दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे सुलभा देशपांडे Sad .

श्रद्धांजली सुलभा देशपांडे आणि मोहम्मद अली.

'शांतता कोर्ट चालू आहे ..' पासूनच्या त्यांच्या अगणित भूमिका आठवतात. सुलभा देशपांडे याना मनःपूर्वक श्रद्धांजली !

सुलभा देशपांडे आणी महम्मद अली Sad
दोन त्यांच्या क्षेत्रातले लेजंडस गेले.
सुलभा देशपांडेंचा इंग्लिश विंग्लिश मधला रोल आठवला.

अरेरे! फारच सुरेख माणूस गेलं Sad

सुलभाताई, मोहम्मद अली आणि मथुरेतल्या दुर्दैवी जीवांना श्रद्धांजली.

अतिशय आवडत्या अभिनेत्री..

सुलभा देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

सुलभा देशपांड्यांच्या जाण्यामुळे खूप काही हरवलं अस वाटतंय. फार दु:खदायक आणि क्लेशदायक घटना! तनवीर पुरस्काराच्या मुलाखती ऑल टाईम फेवरेट, फार फार हृद्य! 'माणसानं कसं असावं' असं वाटलेल्या फार कमी उदाहरणांपैकी एक.

व्हिक्टर कोर्चनॉय ह्या निष्णात बुद्धीबळपटूचे आज देहावसान झाले. जगज्जेतेपदाने तीन वेळा हुलकावणी दिलेल्या, सोव्हिएत रशियाकडून डिफेक्ट करून जिद्दीने वयाच्या ८० वर्षांपर्यंत खेळाची सर्वोच्च पातळी न सोडणार्‍या या माणसाला श्रद्धांजली व मानाचा मुजरा.

.

माझ्या अतिशय आवडत्या अभिनेत्री. खूप प्रेमळ, दिसायच्या त्या. चौकट राजाच आठवला. अभिनय तर अप्रतिमच होता. भावपूर्ण श्रद्धांजली! Sad Sad Sad
मथुरेतल्या दुर्दैवी जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad Sad Sad

ज्येष्ठ पत्रका इंदर मल्होत्रा यांचे निधन.
इंडियन एक्स्प्रेसमधला rear view हा त्यांचा स्तंभ अत्यंत वाचनीय असे.

Inder Malhotra Sad deeply saddened. He was one of the last who had covered Pandit Nehru to NNarendra Modi. Sharp insider view and great chronicler of events.

राज्याचे पहिले माजी पोलिस महासन्चालक सुर्यकान्त जोग यान्चे मुम्बई येथे निधन झाले.

सुर्यकान्त जोग अत्यन्त प्रामाणिक, स्वच्छ, शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व्यक्ती होत्या... १९८४ मधे दिल्लीत इन्दिरा गान्धी यान्ची हत्या झाल्यावर, ३००० शिखान्ची कत्तल झाली होती. समस्त दिल्लीकरान्चा पोलिस दलावरचा विश्वासच उडाला होता.... अशा अत्यन्त बिकट प्रसन्गी त्यान्ची दिल्लीचे पोलिस आयुक्त म्हणुन नेमणुक झाली होती. यावरुन त्यान्च्या कामाबद्दल जनसामान्याप्रती किती विश्वास होता हे दिसते.

निवृत्ती नन्तरही त्यान्नी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत.

त्यान्नी देशासाठी बजवलेल्या सेवेसाठी माझा मनापासुन नमस्कार. त्यान्च्याबद्दल अधिक माहितीसाठी,
https://over2shailaja.wordpress.com/tag/s-s-jog/

एका अत्यंत उमद्या, प्रसन्न व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वाचा अस्त ! Sad
क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ होता व ते स्वतः एक चांगले क्रिकेटर होते. त्यामुळे, शासकीय सेवेतील माझ्या कांही क्रिकेटपटू मित्रांमुळे जोग याना मैदानावरील तंबूमधे भेटण्याचा व पहाण्याचा योग यायचा. ते स्वतः अत्यंत खेळीमेळीने तिथं सहजपणे वावरत पण त्यांच्याबद्दलचा आत्यंतिक आदर , प्रेम व अभिमान याने तिथलं वातावरण भारावून गेलेलं असायचं. त्यांच्या निधडेपणाचे, नितीमत्तेचे व शिस्तप्रियतेचे किस्से तिथं ऐकायला मिळायचे, तसेच त्यांच्या सहृदयतेचे व उमदेपणाचे !
दु:खद बातमी वाचून हळहळलों. त्याना भावपूर्ण श्रद्धांजली !

Pages