणे, फ्लॅट विकत घेतलाय हे लपवणे ) अभिरामला कोणी ब्लॅकमेल करण्याची शक्यता कमी होती. मग नक्की घडलयं काय?

१] नेनेंचो खूनी कोण, ह्यां पोलीसांक जवळ जवळ निश्चित माहित होतां आणि त्येकां अटक करूचाय ठरलेलां. मग तोच संशयित अजयचोय खूनी असलो किंवा नसलो तरी त्येकां प्रथम अटक करणां क्रमप्राप्त होतां;
२] नाईकांच्या घरातले जे कोणी संशयित असतीत त्येंकां पोलीस स्टेशनात बोलावून त्येंका 'पोलिसी खाक्या' दाखवणां समजण्यासारखां आसा; पण, त्येंच्या घरासमोरच एकेकाक भायेर बोलावून असलो तमाशो करणां खुळचटपणाच वाटता.

ह्यां पावसांचां धुमशान थांबव रे बाप्पा; नाय तर, कोकणात भिजत पडलेलां
खूनांच्या चौकशीचां घोंगडां सुकतलां तरी कसां आणि कधीं !!
balance_0.JPG

>>पुढच्या भागात " यान अजयला झाडावर लटकावून आत्महत्या केली असं भासवलंय असं म्हणून विश्वास राव कोणाकडे बोट दाखवतो ? दत्याकडे का अभिरामाकडे?

मलाही हा प्रश्न पडला. ह्याला म्हणतात 'लंडन लुकिंग टोकियो टॉकिंग' Happy

काल देविकाच्या आईची बरी जिरली. फार तारस्वरात बोंबलत असते. ती गेली म्हणून हुश्श करावं तर सरिता ओरडत होती. काय तो आवाज आणि पवित्रा. एखाद्या लेडी कॉन्स्टेबलला बोलावून तिच्या झिंज्या उपटायला हव्या होत्या पोलिसांनी. बघावं तेव्हा आपली गुरकावत असते. एकदा तिला कोणीतरी दणका द्यायला हवा. आणि दत्ता बायकोच्या पदरामागे लपला होता. खरं तर नाईकांनी वकिल करायला हवा होता. म्हणजे पोलिसांना अशी अरेरावी नसती करता आली. बाकी हे सगळं चाललंय आणि माधव, निलिमा, निदान माईने तरी बाहेर यायला हवं होतं नाही?

>>नाईकांच्या घरातले जे कोणी संशयित असतीत त्येंकां पोलीस स्टेशनात बोलावून त्येंका 'पोलिसी खाक्या' दाखवणां समजण्यासारखां आसा; पण, त्येंच्या घरासमोरच एकेकाक भायेर बोलावून असलो तमाशो करणां खुळचटपणाच वाटता

मला असं वाटतं की नाईकांना जे कोणी ह्यात अडकवायचा प्रयत्न करताहेत त्यांना आपण त्यात यशस्वी झालो असं वाटावं म्हणून हा तमाशा चालला असावा.

माधव, निलिमा, निदान माईने तरी बाहेर यायला हवं होतं नाही?>>>>माधव हा शेंदाड शिपाई आहे, निलीमाबाई सध्या घाबरल्यात, बावचळल्यात, हबकल्यात आणी माई लेकीच्या दु:खात गुंगुं करतायत. पण खरय, एवढे आवाज ऐकुन कुणीही पटकन बाहेर नाही आले. अगदी दत्ता, अभिराम आणी सरीता सुद्धा कॉन्स्टेबल् ने बोलावल्यावरच बाहेर आले.

एवढ्या हो -हल्ल्यात घरातले चडीचूप! हे काय पचनी पडेना. आणी अभिराम खूनी आहे हे पण पटत नाही. सरकारी दर्जाच्या परीक्षा देणार्‍या माणसाला एवढी पण अक्कल नाही हे पटतच नाही. त्या पांडुला आणी विश्वासरावला एकाच पोत्यात घालुन बदडा.

आजचा एपिसोड - एकच वाटतं कीं पोलीसाना खूनी कोण हें निश्चितपणे माहित असावं पण पोलीसांकडे असलेल्या पुराव्यांत कांही माहीतीची कमतरता किंवा कच्चे दुवे असावेत व ती माहिती/दुवे नाईक बंधूच [ ते खूनी नसूनही ] देवूं शकतील अशी त्यांची धारणा असावी. पण भिती दाखवल्याशिवाय ती माहिती बाहेर येणार नाही म्हणून त्या प्रत्येकालाच त्याच्यावरच खूनाचा दाट संशय आहे असा धाक विश्वासराव घालत असावा.
[ मालवणीतच सांगाचां तर, ' नाक दाबलां कीं त्वांड उघडता ' ही विश्वासरावाची चाल आसा बहुत्येक.]

<<मला असं वाटतं की नाईकांना जे कोणी ह्यात अडकवायचा प्रयत्न करताहेत त्यांना आपण त्यात यशस्वी झालो असं वाटावं म्हणून हा तमाशा चालला असावा.>> मला पण असाच वाटतंय . जो कोणी खरा खुनी असेल त्याला वाटेल चला नाईकांच्याच घरातलं कोणी तरी आहे असं पोलिसांना वाटतंय. बर झालं. आत्ता आपल्याकडे कोणी बघणार नाही . आणि मग गाफील राहून तो बरोबर काही तरी चूक करेल आणि सापडेल सगळ्यात शेवटी

दत्ता खुनाच्या रात्री घराबाहेर गेला होता? खाण तशी माती. बापाचाच कित्ता गिरवतोय वाटतं लेक. शेवंता २.० कोण आहे दाखवा तरी. हे असं असलं तर सरिताची रिअ‍ॅक्शन बघायला आवडेल. फार 'माझा घोव' म्हणून भांडत असते.

तो विश्वासरावचा दुसरा सहकारी स्वतःला एसीपी प्रद्युम्न समजतोय का? तसाच बोलायचा प्रयत्न करतोय. पोलिस माधव-निलिमाशी ठीक बोलले. दत्ता आणि अभिरामवर गुरकावत होते. निलिमाचा वकिल मित्र आहे म्हणून की काय.

आजच्या भागात निलीमा माधवला म्हणतांना दाखवलीय की घरातल्यांना संशय येण्यापेक्षा आपणच सगळं खरे काय ते सांगुया. म्हणजे ह्या अमर-अकबर-अँथनीनी जी काही लपवाछपवी केलीय तीच विश्वासरावला उघडकीला आणायची आहे. दत्ताने गुपचुप दुसरी जमीन घेतलीय, अभिरामने फ्लॅट घेतलाय, निलीमाताय ( मि. माधव) ने माधवची जमीन जतीन सेठला विकलीय. हे सर्व विश्वासराव इतरांसमोर आणु पहातोय. इतर म्हणजे माई-पूर्वा-सरीता-गणेश-छाया. अजून नाथा आणी यमुना यांची चौकशी राहिली आहेच की.

मला वाटतय ( म्हणजे आत्ता असे वाटतेय ) की अजयचा खून झालेला नाहीये, पण नेनेंचा मात्र झाला असल्याने आणी तो नाईकांनी केलेला नसल्याने खरा खूनी समोर यावा म्हणून हे नाटक चालले असावे.

मी कालचा एपिसोड संपल्यावर म्हणतच होते की गणेश, नाथा, पांडू आणि सुषल्या ह्यांची चौकशी नाही केली ते. प्रोमोमध्ये गणेशची चौकशी दाखवली आहे. 'सुषल्या' वेगळंच प्रकरण आहे म्हणे! आपला 'सॉफ्ट कॉर्नर' आहे हे सांगत नाही विश्वासराव.

अजयचं रक्त आणि केस काढून घेतले होते?? (ड्रॅक्युला इन कोकण???) गुरवाचं काम काय हे? आणि जतिनशेठ. मला आता नेनीणीचा पण संशय येतोय. नाईकांचं चांगलं होणार नाही म्हणाली होती ना ती.

माई छायाच्या खोलीत झोपल्या तेव्हा दागिने चोरायचा प्रयत्न नाही झाला? बाकी काल सरिताचं तोंड बंद झालं ते पाहून 'मोगँबो खुश हुआ' Happy अभिरामने पुण्यात फर्निश्ड फ्लॅट घ्यायला पैसे कुठून आणले हे माईंनी का नाही विचारलं?

बाकी एकेक जण पोलिसांची चौकशी झाल्यावर परत जायचा आणि जमलेले बाकीचे भेदरून त्याच्याकडे पहायचे, काय विचारलं ते विचारायचे ते पाहून कॉलेजात ओरल्स असायच्या त्याची आठवण झाली Proud

<<हे असं असलं तर सरिताची रिअ‍ॅक्शन बघायला आवडेल. फार 'माझा घोव' म्हणून भांडत असते.>> काल कशी एकदम गोगल गाय झाली . दत्या ने काय ती कबुली दिल्यावर . सगळ्या मुलांनी काय काय लपवून गोष्टी केल्यात त्या सांगितलंन आयशीला. आता नेक्स्ट संशय पांडू / नाथा / यमुना /जतिनशेठ / गुरव / सुशल्या नाहीतर गणेश सुद्धा असेल. अगदी "शिरेल" संपता संपता बॉम्ब गोळा पण टाकतील अण्णा जिवंत असल्याचा आणि त्यांनीच केला असेल नेंने वकिलांचा आणि अजयचा खून Happy

खूनी शोधून झालोहा पण नाईकांच्या घरांत खोटेपणा, लपवाछपवी ह्येच्यामुळें नात्यांत इलेली घुसमट विश्वासरावाक चौकशीचो चान्स घेवन घालवची असतली, असां तर नसात ? मैत्रीक आणि नाईकांच्या खालेल्या अन्नाक बहुतेक जागताहा तो !!!

Pages