मायबोली वर्षाविहार आणि मी

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
1’

माझा मायबोलीवरचा वावर हा १० वर्षापेक्षा अधिक आहे, हळूहळू ती आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनली हे मलाही सांगता येणार नाही. इथे नेट वर लिहिताना लोक अतिशय मोकळेपणी बोलतात. पण वर्षाविहाराला येताना त्यांची रोडावलेली संख्या पाहून मला वाईट वाटते. मी ही मधले अनेक ववि मिस केलेत, पण त्यानंतर संयोजन समितीत कधी खेचले गेले कळलंच नाही. फक्त संयोजनाचे काम बदलते,कधी ववी, कधी सांस कधी टिशर्ट. पुण्यातून खंदे असे मयुरेश, योकु, मल्लि आणि मुंबईचे हमखास कलाकार म्हणजे विनय भिडे, घारू, नील, आणि मुग्धा. मुग्धा तर तशी बर्‍यापैकी नविन असल्यापासूनच माबोच्या वविसंयोजनात दाखल झाली.
खास करून पुण्याहून येणार्‍यांची संख्या एका वर्षाविहारालाच मला वाटतंय ३०-३२ होती बाकी वेळेला त्यापेक्षा कमीच. त्याविरूद्ध मुंबईची लोकसंख्या बर्‍यापैकी असते.

वर्षाविहाराला येणं आणि तिथे येण्यातली मजा ह्या फक्त अनुभवायच्या गोष्टी आहेत. काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. मला नेहमी वाटते की आंतरजालावर आम्ही म्हणजे कट्टेकर, कोपुकर आणि मिक्स असे जेव्हा वविला भेटतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. एका दिवसात भरलेलं हे पेट्रोल वर्षभर पुरतं. मी माझ्यापुरती तरी निदान ववीची वाट आतुरतेने पहात असते.

पण तुमच्यापैकी ज्यांनी माबोवर रेग्युलर वावर असुनही ववी एकदा पण अटेंड केला नाहिये त्यांच्या मनात ववीचं नक्की चित्र काय आहे? किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत?

मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वात कॉमन अडचण मी ऐकली आहे ती म्हणजे "मी कधीच कुणाला प्रत्यक्ष भेटले/लो नाहिये, ओळख नसताना कसं येणार?
सर्वात पहिला ववी जो मी अटेंड केला होता त्याचं नाव अंबा (इंग्रजीत AMBA) अखिल मायबोली... पुढे काय होतं विसरले. २ सुमो भरून लोक सिंहगडावर गेलो होतो. त्यातले काही लोक मला आठवतायत मयुरेश, दिनेश, अजय गल्लेवाले, संपदा (डॅफोडिल), सत्यजित इ. माझी सुद्धा कुण्णाशी ओळख नव्हती. आणि मला एक अनामिक भिती सुद्धा होती की बाप रे आपण जातोय खरे...
पण अनुभव प्रचंड वेगळा आणि सुरेख होता. वविच असं नाही पण इथे सुद्धा आंतरजालावर विविध लोकांबरोबर पहिल्यांदा बोलताना कधीच मला परकेपणाची भावना झाली नाही.
असे अनेक लोक आहेत ज्यांना मी अजून भेटले नाहीये, पण त्यांच्याशी रेग्युलर टच मध्ये असते फोन किंवा ईमेल (पैकी एक वेका) कट्टेकर तर माझे जन्माचे सोबती झालेत आता.

एका व्यक्तीचं खास कौतुक करीन इथे - लिंबू.... हा माणूस कितीही अडचणी असल्या तरिही प्रत्येक ववीला हजेरी लावतोच ते ही स्वतः ड्राईव्ह करत.

मनात कोणतीही शंका असेल तर इथे मोकळेपणी बोला, मला तुमची अडचण जाणून घ्यायला आवडेल. ववीला रेग्युलर येणार्‍या लोकांना जो आनंद मिळतो तो आनंद अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे मनापासून वाटते. पण घोड्याला पाण्यापर्यंत आणणे आपले काम, पिणे पिणे हे त्याचे ....

तेव्हा घोडे हो... आपलं लोकहो, जरा पाऊल पुढे टाका, अडचणी सांगा, आमच्या ताकदीत असेल तर त्यांचं निवारण करून आपल्याला ववी मध्ये सहभागी करून घ्यायला अत्यंत आनंद होईल.

विषय: 
प्रकार: 

काहि लिहु का?
लिहितेच.
धन्स दक्षी, हा धागा काढल्याबद्दल. तुझ्या प्रस्तावनेत तु माझा उल्लेख ही केला आहेस.
तर, मी माबो सदस्य होवुन जास्त नाही पण अंदाजे ५ -६ वर्शे झाली असतिल.

मी जॉइन केल्यानंतर जो ववि आला , तेंव्हा मला काहीच कळाले नव्हते, काय प्रकरण आहे ते. मी १-२ जुन्या जाणत्या माबोकरांना विचारणा केली असता त्यांनी चक्क " पाचकळपणा नुसता, वेळेचा अपव्यय" अशा अर्थाचे प्रतिसाद दिले. मी नवीन, मुलगा लहान, नवरा ऑनलाइन , अनोळखी लोकांना भेटण्याची शक्यता०००००.
अशा स्थितीत ते वर्ष गेले. पण सगळ्या ललकार्‍या, घोषणा, सगळे सगळे अगदी मन लावुन वाचुन काढले, प्रतिसादा सकट. उत्सुकता तर वाढत होतिच.
कसे आहे, एखाद्या वाटेला जावु नका, एखादी गोष्ट करु नका, म्हटल्यावर ती करुन बघण्याची इच्छा , तीव्रतेने होते.
माझे असेच झाले.
२०१२ च्या ववि ची घोषणा झाली. मी माझ्या मनाचा कॉल/ कौल घेतला. लोक पारखण्याच्या माझ्या कौशल्यावर मी विश्वास ठेवला, आणी समस्त माबोकरांनी तो सार्थ ठरविला.
त्या वविला मी पण लोक पाहात होते, त्यांच्यातिळ मैत्र, स्नेह आजमावित होते. लेकाला घेवुन, नवर्‍याला सोडुन गेले होते.
त्याच्या पुढच्याच वर्षी मी डायरेक्ट संयोजनात कशी आले ते एक देवी नवलाईच जाणे....

आता अशी स्थीती आहे की मे महिना संपत आला की लेक विचारायला लागतो ," आई, ववि कुठे आहे? कधी आहे?"

नवरोबा पण यायला लागले. तेही चौकशी समिती मधे, कुठे आहे ववि? काय फायनल झाले?
येत चला

येत चला. येतच रहावं अस वाटायला लावणार प्रकरण आहे वर्षा-विहार.

कधी कधी लोकमतावर न जाता, स्वमताचा , स्वानुभवाचा कौल घेणे इष्ट.

पूर्वग्रह दुषित मते ठेवु नका.

वाट पाहाते, ववि २०१६ ला

लिंबु भौ च्या प्रत्येक पोस्टीला टाळ्या..

पियु, पटकन नोंदणी कर... ही विनंती नसुन आदेश आहे ( दिवा, कळवा ई काहीही घेवु- देवु नकोस)

कधी कधी लोकमतावर न जाता, स्वमताचा , स्वानुभवाचा कौल घेणे इष्ट.>> ये हुई ना बात.

मुगु तुझी माझी मैत्री २०१३ च्या गटगला झाली बहुधा. २०१२ च्या गटगला ऐनवेळी मी येऊ शकले नव्हते.

नाही, माग्च्या वर्षीच आपण प्रत्यक्ष भेटलो?
की २०१३ ला, मुरबाड ला?

हो हो. २०१३ ला.
जावुदे ना? काय फरक पडतो?

ववि हा सोहळा अनुभवण्याचाच आहे. इथे ते वातावरण शब्दात मांडता येणार नाही.

मी पहिल्यांदा वविला गेलो आणि तेव्हापासून प्रत्येक वविला आहेच. संयोजनाचीही आपली एक वेगळी मजा असते. तीही अनुभव घेण्यासारखी आहे.

ववि २००६
ववि २००७
ववि २००८
ववि २००९
ववि २०१०
ववि २०११
ब्रेक
ववि २०१३
मग.........

रिसोर्ट चा कंटाळा यायला लागला.. Wink भटकंतीचा नाद लागला... आता वाटतय पुन्हा एकदा जाऊन जुन्या आठवणींना उजाळा देउया.. ~ ~ लेटसी...

इथे वाचून यावे (try) करावा असे वाटले. काहि शंका होत्या मग मुग्धाताईंना त्रास दिला. नोंदणी केली आहे. Thanks Mugdhatai

वैभ्या.. टीपी बंद कर आणि वविला ढोलकी घेऊन ये.. यंदा सांसला तुझ्या ढोलकीचा स्पेशल कार्यक्रम ठेवायला सांगूया..

राखी.. | 11 July, 2016 - 14:24 नवीन
हो ना.. मुद्दाम करतात असे जुणे जाणते लोक्स.. आणि मग माझ्यासारख्या नवख्यांचा होतो गोंधळ. मनापसुन काही सांगायला जावे कि असे विचारतात जणु काहि च माहिती नाहिये.. :रागः असो.. स्मित >>>>

हे एक उदाहरण जणु कि नविन लोकांनी वविला का येऊ नये, नाही म्हणायला इकडे असे तर तिकडे कसे असा प्रश्न पडतोच मग का ऊगाच पैसे भरुन आपले हसु करुन घ्यायचे असे वाटले तर चुकीचे नाहि ना.

Pages