दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोंबिवली कंपनी स्फोटातील मृतांना श्रद्धांजली आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना...

डोंबिवलीतील मृतांना श्रद्धांजली. मृतांमध्ये मालकांचाशी समावेश आहे.

<< डोंबिवली कंपनी स्फोटातील मृतांना श्रद्धांजली आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना...>> +१
<<मूळ समस्या कशी सुटणार??? अशा अनेक MIDC आहेत आपल्याकडे... त्यांच आणि तिथल्या नागरिकांचे काय? >> याबाबत कायद्याच्या ब नियमांच्या तरतूदी कडक असूनही त्यांची अंमलबजावणी मात्र नीट होत नाही, हें सत्य आहे. कारणं समजायला कठीण नाहीत. रसायनिक कारखाने असणार्‍या एमआयडीसी एरियात अशा दुर्घटना वारंवार घडत असतात व त्यांत निष्काळजीपणाचाच भाग अधिक असावा असं जाणवतं.

MIDC नागरी वस्तीपासुन लांब असते, तशी डोंबिवलीची देखिल होत. पण झपाट्याने झालेले नागरीकरण यामुळे MIDC जवळ नागरी वस्ती झाली. असो या धाग्यावर ही चर्चा नको,

महागुरु, यांच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
डोंबिवली कंपनी स्फोटातील मृतांना श्रद्धांजली

Sad

रझ्झाक खान

download.jpg

वर्धा-पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील स्फोट व आगीत बळी पडलेल्या लष्करी अधिकारी व जवानांना श्रद्धांजली

मुहम्मद अली Sad

त्याच्या बॉक्सिंग बाउट्स काही पाहिल्या नाहीत. पण डिफरंट स्ट्रोक्सच्या एका भागात तो पाहुणा होता, तो अजूनही लक्षात आहे.

<< विख्यात बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन >> बॉक्सींगचं एक युगच ह्याने गाजवलं. त्या खेळात खास रस नसलेलेही त्या युगात बॉक्सींगकडे आकर्षित झाले होते कारण अलीचं बहुढंगी व्यक्तीमत्व - त्याच्या प्रचंड आत्मविश्वासाला शोभेशी त्याची लोभस घमेंड, बंडखोरीला असलेली विनोदाची झालर व प्रत्येक लढतीच्या आधीच्या आपल्या जाहीर मुलाखतीं वैशिष्ठ्यपूर्ण आवाजात व भाषेत नाट्यमय करण्याची त्याची हातोटी !! A great boxer and a great entertainer !!
अलीला शेवटचा मनःपूर्वक सलाम !

कॅशियस क्ले नांव बदलून मुहम्मद अली झाला तरीही त्याच्या लोकप्रियतेत अजिबात फरक पडला नाही..
अश्या महान बॉक्सर ला मनापासून श्रद्धांजली..
A great boxer and a great entertainer !! अगदी खरं!!

मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं वयाच्या ७९ व्या वर्षी राहत्या घरी निधन

श्रध्दांजली

माझी आवडती अभिनेत्री. सहज, नैसर्गिक अभिनयाचा वस्तुपाठ होत्या. भावपूर्ण श्रद्धांजली.

बालनाट्य आणि मी - श्रीमती सुलभा देशपांडे - http://www.maayboli.com/node/44907

तन्वीर सन्मान सोहळ्यातली मुलाखत - http://www.maayboli.com/node/22388

तेंडुलकरांची नाटकं आणि मी - http://www.maayboli.com/node/8631

माझ्या लाडक्या अभिनेत्रीस आदरांजली. Sad

Pages