रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं हो... नाहीतर सगळीच बोंबाबोंब होईल. Happy

परवाच्या भागात ते देवळीजवळ काय पुरलेलं असतं?? कोणी बघितलेला का तो भाग??

या शिरेलीत आम्ही अंधश्रध्दा वाढवत नाही वगैरे काहीतरी मेसेज येतो ना. अक्खी शिरेलच अंधश्रध्देवर आधारीत झालीय आता. :रागः

जाऊ द्या हो कापो.:स्मित: झी जरा तरी बरे आहे, कलर्स ( पूर्वीचे ई टिव्ही मराठी ) वरच्या सिरीयल तुम्ही पाहील्या असता ना तर रागाने टिव्हीच फोडला असता.:खोखो: कलर्सवाल्यांनी पक्के ठरवलेय की त्यांच्या सिरीयल कोणीही प्रेमाने वा कौतुकाने वा उत्सुकतेने बघेल, तो वेडा होऊन दवाखान्यात भरती व्हायच्याच लायकीचा उरेल.:हाहा:

चार दिवस सासुचे, लाजीरवाण्या घरात, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला आणी आता कमला अशा एकसे एक भयाण सिरीयली आहेत. मी या येता-जाता, उत्सुकतेने पाहील्या आहेत, पण थोडक्यात वाचलेय.:फिदी:

शिरेल लो बजेट असल्यामुळे अभिनेते/अभिनेत्र्या कच्च्याच घेतलांव वाटतां>>>> शक्यता आहे.

निलीमा वचनाची फार पक्की असल्याने तिला सुसल्याला वाटा द्यावा असे वाटत आहे, पण हे लोक ( तिचे सासरचे सर्व) ऐकत नसल्याने बहुतेक तिने आणी सुषमाने मिळुन काही कट शिजवला असावा असे वाटते. म्हणजे त्या शेवंताला घाबरुन का होईना पण सुसल्याला तिचा कायदेशीर वाटा मिळेल आणी दागिने पण मिळतील.

नीधी, अगं काही नाही, गुरवकाका देव शेतातून जात असतात तर त्यांना तिथे पुजा केलेली दिसते. ते मग तिघा भावांना बोलावतात. सगळेच मग ती पुजा बघुन दोन दोन पावले मागे जातात. गुरवकाका सांगतात की ही जागा कोणीतरी बाटवली आहे. देवशेतात फक्त मीच पुजा करू शकतो, हा माझा हक्क आहे. कोणीतरी बाहेरच्या माणसाने इथे पुजा केली आहे. ही तुमचीच जमिन आहे. जो कोणी तुमच्या वाईटावर आहे त्यानेच ही पुजा केली आहे आणि ह्या पुजेतील फुले जशी सुकत जातील तशी तुमच्यावर संकटं येतील. दत्ता सांगतात की मी बघतो काय ते आणि ते मिळेल ती काठी घेऊन पुजेच्या ठिकाणी खणायला लागतात. त्यांना त्यात गाठोडे पुरलेले दिसते. दत्ता ते गाठोडे बाहेर काढतात तर त्यात लींबू, नारळ (शहाळे) त्याला डोळे व केस लावलेले असतात. गुरवकाक सांगतात की हे ज्या बाईचे केस आहेत तिच्या जिवाला धोका आहे. माधव सांगतात की निलीमाचे केस असावेत. गुरवकाका म्हणतात की हे तिच्यावर उलटू नये.

<< शिरेल लो बजेट असल्यामुळे अभिनेते/अभिनेत्र्या कच्च्याच घेतलांव वाटतां>>>> -

अहो, जॉगींग करुंचा सोडून अशे निजान रवलास तर
फक्त त्या बेरीनानांचोच रोल देतीत तुमकां !!
aknokout.JPG

चार दिवस सासुचे, लाजीरवाण्या घरात >>> या दोन तु पाहिल्या आहेस रश्मी? पैकी चार दिवस सासुचे मी पण पाहिली साबांमुळे, पण लाजीरवाण्या घरात केवळ अशक्य होत.

हो मुग्धा, चार दिवस आधी पहात होते. आधी माहेरी मग सासरी ही कंटिन्यु होती ( माहेरी आई बाबा आणी सासरी साबु- साबा Proud ) मग काही दिवस परदेशात असल्याने बराच गॅप पडला, मग इकडे आल्यावर शेवटी बघीतली. बघीतली म्हणजे काय तर नाईलाज होता. कारण हॉलशेजारीच किचन असल्याने येता-जाता नजरेस पडायची.

लाजिरवाण्या तर विचीत्र होती पण त्यापेक्षा भयानक म्हणजे असावा सुंदर स्वप्नांचा बंगला. हॉलमधल्या टिव्हीवर साबु या मालिका बघायचे तर आतल्या टिव्हीवर जाऊ भयाण हिंदी मालिका बघायची. नशीबाने असंभव आल्याने माझी सुटका झाली. आता तेच चालते, मुलगी गणपती पहाते आणी साबु सौभाग्यवती पहातात.:फिदी: साबुंना सारखे चॅनेल बदलायची सवय असल्याने पसंत आहे मुलगी आणी अस्स सासर सुरेख बाई दोन्ही आलटुन पालटुन पहायला मिळतात. मधून कधीतरी कमला टुमला पण बघायला मिळते.

साबु सौभाग्यवती पहातात >>>> रश्मी साबांना दंडवत माझ्याकडुन. माझ्या साबांना सौभाग्यवतीचा कॉन्सेप्टच आवडलेला नसल्याने आमच्याकडे तो छळ होत नाही.. अवांतराबद्दल क्षमस्व.

<< माझ्या साबांना सौभाग्यवतीचा कॉन्सेप्टच आवडलेला नसल्याने ..>> घरातल्यांचां सौभाग्य ! Wink

सावंतवाडीत आलो होतो, रस्त्यावर नवीन पर्यटनस्थळाला भेट द्यायलाच हवी होती
(नायतर घरगुती भुते माझ्या मानगुटीवर बसली असती!)

IMG_20160617_123957.JPG

छान प्रचि !
<< रस्त्यावर नवीन पर्यटनस्थळाला भेट द्यायलाच हवी होती >> गेलेलासच तर निदान गुरवाक भेटून पावसासाठी गार्‍हाणां घालूंक तरी सांगला असतास तर !!! Wink

अमेय मस्तच.

भाऊकाका, मस्त व्यंगचित्र.

आता बघत नाही ही मालिका, मधे काही दिवस बघितली, कंटाळा आला.

माकां काय गरज नाय त्येची ! वाटलांच तर नाईकांकडे धाड दोन छत्र्ये; त्या छायाक
आणि सुसल्याक घरांत कोण इचारनत नाय आणि त्येंका तर भायेर फिराचीच खोड !
curlihair.JPG

नारळ (शहाळे) त्याला डोळे व केस लावलेले असतात>>>> सावंतवाडीची लाकडी खेळणी आधीच जगप्रसिद्ध आहेतच. आता ही कोकणातली नवीन कला म्हणून नावाला येईल जगभर.

सावंतवाडीची लाकडी खेळणी>> माझ्याकडे उखळ, मुसळ, जात्यासुद्धा भातुकलीची सावंतवाडीची खेळणी अजूनही आहेत.

भाऊकाका.. Biggrin

भगवती, तुझ्या लहानपणीची की लेकीच्या??
माझे काका होते तिकडे कामाला.. दरवर्षी दोन बाॅक्स खेळणी मिळायची आणि दरवर्षी हरवायची. Happy मी दहावीत गेले तेव्हा आजी काकांना ओरडली, आता बास कर खेळणी.. दहावीचा अभ्यास आहे तिचा म्हणून. Lol

<< माझ्याकडे उखळ, मुसळ, जात्यासुद्धा भातुकलीची सावंतवाडीची खेळणी अजूनही आहेत. >> माझ्याकडे वाडीचो एक सुंदर लाकडी देव्हारो आणि एक हुबेहूब बोटीवरचां 'स्टिअरींग व्हील' आसा. अगदीं तसांच एक व्हील घेवन माकां पांडूक द्येवचा आसा; खंयव भरकटताहा त्येच्या कथेची बोट, ती जरा ह्यां व्हील वापरून तरी लायनीवर येता काय बघूंक ! Wink

Pages