क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या २०-२० चे हायलाईट्स पाहिले. शर्माने ३-४ फिल्डर्स मधून काढलेल्या गॅप्स, बुमराह चे यॉर्कर्स, धोनीची हेलिकॉप्टर सिक्स व त्याहून भारी ती दुसरी ऑफ साईडची, कोहलीचे 'व्हिपिंग' फ्लिक्स व युवराज चा खतरनाक कॅच. सगळे बघायला मजा आली.

कोहली फ्लिक करताना किंवा लेग साईडला मारताना एक व्हिपिंग अ‍ॅक्शन करतो - आयत्या वेळा मनगट फिरवून- ती मी आधी इतक्या सतत कोणी करताना पाहिलेली नाही. त्याला बहुधा पाहिजे तिकडे बॉल ला दिशा देता येत असावी. अझर, लक्ष्मण वगैरे असे करत पण ते करताना इतक्या उघडपणे दिसत नसत ते, आणि त्यांचा भर पॉवर पेक्षा टायमिंग वर असे. सचिन शेवटच्या ३-४ वर्षांत ऑफ साईडला मारताना बॅट पाहिजे तेवढी ओपन करून असे करत असे. पण लेग ला सहसा नाही.

जगातील सर्वात सुंदर बोलिंग अ‍ॅक्शन मधे बॉब विलीस, फॅनी डी विलियर्स, सोहेल तन्वीर नंतर बुमराह असेल Proud

त्याला बॉलिंग टाकताना अचानक फिट आली की काय? असे वाटत राहते.

त्या फॅनी डी विलियर्स ने सचिनला बराच त्रास दिला आहे. बरेचदा आउट व्हायचा तो तेंव्हा.

अहो भाऊ, शेवटच्या ओव्हरबद्दलचे ते केदारच्या नेहराच्या प्रश्नाला उद्देशून होते.

जगातील सर्वात सुंदर बोलिंग अ‍ॅक्शन >> मलिंगा राहिला फा Happy

वेगवान गोलंदाजांना पुढे येत फ्लिक करणे, ते देखील खणखणीत आणि ईतक्या प्रभावीपणे, हे देखील कोहलीच करू जाणे..

जगातील सर्वात सुंदर बोलिंग अ‍ॅक्शन मधे बॉब विलीस, फॅनी डी विलियर्स, सोहेल तन्वीर नंतर बुमराह असेल फिदीफिदी>>>>
अजून एक म्हणजे पॉल अ‍ॅडम्स..

कच्चा खाल्ला असता>>> खरंय..
युवराज ला मराठी कळत असतं तर 'जीव भांड्यात पडला' या म्हणीचा अर्थ त्याला आज कळला असता Wink

९ मधे ५ होते
शेवटच्या ओव्हरचा पहिला चेंडू पण तोच खेळणार होता तो खेळू पर्यंत संबंध भारताने त्याला किमान ५०-६० शिव्या तरी दिल्या असतीलच. फोर सिक्स मारल्यावर पण ३ रा चेंडू वायाच घालवला ते नशिब रैना पळाला. आणि पुढच्या ३ चेंडूत ८ रन्स काढले

ह्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील धांवा वैगेरेचे मजेशीर गणित पहा! लक्षात येईल की पुर्णपणे भारतिय संघच वरचढ होता! Wink

एकूण सामने ८ झाले पहिले ४ ऑस्ट्रेलियाने जिंकले नंतरचे ४ भारताने...

ऑस्ट्रेलिया

एकुण षटके फलंदाजी - ३०८.१
एकूण धावा - २०९८
सरासरी - ६.८१
गमावलेले बळी - ५३

भारत

एकुण षटके फलंदाजी - ३०९.५
एकूण धावा - २१३८
सरासरी - ६.९०
गमावलेले बळी - ४०

आहे की नाही मजेशीर!! Happy

' अंडर १९' मधे सनसनाटी निर्माण केलेल्या नेपाळ संघाला भारतीय संघाने लिलया हरवलंय. हा भारतीय संघही खूप समतोल व गुणवत्तापूर्ण दिसतोय. आपल्या क्रिकेटला चांगले दिवस आलेत हें निश्चित !

<< ...कधी तोंडघशी पाडतील त्याचा नेम नाही.>> अहो, ही अनिश्चितताच तर क्रिकेटची खासियत आहे ! [ कालच निमिबियाने द. आफ्रिकेला हरवून स्पर्धेबाहेर फेकले !]. जिंकतील तेंव्हां आपण नाचायचं, तोंडघशीं पाडलंच तर तोंडातून शिव्या बाहेर येतातच !! Wink

Pages