Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
चनस तेच की. अडणचोट लोक.
चनस तेच की. अडणचोट लोक. बघणारे मूर्ख.
सौभाग्यवती पण अशीच एक ट प रा ट सिरीयल. सध्याच्या ३-४ सिरीयलपैकी सर्व डायरेक्टरने डोके ठिकाणावर ठेऊन काहीतरी करावे.
बघणारे मूर्ख. >>> आम्ही फकस्त
बघणारे मूर्ख. >>> आम्ही फकस्त शिवसाठी बघतो
खरकट्या हाताने पळणे
खरकट्या हाताने पळणे काय.>>>>>>>>>>
हे येवढ काही वाटल नाही.. अनेक सिनेमामधुन अनेक वेळा आपण हे पाहिल आहे की...
आणि हो बरोबर आहे .. आम्ही फक्त शिवकुमार शुक्ल साठी सिरियल बघतो..
नताशा +१ कांदापोहे , तुम्ही
नताशा +१
कांदापोहे , तुम्ही म्हणताय ते सर्व मान्य आहे. तो घड्याळ वाला प्रसंग अक्षरशः का ही ही आहे. पण ह्यातल्या कलाकार मंडळींच्या अभिनयामुळे अजूनपर्यत बघवीशी वाटली.
पुढे जाऊन ह्या सिरीयलचही होसुयाघ व्हायला नको ही इच्छा
गौरी मोलकरीण वाटत नसणार. कारण
गौरी मोलकरीण वाटत नसणार. कारण ती हापिसात काम करत हे शिवच्या अम्माला समजलंय. अम्मा-बाऊजी हापिसात जातात तिथेही गौरी त्यांना भेटते, नम्रपणे बोलते, आणि ऑफिसवर्कसाठी आली होती हे शिवकडून समजतं. (ती कशी गुणी आहे हे समजावं याचसाठी ते अचानक हापिसात जाणं घुसडलं असणार असा माझा अंदाज)
आणि अजून म्हणजे, घरी चहाला गेल्यावर "आपकी बेटी घरका काम संभालती है, ऑफिसमें भी अच्छेसे काम करती है और समझदार भी लगती है" वगैरे म्हणून अम्मा तिला ५०० रुपये देऊ करतात, "खुशी से दे रहे है" वगैरे म्हणत..
गौरी तिला "बाह्र का कुछ आप लेती नही तो हम समझते है" असं काहीतरी बोलून चहा घ्यायचा आग्र्ह करत नाही हे बघून अम्माचं मत जरा बरं होतं तिच्याबद्दल. म्हणून गौरी समझदार आहे वगैरे..
गौरी शिव च्या आई वडिलांना
गौरी शिव च्या आई वडिलांना त्याच्या ऑफीस मधे भेटली? केव्हा?
आणि मुलीन्नी नोकरी करणं एव्हढं ऑड वाटतं यू पीत? "हम हमारी बेटीयोंसे काम नही करवाते!"...बरं झालं बाबा आपण आपल्या प्रगत महाराष्ट्रात जन्मलो आणि राहतो आहोत ते!
घर गृहस्थी संभालनं...... किती कर्म कठीण हिच्या हाताखाली राहून!
मीपण शिवसाठीच बघते, डायरेक्टर
मीपण शिवसाठीच बघते, डायरेक्टर नाव बघुनंच मी पहील्या भागापासूनच अपेक्षा ठेवल्या नाहीयेत.
काल नीशाने केलेला प्रकार तर
काल नीशाने केलेला प्रकार तर जानीच्या आईलाही लाजवणारा होता. >>>> काय केल?
निशाने शिव च्या मम्मी कडून साडी घेतली हव्र्यासारखी
प्रज्ञा९ नाही अगं ती कामवालीच
प्रज्ञा९ नाही अगं ती कामवालीच वाटतेय शिवच्या आईला. काल खिडकीत उभी असते ना तेव्हा शिव गौरी बोलत असताना पाह्ते आणि म्हणते ये कामवाली के साथ मुन्ना क्या इतने देर से बाते कर रहा है?
बोअर होतेय सिरीयल आता. ती
बोअर होतेय सिरीयल आता. ती निशा इत्यंभूत माहिती कळवत राहणार, शीवच्या आईला बनारसला. तिने ५० हजार घेतले शिवने दिलेले, ते गौरीच्या बाबांनी हिसकावून घेऊन शिवला परत द्यायला हवे होते. त्या शिवच्या आईला पूर्ण family लालची वाटतेय ना आता.
कालच्या भागात एक प्रकार कळला
कालच्या भागात एक प्रकार कळला नाही. निशा ही गौरीची वहीनी आहे हे जर अम्माला माहित आहे, तरी पण तिला गौरी कामवाली का वाटतेय.
हो का! अरे बापरे! म्हणजे
हो का! अरे बापरे! म्हणजे अवघडच आहे. (प्रेक्षकांचं)
तिला अगदी कामवाली नाही पण
तिला अगदी कामवाली नाही पण गरीब लोक वाटत असावेत..
कारण काल पण ते लोक गौरीच्या घरी गेले होते तर आज्जी बाहेर द्यायच्या पोळ्या करत होत्या..आणि घरी गौरी ,नीशा.. सगळेच जॉब करतात
नाही आनंदी, गौरी तिला
नाही आनंदी, गौरी तिला कामवालीच वाटत आहे. हा सस्पेन्स उगाचच घुसडलाय मालिकेत अस वाटतय आता.
ह्म्म्म्म्म असेल पण ... शिव
ह्म्म्म्म्म असेल पण ... शिव गौरी आवडते म्हणुन घरी सांगेल तेव्हा हा मुद्दा वापरतिल कामवाली लडकी म्हणुन...
खरेच निशा ट्रॅक बोअर होणार
खरेच निशा ट्रॅक बोअर होणार आता! ती बनारस ला कळविणार...मग समज गैरसमज, राग लोभ....गौरीचं तणतणणं.......निशाला कुणीच काही न बोलणं...... शिव ची ओढाताण......आणि यांत भरडल्या गेलेले आपल्या सारखे शिवचे चाहते !!!!!
पण ती इतकं मराठीतूनच का बोलत राहते त्याच्याशी हेच कळत नाही. डायरेक्टरचा हा आय पी आहे बहुतेक...की उत्तर प्रदेशी लोकांशी मराठीच बोलायचं....... भले गैर समज झाले तरी चालतील!
सगळे मूर्ख आहेत.
नुसती गौरीच नाही, तर घरातले
नुसती गौरीच नाही, तर घरातले सगळेच शिव आणि त्याच्या घरातल्यांशी मराठीतुन बोलतात आणि लक्षात येउन हिंदीत बोलायला गेले तर मोडक तोडक हिंदी बोलतात. कैच्याकै आहे राव
गौरीला मे महिन्याच्या सुट्टीत
गौरीला मे महिन्याच्या सुट्टीत एखाद्या 'बाल-अभिनय कोर्स' ला घालायला हवे होते. थंड डोळे, एकसुरी बोलणं आणि मख्ख चेहरा ! तिच्यापेक्षा 'चौबे' चांगला अभिनय करतो.
मला हे कळत नाही शिव आणि गौरी
मला हे कळत नाही शिव आणि गौरी दोघे निदान डिग्री प्लस काहीतरी शिकलेले आहेत. इंग्लिश कॉमन भाषा आहे दोघांसाठी. पण नाही. मराठीच बोलायचे. चौबे, वेणू ग्रेट आहेत त्या मानाने. मितू क्रीपी आहे. काल तर त्या निशाने सर्वच पैसे घेतले? असे कोणी करते का? ही प्रातिनिधिक मराठी फॅमिली नाही वाटत. किंवा आजकाल असेच असेल. शिवच्या आईचा लाल चुडा छान दिसत होता. ती स्क्रीन वर आली की 'उगीचच हिंदी सिरीअल पाहिल्या सारखे वाट्टॅ. गौरी काल भेटायला खाली आली पण तिथे ही कटकटच काही प्रेमळ कटाक्ष वगिअरे नाहीच. आर्ची ने इन्स्पायर्ड आहे का?
गौरी काल भेटायला खाली आली पण
गौरी काल भेटायला खाली आली पण तिथे ही कटकटच काही प्रेमळ कटाक्ष वगिअरे नाहीच. आर्ची ने इन्स्पायर्ड आहे का?>>>>>>>>>>>.
हो ना...
अगदी शेवटी हसत होती... पण तेवढच..
प्रेमळ नोकझोक दाखवायची आहे पण गौरीला जमत नाहिये..
शिव बिचारा उगाच उठाबशा काढत होता..
तो काढ ला कान समजला आणि
तो काढ ला कान समजला आणि म्हणुन त्याने कान पकडले.
बादवे, गौरीच्या मनात जर शिवविषयी प्रेम नाहीये, म्हणजे तिला अजुन तस वाटत नाहीये तर काल तो पान आणायला जातो म्हटल्यावर हि पळत पळत खाली का आली? आणि तोसुद्धा तिची वाट बघत का थांबला होता? कालचा हा सीन थोडा नंतर हवा होता अस नाही वाटत?
विठ्ठल, खरे आहे तुमचे. चौबे
विठ्ठल, खरे आहे तुमचे. चौबे तर मस्तच अभिनय करतो हिच्या पेक्षा....
आणि अमा....सगळेच्या सगळे पैसे घेतले तिने..... म्हणजे काय.? ..थोडे घ्यायला पाहीजे होते...?
आजकाल असेच वगैरे नसते! इतके स्वस्त आणि उथळ लोक असतीलही जगात..पण त्यांना टरकावणारे ही असतात!
गौरीला नीट हसताही येत नाही...... प्लीज बदला ही हिरॉईन....................
आम्ब ट गो ड अहो उत्तरेत पद्धत
आम्ब ट गो ड अहो उत्तरेत पद्धत आहे मुंह दिखाई किंवा तसे मुलांच्या हातात कॅश ठेवायची. तर एक नोट दिली तर हातात घेउन पाया पडून बाजूला व्हायचे असते लहानांनी. गौरीने पण आईने दिलेले पाचशे घेउन नमस्कार करून बाजूला व्हायला हवे होते. पन तिथे स्वाभिमान आणि हिने सर्व नोटांचा क ट्टाच घेउन टाकला. ते बरोबर नाही. म्हणजे ट्रेमधून प्लेट्स आल्यावर सर्व ट्रेच ठेवुन घेण्यासारखे झाले.
मला आता वेगळीच शंका येतेय,
मला आता वेगळीच शंका येतेय, ह्या शिवसाठी अमराठी प्रेक्षक मालिका बघत असणार आणि त्यांना असं वाटणार की मराठी माणसं वाद घालत बसतात बाहेरच्यांच्या समोर, सून लालची असते, ती मंग्याची आई एक. इथे राहतात त्या अमराठी लोकांना नाही वाटणार पण इतर ठिकाणी ह्या सिरीयलमुळे असं वाटेल की काय.
मध्यमवर्ग हि संकल्पनाच समजत नाहीये का शिवच्या आईला, हे काही पटत नाही. मुंबईत एवढा स्वताचा flat असणं ही किती मोठी गोष्ट आहे.
गौरी तिला कामवालीच वाटत
गौरी तिला कामवालीच वाटत आहे.>>>> त्या मोजोच्या घरच ठिक आहे, त्यान्च्याकडे टि.व्ही नसतो म्हणून त्यान्ना जगात काय चालले आहे हे माहित नसते,पण शिव च्या आई तसे नाहि ना, तिथे बनारस मध्ये ती टि.व्ही बघते तरी तिला माहित नसते का मुम्बईत or कुठेही मिड्ल क्लास मुली ह्या job हि करतात आणि घर हि साम्भाळतात. त्यात वावगे असे काहीच नाही. मुम्बई मध्ये flat सन्स़़कृती असते हे तिच्या गावीही नसते? तीने गौरीला कित्येक वेळा office मध्ये जाताना बघीतलेय तरीही सारख काय तिच वो कामवाली लडकी चालू असते.:अओ:
गौरी काल भेटायला खाली आली पण तिथे ही कटकटच >>>>परवा शिवची अम्मा बरोबर बोलली गौरीबद्दल,"मेरा बेटा अच्छे से बात कर रहा है, और ये लडकी उसे अकड दिखा रही है." कुठल्याही आईला हे आवडल नसत.
गौरीला भलताच आदर दिसतोय भावी सासूच्या स्वयमपाकाबद्दल. शुगो तिला विचारत होती,कस वाटल शिवच्या अम्माच जेवण , तर ही madam म्हणते कशी, " ठिक होते त्यान्चे जेवण." लग्नानन्तर सासूचा काय मान ठेवणार ते दिसतेच आहे. :राग:::अरेरे:
मोजो जेव्हा विचारतो शिवच्या अम्मा-बाबूजीन्ना तुम्ही शिवला मुम्बई मध्ये का पाठवल्,तेव्हा अम्मा-बाबूजी tense दिसत होते. नक्किच suspense आहे हयामध्ये.
शिवची हम्मा.
मन्गती
कालचा हा सीन थोडा नंतर हवा
कालचा हा सीन थोडा नंतर हवा होता अस नाही वाटत?>>>> सहमत
म्हणजे ट्रेमधून प्लेट्स आल्यावर सर्व ट्रेच ठेवुन घेण्यासारखे >>>>:खोखो:
तीने गौरीला कित्येक वेळा
तीने गौरीला कित्येक वेळा office मध्ये जाताना बघीतलेय तरीही सारख काय तिच वो कामवाली लडकी चालू असते.अ ओ, आता काय करायचं >>> अगं ,तिने तिला दूपारच्या वेळेस परत येताना ही बघितलं असेल .
आणि तिला वाटत असेल , की ही ऑफिसमध्येही 'काम' करायला जाते .
निशा, 'कारेदु' मधल्या
निशा, 'कारेदु' मधल्या शोभासारखी वाटते.
अतिशय फालतुपणा चाललाय. -
अतिशय फालतुपणा चाललाय.
- मुंबईतील मराठी लोकांना हिंदी बोलायला येत नाही.
- शिवचे आई वडील इतके अडाणी की त्यांना मुंबईतील जराही माहीती नाही
- त्यांचे ते ऑफीसात घुसणे
- गौरी कधीही ये जा करते ऑफीसमध्ये.
-निशा सारखी फालतु सून
- आणि कुठल्या काळात पेपर फाईल्स न्यायला, द्यायला, सही करायला स्वःतच एम्प्लॉयी जातात?
- आणि चपरासी नाही काय चेक पोचावायला? ते हि डिजिटल काळामध्ये? ईलेक्ट्रॉनिक सिगनेचर हा ही प्रकार असतो आजकाल माहित नाही डायरेक्टरला?
- गौरीचे डोळे हा संशोधनाचा विषय आहे. थंड काळ्या डोळ्याचा भाग, खास करून ( pupil and iris) इतके भावहिन..... जराहि डोळ्यात चमक नाही. गाजर ज्युस पी आणि पालक खा गं बाई.
- शिव आवडतो म्हणूनच येते ना खाली तरी ते ओरडून भांडत बसणं.... जराही खट्याळपणा नाही.
- मीतु आणि वेणू खरेच छान अँक्टींग करतात.
- वेणू खरच मस्त वाटतो.
- आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, शिव अँक्टींग चांगली करतो. डोळे बोलके आहेत. उसके अब पर निकल आ रहे है... आई जेव्हा मुली पाहिल्या आहेत सांगते तेव्हा गौरी कडे कटाक्ष टाकतो...
एकट्या शिवच्या जीवावर किती दिवस आम्ही तग धरणार....
कालचा घरात पगाराचे पैसे
कालचा घरात पगाराचे पैसे देण्याचा सीन डोक्यात गेला.
सासरे तुझे पैसे परत करतो म्हणालेत त्याची लाज नाही. मदत म्हणुन शेजारचा मुलगा पैसे आणुन देतो तर तुमच्यावरच्या कर्जातले ५०,००० मिळाले म्हणुन सांगते, काल सासुच्या हातातुन पैसे काढुन घेते आणि म्हणते की तसेही नंतर तुम्ही मलाच देणार त्यापेक्षा मी आत्ताच घेते आणि हे सगळ चालु असताना सासु, दुनियेवर खार खाउन रहाणारा सासरा आणि सतत वसवस करणारी नणंद गप्प बसुन तोंडाकडे बघत बसतात तिच्या. आजेसासु बोलायला जाते तर सासु गप्प करते तिला, का तर म्हणे जेवताना वाद नकोत, मग काय हे बघुन शांतपणे जेवत बसायच की काय बाकीच्यांनी.. मूर्ख लेकाचे.. मोजो आणि गौरी बाहेरच्यांवर जेवढा आवाज काढतात त्यापैकी २% आवाज इथे काढला असता तर निशाची ही हिंमत झाली नसती.
Pages