काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो तसा नाहिये, माझा त्याच्यावर विश्वास आहे. हे काय बोलणं झाल???
गौरीने कस,
'एक तर मुर्खासारखी इथे तिथे पर्स ठेवायची, आणि पैसे गेल्यावर दुसर्‍यांना धारेवर धरायच. इतकीच मिजास आहे ना स्वतःच्या पैश्यांची तर आधी जे हरवलेस ते आणुन दाखव. आमचेच खाउन वर आमच्यावर गुरगुरतेस?? लाज नाही का वाटत?? मोठी आली तोंड चालवणारी.'

अय्य्यो लोक किती मागे लागलेत गौरीच्या

शिव मात्र कातिल.. चहा पिताना काय मस्त बघत होता..

दहा वेळा लिहुन झाल आता परत लिहिते..... गौरीला थोडे हसण्याचे डाय्लॉग का देत नाहित..
सिरियल सुरु झाल्यापासुन जे चिड्त आहे ते अजुन तसच.

का येवढी चिडली आहे आत्ता शिव वर हे पण कळत नाहिये..

बहुतेक तो मितुला काही स्पष्ट सांगत नाहिये म्हनुन??

'एक तर मुर्खासारखी इथे तिथे पर्स ठेवायची, आणि पैसे गेल्यावर दुसर्‍यांना धारेवर धरायच. इतकीच मिजास आहे ना स्वतःच्या पैश्यांची तर आधी जे हरवलेस ते आणुन दाखव. आमचेच खाउन वर आमच्यावर गुरगुरतेस?? लाज नाही का वाटत?? मोठी आली तोंड चालवणारी.'>> शुके असे ड्वायलॉक फक्त त्या त्या शिरेलीतल्या त्या त्या वेळच्या व्हिलन पात्रांनीच म्हणने अलाऊड आहे. बाकी लोकांनी म्हणले तर तो फाऊल समजला जातो. Proud

अरे देवा....हिचे थंड - बर्फगार डोळे पहावत नाहीत! काही म्हणजे काहीच भाव नाहीत चेहेर्‍यावर.
शिव मात्र मस्त एक्स्प्रेशन्स देतो!
कुणी हिला समजावून सांगत नाही का? डायरेक्टर कसे काय ओके करतात शॉट्स?
विराज (सौभाग्यवती) परवडला या दिग्दर्शका पेक्षा!!

बाकी सगळ जाऊद्या हो.. पण मला ना त्या बिचार्‍या शिकवणीला येणार्‍या मुलांच्या भविष्याची काळजी वाटुन राहीली आहे. ह्यांच्या घरात जरा आवाज चढले की ती शुगो मुलांना लगेच घरी पाठवते.... दुसरं काही होवो न होवो पण ही माणसं घरगुती शिकवणीवाल्यांच्या पोटावर पाय देणार बहुतेक.

मुर्ख आहे ती गवरी आणि डायरेक्टर पण. मीठ घातलेला चहा का बरं देते ती त्याला. काय्च्या काय. एकतर हिच्या तिरसट हेकड्या बापाला शिकवायला यायचं नी ही अशी काय वागते उगीच्या उगीच.

दिल और दिमाग ची लढाई चालू आहे तिची. मन म्हणतय त्याच्यावर प्रेम आहे त्याचा स्विकार कर पण वडिलांचे संस्कार, स्वभाषेवरच प्रेम, अतिशिस्त आडवी येतेय. पुन्हा त्यांना वहिनीचे पैसेही परत करायचेत त्याचही टेंशन आहेच. मग चिड चिड नाहीतर काय होणार ग स्मिता??

बर घरी कुणावर राग काढावा?? भाऊ शामुळा, वहिनी भांदखोर, आई तिच्या शिकवण्यात आणि आज्जी कायम स्वयपाकघरात बिझी. मग शिवच राहिला न हक्काचा ज्याच्यावर राग काढावा असा. आणि दिलमें है प्यार पर होठोंपे इन्कार अशी तिची गत शिवने बरोबर ओळखली आहे म्हणुन तर तो तिच्याकडुनच कबुल करवुन घेणार की तिचं त्याच्यावर प्रेम आहे.

हक्काचा शिव? बरं असेल असेल. पण म्हणून काय त्याला मीठाचा चहा पाजेल? ते ही कढईभर भाजीत घालणार होती एवढं मीठ घातलं तिने त्या अर्ध्या कप चहात. तु काहीही म्हण शुभांगी पण मला त्या गवरीचा खुप राग आला आहे. ही शिवच्या आणि शिव हिच्या प्रेमात नाही पडली तरच बरं. Lol

ते प्रेमात पडणार नाहिच्चेत दिग्दर्शक त्यांना आपटेल बघ प्रेमात पुढच्या १० एपिसोडस मधे. Lol
पण ती गौरी कैच्या कै थंड आहे. शिवची दया येते अगदी.

अग हक्काचाच आहे की ती किती त्याला हाडहुड करते तरी बिचारा काय म्हणतो का तिला? एकतर त्याला कै कळत नाही किंवा मग हिच सगळं हसणं, रडण, रागावण. बडबडणं त्याला सारखच वाटत असेल जस आपल्याला वाटत Wink

प्रकरण >>> : हहगलो:

सही... अजुनही दोन तीन किलर लूक दिले त्याने या एकाच सिन मधे... >>> हो सगळे कॅप्चर नाही करता आले.
परत एक्दा प्रयत्न करेन Happy

शिव जरा जास्तच भाव देतोय तिला, मम गुब्बे.

ओये होये शिव काय दिसतोय, वॉव.

अरे त्या शिकवणी सीनचं मी झी फेसबुकवर लिहिलं तरी त्यांच्या डोक्यात शिरेना. बरं पालक विचारत नाहीत का रोज काय कुठल्या ना कुठल्या कारणाने लवकर येता.

ही मालिका इतर भाषिक बघतात त्या शिवसाठी मग त्यांचा समज मराठी घरात नेहेमीच वाद विवाद होतात, नीट शिकवत नाहीत मुलांना असा होणार नाही का.

अन्जु, मालिकावाल्यांची फेसबुक पेजेस असल्या कमेंटी वाचण्यासाठी असतात का? राखेचाच्या फेसबुक पेजवर लिहिलेल्या कमेंट्स काय उत्तर मिळाल लक्षात आहे ना? तु कुठेही काहीही कितीही वेळा लिही, ते त्यांना हव तेच करणार आणि आपल्याला दाखवणार. आपणसुद्धा ते बघणार आणि इथे येउन किबोर्ड बडवणार.

तो शिव आईकडे पैसे मागणार दिसतोय मोजोंची देणी फेडायला!!
खारट चहा काय पितो!
मराठी पेपर सुरु करतो!

मुगु अग मी बघायचीच नाही हा विचार करतेय पण शिवसाठी बघतेय, कारण मालिकाप्रेमी नाहीये फार मी.

रायटर डायरेक्टरला तेच तेच सीन दाखवण्यात काय क्रिएटीविटी वाटतेय काय माहिती.

पालक विचारत नाहीत का रोज काय कुठल्या ना कुठल्या कारणाने लवकर येता. >>> त्या गौरी ला तरी कोण विचारत> , रोज दूपारी कशी काय निघुन येतेस ऑफिसमधून Wink

स्वस्ति करेक्ट. पण तो मुलगा म्हणतोना येणार नव्हतो पण आई म्हणाली आपण पैसे देतो, त्यामुळे त्याची आई जागरूक दिसतेय Wink .

बरं ती ऑफिसमधून लवकर निघालेली बॉसला पण चालते. एकदाच फक्त शु गो ने विचारलं होतं लवकर आल्याबद्दल तिला.

तु कुठेही काहीही कितीही वेळा लिही, ते त्यांना हव तेच करणार >>>>>>>>>>

त्यांचे पुढचे बरेचसे एपिसोड शूट पण करुन झाले असतिल.

Pages