काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरी भाव देत नाही शिवला, क्रेडीट पण देत नाही हिंदी शिकवण्याचं आणि साधे आभार मनात नाही तर हा शिव कशाला मागे मागे करतो तिच्या, अजिबात भाव द्यायचा नाही. ते पैशाच्या मदतीबद्दल वेणू सांगतो म्हणून विचारायला जातो ते ठीक पण एरवी पण अति भाव देत असतो आणि ती आगाऊपणा करते, तु क टाकते त्याच्याकडे.

बरं सगळे शिव व गौरीबद्दल बोलतायत तर मी निशावैनीला भाव देते. आजच्या भागात ही हावरट व नासमझ बाई, चक्क शिवने दिलेले पैसे ( पन्नास हजार की जास्त) उचलुन सासर्‍याला उद्धटपणे बोलताना दाखवलीय की तुम्ही शब्द दिला होतात की विकीने माझे जे पाच लाख उडवले ते परत कराल तेव्हा हे पैसे माझे आहेत, बाकी उरलेले द्यायची जबाबदारी तुमची. आणी मग मोजो हतबुद्ध होऊन तिच्याकडे पहात रहातात. अरे काय बाई आहे ही?:राग: इतके घाणेरडे कॅरेक्टर का दाखवलेय? एखादी सून अशा नीच पातळीवर कुठलाही कॉमन सेन्स न दाखवता उतरु शकते?:अओ: नक्की काय दाखवयचय झी मराठी वाल्याना? हे असले काहीतरी बीनबुडाचे दाखवतात म्हणून टिव्ही फोडावासा वाटतो.:राग: तो पाणचट मुर्ख नोबिता परवडला या असल्या सिरीयलपेक्षा.:राग:

गवरी लैच तु.क. टाकुन र्‍हायली...

शिव सही..

मोजो विचारतात तुला काय हव ते माग .. तेव्हा काय सही बघतो गौरी कडे..
आणि गौरी तर ध्यानच आहे..

काल नागराजचा इंटर्व्हिव्यु होता ए बि पी वर तो म्हणाला जर कलाकार नीट अभिनय करत नाहित.. जे हवे
ते लोकांपर्यंत नीट पोहचत नाहित तर त्याला दिग्दर्शक जबाब्दार असतो...
इथे पण दिग्दर्शकाने सांगितल पाहिजे तिला की बाई तुलाखरखरं नाही लुटुपुटु च चिडायचं आहे..

शिवचे आई नी
बाबा येणार आता... आता तरी चिडु नये ही बाई

ह्या मालेकेतल्या हिरविणी घरात पण असे बाहेर सारखे चुडीदार / सलवार कमीज असे कपडे का घालतात? अगदी झोपताना पण ओढणी वगेरे घेऊन झोपतात. ह्यांच्याकडे ट्रॅक पँट / केप्री / पलाझो / गेला बाजार नाईटी किंवा साधा कॉटनचा सैलसर कुडता पण नसतो का Uhoh अधू पण तशीच होती Angry

जानी झोपताना छान सिल्कची नाईटी घालायची. उर्मी पण झोपताना वेगळे कपडे घालते.

गौरी भाव देत नाही शिवला, क्रेडीट पण देत नाही हिंदी शिकवण्याचं आणि साधे आभार मनात नाही तर हा शिव कशाला मागे मागे करतो तिच्या, अजिबात भाव द्यायचा नाही. ते पैशाच्या मदतीबद्दल वेणू सांगतो म्हणून विचारायला जातो ते ठीक पण एरवी पण अति भाव देत असतो आणि ती आगाऊपणा करते, तु क टाकते त्याच्याकडे.>>>> सहमत. आज गौरी पुन्हा पुर्वपदावर आली :राग:. तिला वाटत कि, शिव मोजोशी पर्सनल काहीतरी बोलणार म्हणजे हा मोजोकडे मला लग्नासाठीं मागणी घालणार की काय? Lol ते म्हणतात ना , चोराच्या मनात चान्दणे तसे गौरीचे चालले आहे. तो फक्त पैश्याबाबत तिला विचारणार होता हे तिच्या गावीही नाही. कैच्याकै गौरी.

ती watchman समोर शिवचा अपमान करते ते एकदम crass होते. शिक्षकाचा असा अपमान? शुगो असायला हवी तिथे, चान्गले झापले असते तिला. तो शिव तिच्याबद्दल बरोबर बोलला, " पल मै तोला पल मै मासा."

Sad ...
+१

Bagh naa

अजूनही आहेत का??? मला वाटलेलं संपले एकदाचे बदामाचे वाटेकरी.>>> एवढ्यात कसे संपतिल Uhoh आम्ही त्याच्यासाठीच बघतो शिरेल

शिवला मुंबईत येऊन २ महिने झालेत.
शिवची आई त्याला फोनवर अचानक सांगते की ते मुंबईत येत आहेत.
शिव आणि गौरी सामान लावत असताना शिवचे वडील फोन करतात की कल्याण स्टेशनवर पोचतोय, न्यायला ये.
म्हणजे ते बनारसहून ट्रेनने येतात.
ऐनवेळेला ट्रेनमधे घुसून तर काही येणार नाहीत ते.
म्हणजे आधी रिझर्वेशन करायला हवं.
ट्रेनची रिझर्वेशन्स ३ महिने आधी फुल्ल होतात. म्हणजे शिव नोकरीला मुंबईत यायच्या आधीच हे रिझर्वेशन झालेलं असलं पाहिजे Wink

:१४-१५ वर्षं असे हिशोब करून ४-४ महिने आधी प्रवासाचा दिवस ठरवून त्या दिवसाचं रिझर्वेशन ज्या दिवशी ओपन होईल त्यादिवशी खिडकी उघडायच्या आधीपासून तिथे जाऊन नंबर लावणारी बाहुली:

Proud

Pages