"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राव प्रमाणेच "पेशवा" असा एकेरी उल्लेख बरेचदा खटकला. मस्तानीने "पेशवा" मागितला असा काहितरी उल्लेख होता...

Mi so started using dentures or what? In one shot his teeth was looking artificial ! (how now a days Rishi ka poor's teeth are looking )

बापरे, मिसो इतका महत्त्वाचा कॅरॅक्टर होता का मूव्ही मध्ये! बर्‍याच जणांनी मिसो ला साग्रसंगीत पाहून घेतलेय Rofl

चिमाजी अप्पा परवा माझ्या फ्लाइट ला होते मुम्बई _नागपूर विमानतळावर कोणी ओळखले नाही त्याला, कदाचित मूवी मध्ये गेट अप वेगळा आहे म्हणून असेल ( टक्कल )

भन्साळीचं चुकलच म्हणायचं,
थोडीफार कॉम्पुटरग्राफि वापरुन मिसोलाच बाजीराव केला असता तर इथल्या बर्‍याच "गिर्‍हाईकांनी" (मिसो मिसो मिसो करणार्‍यांनी) डबल - टिबल बघुन त्याच्या धंदा वाढवला असता.

हो सिम्बा...

चिमाजी अप्पा नागपुर चे आहेत्...वैभव तत्त्ववादी नाव आहे त्याचे. नागपुर ला त्याचे वडिल ही नाटकांमध्ये काम करायचे/करतात

वैभव तत्त्ववादी - कॉफी आणि बरंच काही मधला लीड अ‍ॅक्टर.
महाग्रूंच्या झी मराठीवरच्या डान्स शो मध्ये पण होता ना एका सीझन मध्ये. बहुतेक तोह फायनल विनर होता तेव्हा. एरवी छान दिसतो. पण चिमाजी अप्पा म्हणून मला आवडला नाहीये.

सुरवातीला भानू काशीबाईंना अस्थिकलश देते तो प्रसंग फारच तुटक वाटला. निदान शेवटीतरी काही संदर्भ द्यायला हवा होता.
मस्तानी बाजीरावाविषयी प्रेमापेक्षा obsessiveच जास्त वाटली Sad
शेवटी बाजीराव नदीत उतरतात तेव्हा काशीबाई आणि बाकीचे सेवक त्यांना अडवत का नाहीत? ते तापात, भ्रमात आहेत, जिवाचे बरेवाईट करून घेऊ शकतात हा विचार मनात नाही आला? काशीबाई आणि राधाबाई नदीकाठावरून ते शांतपणे बघताना दाखवलेत Sad
मरतानाही बाजीराव आणि मस्तानी अचूम टायमिंग साधतात!

मला वाटते अलरेडी वैद्याने 'इन्हे अब दवा की नही दुवा की जरुरत है' सांगितल्याने त्या दोघांनी 'जा बाबा आता पाण्यात..तसाही थांबवून बरा होणार नाहीयेस' म्हणून सोडले असावे.
अस्थि कलशाचा प्रसंग खरंच तुटक आहे.

मस्तानीचे ते गाणे मी यू ट्यूबवर बघितले. अप्रतिम सेट आहे तो. मागच्या डोंगराचा भाग बहुतेक नंतर जोडला आहे पण तसे जाणवत मात्र नाही. एकसंध वाटतो तो.

गाणे मात्र दबक्या आवाजात का गायलेय ? मोकळ्या गळ्यानी गायची आपल्याकडे पूर्वापार प्रथा आहे. आवाज चोरणे तर अजिबात मान्य होत नसे. चालही यथातथाच वाटली ( बिभास का ? ) बागेश्री सारखा एखादा शृंगारीक राग असायला हवा होता.

ते गाणं 'मोहे रंग दे लाल' हे भन्सालीने 'मोहे पनघटपे नंदलाल' या गाण्यासारखं करण्याचा प्रयत्न केला आहे, फिकट रंग, सेट्स, कारंजी सगळ्याच गोष्टी मोहे पनघटपे ची आठवण करून देतात, दीवानी मस्तानी हे गाणंही प्यार कियाची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण कुठे मधुबाला आणि ते स्वर्गीय गीत आणि कुठे दीपिका..!

जर हा सिनेमा बनवता आला आणि काळाचे कप्पे उलटे सुलटे करता आले तर मनात दडलेली मस्तानी म्हणून हिलाच घेईन सिनेमात.

waheeda-rehman-bees-saal-baad[1].png

अहो कापोचे, संजीवकुमारला बाजीराव केलं तर त्यात काय वाईट आहे? तरूणपणी तो चांगला फिट आणि देखणा दिसायचा, त्याच्या अभिनयक्षमतेविषयी कोणालाच शंका घ्यायचे कारण नाही. बाजीरावाचा भ्रम आणि आजारपणातले शेवटचे दिवस त्याने त्याच्या अभिनयाने जिवंत केले असते. तसा तो वहिदाला काहीसा समकालीनही होता. राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद यांची आपण बाजीराव म्हणून कल्पनाही करू शकत नाही. फिरोज खान, संजय खान, धर्मेंद्र, विनोद खन्ना नुसतेच देखणे होते, अभिनयाच्या नावाने बोंब. त्यामुळे तरूणपणीचा फिट आणि देखणा संजीवकुमार बाजीराव म्हणून शोभला असता असे माझे प्रामाणिक मत आहे.

वहीदा जबरी. त्याकाळात राजा म्हणजे प्रदीप कुमारच झाला असता. लोक फायटिंग सीन्स ना स्टंटमेन वापरतात तसे त्याने अ‍ॅक्टिंग सीन्स ना वापरले असते.

>> लोक फायटिंग सीन्स ना स्टंटमेन वापरतात तसे त्याने अ‍ॅक्टिंग सीन्स ना वापरले असते.

Lol

त्या रणवीर सिंघ ला विचित्रच वाटत असणार .. म्हणजे कोणाला वाटतंय संजीव कुमारने असायला हवं होतं बाजीराव तर कोणाला प्रदीप कुमार .. संजीव कुमार अ‍ॅक्टींग मध्ये एकदम सॉलिड पण "वाट लावली" गाण्यात संजीव कुमार ला इमॅजिन करून कससंच झालं मला .. प्रदीप कुमार बद्दल तर मला काहीच बोलता येणार नाही ..

तर अशा दिग्गज लोकांच्या लाईनमध्ये रणवीर सिंघला स्वतःला बघून काय वाटत असेल .. Wink

>> लोक फायटिंग सीन्स ना स्टंटमेन वापरतात तसे त्याने अ‍ॅक्टिंग सीन्स ना वापरले असते. >> Biggrin

अरे वहिदाला मस्तानी केलं तर सुनील दत्तला बाजीराव करणे भाग आहे. ते रात भी है कुछ भीगी भीगी मध्ये दोघे कसले लस्टी (फॉर दि लॅक ऑफ बेटर वर्ड) आणि डेस्पो आहेत. Wink

येस! तेव्हाचा सुनील दत्त शोभला असता वहिदा बरोबर.

सुनील दत्त, राजेश खन्ना वगैरेंचे चित्रपट चांगले आहेत का हे त्यांच्या कानावर केस वाढवलेली हेअर स्टाईल आहे का या एकाच चेक वरून ओळखता येतात Happy

संजय लीला भन्साळीच्या फ्रेमवर्कमधेच बाजीराव करायचा का ? Proud
बिचा-या बाजीरावाने आयुष्यात लढाया सोडून अभिनय वगैरे किती केला असेल त्याचं त्यालाच माहीत. आम्हाला प्रेमनाथ, दारासिंह पण चालले असते. उत्कट सीनमधे पाठीमागून कॅमेरा, मनोजकुमारचं पंजा आणि जितेंद्राचं खांब तंत्रज्ञान जोरात होतं की तेव्हां ! पब्लीकला चालाय्चं ते !

मस्तानी सुंदर दिसली पाहीजे फक्त, हिरो म्हणून दोन हात दोन पायाचा ठोकळा आणून बसवला तरी चालत होतं.

बाजीराव म्हणून मला हृतिक चालला असता पण तो अकबर बनून झाल्याने डोक्यात तो ठसा आहे. उद्या नितीश भारद्वाज ने धृतराष्ट्र किंवा धनानंद किंवा गणेश असा रोल केला तर डोक्यात गडबड होईल ना? तसे.
जुन्या काळात बाजीराव म्हणून धर्मेंद्र चालला असता Happy

Pages