क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी असता तर मूळात ह चेसच झाला नसता. He had become too defensive captain by then.
>>>>
शक्यंय.
पण तसे पूर्वीही आपण सेहवाग बाद होईपर्यंत जिंकायला बघणार आणि मग अनिर्णित राखायला बघणार याच डावपेचाने उतरायचो. (अर्थात हा डावपेच टीमचा नसला तरी सेहवागला तेच जमायचे, पण दुर्दैवाने अश्या स्थितीत किंबहुना एकंदरीतच सेकंड इनिंगला तो कधीच खेळला नाहीये) तर ते असो, सांगायचा मुद्दा की त्याच प्रकारे कोहली देखील मी असे पर्यंत जिंकायला प्रयत्न करायचे या माईंडसेटने भले धोनीच्या कप्तानीत उतरला असता तर हा चेस असाच झालाही असता.

मला नाहि वाटत तसे काही झाले असते. त्याच दौर्‍यात धोनी कप्तान असताना नि कोहली कप्तान असताना दोघांचे approach 180 degree opposite होते. त्याच्या आधीच्या ३-४ सिरीज मधे आलेल्या पराभवानंतर धोनी मधला aggressiveness संपला. 'जिंकण्यापेक्षाही हरायचे नाही' हा मोटो उरला होता. धोनी त्या सामन्यात कप्तान असता तर विजय नि कोहली ने जिंकण्याचा प्रयत्नही केला नसता कारण त्यांना direction तशी नसती.

रॉस्टन चेस मस्त खेळतोय. दुसरीच टेस्ट आहे त्याची आणी त्यात five-for आणी अर्धशतक.

तिकडे ईंग्लंड अडखळतय.

अनिर्णित राहिलेला कसोटी सामनाही एखाद्या संघाचं मनोबल किती उंचावूं शकतो याचंच उदाहरण काल पहायला मिळालं. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वे. इंडीज संघ पुन्हा क्लाईव्ह लॉइडसच्या संघासारखं शिखर गाठणार अशी आशा वे.इंडीजमधे पल्लवित करणारी अशीच कामगिरी वे. इंडीजने केलीय. What a chase !

अ‍ॅटॅक इज अ बेस्ट वे ऑफ डिफेन्स! हे कालच्या विंडीजच्या खेळाने पुन्हा अधोरेखित केले!
वेल डन!!

विंडीजला पुरेसे श्रेय देऊनही, एक वाटले कि काल कधी तरी मधे पुजाराचा लेग ब्रेक किंवा धवन चा स्पिन पण try करून partnership तोडता येते का बघायला हवी होती. मिश्रा च्या जागी जाडेजा बहुधा पुढच्या टेस्ट मधे.

जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वे. इंडीज संघ पुन्हा क्लाईव्ह लॉइडसच्या संघासारखं शिखर गाठणार >> हे थोडे जास्त होत नाहिये का भाउ ? कालची कामगिरी कतुकास्पद होती ह्यात शंकाच नाही पण लॉइडसचा संघ जिथे पोहोचला तिथे पोहोचण्यासाठी जे लागणार आहे ते ह्या संघात आहे असे वाटत नाही.

<< पण लॉइडसचा संघ जिथे पोहोचला तिथे पोहोचण्यासाठी जे लागणार आहे ते ह्या संघात आहे असे वाटत नाही. >> असामी, मलाही ती जाणीव आहेच. पण << लॉइडसच्या संघासारखं शिखर गाठणार अशी आशा वे.इंडीजमधे पल्लवित करणारी अशीच कामगिरी >> यांतील ठळक अक्षरातील मजकूरच मला अभिप्रेत होता ! आपण जसे 'आतां सुवर्णयुग येणार' म्हणत प्रत्येक नविन पंतप्रधानांकडे मोठ्या आशेने पहात असतों, तसंच ! Wink

विंडीजला पुरेसे श्रेय देऊनही, एक वाटले कि काल कधी तरी मधे पुजाराचा लेग ब्रेक किंवा धवन चा स्पिन पण try करून partnership तोडता येते का बघायला हवी होती.
>>>
प्लस वन
कोहली स्वता घेईल असे मला वाटलेले.. ते देखील नाही केले..
बहुधा पाच गोलंदाज खेळवलेत तर जे त्यांना करता येत नाही ते ईतर काय करणार असे वाटले असावे.. जो माझ्यामते फार चुकीचा विचार आहे.. कारण स्टॉक बॉलर बॉलिंगची करामत करून नाही तर कॉन्सट्रेशन तोडून विकेट काढतो..

बाकी काल मला सचिनची फार आठवण आली..

<< पुजाराचा लेग ब्रेक किंवा धवन चा स्पिन पण try करून partnership तोडता येते का बघायला हवी होती.>> चेंडूला पीचवर कांहींसा अनपेक्षित असा बाऊन्स निश्चितपणे मिळतोय यावर गावसकर, विव्ह रिचर्डस या सर्वच तज्ञांचं एकमत होतं. पार्ट- टाईम गोलंदाज याचा फायदा उठवण्याची शक्यता खूपच कमी असावी व स्थिरावलेले फलंदाजच उलट याचा फायदा घेण्याची शक्यता दाट असावी. अशा वेळीं नेहमींच्या हुकमी गोलंदाजांवरच विसंबून रहाणं अधिक शहाणपणाचं वाटणं स्वाभाविक आहे..कदाचित, यामुळे कोहली त्या फंदात पडला नसावा.

बाकी काल मला सचिनची फार आठवण आली.. >> मला पण Happy

अशी आशा वे.इंडीजमधे पल्लवित करणारी अशीच कामगिरी >> नाही भाऊ, they have been disappointed enough number of times now. ऑफिसमधे दोघे जमैकन आहेत त्यांच्याशी बोलताना हे नेहमी जाणवते.

पार्ट- टाईम गोलंदाज याचा फायदा उठवण्याची शक्यता खूपच कमी असावी व स्थिरावलेले फलंदाजच उलट याचा फायदा घेण्याची शक्यता दाट असावी >> किंबहुना ह्याच कारणामुळे carry होत run against the play बाद होण्याची शक्यता वाढते ना ? अर्थात हे सगळे जर तर आहे म्हणा.

<<बाकी काल मला सचिनची फार आठवण आली.. >> मला पण >> मला तर कोणतीही मॅच पहाताना त्याची आठवण येतच असते ! Wink
<< they have been disappointed enough number of times now. >> मग हेंही << आपण जसे ... प्रत्येक नविन पंतप्रधानांकडे मोठ्या आशेने पहात असतों >> तसंच झालं कीं !!!! Wink

एकाच दिवशी तब्बल २१ विकेट्स पडणे याला खेळपट्टी कारणीभूत की गोलंदाजी?

मागे असेच काहीसे दिल्लीच्या खेळपट्टीवर झाल्यावर बाकीच्या खासकरून ऑसी मिडीयाने टिकेची झोड उठवली होती.
आता काय ?

२१ बळी गेले पण ३१३ धावाही झाल्यात! ह्याचा अर्थ खेळपट्टी चा दोष किती?? की धावा अश्याच इकडे तिकडे चेंडू लागून झाल्यात??

लंका - ऑस्ट्रेलिया, ईंग्लंड - पाकिस्तान, विंडीज-भारत - तीनही टेस्ट सिरीज जबरदस्त चालल्या आहेत. मजा येतेय पहायला / फॉलो करायला. हे माझ्याच बाबतीत आहे क ते माहीत नाहे, पण अशा जबरदस्त टेस्ट सिरीज चालू असल्या की टी-२० लीग फारश्या आकर्षित नाही करत (उदा. सीपीएल).

ऑस्ट्रेलिया ला भारतीय उपखंडातलं यश गवसत नाहीये. ह्या वेळी तर मुरलीधरन, समरवीरा वगैरे लंकेच्या लोकांची मदत सुद्धा घेऊन झाली. त्या तुलनेत ईंग्लंड ला उपखंडात माफक का होईना, यश मिळालय.

मजा येतेय पहायला / फॉलो करायला. >>> हो, वर्षाअखेरीस देखील अश्या तीनेक ठिकाणी टेस्ट सिरीज चालू असण्याची शक्यता वाढते, तेव्हाही मजा येते. प्रत्येकाचे टाईम वेगळे, चालू असतील त्या बघा, किंवा संध्याकाळी निवांत प्रत्येकाचे स्कोअर फॉलो करा, ज्यात काही ईंटरेस्टींग घडले असेल तिची क्षणचित्रे बघा.. जसे की आज ऑसीज बाद होत मान खाली घालत तंबूत परतताना बघायला आवडतील Happy

सीपीएल तशीही फारशी रोचक वाटत नाही. एक IPL वगळता इतर कुठल्याही लीग च्या वेळी इतर टेस्ट सामने सुरू असतात. IPL मधे इंग्लंडच्या दौर्‍यामधे अडकलेला संघ वगळता इतर सगळे संघ असतात त्यामूळे तिचा दर्जा वेगळा असतो.

ऑसीजची पहिल्या डावातील फलंदाजी थोडा वेळ पाहिली. खेळपट्टी कांहीं भयानक अशी अजिबात वाटली नाही. ऑसी फलंदाज स्पीनर्सना खेळताना स्वतःला फारच जखडून घेतात असं वाटलं. मार्शने जरा फूटवर्क वापरून चेंडूच्या टप्प्यापर्यंत जावून खेळायचं धार्ष्ट्य दाखवलं , तर त्याला सहज दोन षटकार मारतां आले. चांगली साथ मिळून तो टिकला असता तर स्पीनर्सचा धाक ऑसीजच्या मनातून जायला मदत झाली असती. आतां या सामन्यात ऑसीजचं कांहीं खरं नाहीं ! अर्थात, << जसे की आज ऑसीज बाद होत मान खाली घालत तंबूत परतताना बघायला आवडतील >> हें आहेच !!

लेहमन सारखा निंबल फूट्वर्क असणारा कोच असताना ऑसीज ज्या तर्‍हेने क्रीजमधूनच खेळतात ते बघितले कि आश्चर्य वाटते.

आज वॉर्नर फुटवर्कचा उपयोग केल्यामुळे चांगलाच प्रभाव टाकत होता पण ४१वर असताना परेराचा स्पीन न केलेला चेंडू डिफेण्ड करताना एलबीडब्लू ! ६८-४ !! ऑसीज हरल्यात जमा; फक्त किती वेळ टिकाव धरतात, तेवढंच बघायचं !

चहापानाच्या वेळे पर्यन्त आटोपतयं ऑसी... तेवढाच २ दिवस एक्स्ट्रा सुटी!!
बघुया किती प्रतिकार करतायेत.. ७/१३३ पुढे...

ऑसीजनी १८३ पर्यंत मजल मारली व २२९ धांवानी हरले !
आज मात्र स्पीनर्सचे चेंडू खूपच वळत होते; संदाकन व परेरा तर 'अनप्लेयेबल'च वाटत होते. १८३ हा चांगलाच स्कोअर म्हणायला हवा. ऑसीज आतां स्पीनला सरावलेले होताहेतसं वाटतं. बघूं कितपत सुधारणा दाखवतात तें.

Pages