मायबोली वर्षाविहार आणि मी

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago
Time to
read
1’

माझा मायबोलीवरचा वावर हा १० वर्षापेक्षा अधिक आहे, हळूहळू ती आयुष्याचा अविभाज्य घटक कधी बनली हे मलाही सांगता येणार नाही. इथे नेट वर लिहिताना लोक अतिशय मोकळेपणी बोलतात. पण वर्षाविहाराला येताना त्यांची रोडावलेली संख्या पाहून मला वाईट वाटते. मी ही मधले अनेक ववि मिस केलेत, पण त्यानंतर संयोजन समितीत कधी खेचले गेले कळलंच नाही. फक्त संयोजनाचे काम बदलते,कधी ववी, कधी सांस कधी टिशर्ट. पुण्यातून खंदे असे मयुरेश, योकु, मल्लि आणि मुंबईचे हमखास कलाकार म्हणजे विनय भिडे, घारू, नील, आणि मुग्धा. मुग्धा तर तशी बर्‍यापैकी नविन असल्यापासूनच माबोच्या वविसंयोजनात दाखल झाली.
खास करून पुण्याहून येणार्‍यांची संख्या एका वर्षाविहारालाच मला वाटतंय ३०-३२ होती बाकी वेळेला त्यापेक्षा कमीच. त्याविरूद्ध मुंबईची लोकसंख्या बर्‍यापैकी असते.

वर्षाविहाराला येणं आणि तिथे येण्यातली मजा ह्या फक्त अनुभवायच्या गोष्टी आहेत. काही लोक अत्यंत छोट्या अडचणी मोठ्या मानून या आनंदाला मुकतात. मला नेहमी वाटते की आंतरजालावर आम्ही म्हणजे कट्टेकर, कोपुकर आणि मिक्स असे जेव्हा वविला भेटतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. एका दिवसात भरलेलं हे पेट्रोल वर्षभर पुरतं. मी माझ्यापुरती तरी निदान ववीची वाट आतुरतेने पहात असते.

पण तुमच्यापैकी ज्यांनी माबोवर रेग्युलर वावर असुनही ववी एकदा पण अटेंड केला नाहिये त्यांच्या मनात ववीचं नक्की चित्र काय आहे? किंवा त्यांच्या वविला येण्याचा नक्की अडचणी काय आहेत?

मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वात कॉमन अडचण मी ऐकली आहे ती म्हणजे "मी कधीच कुणाला प्रत्यक्ष भेटले/लो नाहिये, ओळख नसताना कसं येणार?
सर्वात पहिला ववी जो मी अटेंड केला होता त्याचं नाव अंबा (इंग्रजीत AMBA) अखिल मायबोली... पुढे काय होतं विसरले. २ सुमो भरून लोक सिंहगडावर गेलो होतो. त्यातले काही लोक मला आठवतायत मयुरेश, दिनेश, अजय गल्लेवाले, संपदा (डॅफोडिल), सत्यजित इ. माझी सुद्धा कुण्णाशी ओळख नव्हती. आणि मला एक अनामिक भिती सुद्धा होती की बाप रे आपण जातोय खरे...
पण अनुभव प्रचंड वेगळा आणि सुरेख होता. वविच असं नाही पण इथे सुद्धा आंतरजालावर विविध लोकांबरोबर पहिल्यांदा बोलताना कधीच मला परकेपणाची भावना झाली नाही.
असे अनेक लोक आहेत ज्यांना मी अजून भेटले नाहीये, पण त्यांच्याशी रेग्युलर टच मध्ये असते फोन किंवा ईमेल (पैकी एक वेका) कट्टेकर तर माझे जन्माचे सोबती झालेत आता.

एका व्यक्तीचं खास कौतुक करीन इथे - लिंबू.... हा माणूस कितीही अडचणी असल्या तरिही प्रत्येक ववीला हजेरी लावतोच ते ही स्वतः ड्राईव्ह करत.

मनात कोणतीही शंका असेल तर इथे मोकळेपणी बोला, मला तुमची अडचण जाणून घ्यायला आवडेल. ववीला रेग्युलर येणार्‍या लोकांना जो आनंद मिळतो तो आनंद अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे मनापासून वाटते. पण घोड्याला पाण्यापर्यंत आणणे आपले काम, पिणे पिणे हे त्याचे ....

तेव्हा घोडे हो... आपलं लोकहो, जरा पाऊल पुढे टाका, अडचणी सांगा, आमच्या ताकदीत असेल तर त्यांचं निवारण करून आपल्याला ववी मध्ये सहभागी करून घ्यायला अत्यंत आनंद होईल.

विषय: 
प्रकार: 

याचा सल्ला इतर सदस्यांना मागितला नव्हता >> अहो बिपिन, मल्लीनाथ इतर सदस्य नसून, वविचा खंदा संयोजक आहे याची कृपया नोंद घ्यावी. आणि सर्व संयोजक माझ्यावतीने इथे सर्व शंकांचं निरसन करू शकतात कारण हा धागा फक्त माझ्या मालकीचा नाही.

संयोजनात आल्यावर कळते की एक ववि आयोजित करायला किती खटपट, वेळ, ऊर्जा, श्रम खर्च होतात ते! अर्थात सर्व संयोजक हे काम आनंदाने व स्वेच्छेने करतात. नवनवीन कल्पना, योजना, स्थळे, सुचवण्या यांसाठी मायबोली प्रशासक वविची घोषणा होण्याचेही, म्हणजे सर्वात अगोदर, स्वयंसेवक / संयोजक हवेत आणि नवीन कल्पना कळवा अशा प्रकारचे धागे काढतात व तिथे आपल्याला नावनोंदणी करून थेट वविसंयोजनातच उडी मारता येते. सूचना मांडता येतात. माझ्यासारखे हौशे, नवशे, गवशेही वर्णी लावतात. अनुभवी संयोजकही असतात.

ज्यांना जिथे जे काही बदलावे, नवे करावे, सुधारावे असे वाटते त्यांना पुढील वर्षीच्या ववि संयोजनात सामील होण्याचे निमंत्रण! तसेच मंडळात नसलेले परंतु पडद्याआड काम करणारेही अनेकजण ववि यशस्वी करत असतात. हौसेने. आपल्या घरचे कार्य समजून. या यादीत आपणही समाविष्ट होऊ शकतो हे नक्की आहे. Happy

मी एकट्याने पवनाहटला गेलो, तरी मला तितकेच रुपये लागणार जितके माबोवविबरोबर लागणार.
तेव्हा मी जायचे की नाही अन पवनाहट इथे चिखलात लोळायला, एक चहा, एक नाष्टा, एक जेवण करायला ७०० रुपये घालवायचे की नाही हा निर्णय माबो ववि करते अन ठिकाण ठरविते यामुळे उद्भवत नसुन, तो मला जायचे वा नाही व मी एकंदरीतच किती "व्यवहारी" आहे यावर ठरतो.
मी बसने गेलो तर अमुक इतके रुपये लागतात, त्यापेक्षा मी बाईकने गेलो तर कमी पैसे खर्च होतात. अर्थातच मी जरा जादाच पुणेरी कंजुष असल्याने दर वविला बाईकनेच जातोयेतो, तेव्हडेच पैसे वाचतात. व असे पैसे वाचविण्यास माबोववि संयोजक बंदी घालत नाहीयेत. तेव्हा बसभाडे किती, काय कसे वगैरे बयादी लागूच पडत नाहीत. उद्या मी सायकलने गेलो, तर बाईक इतकाही खर्च होणार नाही. हो ना? Wink
एक जोक आहे....
एक मुलगा शाळेतुन घरी परतताना बस मागे धावत येतो, घरी आल्यावर मोठ्या फुशारकीने बापाला सांगतो की बाबा बाबा, मी बसच्या मागे धावत येऊन बसचे तिकिटीचे दोन/पाच रुपये वाचवले. मुलाला बाप आता शाबासकी देईल अशी अपेक्षा असते....
तितक्यात बाप काडकन मुलाच्या मुस्काटात फटकावतो....
मुलगा गाल चोळत रडवेल्या चेहर्‍याने बापाकडे पहातच रहातो... की का मारले?
बाप म्हणतो, गाढवा, बसच्या ऐवजी टॅक्सीच्या मागे धावत आला अस्तास तर दोन/पाच ऐवजी पन्नास रुपये नस्ते का वाचले???? ....... Proud
आता या जोक मधिल मुलगा कोण, बाप कोण, अन बस/टॅक्सी कुठली कुठुन कुठे जाणारी हे (सूज्ञ) माबोकरांना काही वेगळे सांगायला नकोच ... नै का? Lol

(कधी नव्हे ती मला "संयोजकांची" दया यायला लागलीये.... आमच्या वेळचे संयोजक असे नव्हते बोवा... Proud )

पण मी काय म्हणते लिंब्या...
चालत किंवा पळत गेलास तर पवना हटची फी सुद्धा वाचेलच की.

चालत/ पळत गेल्यास वाटेत वर्षा गाठेल त्यामुळे त्यात विहरणे होईलच. तिथे पोचायला ४-५ तास तर लागतीलच त्यापेक्षा थोडे जास्त परत यायला. एकंदरीत वेळेचा हिशोब केल्यास पवना हटीच्या बाहेरच्या बोर्डाला हात लावून परत येणे श्रेयस्कर ठरेल.

भूक बिक लागल्यास मधे सापडेल त्या हाटेलात थांबून जेवायचाच काय तो खर्च. हवंतर ते ही घरून बांधून न्या.

म्हणलं तर माबो ववि आणि बोलेतो फुकटमे! Wink

Lol

बिपिन यांच्या पोस्टवर संयोजकांतील मंडळींनी लावलेला सूर खटकला. तुम्ही न येण्याची कारणं विचारताय आणि कुणी व्यवहाराचे गणित मांडले तर तसेच आकडेमोडीने उत्तर द्यायचे सोडून उपहास का करताय? एखाद्याला पडू शकतात असे प्रश्न आणि जमलं तर संयोजकांनी त्याचं योग्य शब्दात उत्तर देणं अपेक्षित आहे. ही अपेक्षा सर्वच उपक्रमांच्या कार्यकर्त्यांबद्दल बाळगली जाते.
ववि संयोजक आयडीने एका मुद्देसूद उत्तराची प्रतीक्षा आहे या बाफावर अन्यथा हे सगळं व्यक्तिगत पातळीवरच गृहीत धरलं जाईल. दक्षिणाच्या पानावर संयोजक आयडीने का पोस्ट टाकावी असा प्रश्न मलाही पडला होता. पण जर सगळे संयोजकच आपापल्या आयडीने तेच मत मांडत असतील तर रीतसर संयोजक आयडीचा आधार का नाही द्यायचा त्याला? सगळ्यांनी आपले म्हणणे मांडल्यावर संयोजक मंडळात काय चर्चा झाली, काय निष्कर्ष निघाले, काय बदलणार, काय नाही याची आम्हालाही उत्सुकता आहेच की. Happy

आशुडी +१.
वविला न येण्याच्या कारणांची खिल्ली उडवायला उघडलेला बाफ दिसतो आहे हा. एखाद्याला चार्जेस परवडत नसतील त्याचीही थट्टा?

आशुडी +१.

प्रतिसादाचा टोन खटकला.

एखाद्या निवृत्त माणसाला ववी ला यायची इच्छा असूनही अर्थिक गणितामुळे अडचणीचे वाटत असेल आणी त्याने तशी शंका प्रांजळपणे लिहिली असेल तर उपहास न करता उत्तर देता येइल ना ? त्या रिसॉर्ट वाल्यांना खरेच विचारले तर ते कदाचित इतक्या मोठ्या ग्रूप मधल्या एकाद दुसर्‍याला सिनियर सिटिझन डिस्काउंट देतीलही.

आय थिंक 'कुछ तो गडबड है दया' सारख्या वाक्यामुळे त्या पोस्टचा टोन आरोप करणारा वाटू शकतो, आणि त्यामुळे उत्तराला धार आली असावी. मी संयोजक नसूनही मला ते जरा खटकलं, म्हणून म्हणतो.

बर्‍याच ठिकाणी ठराविक वयोगटात बसणार्‍या मुलांना आणि सिनीयर सिटीझन्सना बाकी वयोगटापेक्षा रेटमध्ये डिस्काऊंट मिळतं. तसं डिस्काऊंट निवृत्त मंडळींनी विचारलं, मागितलं तर नक्कीच समजून घेता येण्यासारखं आहे. पण मी पाण्यात उतरणार नाही, मड बाथ घेणार नाही म्हणून पैसे कमी होतील का विचारणं जरा अतीच आहे. हे बघून उद्या बाकीची मंडळी आम्ही डेझर्टमध्ये गुलाबजाम खाल्ले नाहीत, नुसतीच खीर खाल्ली, पोळी घेतली नाही, नुसताच आमटी भात खाल्ला तेव्हा पैसे कमी करा म्हणायला मागेपुढे बघणार नाहीत. रिसॉर्टवाल्यांना प्रत्येक व्हिझीटरमागे एक माणूस लावावा लागेल हे बघायला की ज्याकरता पैसे भरलेत तेच करतायत की नाही.
संयोजक हे संयोजक असल्याने कितीही इरिटेट झाले तरी सौम्य शब्दात सांगावं ह्याच्याशी सहमत.

आपण कृपया लेखाच्या मूळ विषयाकडे वळूयात का?

कुणाला कुठल्या गोष्टीवर पैसे खर्च करणे जमेल (किंवा जमत असले तरी योग्य वाटेल) हा अतिशय वैयक्तिक मुद्दा आहे. आणि तो त्यांनी मांडला आहे. त्याची टिंगल होत असेल तर ते योग्य नाही. इतरांनीही त्या टिंगलीत सामील होणे योग्य नाही.

संयोजकांच्या बाजूने यात असणार्‍या अडचणी समजावून घ्याव्यात. संयोजकही आपले उद्योग संभाळून या लष्कराच्या भाकरी भाजत असतात. सगळ्यांच्याच इच्छा त्यांना पुर्‍या करणे शक्य नाही आणि ते व्यवहार्यही नाही.

अमुक गोष्टींना संयोजकांनी केलेल्या व्यवहारानुसार इतके पैसे पडतील. ते ज्यांना योग्य वाटत असेल त्यांनी सामील व्हावे. ज्यांना ते योग्य वाटत नसेल त्यांनी संयोजकाना इतर उपाय सुचवून पहावे. ते अंमलात आणणे शक्य असेल तर चांगलेच नाहीतर सामील व्हायचे का नाही ते ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

आणखी एक ३ रा मुद्दा. संयोजक हे कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. त्यांना इथल्या पानांवर लिहतांना (विशेषतः वाद होईल असे मुद्दे निघाल्यावर) योग्य त्या शब्दात/टोनमधे लिहता येईलच असे नाही. किंवा आलेल्या प्रतिसादावरून असे लक्षात येते आहे की अनेकांना तो टोन नक्कीच खटकला आहे. याही पूर्वी अनेक उपक्रमात संयोजकांनी केलेल्या टोनवरून वाद निघाले आहेत. ही नक्कीच पहिली वेळ नाही. उपक्रमात भाग घेणार्‍या सगळ्याच स्वयंसेवकांना योग्य त्या टोनमधे लिहणे जमतेच असे नाही. कधी कधी काय लिहले आहे यापेक्षा कुणि लिहले आहे यावरूनही वाद निघाले आहेत. कार्यक्रमाचे संयोजन करणे आणि योग्य त्या भाषेत एका समाजासमोर आपले विचार मांडणे ह्या दोन्ही गोष्टी सगळ्यानाच जमतात असे नाही.

संयोजकांसाठी हा फीडबॅक आहे. संयोजकांनी इथे मॉडरेट करण्याऐवजी व वि संयोजनाकडे लक्ष द्यावे हे उत्तम आणि इतरांनीही त्यावर अधिक उहापोह न करता मूळ विषयाकडे लक्ष द्यावे अशी मी विनंती करतो.

टिपः कृपया खालील प्रतिसाद शांत डोक्याने वाचावे. रागा रागात, खोचक उत्तर किंवा याची जिरवायलाच प्रतिसाद दिलाय असा कोणताच पुर्व गृह करुन अथवा मनात ठेउन वाचु नये. टेक्स्टींग चा हा ड्रोबॅक आहे की समोरच्यांनी पाठवलेला/दिलेला प्रतिसाद आपण आपल्या स्वत:च्या सध्य मनःस्थिती प्रमाणे इन्टर्प्रेट करतो.

बिपिन यांच्या पोस्टवर संयोजकांतील मंडळींनी लावलेला सूर खटकला. तुम्ही न येण्याची कारणं विचारताय आणि कुणी व्यवहाराचे गणित मांडले तर तसेच आकडेमोडीने उत्तर द्यायचे सोडून उपहास का करताय?

खालच्या वाक्यांमधला उपहास तुम्हाला कळले नसेल तर नवलच आहे. Happy

>>>>>>पुणे - पवना हट्स (कामशेत) - पुणे (येऊन जाऊन) :- एकूण अंतर १११ किमी - बस अगदी पुण्यात शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, सिंहगड रोड या सर्व ठिकाणी फिरून प्रवासी गोळा करून (येताना आणि जाताना) फिरली तरी यात २५ किमी अधिकची भर पडेल. मात्र याकरिता बसभाडे रू.३००/- प्रत्येकी तेही प्रौढास आणि लहान मुलासदेखील. इतके करुनही बसमध्ये बसायला जागा मिळण्याची खात्री नाही. शिवनेरीचा रेट झाला हा. कुछ तो गडबड है दया!

अनावश्यक फाजील खर्च पटत नाही. घरुनच पोळी भाजीचा डबा घेऊन आलो आणि पाण्यात न डुंबता फक्त इतर सदस्यांना भेटलो तर काँट्रिब्युशन माफ होणार आहे का?

बस मध्ये जागा मिळण्याची खात्री नाही असं कुठेही माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. आजवर संयोजकांनी स्वतःची जागा दुसर्यासंना देउन स्वतः उभे राहुन बाकिच्यांची सोय केलीय.

एखाद्याला पडू शकतात असे प्रश्न आणि जमलं तर संयोजकांनी त्याचं योग्य शब्दात उत्तर देणं अपेक्षित आहे.

असं समजा की तुम्ही संयोजक आहात आणि तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर तुम्ही कोणत्या शब्दात प्रतिसाद द्याल? तुमचा प्रतीसाद वाचायला आवडेल मला. Happy आणि मलाही कळेल की माझं कुठं चुकलंय. Happy

ही अपेक्षा सर्वच उपक्रमांच्या कार्यकर्त्यांबद्दल बाळगली जाते.
बाकीच्या कोणत्याच उपक्रमात व्यवहार येत नाही, तेव्हा असा लेखा जोखा आजवर तर कोणी मांडलेलं मला तरी वाचणात नाही.


ववि संयोजक आयडीने एका मुद्देसूद उत्तराची प्रतीक्षा आहे या बाफावर अन्यथा हे सगळं व्यक्तिगत पातळीवरच गृहीत धरलं जाईल. दक्षिणाच्या पानावर संयोजक आयडीने का पोस्ट टाकावी असा प्रश्न मलाही पडला होता. पण जर सगळे संयोजकच आपापल्या आयडीने तेच मत मांडत असतील तर रीतसर संयोजक आयडीचा आधार का नाही द्यायचा त्याला?

हा धागा दक्षीचा आहे, तिने स्वत:चे ववि बद्दल चे मत मांडलेय. ववि मध्ये तिने ज्या गोष्टी अनुभवल्या, तिला आवडल्या त्या दुसर्‍यांनीही अनुभवावी असं तिला वाटलं म्हणुन तिने हा धागा काढला. यात संयोजकांचा ववि-मार्केटींग सारखा कोणताच हेतु नव्हता. बाकीचे आलेले प्रतिसादही वैयक्तीक होते. संयोजकांनी कुठेही हस्तक्शेप केलेला नाहीय. आणि बिपिन आजोबांनीही कुठेही संयोजकांना संबोधलेले नाही. कदाचीत त्यामुळे संयोजक आयडीने प्रतिसाद देने रास्त वाटले नसावे. Happy

सगळ्यांनी आपले म्हणणे मांडल्यावर संयोजक मंडळात काय चर्चा झाली, काय निष्कर्ष निघाले, काय बदलणार, काय नाही याची आम्हालाही उत्सुकता आहेच की.

ववी साठी संकल्पना, सुचना वगैरे ववी दवंडीच्या आधी मागवले जातात. ज्यांना संयोजनात काम करायचे आहे त्यांनाही संधी दिली जाते. स्पॉट फिक्सींग, किस्टींग वगैरे काढले जाते. स्पॉट ठरवताना मुंबई-पुणे असा आजुबाजुचा परिसर संयोजक (स्व-खर्चाने) फिरुन काही रिसॉर्ट/वॉटर पार्क्/इतर काही ऑप्शन्स पाहुन सोईस्कर आणि परवडेबल असा स्पॉट फायनल करतात. आणि त्या नंतर होते सासं ची तयारी. त्यामुळे इथल्या काही म्हणन्या नुसार किंवा कोणाच्या कमेंट नुसार या सर्व कार्यक्रमाच्या प्लॅनिंग मध्ये शक्यतो बदल केला जात नाही (खुपच गरजेचे नाहीय तो पर्यंत). आणि जाणुन घ्यायची उत्सुक्ता वेगळी आणि उपहास वेगळा. उत्सुकतेपोटी विचारलेले प्रश्न आणि उपहासत्मक प्रश्न यात फरक असतो.

वविला न येण्याच्या कारणांची खिल्ली उडवायला उघडलेला बाफ दिसतो आहे हा. एखाद्याला चार्जेस परवडत नसतील त्याचीही थट्टा?

इथे कोणाची खिल्ली उडवलीय असं वाटतंय? Uhoh आख्या बाफ वर आत्त पर्यंत २२० पोस्ट आहेत. त्यात खिल्ली उडवणार्या किती पोस्ट आहेत?


एखाद्या निवृत्त माणसाला ववी ला यायची इच्छा असूनही अर्थिक गणितामुळे अडचणीचे वाटत असेल आणी त्याने तशी शंका प्रांजळपणे लिहिली असेल तर उपहास न करता उत्तर देता येइल ना ?

प्रांजळपणे शंका लिहिणारे घरुन डबे आणायच्या किंवा गडबड है च्या गोष्टी करत नसतात. सरळ मुद्द्यवर बोलत असतात.
"मला यायची फार इछा आहे, पण आर्थीक गणितात बसत नाहीय. काही सुचवाल का?" वगैरे वाक्य वाचायला कदाचीत प्रांजळ वाटली असती.

त्या रिसॉर्ट वाल्यांना खरेच विचारले तर ते कदाचित इतक्या मोठ्या ग्रूप मधल्या एकाद दुसर्‍याला सिनियर सिटिझन डिस्काउंट देतीलही.

त्या रिसॉर्ट वाल्यांशी बारगेन केल्या शिवाय का तो ७०० रु. मध्ये तयार झालाय असं वाटतं का? Happy आहो सरळ आहे, तुम्ही जसं विचार करता तसंच आम्हीही विचार करतो. पैसा कोणाला वाचवायचा नसतो? आणि असंही नाहीय की सारं लपुन छपुन चालुय. रिसॉर्ट डिटेल्स दिलेत, हिशोबाची आकडेमोड दिलीय, सगळं पारदर्शक ठेवलंय. तरी शंका घेताय म्हणजे कमालच आहे.

असो, हे माझं वैयक्तीक मत. नाहीतर पुन्हा संयोजकांच्या नावाने सुरु व्हाल. Wink

कृपया कुठल्या प्रतिसादाला काय उत्तर देणे योग्य होते, कुठला टोन योग्य कुठला चुकीचा यासारखे प्रतिसाद टाळा. असे प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येतील.
(वरील प्रतिसादाची वेळ पाहता माझा प्रतिसाद पहाण्याच्या अगोदर लिहला गेला असावा असे दिसते आहे. म्हणून ठेवला आहे. यापुढचे "प्रतिसादांबद्दलचे प्रतिसाद" अप्रकाशित करण्यात येतील. मूळ विषयावर प्रतिसाद द्यायला हरकत नाही.)

तसे स्विमिंग पूलावर काय पाहून अत्याचार होतात हा एक वेगळा आणि मजेशीर विषय आहे.

मी एकलेले काहीं कडून .... त्यांच्यावर स्विंमिग पूलावर गेल्याने होणारे खरे अत्याचार...

काहींना काश आपण तरूण असतो तर, काहींना , जरा मी तिच्याएवढी बारीक असते तर, पुरुषांचे आणखी वेगळेच प्रॉबलेम. काहींना नवरोबा कुठे बघतोय त्यामुळे अत्याचार.... काहींना उलटी. तर संस्कृती रक्षकांना देश वाया चाललेला सुद्धा वाटतो ते काहींचे घातलेले कपडे पाहून. Wink

पण आणखी हि काही अत्याचार असतो हे ह्या बीबी वरून आजच कळले. Proud

आमचा एक मित्र ज्याला स्विमिंग येत सुद्धा नाही तो डोळ्यावर गॉगल लावून एक कोपरा पकडून निवांत पडून रहातो ड्रिंक पित..... त्याच्याकडून काहीच तक्रार एकली नाही. तो फक्त काटेकोरपणे नियम पाळणार्‍या पूलावरच जातो मात्र. Wink

मजेशीर आहे.

अता मुद्द्याकडे,

बिपिन ह्यांनी प्रांजलपणे त्यांच्या खिशाला काय परवडतं किंवा काय नाही हे सांगितलय. ते फक्त त्याच नजरेने पाहून घेता येवु शकतं,

येणारे सर्व हे वेगवेगळ्या स्तरातून(आर्थिक, मानसिक ) येतात. प्रत्येकाचे खर्च करण्याची(किती, कुठे, कधी, कश्यावर) ह्याचे गणित असते. त्यावर इतका कल्लोळ करू नये.

मान्य आहे, महागाई झालीय. पण कदाचित हा एक मुद्दा ठरू शकतो..( मला कल्पना नाही की ह्याचा विचार केलाय की नाही ते), की १०० वर लोकं असतील तर रिसॉर्ट मालकांकडून सवलत.

एकटेच ६० च्या वर( सिनियर सिटीझन्स) येणार्‍यांना सवलत (रिसॉर्ट मालकांकडूनच मागावी).

६०- ७० वयोगटातील लोकांसाठी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम( जेवढी संख्या आणि शक्य असल्यास).

आम्ही बिल्डिंग मध्ये पिकनिक काढतो तेव्हा ६० च्या वर अर्धाच खर्च घेतो. हे तुम्ही कराच असे नाही म्हनत आहे.. कल्पना सुचवतोय. परवडत असेल तर बघा विचार करून. Happy

असा काही गोष्टींचा विचार होवू शकतो.

{त्या रिसॉर्ट वाल्यांशी बारगेन केल्या शिवाय का तो ७०० रु. मध्ये तयार झालाय असं वाटतं का? स्मित}

पण ७०० ही तर त्यांच्या वेबसाईट वर दिलेली स्टँडर्ड किंमत आहे ना?

https://pavnahuts.wordpress.com/pricing/

>>> "मला यायची फार इछा आहे, पण आर्थीक गणितात बसत नाहीय. काही सुचवाल का?" वगैरे वाक्य वाचायला कदाचीत प्रांजळ वाटली असती. <<<< नेकी नेकी और पुछ पुछ.... Wink
हे वाक्य मला दर वविच्या वेळेस म्हणावेसे वाटते........ Proud म्हणत नाही तो भाग वेगळा. Happy
किंबहुना शेवटच्या क्षणापर्यंत माझे येणे नक्की नसते ते याच कारणाने (हे काही सदस्यांपाशी उघडही केलेले आहे)

बाकी उद्यापरवा मी साठच्या वरील वयाचा झालो तरी ववि संयोजकांना (आर्थिक स्वरुपातील) "सवलत" मागण्याकरता गळी पडणार नाही.... आर्थिक सवलती वगैरे "सरकार" कडे मागाव्यात, ववि संयोजक हे "वय/लिंग/जात" परत्वे सवलती देण्यास जबाबदार नसावेत/नाहीत असे माझे मत.

बिपिनजी, ववि हा ववि आहे.
तिथे नेमकं त्यात जे अपेक्षित आहे तेच करायचं नाही म्हटलं तर कसं जमेल.
तुमच्या अटींत बसणारे गटग वगैरे इतरवेळी पुण्यात होतच असतात.
माबोकरांना भेटायची इच्छा असेल तर अश्या गटगना जाऊन , मल्टीस्पाईसमध्ये (!) आपलं बिल स्वतः देऊन हवे ते खाऊन किंवा न खाता तुम्ही ती पूर्ण करू शकता.

हे म्हणजे मला विमानात बसायचंय आणि परदेशी जायचंय पण विमान दहा फुटापेक्षा जास्त वर उडता कामा नये असं म्हटल्यासारखं आहे.

(मला अश्या विचित्र शंका - कुशंकाना तोंड देऊनही माबोवरचा एखादा उपक्रम मनापासून साजरा करण्यासाठी धडपडणार्‍या संयोजकांचं जाहिर कौतुक करावंसं वाटतंय.
वविला येऊ शकत नाही , पण माझ्याकडून अनेकानेक शुभेच्छा!)

कौतुक सगळ्यांनाच आहे. सर्वच संयोजकांच्या हातभाराशिवाय उपक्रम अपूर्ण आहे. ववि संयोजकांचं विशेष कौतुक वेळोवेळी उघडपणे केलेले आहे. पण जरा कुठे काही खटकलं तर त्याबद्दल टोकलं तर असे करणार्यांना संयोजकांच्या कामाची काय कल्पना? किंवा कदर नाही असे मुळीच नसते. जे छान आहे ते डोक्यावर घेतलं तर जे रूचलं नाही ते सांगायचं आम्ही कर्तव्य समजतो, अधिकार नव्हे. Happy आता इथे सरळसरळ संयोजकांच्या बाजूचे आणि विरूध्द असा भेद होऊ नये म्हणून हा प्रपंच. संयोजक आपलेच आहेत.

आशुडी, मी खर्च करीत असलेल्या पै न पै ची "वसुली" करणे हाच माझा सदाचा हेतू असेल, (तसा तो असावाच वा असु नये वा कधीकधीच असावा वगैरेबाबत भाष्य करण्याइतपत मी थोर नाही) तर त्याकरता मी "वविला" जाण्याचीच गरज नाही, इकडे लोकल मार्केट/हॉटेल मधे पै न पै ची वसुली मला करत बसता येईल. तशी ती एरवी करत असतोच प्रत्यही.... साधा रस्त्यावरील हातगाडीवरील वडापाव खायचा तरी दोन जागि किंमत समान असली तरी वड्याचा व पावाच्या आकाराची तुलना करुन कितीसे ग्रॅम वडा/पाव जास्त मिळतो त्याच हातगाडीवर आम्ही वडापाव हादडायला जातो. Proud
अर्थात ति भावना घेऊनच (म्हणजे पै न पै वसुल करण्याची) मी कायम जगायचे असेल, तर वविलाच कशाला जायला हवे? नै का?

अन तरीही मग मला वविला जायचेच असेल, तर ववि मधे मिळणारा "आनंद" जो अनेकांनी येथिल पोस्ट्स मधे मांडला आहे, त्या आनंदाची "किंमत" रुपयांमधेही करण्याचे कसब देखिल पै न पै वसुल करताना माझ्यामधे असायला हवे. नै का? अन जर त्या "आनंदाची" कसलीच किंमत माझ्या लेखी नसेल (आय मीन पैशांमधे किंमत वा खरोखर "आनंद" जाणवणे) तर मात्र मी ववि वगैरेच्या वाटेला जाऊच नये ! बरोबर ना?

माझ्या नातेवाईकांत बरेच जण "सीए" आहेत, आमचा लिंबोटला देखिल सीए कडे काम करुन जरा जास्तच हिशोबी बनला आहे. पण आम्हां नातेवाईकांची गटग होतात, तेव्हा या तमाम हिशोबी सीए लोकांना आम्हि सांगतो, की तुमची सीएगिरी तुमच्या व्यवसायात ठेवा... इथल्या "कौटुंबिक आनंददायी" व्यवहारात तुमची फायद्यातोट्याची अन वसुलीची गणिते आणु नका.... ! असो.

पैशांचा व रिटर्न चा विचार मी ही केलाच. १००० रु. भरायचे. शिवाय केनेलचे ५५० रु रोज ते शनिवार रविवार व कदाचित सोमवार कारण सोमवारी पहिले हपिसात यावे लागेल. म्हणजे १६५०.०० टोटल. २६५० इथेच झाले. त्यात टीशर्ट चा खर्च अ‍ॅड करा. त्यात पाण्यात मुद्दाम भिजायची आवड नाही. स्कूटरने हपिसला जाते त्यामुळे सीझनला तीन चारदा भिजतेच भिजते. मड बाथ शक्यच नाही. गप्पा व सोशल इंटर अ‍ॅक्षन. फन ( धम्माल) मिस करेन नक्की. तितक्या आतुरतेने भेटावे वाटावे असे माबोकर माझ्या परिचयाचे नाहीत.

त्या ऐवजी रविवारी घरी बसून गूगल प्ले स्टोअर किंवा नेटफ्लिक्सावर चित्रपट रेंट करून बघितला व अगदी खाणे बाहेरून माग वले तरी १२० + ३०० = ४२० च्या पलीकडे जात नाही. परत कोरडे ते कोरडे मस्त.

गटारी अमावास्या सद्रूश्य दंगा काही जमणार नाही व सोमवारी ड्यूटी पकडणे मस्ट आहे. असा विचार करून ववि व आपण हे करेक्ट फिट नाही हे लक्षात आले. पण कार्यक्रमास शुभेच्छा. त्या आधीच दिलेल्या आहेत.

मामी, १२० + ३०० ला फारतर २५ रू लागतील. Light 1 ४२० रू घेणारे ४२० आहेत. Happy

ऑन अ सिरियस नोट,

१. काही वविकरांना ववि बद्दल काही बोलले की ते एकदम ऑफेन्सिव्ह मोड मध्ये जाताना बघितले आहे. ( हाच ववि नाही, एकुण मत लिहितोय. ) त्याची काही गरज नाही असे वाटते. ववि म्हणजेच एकदम भारी बिरी असेही खरे तर काही नाही. सगळे भेटतात, धमाल येते हे खरे पण वर्षभराचा हाच दिवस आनंदाचा वगैरे वाचून मलाही नवल वाटले हे खरे. अर्थात काहींना कदाचित ववि म्हणजेच वर्षभराचा स्ट्रेस बस्टर असेल हे ही मान्य !

२. काल मी एका वाहत्याबाफवर मात्र संयोजकांच्या बाजूने लिहिले होते. मला ती पोस्ट केवळ उचकवणारी वाटते.

प्रत्येक गोष्टी आपल्याला हव्या त्याच बजेट मध्ये कसे बसविता येईल. शिवाय इथे कोणी सिनियर सिटिझन आहे म्हणून रिसॉर्ट शुल्कात सवलत देत नाही. येणे जाणे आणि दिवसभराचे खाणे-पिने इत्यादी मध्ये आजकाल १००० रू लागतीलच ह्यावर प्रश्न पडावा हेच मुळी मला समजले नाही. तिकडे मामी घरबसल्या ४२० रू चा हिशोब लावत आहेत. इथे तर तुम्ही बस मध्ये जाणार, रिसॉर्ट मध्ये दिवसभर राहणार.

ह्याउपरही कुणाला नुसतेच भेटायला यायचे असेल तर स्वतःच्या खर्चाने येणे जाणे व जी काय रिसॉर्टची फी असेल ती द्यावी. ( किंवा त्यांच्याशी मांडवली करावी, वाटल्यास दयाला मांडवली साठी न्यावे. म्हणजे गडबड वाटणार नाही, अन वाटली तरी दयालाच प्रश्न विचारता येईल. Light 1 )

अमा, वविची तुलना आणि रविवारी चित्रपट पाहण्याचे तुलना न कळण्यासारखी आहे.

वविला स्वतःच्या इच्छेनेच आणि आपल्याला खर्च व मतं जमेल तरच जावं आणि ह्यात काहीच वावगं नाही. आणि कुत्सित नाही.

पण अशी तुलना म्हणजे अतिच आहे.

नावच वर्षाविहार असताना कोरडे रहाण्याची तुलना? तिथे जावूनही कोरडे राहू शकता की.

शेवटी आपापल्य इच्छेचा आणि आवडीचा भाग आहे. तेव्हा असोच.

सध्या मुंबई पुण्याच्या आसपासची पिकनिक रिसॉर्टस, तिथे जाण्या येण्याचा खर्च याचे एकुणात १००० रूपये होऊ शकतात याचे आश्चर्य वाटणे मग त्या वाटलेल्या आश्चर्यामुळे संयोजकांवर, त्यांच्या भूमिकेवर संशय घेणे परत यांना फीमधे सवलत मिळावी यासाठी संयोजकांनीच रिसॉर्टशी डोके खपवावे ही अपेक्षा धरणे यानंतर ती पोस्ट साधी सरळ का वाटावी कुणालाही?
परवडत नाही हे होऊ शकते. पण ते तसे सांगितले तर कुणी खिल्ली उडवत नाही. इथे वरतीही संयोजकांवर घेतलेला संशय आणि संयोजकांनी यांच्यासाठी सवलती आणाव्यात याबद्दलचा हट्ट यावर विनोद आहे कुणाच्या परिस्थितीवर नाही.

नमस्कार

ही पोस्ट मी एक मायबोलीकर , ववि अनुभवलेला म्हणुन टाकतोय , पण त्यातही कुठेतरी माझ्यात असलेला ववि संयोजक बोलेलच. Happy

२००८ मधे मायबोलीवर आलो , ववि बद्दल कळल , मुळात स्वभाव कार्यकर्त्याचा असल्याने ववि संयोजन कोण करत याची इकडुन तिकडुन चौकशी केली, कारण ववि संयोजक हे फक्त पावसाळ्यात माबो वर उगवतात Proud

दक्शी ला फोन केला आणि तिने निलेश वेदक आणि घारु ला माझा नंबर दिला , दोघांनी जातीने फोन करुन मला रुपरेशा सांगितली , थोड वाटल होत की .. कस काय असेल पण म्हणल एकदा बघितल्याशिवाय नाही कळणार ...काय होइल फारतर ? ...बघु तरी ..?म्हणुन घुसलो त्यात.

ववि संयोजकांची बैठक आहे कळल ठाण्याला म्हणुन किरु बरोबर निघालो , किरु ला पण मी पहिल्यांदाच भेटत होतो .. मी आपला मिटिंग म्हणुन व्यवस्थित फॉर्मल कपडे घालुन आलेलो ... बघतो तर काय बाकी सगळे ३/४ मधे Rofl

मला माझ्या टिपिकल विचार करणार्‍या डोक्याची गंमत वाटली. Happy

२००९ ला ववि पाहिला आणि लक्षात आल की दर वेळेला काहितरी नवीन आयडिया असेल तर लोकांना ववि ला यायला उत्साह वाटेल , शिवाय खर्च आणि प्रवास हा सुद्धा सुयोग्य हवा , त्या वर्षी प्रवास् फारच होता. १२ वाजलेले पोहोचायला Proud

२०१० ला यु के स रिसॉर्ट ला माझ काम चालु होत , तिकडे ववि ठरवला , गम्मत अशी की त्या ववि ला तब्बल ११९ माबोकर आले होते ... आजवरचा सगळ्यात मोठा आकडा ववि चा Happy

कारण प्रवास बेताचा होता, रिसॉर्ट चे दर ५०० च्या दरम्यान होते , या दोन मेन आणि बाकी सोयी शिवाय सांस चे कार्यक्रम जरा वेगळे होते नेहमीपेक्शा.

२०११ ला मी ववि ला येणार नव्हतो काही वैयक्तिक कारणांमुळे पण शेवटच्या क्षणी जमवलच , तिथे रिसोर्ट चे रेट कमीच होते पण प्रवास जरा जास्त होता.

२०१२,२०१३,२०१४ ववि असेच थोड्याफार फरकाने अनुभावले ... लोकांना परवडेल म्हणुन पुन्हा दोन वेळा युकेस रिसॉर्ट ला गेलो, तर परत परत तिथेच काय जायच म्हणुन काही लोक आले नाहीत.

मुद्दा हा आहे की ... संयोजकांना दर वेळेला काहीतरी नवनवीन करायची इच्छा खुप असते , पंण प्रवास चा वेळ , प्रवास खर्च , उपलब्धता , रिसॉर्ट वर आवश्यक सोयी माबोकरांच्या, शिवाय मुंबई पुण्याच्या मधील लोकेशन्स यामुळे लिमिटेशन्स येतात.

दर वर्षी अ‍ॅडमीन नवीन कल्पना कळवा असा बाफ चालु करतातच , त्यात खरच काही उत्तम विचारात घेण्यासारखे मुद्दे असतात , दर वेळेला त्यांचा विचार देखील होतो ,

या वर्षी च्या एका प्रतिसादातुन तर अस जाणवल की अगदी कमीत कमी खर्चात सुद्धा ववि होउ शकतो ,बस चा खर्च होइल आणि जेवणाचा फक्त ... पण त्या वेळेला खुप अडचणी असतील , स्वच्छतागृहाची, जेवणाची गैरसोय होउ शकते शिवाय खर्च कमी आहे अगदीच म्हणुन एकदम खुप लोक येण्याचीही शक्यता आहेच.आणि खुप जास्त लोक आले तर सांभाळण सुद्ध कठिण जाईल संयोजकांना.

शिवाय त्यातही काही लोक एकतर लोक अशा ठिकाणी जायला तरी काच्कुच करतील , किंवा आले तर नंतर नाव ठेवतील , ,

गेली बरीच वर्ष घारु , नील , मयुरेश , आनंद चव्हाण, आनंद केळकर् ,हिम्या, दक्शी, मल्ली , योकु , देसाई ,राखी मुग्धा आणि बरेच जण हे काम करतायत , मला त्यांच्या बद्दल खुप आदर वाटतो.

दर वर्षी नवीन संयोजकांकरता आवाहन केल जात त्यालाही चांगला प्रतिसाद आहे , हा मायबोलीचा एक उपक्रम आहे , आणि तो अजुन कसा चांगला सर्वसमावेशक करता येइल याकडे आपण बघितल पाहिजे ...

मायबोली आणि ववि ने मला जिवाभावाचे मित्र दिलेत .. अजुन मला तरी काहीही नको.

पण सर्वसमावेशक असा ववि होण कठिण आहे ,पण अशक्य नाही, त्यामुळे आहे ते गोड मानुन घ्या Happy

दर वेळेस काही नवीन जोडता येतय का हे पाहुया.

एकदा तरी ववि ला येउन बघा असा मी तरी म्हणेन ...

मालक, छान लिहिलय... Happy
केदार, तुझी शंका रास्त आहे की असे काय असते ववि मधे की त्यास एकमेवद्वितिय ठरवावे.
पण तुच म्हणाल्याप्रमाणे, (आमच्यासारख्या) काही जणांना तसे वाटते. यास अनेक कारणे आहेत.
माझ्यासारखे, टिपिकल कनिष्ठ मध्यमवर्गीय लोक, वर्षावर्षातुन कधी घराबाहेर पडु शकत नाहीत. घर ते ऑफिस, फार फार तर किराणा दुकान वा मंडई, इतकाच संचार असतो वर्षभर आमचा.
पुरुष निदान बाहेर ऑफिसला तरि जातात, आम्हा कनिष्ठ मध्यमवर्गियांची स्त्रीयामुले तर घरातच पडीक अस्तात. ही अतिशयोक्ति नाहीये. वास्तव आहे.

मी आजवर केवळ दोनदा महाराष्ट्राबाहेर गेलोय. (बेळगाव महाराष्ट्रातच धरतो मी, म्हणून ते मोजले नाहीये... Proud ) वर्षातुन दोन/चार वेळेस वा दोनचार वर्षातुन परदेशात फेर्‍या मारणार्‍यांना कदाचित वर्षानुवर्षे घरातच अडकुन रहाण्यातले दु:ख कळणारच नाही.

२००४ साली नीरजाच्या श्वास चित्रपटाच्यावेळेस माबोगटग निमित्ताने लिंबी सोबत पुण्यात जाऊन तो चित्रपट पाहिला, त्यानंतर गेल्या अकरा वर्षात केवळ एकदाच (बहुधा २००६ /६७ असावे) थेटरला गेलो आहोत आम्ही, ते देखिल त्या चित्रपटात लिंबीचीच छोटीशी भुमिका होती म्हणून तो बघायला गेलो होतो.

मला थंड पाणी /थंडी / वारा जराहि सहन होत नाही. त्यामुळे ट्रेकिंग वगैरे बाद. अन समजा गेलो तरी सहकुटुंब जाणे शक्य नाही. सायकलिंग केले तरी ते किती करणार? कधी करणार? ते देखिल सहकुटुंब नाहीच. अर्थात इतरांना थंड पाण्यात डुंबताना/पावसाच्या थंड पाण्यात न्हाऊन निघताना बघितले तर मला हुडहुडी भरत नाही, बरेच वाटते, की मला जमत नाही तरी ही लोक कशी धमाल करताहेत.

चाळकरी/सोसायटी वगैरेंच्या सहली निघण्याचे भाग्य सगळ्यांच्याच नशिबी असते असेही नाहि.

याव्यतिरिक्त अनोळखी/नवख्या ठिकाणी एकट्याने वा कुटुंबास घेऊन जाण्याचे धाडस असते असेही नाही.
तर मग मजसारख्या कनिष्ठ मध्यमवर्गीय व्यक्तिस आपल्या कुटुंबियास वविसारख्या ठिकाणी सुरक्षितपणे नेणे आणणे सोईचे, तसेच तुलनेत फारच "सोफास्टिकेटेड्/संयत/सुसंस्कृत" वगैरे लोकांमध्ये मिसळणे हे "अमोल" वाटले तर त्यात नवल ते काय?

त्यामुळे मला तरी ववि ही एक संधी वाटते. वर्षभरातील ताणतणाव विसरण्याकरता कोणा स्वयंसेवकांनी आयोजित केलेली एक संधी.

मला वाटते की वैचारिक मतभेदांचा बराचसा भाग हा "आहेरे " व "नाहीरे" यांच्यातिल वास्तव फरकामुळे येत असलेल्या दृष्टीकोनाचा आहे.
त्याव्यतिरिक्त, काय नाहीये, त्यातुनही "आहेरे" शोधणारे वेगळे, अन काय आहे, त्यातुनही "नाहियेरे" शोधणारे वर्ग अजुनच वेगळे... Proud मी यातिल पहिल्या वर्गात मोडतो.

Pages