रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यां सांगून वेताळान विक्रमादित्याक इचारल्यान, ' निलीमाऐवजीं तां शेवंता
माईच्याच आंगात कित्याक नाय शिरलां ? जर बरोबर उत्तर दिलस..... '
boys.JPG

आज शोधता शोधता 5व्या पानावर पत्तो सापडलो ह्या सिरियलचो Wink
सीरियल आता भुयारात जाऊं बहुतेक गड़प होताली असा वाटता Happy

माझे चार जुने मित्र माकां कायमच्ये दुरावले. समोरून इले तर रस्तो क्रॉस करून, मान फिरवून चलांक लागतत. मींच झक मारलंय आणि त्येंकां आमच्या कोकणातली ही सिरीयल बघूंक सांगलेलंय ! Sad

Sad हो ना, कालचा भाग पहाताना आजच्या भागाची झलक पाहील्यावर डोकेच सरकले.:राग: आजच्या भागात तो येडा गणेश भिंतीवरची पाल पकडतो आणी आईला सांगतो की काकाचे ( माधव) ताट वाढ. शी! मला पाहुनच शिसारी आणी संताप आला. किती हा नीचपणा?:राग: आजच्या की उद्याच्याच भागात माधव सरीताला सांगतो की जमीन तुला देईन.:अओ:

इकडे दत्ताचा जीव भुयारात घुसमटलेला असतो, आपला नवरा सुखरुप घरी आलाय याचे या दत्तीला काहीच सोयरे सुतक नाहीये,उलट भुयारात काही सोने-नाणे दिसले का असे ती दत्ताला विचारते, धन्य आहे या नारीची.

ठोकळीबाय म्हमईला पोचली की नाय ते नीट कळत नाही. फोनवर बोलतांना मात्र गुरकावत असते. पण या लोकांचे हे चाळे पाहुन तीच बरोबर होती हे मात्र पटते. मला नाही वाटत की या सिरीयल मधून काही अंधश्रद्धा पसरवली जातेय, उलट असे लोक जगात आहेत, ते त्यांच्या आभासी जगात वावरतायत आणी स्वतःच्या मुर्खपणापायी स्वत;चे आणी दुसर्‍याचे आतोनात नुकसान कसे करु शकतात हे दाखवले आहे.

कुणी फेसबुकावर असेल तर प्लीज प्लीज या आजच्या भागाविरुद्ध तिथे एखादी पोस्ट टाका या गणेशच्या विरोधात.

रश्मी Happy
कालचा एपिसोड बघताना मला सरिताचा खूप राग आला, किती लोभीपणा तो ! आधी एकट्यालाच त्या काहीही माहीत नसलेल्या भुयारात पाठवते, त्याच काय होईल हा विचार नाही आणि आता तो एवढा भेदरलेला आहे तर त्याविषयी एक शब्द नाही Uhoh
परत हिला उत्सुकता सोन्याची!

ही सिरियल दिवसेंदिवस इतकी बेकार होत चाललेय की टुकार, फालतू वगैरे विशेषणं पण कमी पडावीत. इतकी वर्षं हे भुयार कोणाला दिसलं नाही का? काल गणेश जमिनीवर इतक्या खाली टॉर्च मारत होता की बापाला शोधतोय का बेडूक तेच कळत नव्हतं. सरिता माधवने निलिमावर वचक ठेवला नाहीये असं म्हणते. काल दत्ताच्या एव्हढं जीवावर बेतलं होतं तरी ही आत चकाकणारं दिसलं का असं विचारत होती तेव्हा दत्ताने एक सणसणीत आवाज काढायला हवा होता. भिकारी बाई आहे अगदी! लोकांना वश करायची पूड कनवटीला बांधून फिरत असतं का कोणी? मग एव्हढं होतं तर सुशल्या, वकिल, माई सगळ्यांना होलसेल मध्ये द्यायची ना ती पावडर. सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झाले असते. तो गणेश बापालाच खबरदार म्हणतो..तेव्हाही दत्ताने जाळ काढला नाही. माधव तर मोठा भाऊ म्हणून सर्वस्वी नालायक आहे. स्वतःच्याच घरात खोदकाम करायला म्हणे पोलिस बोलवावे लागतात. काहीही! ठोकळी तर 'आम्ही जातो आमुच्या गावा' छाप डायलॉग मारत होती, वाटलं आता हिचा गेम होणार तर पोचली वाटतं सुखरूप. तिच्या अंगात शेवंता येते तेव्हा कोणीही ते रेकॉर्ड करत नाही. आणि ती खुशाल सगळ्यांना खोटं पाडते. तो अभिराम कुठले पेपर्स आणायला गेलाय तो अजून आला नाही का?

ते गुजराती लोक आमचं काय काम आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही म्हणतात तरी हा माधव परत परत तेच विचारतो. आणि वर त्या माणसाने फोन करून निलिमचा फोन लागत नाही म्हटल्यावर हा नेभळट 'असं का?' वगैरे म्हणतो. मी म्हटलं असतं तुझं काम सांगत नाहीस मग तू आणि निलिमा काय ते बघून घ्या. मला परत फोन करू नकोस.

मला तर वाटू लागलंय की दत्ता आणि कंपनी व्हिलन निघणार आणि पांडू सगळ्यांना वाचवणार. ही सिरियल घरात बघितली जातेय त्यामुळे बाकी काहीही बघता येत नाही त्या वेळेत. झी ने हा रात्रिचा पोरखेळ बंद करावा ही कळकळीची विनंती

हल्ली ते गुजराती जोडपं ठोकळीला भेटायला म्हणून येतेय, घर वगैरे विकत घ्यायचे आहे असे दिसते.

स्वप्ना + ११११११११

हो, मला पण तसच वाटत की त्येच्या बायडीला वाडी आवडल्याने ते विकत घेऊ पहात असतील. माधव खरच ठोकळा आहे, कशाला भाव द्यायचा त्या आगाऊ जोडप्याला?

परका माणूस ओळखदेख नाही आणि एवढा आगाउपणा करतोय, हे समजायला नको का माधवाला ?
दत्तासुधा इतकेदिवस घराचंसाठी धड़पडणारा वाटत होता, तोसुद्धा स्वार्थिच दखावतायत का?

त्या दिवशी ते आण्णा माईला विडा लावून दे म्हणत होते म्हणजे निदान माईला तसं वाटलं. माझ्यासारखी बायको असती तर 'जा त्या शेवंताच्या भुताकडे आणि घ्या विडा' असं ठणकावून म्हणाली असती. ही पानाची चंची घेऊन आली Angry

निलिमा शेवंताच्या रोलमध्ये गेली की chucky सारखी दिसते. कपाळावर आठ्या अगदी तश्श्याच असतात.>>>
ऑबजेक्शन मिलॉर्ड, हा चकी चा अपमान आहे Wink
कोण हि chucky? >>> हि नाही, हा. चकी म्हणजे चाइल्ड्स प्ले नामक इंग्रजी सिनेमातला बाहुला. आपल्या 'झपाटलेला' तल्या तात्या विंचु बाहुल्याचे प्रेरणास्थान !

माझ्यासारखी बायको असती तर 'जा त्या शेवंताच्या भुताकडे आणि घ्या विडा' असं ठणकावून म्हणाली असती. ही पानाची चंची घेऊन आली>>>> अण्णांवर माईचो लई जीव असांव ना!:इश्श:Love Birds

हि नाही, हा. चकी म्हणजे चाइल्ड्स प्ले नामक इंग्रजी सिनेमातला बाहुला. आपल्या 'झपाटलेला' तल्या तात्या विंचु बाहुल्याचे प्रेरणास्थान !>>> हो का? धन्स.

जा त्या शेवंताच्या भुताकडे आणि घ्या विडा' असं ठणकावून म्हणाली असती. ही पानाची चंची घेऊन आली >>>> नैतर काय.

<< त्या दिवशी ते आण्णा माईला विडा लावून दे म्हणत होते म्हणजे निदान माईला तसं वाटलं. >> असां तर नसात ना कीं माईक अण्णा दिसतत पण अण्णांक मात्र माईच्या जागीं शेवंताच दिसता !! इतक्या हक्कान अण्णा विडो लावक सांगतत आणि ह्या सिरीयलीत कायव होवूं शकता, म्हणान आपली ही शंका !! Wink

भाउंनो, असात असात असा पण होउ शकता:)
माधवाक घालवतले काय हे लोक??, त्याच्या मागे लागलेत ते सगळे?

काल गणेशान पाल काय नैवेद्य दाखवताना पाणी सोडतात ताटाभोवती तशी पिळलान माधवाच्या ताटाभोवती?? Proud

आणि तसाच पाल पकडलेले हात न धुवताच जेवायला बसला. ईईईई. Uhoh

अरे हा अभिराम किती वेळा तालुक्याला जाणार आहे? त्या दिवशी गेला होता ना? मग रात्री झाली आणि दत्ता भुयारात अडकला. मग आता परत कश्यासाठी जातोय? तो त्या अजय देवगणशी बोलणार होता त्याचं काय झालं? माधवला पण विस्मृतीचा आजार आहे का? काल त्या गुजरात्याला सांगत होता की निलीमा तुम्हाला ओळखत नाही म्हणून. त्याने तिच्या बॉसची ओळख सांगितली नाही का ह्या दोघांना? तरी बरंय काल 'निलीमाला पण कामं असतात' एव्हढं तरी ऐकवलंन. तो माणूस ह्याला का फोन करतो? हा काय निलीमाचा अधिकृत प्रवक्क्ता आहे का?

काल गणेशाला एक ठेवून द्यावीशी वाटली. त्या छायाला पाणी काढायला त्रास होत होता आणि हा ठोंब्या तिथे बसून 'किती वेळ पाणी काढायला?' असं विचारत होता. बरं, ह्याचे हात कोकणात गेलेत का असं विचारायची सोय नाही. तिथेच राहतात. माझ्या मते गणेश आणि छाया दोघे नं. १ नौटंकी आहेत. ह्याला काही काळी विद्या वगैरे येत नाही, नुसतं ढोंग करतोय. आणि ती जीव द्यायच्या नुसत्या बाता करते. ज्याला जीव द्यायचा असतो तो असं बोलत बसत नाही. सिरियलवाल्यांना कळकळीची विनंती. हा 'सत्यम शिवम सुंदरम' नाही किंवा लिरिलसारखी साबणाची जाहिरात नाही. कथानकाची गरज म्हणून सुध्दा कोणाला आंघोळ करताना दाखवू नये. बघताना डोळे दुखतात.

बाकी ती खोटी पाल पण वैतागलेली दिसत होती काल. ती ताटाभोवती फिरवून काय केलंन ह्याने? आणि मग हात न धुताच जेवायला बसला. Sad सरिताने किती तो कमी स्वयंपाक केला होता! सगळे डाएट वर आहेत काय?

आण्णा त्या madame tussauds च्या प्रदर्शनातल्या पुतळ्यासारखे गप का र्‍हवतात? नजर अजूनही लंपट वाटते ना त्यांची? मला माईंची काळजी वाटते बुवा Happy

>>माईक अण्णा दिसतत पण अण्णांक मात्र माईच्या जागीं शेवंताच दिसता

त्यांना तिच्या जागी शेवंता दिसत असती तर ते असे रिड ओन्ली मोड मध्ये दूर बसले नसते हो. Happy

Pages