क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ व्यक्ती तितक्या प्रक्रुती. कोणाला कशात मजा वाटेल किंवा कोणाला कोण ग्रेट वाटेल हे थोडेच सांगता येते: Wink

आश्चर्य म्हणजे मॅच च्या पहिल्या डावात स्पिनर्स नी विकेट्स काढल्यात आणि आता फास्ट बोलर्स नी. सहसा हे उलटे असते Happy

शिवाय, आश्चर्य म्हणजे पहिल्या डावात भारताच्या ५६६ धांवसख्येत २२३ धांवा, तर वे. इंडीजच्या २४३मधे ९५ धांवा यष्टीरक्षक व गोलंदाज यानी केल्या आहेत !
तिकडे इंग्लंडने पाकची अशीच धुलाई सुरु केलीय [ इं.-५८९-८; पाक- ५७-४]

सहाने इनिंग मधे ६ कॅचेस/स्टंपिंग केले आहे.

दुसर्‍या इनिंग मधे सुध्दा असे मिळाले तर रेकॉर्ड होऊ शकतो

<< पाकीस्तानला फॉलो ऑन मिळणार असे हवे....>> खूपच उशीरा हा 'नो-बोल' दिला गेला ! Wink
शक्य असूनही इंग्लंडने 'फॉलो-ऑन' न देतां बॅटींगचा दुसरा डाव सुरूं केला. इंग्लंडच्या तेज गोलंदाजाना विश्रांतिची गरज होती, हेंच संभाव्य कारण. पाकची हालत फारच वाईट.

भारताने 'फॉलो-ऑन' देवून वे. इंडीजला धूळ चारलीच ! सर्वांगिण चांगल्या कामगिरीबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन !!
['एक्स्पर्ट' म्हणून टीव्ही कॅमेरासमोर येताना त्या विव्ह रिचर्डसला काय वेदना होत असतील ! कालाय तस्मै नमः !! ]

इंग्लंडचा स्टँड कळालाच नाही.. फॉलो ऑन दिला असता तर पटकन मॅच संपली असती. आता उगाच टीपी करत बसतील एक दिवस.. चुकून पाकिस्तानचा एखादा बॉलर चालला तर गोची होईल इंग्लंडचीच.. बॅकफूटवर गेलेच तर मॅच वाचवण्याची पाकिस्तानची शक्यता वाढेल.. आणि इतकीही बॉलिंग इंग्लंडनी केली नव्हती की बॉलर्सला विश्रांतीची गरज पडावी..

जितकी गोलंदाजी इंग्लंड ने केली तितकी भारताने सुध्दा केलेली ते ही दुसर्याच्या देशात जाऊन
इथे स्वतःच्या देशात पुन्हा गोलंदाजी करणे जमले नाही? ते ही थंड वातावरणात मग भारतात आल्यावर काय अवस्था होईल Wink

'शेवटच्या डावात पाक स्पीनर्सना खेळायची पाळी आलीच तर ...' ही भिती तर नसेल ना यामागे !! Wink

'शेवटच्या डावात पाक स्पीनर्सना खेळायची पाळी आलीच तर ...' ही भिती तर नसेल ना यामागे !! >>> म्हण्जे आपल्या बॉलर्स वर अजिबातच विश्वास नाही असा अर्थ होईल की त्याचा..

पण इंग्रजांचा फॉलो ऑन न देण्याचा निर्णय केवळ अनाकलनिय! आपला ५०० च्या वर डोंगर प्रतिस्पर्धी संघाला २०० च्या आत गुंडाळलयं ! तरी ४थ्या डावात कितीही स्पीनर्स चालली तरी ३००च्या वर लीड आहे तुमच्या पाठीशी ह्याचा फायदा घ्यायलाच हवा होता!

मग अँडरसन ला कशाला घेतला? ३५० पेक्षा जास्त लीड होती पाऊस पण पडून गेलेला. स्वींग होण्याचे चांसेस जास्त होते. अशा अनुकूल परिस्थितीत इंग्लंडने बॉलिंग घ्यायला हवी होती. मॅच अनिर्णित ठेवायला आता पाकिस्तानला चांस आहे. जे आधी अजिबात नव्हता.

निर्णय खूपच डिफेन्सिव्ह आहे हे खरे. मात्र निकालावर फार परिणाम होईल असे वाटत नाही. पाक ५ सेशन्स खेळले तर फार मोठे आश्चर्य असेल.

केला आज इंग्लंडनी डिक्लेअर.. पण निदान एकाचं तरी शतक होऊ द्यायला पाहिजे होतं.. रूट आणि कूक दोघेही ७० प्लस होते.. ५६५ ही पाकला करायची धावसंख्या आहे आणि २ बाद झाले आहेत..

किंग्स्टन जमेकाच्या फास्ट आणि बाऊंसिंग विकेटवर जेसन होल्डरने टॉस जिंकून बॅटींग घेतली!

गुड टॉस टू लूज फॉर इंडीया?

१७ वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला टेस्ट मॅच मधे हरवले.
दोघांमधे झालेल्या सगळ्या टेस्ट मॅच मधे याआधी श्रीलंकेला निव्वळ १ टेस्ट मॅच जिंकायला यश मिळाले होते.
ते ही १९९९ मधे श्रीलंकेत.

लंकेचा टर्न अराऊंड झक्कास होता. हेराथ काय चीज आहे ते लक्षात येते. हेराथ नि मुरली एकत्र खेळले नाहित हे बरे झाले Happy

जमेकामधले दोन्ही टीमचे सिलेक्शन कल्पनेपेक्षा वेगळे आहे. भारताचे फोर्स्ड असले तर विंडीजचे थोडे बुचकळ्यात टाकणारे आहे. कदाचित पिच वाटते तेव्हढे स्पायसी नसावे. द्रविडचे काम ह्यावेळी कोण करणार ? Happy

मांजरेकरचं म्हणणं - टॉस झाला तेंव्हां कडक उन होतं व सामना सुरूं होताना अचानक आकाश ढगाळ झालं.
भारतीय गोलंदाजानी याचा चांगलाच फायदा उठवलाय, वे.इंडीजच्या ३विकेटस लवकर घेवून. शामी फारच सुंदर गोलंदाजी करतोय.

सहा गेले !

हा सामना सुरू व्हायच्या आधी मला आपण ही मालिका ४-० ने जिंकलोय वगैरे स्वप्ने पडत होती ..
तुर्तास याही सामन्यात भारताची सुरुवात दमदार दिसतेय..

आश्विन आणि कोहलीत मालिकावीरासाठी स्पर्धा होणारसे दिसतेय..

दादा बहुतेक मालिका सुरु व्हायच्या आधीच बोललेला की आश्विन भरीव कामगिरी करणार.. भविष्यवाणी खरी होणार..

आश्विन काय जबरदस्त बॉलिण्ग करतोय. खिलवाड करतोय विंडीजशी. त्याच्या अश्या फॉर्ममध्ये समोरच्या संघाचे शेपूट वळवळणे कठीण आहे..

अश्विन सामन्याच्या पहिल्याच दिवशीं अशी धम्माल करतोय ह्याचं कौतुक आहेच. पण , भारतीय तेज गोलंदाज वे.इंडीजमधे वे.इंडीयन फलंदाजाना स्विंग व आंखूड टप्प्याचे चेंडू टाकून हैराण करतात, याचंही अप्रूप आहेच !

राहुलने मिळालेल्या संधींचं सोनं केलंय व पुजारा जिद्दीने आपली गुणवत्ता सिद्ध करूं पहातोय. भारतासाठी आशादायक चित्र !!!

राहुल च्या खात्यावर एकपण अर्धशतक नाही सगळी शतक आहे
50 क्रॉस केल्यावर तो शतक करतोच हे सातत्य उल्लेखनीय आहे

उदय 50 काय मला वाटते थेट 16 वगैरे आहे त्याचा बिनशतकी सर्वोच्च स्कोअर..
पण ईनमीन सात-आठ टेस्ट असतील रे त्याच्या. अश्या स्टॅट्स एवढ्या लवकर काय कामाच्या नाहीत.
पण येस्स त्याच्यात पोटेंशिअल आहे जबरदस्त हे नक्कीच. त्याच्या पहिल्या ऑस्ट्रेलियन शतकापासून, अगदी पहिल्या सामन्यात ब्लंडर केल्यानंतरही त्यावर मी ईम्प्रेस होतो. आयपीएलमध्ये तर ज्या क्लासिकल पद्धतीने वेगात धावा जमवल्या त्यामुळे आणखीनच झालो.
कालची खेळी तर लाजवाब. पहिल्या व दुसर्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीतील फरक पाहता कोहलीच्या द्विशतकापेक्षा जास्त वेटेज वाले दिडशतक होते हे..

येत्या काळात कसोटीमध्ये कोहली, रहाणे आणि हा राहुल असे आपले नवीन फॅब तीन बनतील असे वाटते.

बाकी काल लास्ट सेशनला चेंडू वळायचे प्रमाण वाढलेले. सुरुवातीला थोडा सूरात न वाटणारा रहाणे मात्र नंतर सुरेख आणि टिपिकल रहाणे स्टाईल खेळू लागला अन्यथा दोन तीन विकेट भरभर गेल्याने आपली लाईन लागते का असे वाटलेले. पण विंडीजचे स्पिनर तितके दर्जेदार नाहीत जे आपले आहेत आणि आज ते नक्की फायदा उचलणार.. कदाचित आजच टेस्टचा शेवटचा दिवस झाला तरी नवल वाटणार नाही..

रहाणे आणि साहा दोघांना आज खेळावेच लागेल तेही जलद
के राहूल ने साहाच्या आणि रहाणेच्या जागेवर दावेदारी सांगितली आहे

खासकरून साहाच्या जागेवर तर टांगती तलवार लटकवली आहे

Pages