मायबोली वर्षाविहार आणि मी

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

माझा मायबोलीवरचा वावर हा १० वर्षापेक्षा अधिक आहे, हळूहळू ती आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनली हे मलाही सांगता येणार नाही. इथे नेट वर लिहिताना लोक अतिशय मोकळेपणी बोलतात. पण वर्षाविहाराला येताना त्यांची रोडावलेली संख्या पाहून मला वाईट वाटते. मी ही मधले अनेक ववि मिस केलेत, पण त्यानंतर संयोजन समितीत कधी खेचले गेले कळलंच नाही. फक्त संयोजनाचे काम बदलते,कधी ववी, कधी सांस कधी टिशर्ट. पुण्यातून खंदे असे मयुरेश, योकु, मल्लि आणि मुंबईचे हमखास कलाकार म्हणजे विनय भिडे, घारू, नील, आणि मुग्धा. मुग्धा तर तशी बर्‍यापैकी नविन असल्यापासूनच माबोच्या वविसंयोजनात दाखल झाली.
खास करून पुण्याहून येणार्‍यांची संख्या एका वर्षाविहारालाच मला वाटतंय ३०-३२ होती बाकी वेळेला त्यापेक्षा कमीच. त्याविरूद्ध मुंबईची लोकसंख्या बर्‍यापैकी असते.

वर्षाविहाराला येणं आणि तिथे येण्यातली मजा ह्या फक्त अनुभवायच्या गोष्टी आहेत. काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. मला नेहमी वाटते की आंतरजालावर आम्ही म्हणजे कट्टेकर, कोपुकर आणि मिक्स असे जेव्हा वविला भेटतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. एका दिवसात भरलेलं हे पेट्रोल वर्षभर पुरतं. मी माझ्यापुरती तरी निदान ववीची वाट आतुरतेने पहात असते.

पण तुमच्यापैकी ज्यांनी माबोवर रेग्युलर वावर असुनही ववी एकदा पण अटेंड केला नाहिये त्यांच्या मनात ववीचं नक्की चित्र काय आहे? किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत?

मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वात कॉमन अडचण मी ऐकली आहे ती म्हणजे "मी कधीच कुणाला प्रत्यक्ष भेटले/लो नाहिये, ओळख नसताना कसं येणार?
सर्वात पहिला ववी जो मी अटेंड केला होता त्याचं नाव अंबा (इंग्रजीत AMBA) अखिल मायबोली... पुढे काय होतं विसरले. २ सुमो भरून लोक सिंहगडावर गेलो होतो. त्यातले काही लोक मला आठवतायत मयुरेश, दिनेश, अजय गल्लेवाले, संपदा (डॅफोडिल), सत्यजित इ. माझी सुद्धा कुण्णाशी ओळख नव्हती. आणि मला एक अनामिक भिती सुद्धा होती की बाप रे आपण जातोय खरे...
पण अनुभव प्रचंड वेगळा आणि सुरेख होता. वविच असं नाही पण इथे सुद्धा आंतरजालावर विविध लोकांबरोबर पहिल्यांदा बोलताना कधीच मला परकेपणाची भावना झाली नाही.
असे अनेक लोक आहेत ज्यांना मी अजून भेटले नाहीये, पण त्यांच्याशी रेग्युलर टच मध्ये असते फोन किंवा ईमेल (पैकी एक वेका) कट्टेकर तर माझे जन्माचे सोबती झालेत आता.

एका व्यक्तीचं खास कौतुक करीन इथे - लिंबू.... हा माणूस कितीही अडचणी असल्या तरिही प्रत्येक ववीला हजेरी लावतोच ते ही स्वतः ड्राईव्ह करत.

मनात कोणतीही शंका असेल तर इथे मोकळेपणी बोला, मला तुमची अडचण जाणून घ्यायला आवडेल. ववीला रेग्युलर येणार्‍या लोकांना जो आनंद मिळतो तो आनंद अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे मनापासून वाटते. पण घोड्याला पाण्यापर्यंत आणणे आपले काम, पिणे पिणे हे त्याचे ....

तेव्हा घोडे हो... आपलं लोकहो, जरा पाऊल पुढे टाका, अडचणी सांगा, आमच्या ताकदीत असेल तर त्यांचं निवारण करून आपल्याला ववी मध्ये सहभागी करून घ्यायला अत्यंत आनंद होईल.

विषय: 
प्रकार: 

मस्त धागा दक्षे. य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य दिवसांनी माबोवर लॉगीन केले केवळ इथे लिहायला.
अजुन सगळी चर्चा वाचली नाही. पण एकुणच,,,,
ज्यांना वाटत असेल की ते स्वतः / पार्टनर कंटाळतील / बोर होतील त्यांना एक नक्की सांगते - उडी मारा फक्त ह्या ववि नावाच्या वादळात पुढचे काम माबोकर करतील. मलापण पटकन मिक्स होता येत नाही सो जरा भीतच गेलेले वविला. पण मग एक वेळ अशी आली की, कोण मोनाली म्हटल्यावर अरे तो नाही का तो.... त्याची बायको अशी ओळख बनली माझी. खरतर इथे मी १२+ वर्षे आहे व नवरा नाहिच्चे अजुनही. तरीही :प
माझ्या घरी पण पावसाळा आला की माझ्या आधी नवर्‍यालाच वविची आठवण येते.
सो, जे कोणी विचार मोड ऑन आहेत त्यांनी विचार थांबवा व रजिस्टर करा.
(मी पण अजुन केले नाहिये, पण २-४ दिवसात करते फायनल.)

दिवाळी अंकाप्रमाणे यालाही कमी प्रतिसाद येत असेल तर कुठे चुकतंय हे शोधायला काही हरकत नसावी. उलट, इतर उपक्रमांसाठीही अशी चर्चा व्हायला हवी. +१००००००

आणि हे कॅनव्हासिंग असलं तरी काय फरक पडतो? दिवाळी अंकाप्रमाणे यालाही कमी प्रतिसाद येत असेल तर कुठे चुकतंय हे शोधायला काही हरकत नसावी. उलट, इतर उपक्रमांसाठीही अशी चर्चा व्हायला हवी.>>> + १

पराग च्या पोस्टीसाठी एकच प्रतिसाद .....

लुत्फ ए ववि हम तुम्हे क्या बताएँँ पराग
हाय कम्बख्त, तू कभी आया ही नही Happy

एकदा उपस्थित राहून खात्री करून घ्यावी

>>>> मी खास करुन मुम्बैकर माबोकरांना भेटायला म्हणून वविला जातो.... Proud जरा त्यांच्यात वावरले की उत्साह संचारतो.... ! <<<<<
अगदी पहिल्या पानापासुन पहातोय... माझ्या या वरच्या वाक्याचा "समस्त पुणेकरांनी (नेहेमीप्रमाणे) अनुल्लेख केलाय" Proud
अन चक्क मुंबैकरांनीही बघुन न बघितल्यासारखे केलय.... Lol

लिंटी, तुमचा दोन्ही घरचा पाहुणा झाला म्हणायचा...

मुंबईतले लोक्स यावेळी ठाण्याला आपले म्हणेनात ( यावेळी मुंबईत शिपा शिवाय पैसे कुठे भरता येतायत का बघ Wink ) तुला कुठून म्हणणार....

त्यामुळे ववि ला जाऊन कोण कोणाकडून काय शिकतय कळतंय बरं Light 1
तरी बरं वविला पुण्याची माणसं कमी असतात Proud

हर्पेन, यंदा काही वेगळंही घडू शकतं... आश्चर्याचा सुखद धक्का यंदा पुणेकर देतील काय? द होल नेशन वाँट्स टू क्नो!! Proud

<आश्चर्याचा सुखद धक्का यंदा पुणेकर देतील काय? द होल नेशन वाँट्स टू क्नो!! >

काय सांगतेस अकु??

मुंबईकर असताना?

मला दक्षीने चालता व्हायला सांगितलं आहे, म्हणुन मी काहीही बोलणार नाही : हाताची घडी घालुन बसलेला भावला:

वैभ्या Lol

आश्चर्याचा सुखद धक्का >>>>>> पुणेकर हे असलं निरुपद्रवी काही करायला जात नाहीत Proud

हैला... ह्ये कुटून पडलं >>>>> पुण्यातून Proud

रच्याकने ववि आला तरी निंबुडा कशी नाही उगवली अजुन इथे? ठिकेय न ती? कोणाकडे तिची काही खबरबात?

मागच्या वर्षी च्या वृत्तांताच्या धाग्यावर 'मी पुढच्यावर्षी येईन' असं कबुल केल्याचं मला आठवतंय. त्याला ओढत घेऊन जावा.
>>>
हम आय गया हु. ए देखो Wink

म्या कबूल केल्या परमान आवंदा येनार हाय! Happy

मला बी ववि ला यीऊ द्या की! Happy

निंबे बस ने येणार आहेस की स्वतःची स्वतः (नेहमीप्रमाणे)
एकटी का सकुसप?

खुप वर्ष झाली तुला भेटून, तु येणार आहेस म्हटल्यावर एकदम मस्त वाटलं.

निंबु, मी नाहीय अगं पण यावर्षी. मिस मी Sad
ज्यांना येणं शक्य आहे ते येत नाहीयेत ज्यांना यायचंय त्यांना शक्य नाहीये. किती तो अन्याय!

पुणे - पवना हट्स (कामशेत) - पुणे (येऊन जाऊन) :- एकूण अंतर १११ किमी - बस अगदी पुण्यात शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, सिंहगड रोड या सर्व ठिकाणी फिरून प्रवासी गोळा करून (येताना आणि जाताना) फिरली तरी यात २५ किमी अधिकची भर पडेल. मात्र याकरिता बसभाडे रू.३००/- प्रत्येकी तेही प्रौढास आणि लहान मुलासदेखील. इतके करुनही बसमध्ये बसायला जागा मिळण्याची खात्री नाही. शिवनेरीचा रेट झाला हा. कुछ तो गडबड है दया!

दुसरे असे की, आता अर्ध्या चड्डीत पाण्यात डुंबायचे किंवा चिखलस्न्नान करायचे वय राहिले नाही. तेव्हा फक्त दोन चहा, एक नाश्ता आणि एक जेवणाकरिता सातशे रुपये फार जास्त वाटतात. सामिष आहार, धुम्रपान व मद्यपानाचे शौकिन असलेले माझ्यासारखे सदस्य बहुसंख्येने एकत्र आले आणि त्यांनी एखादी पार्टी ठेवली ज्यात या सामिष आहार, धुम्रपान व मद्यपान या सर्व गोष्टींचा आनंद लुटण्याचे मूल्य एकत्रित करून पार्टी काँट्रिब्युशन ठेवले गेले तर या गोष्टी न करणारे विना खळखळ हा भूर्दंड सोसतील का?

मग आम्हीदेखील वॉटर पार्क राईड्स, मड बाथचा आनंद घ्यायची इच्छा नसताना त्याचा आर्थिक भार का सोसावा?

मलाही वर्षाविहारामागील गटगची संकल्पना पटते. इतर सदस्यांना भेटायची उत्सुकतादेखील आहे. पण आता निवृत्तीनंतर अनावश्यक फाजील खर्च पटत नाही. घरुनच पोळी भाजीचा डबा घेऊन आलो आणि पाण्यात न डुंबता फक्त इतर सदस्यांना भेटलो तर काँट्रिब्युशन माफ होणार आहे का?

असो. ही तक्रार नाही अन्यथा http://www.maayboli.com/node/59066 इथेच नोंदविली असती. हे दक्षिणा यांच्या प्रश्नाचे उत्तर आहे.

पुणे - पवना हट्स (कामशेत) - पुणे (येऊन जाऊन) :- एकूण अंतर १११ किमी - बस अगदी पुण्यात शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, सिंहगड रोड या सर्व ठिकाणी फिरून प्रवासी गोळा करून (येताना आणि जाताना) फिरली तरी यात २५ किमी अधिकची भर पडेल. मात्र याकरिता बसभाडे रू.३००/- प्रत्येकी तेही प्रौढास आणि लहान मुलासदेखील. इतके करुनही बसमध्ये बसायला जागा मिळण्याची खात्री नाही. शिवनेरीचा रेट झाला हा. कुछ तो गडबड है दया!

निवृत्त झालायत म्हणजे एवढं तर नक्कीच माहीत असेल की पब्लिक ट्रान्स्पोर्ट दिवसा ३०० किमी रनिंग धरुन भाडे आकारतात. आणि हेही माहीत असेल की भाडे अंदाजे किती रुपये प्रति किमी असते. तेव्हा प्रती डोकी ३०० रुपये पेक्षा कमी भाडे आकारले जाईल अशी सोय तुम्ही करु शकत असाल तर उत्तमच. तेवढीच संयोजकांना मदत होईल.

दुसरे असे की, आता अर्ध्या चड्डीत पाण्यात डुंबायचे किंवा चिखलस्न्नान करायचे वय राहिले नाही. तेव्हा फक्त दोन चहा, एक नाश्ता आणि एक जेवणाकरिता सातशे रुपये फार जास्त वाटतात. सामिष आहार, धुम्रपान व मद्यपानाचे शौकिन असलेले माझ्यासारखे सदस्य बहुसंख्येने एकत्र आले आणि त्यांनी एखादी पार्टी ठेवली ज्यात या सामिष आहार, धुम्रपान व मद्यपान या सर्व गोष्टींचा आनंद लुटण्याचे मूल्य एकत्रित करून पार्टी काँट्रिब्युशन ठेवले गेले तर या गोष्टी न करणारे विना खळखळ हा भूर्दंड सोसतील का?

मग आम्हीदेखील वॉटर पार्क राईड्स, मड बाथचा आनंद घ्यायची इच्छा नसताना त्याचा आर्थिक भार का सोसावा?

काय सोसायचं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. Happy

मलाही वर्षाविहारामागील गटगची संकल्पना पटते. इतर सदस्यांना भेटायची उत्सुकतादेखील आहे. पण आता निवृत्तीनंतर अनावश्यक फाजील खर्च पटत नाही. घरुनच पोळी भाजीचा डबा घेऊन आलो आणि पाण्यात न डुंबता फक्त इतर सदस्यांना भेटलो तर काँट्रिब्युशन माफ होणार आहे का?

काँट्रिब्युशन अवश्य माफ करण्यात येईल. फक्त एकाच अटीवर, वरील सर्व मुद्दे तुम्ही रिसॉर्ट मालकांस समजाउन सांगुन तुमची फी माफ करुन घ्यावी. जमल्यास आणखीन दोघा तिघांची ही करुन द्यावी. आणि हो, रिसॉर्ट पुण्याच्या जवळ आहे, तेव्हा त्यांच्यात थोडा तरी पुणेरी बाणा असेलच. आणि त्यांनी जर काही मान-पान केला तर त्यास संयोजक/माबो जबाबदार राहनार नाही हेही ध्यानात ठेवावे. Happy

आणखीन काही शंका कुशंका असतील तर संयोजक आहेतच.... उत्तर द्यायला.

मल्लीनाथ,

{{{ काँट्रिब्युशन अवश्य माफ करण्यात येईल. फक्त एकाच अटीवर, वरील सर्व मुद्दे तुम्ही रिसॉर्ट मालकांस समजाउन सांगुन तुमची फी माफ करुन घ्यावी. जमल्यास आणखीन दोघा तिघांची ही करुन द्यावी. आणि हो, रिसॉर्ट पुण्याच्या जवळ आहे, तेव्हा त्यांच्यात थोडा तरी पुणेरी बाणा असेलच. आणि त्यांनी जर काही मान-पान केला तर त्यास संयोजक/माबो जबाबदार राहनार नाही हेही ध्यानात ठेवावे. }}}

रिसॉर्टमध्ये ववि आयोजित करण्याचा निर्णय माझा नाहीये. तेव्हा रिसॉर्ट मालकास समजावणे ही माझी जबाबदारी नाही. अर्थात वविला न येणे हा माझ्यापुरता मी निर्णय घेतलाय.

मी माझ्या वविला न येण्याचे कारण दक्षिणा यांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून नमूद केले होते. त्या कारणाचे निराकरण कसे करायचे (तेही पुन्हा माझ्याच प्रयत्नाने) याचा सल्ला इतर सदस्यांना मागितला नव्हता. तरीही न मागितलेला सल्ला दिल्याबद्दल आभार.

संयोजक मोड ऑन :-

बिपिन तुमची शंका रास्त आहे, ३०० रुपये दरडोई हे ५०-६० किमी साठी जास्त वाटू शकतात. पण याच ३०० रू मध्ये आम्ही लोकांना पार कर्जत पर्यंत करमणूकीसह (कर लागू न करता) नेऊन आणले आहे. कमी पैशात, बस मध्ये होणारी धमाल विकत घेता येत नाही. अर्थात म्हणून आम्ही ३०० रू आकारतो असे नाही. वविचा दरडोई खर्च काढणं हे एक जिकिरिचं काम आहे. याशिवाय सर्व खर्च हा; ठिकाण, आणि येणारे लोक यांवर अवलंबून असतो. खास करून ट्रान्स्पोर्ट चा. तो जितका असतो तितका दरडोई वाटावाच लागतो. शिवाय ववि मध्ये घेतले जाणारे खेळ, आणि त्या करता छोटी मोठी बक्षिसं पण याच पैशातून घेतली जातात. त्या व्यतिरिक्त अनेक इतर बारीक सारीक खर्च असतात ज्याची कल्पना फक्त संयोजकांनाच असते.

२चहा नाश्ता आणि एक जेवण या करता, ७०० रुपये अधिक वाटणं हे सुद्धा व्यवहारीपणाचं लक्षण आहे. जे योग्य आहे. पण मायबोलीचा ववी हा फक्त खाण्याच्या रेलचेलीसाठी नसतो. त्याची (वविची) नस एकदा सापडली मग शौकिन माणूस ७०० काय १७०० पण देईल. तिथे मिळणारा आनंद हा पैशापेक्षा कितीतरी अधिक असतो (हे मी एक माबोकर म्हणून सांगते आहे) पण तो तुमच्यासारख्या व्यवहारी माणसाला कळेल की नाही याची मला शंका वाटते.

तुम्हाला एकिकडे वविला यावंसं वाटतंय पण आर्थिक भार सोसायचा नाही.. अहो अशी अखुडशिंगी, बहुगुणी बहुदुधी, कमी चारा खाणारी आणि कमी शेण देणारी गाय कुणालाच मिळत नसते हो. मला अर्थात तुमचे लॉजिकच ईललॉजिकल वाटते आहे.

काँट्रिब्युशन माफ होणार का :- Lol
या साठी मल्लीने जे उत्तर दिले आहे ते तंतोतंत पटते. कारण आमच्यात आणि रिसॉर्ट च्या मालकात करार झाला आहे, तुमच्या स्पेशल मागणीसाठी तुम्ही खुद्द साकडे घालावे (मालकाला) ही नम्र विनंती वजा सुचना.

संयोजक मोड ऑफ:

Pages