रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही दिवसांनी प्रेक्षकांचाही येइल >>>:हाहा: प्रेक्षक आत्ताच स्वत;च्या झिंज्या उपटायला लागलेत अजून रहस्य उलगडेना म्हणून.:फिदी:

ठोकळीबाय:- इनफ माधव, मी तुला इतकं सांगीतले पण तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस की मी या सर्वाचा छडा लावेन म्हणून. Angry wife smashing dishes

ठोकळ्योदादा:- निलीमा, अगं तुला कसं सांगु हे सगळे कळण्याच्या पलीकडले आहे.Confused and unsure

अर्चिसः- ममा, डॅड काहीही झाले तरी मी तुमच्या बरोबर आहे, आणी अभिदाला पण आणेन.Bravo clapping

दत्ता: सरीता, आता तू माझे डोके नको फिरवुस, माका जो काय करुचा हा तां मी करणारच.Pulling Hair Out

दत्ती ( सरीता ):- ह्ये जे काय चल्लाहा ना ते भयानक असां, तुमी बगताय ना?Nail Biting

माई:- तुम्ही पहाताय ना? मगे कित्यांक बोलत नाय? ओढा, अजून इड्याव ओढा, इकडे घराक आग लागली हांव आणी तुमी शांत रवुन इड्याव वढताय.Cigar

छाया:- माझे काय होणार? कोणी माझी चिंता करुक नाय. माझ्या वांगडा कोणी बोलुचा पण नाय.Crying Bee

गणेशः- आत्या , मी बघतय, तू काही काळजी करु नकोस.Saying a Prayer

पूर्वा:- आई, बाबा तुम्ही काळजी करु नका. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर.Tearing Goodbye

सुसल्या:- माझ्या आईचे दागिने माका होयेत, मियां कोणाक सोडुचा नाय.Angry kitten

पांडु:- ह ह ह ! इलयं, दत्ताभाव अण्णा इलयं. आणी तुम्ही लोक जां रहस्य जाणु बगतावं, तां मियां सांगुचा नाय, कारण मी लेखक असां ना.Riding a Turtle

असं वाटतंय की सिरीयल च्या शेवटी उलगडा करणार की हे सग्गळं सग्ग्ळं द्स्तुरखुद्द ठोकळीच करत होती, इतर सर्वांना पटवून द्यायला की हे सगळं खोटं आहे, मनाचे भास आहेत आणि असं काही नसतं ! >>> मग अण्णा कुठून प्रकट झाले असे मध्येच? Uhoh

लोकहो , आमच्या घरातल्या लोकांच्या आग्रहास्तव , नायकांच्या घराला पाहून आलो. मला पात्र परिचय फारसा नाही पण शेवंताची मुलगी, अन दत्ता हे लोकं दिसले. सिरियल मधे दिसत त्यापेक्षा फारच लहानस आहे ते घर. भुताच झाड पण .
भैरोबाच देउळ तर कुडाळला आमच्या घरासमोरच आहे. तिथे नाइकांच लग्न आहे अशी बातमी आमच्या कडे कामाला येणार्‍या मुलीनी दिली.
नायकांच घर टूरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन आहे सध्या!

निधी, सुलु, अन्जू धन्यवाद.:फिदी:

बेरीनाना:- येणार, येणार. भायेर हुभ रवुन कित्यांक डोळे वटारतंस.Sick In Bed

इन्ना काय लकी आहेस.:स्मित: माका पण जावचा होया.

निलिमाचा plan असणार हे नक्कीच, पैन हे सगळं ती मॅनेज कास करत असेल?

निलीमाच्या अंगात आले तरी ती बिचारी काहीच करत नाही. खाली बसून वेडावाकडा चेहरा करून बोलत असते आणि मुलीचे हक्काचे दागिने मागते. घरातील मंंडळी उगाच घाबरतात.

रश्मी, अभिराम राहिला.

इन्ना, लकी आहेस. Bw

सगळ्यात बावळट नाईक कोणता?>>>> माधव

निलीमाच्या अंगात आले तरी ती बिचारी काहीच करत नाही. खाली बसून वेडावाकडा चेहरा करून बोलत असते आणि मुलीचे हक्काचे दागिने मागते. घरातील मंंडळी उगाच घाबरतात.>>>> निलिमा नाटक करतेय अंगात येण्याचे. तिला माहीतीय, सुषमा सतत "माझ्या आईचे दागिने मला हवेत." धोशा लावत असते. नेमके तेच तिने बरोबर पकडलय. हे नाईकान्ना कळत नाही.

काही दिवसांनी प्रेक्षकांचाही येइल>>> Lol

रश्मी ग्रेट .

इन्ना घरात खोल्या नक्की किती ते नक्की सांगा हा...

बाकी धागा भन्नाट धावतोय. अगदीच सैराट.

निलिमा नुसताच त्वांड हलवता... आवाज त्याच्या घशातून येत नाय ह्या लगेच कळता.

किमान दोनदा असा प्रकार झाला तरी निलिमा विश्वास ठेवत नाही तर तिसर्‍यांदा अंगात आल्यावर मोबाइलमध्ये शुटींग करून ते निलिमाला दाखवायचा शहाणपणा कोणीच का करत नाही.???

<<... ..शुटींग करून ते निलिमाला दाखवायचा शहाणपणा कोणीच का करत नाही.??? >> निदान ह्या एपिसोडचांच रेकॉर्डींग तरी निलीमाक दाखवूंक काय हरकत आसा ? आसा कीं नाय माझ्याकडे नाईकांकडे नसलेलां श्यानपन ! Wink

किमान दोनदा असा प्रकार झाला तरी निलिमा विश्वास ठेवत नाही तर तिसर्‍यांदा अंगात आल्यावर मोबाइलमध्ये शुटींग करून ते निलिमाला दाखवायचा शहाणपणा कोणीच का करत नाही.???>>> अरे मियां तांच तर म्हणतयं केव्हापासुन.:फिदी:

भाऊ Proud अहो तुमच्या ओळखीतले कोणी आकेरीतले ( नाईकांचे गाव ) असेल तर त्येंका सांगा की आपला निरोप थंय पोचवायला.

निधी हे तर काहीच नाही. तो येडा अर्चीस तिथेच असतो की निलीमाच्या अंगात शेवंता येते तेव्हा. मग तो का नाही सांगत निलीमाला का डॅड जे काय बोलतयं ते खर असां म्हणून.:अओ: हाफचड्डी, हाफमॅड कुठला!

<< अहो तुमच्या ओळखीतले कोणी आकेरीतले ( नाईकांचे गाव ) असेल तर त्येंका सांगा.. >> वळखीच्ये खूप आसत थंयले पण ही सिरीयल इल्यापासून मेले ओऴख दाखवतीत तर शप्पत ! स्वताक व्हीव्हीआयपी समजांक लागलेत ! Wink
[ नाईक आकेरीच्ये ? एकदां गाडीचो प्रॉब्लेम झालो म्हणान एक रात्र माकां वाटता थंयल्याच एका छोट्या विश्रामगृहात काढलेली आम्ही. छानच होतां तां. आतां काय, थंय पंचतारांकीत हाटेलांय येतीत !! ]

हाफचड्डी, हाफमॅड कुठला!>> Rofl
खरोखरचं.

आता ही बया मुंबैला चाल्ली.. इकडे या प्रकरणाची शोधाशोध कोणी करायची?? Wink

पांडोबा सगळे घोळ कशे निस्तरणारय.. भैरवनाथाक म्हायती. Proud

भाऊकाका.. Biggrin

Pages