' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

Submitted by नीधप on 4 November, 2008 - 10:31

दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाच्या विषयासंदर्भाने अनेकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. साहजिक आहे कारण प्रॉब्लेम सगळ्याच आयाबायांचा आहे.
हा धागा तुमचं म्हणणं मांडण्यासाठी सुरू करतेय.
मी लेख लिहिला तेव्हा निश्चितच माझ्या डोळ्यासमोर पुढची कृती नव्हती. पण एकुणात मिळालेला प्रतिसाद बघता आपण काही करू शकतो का याबद्दल असा विचार सुरू होतोय.
माझा लेख इतर अनेक ठिकाणी देण्याबद्दल मला अनेकांनी विनंती केलीये पण एकदा इथे प्रसिद्ध झाल्यावर परत इतर ठिकाणी कोणी घेतील की नाही याची मला कल्पना नाही. कुणाला माहित असेल तर जरूर कळवावे.
माझ्याकडून होण्यासारख्या या तीन गोष्टी आहेत. ज्या माझ्या आवाक्यातल्या आहेत आणि मी त्या यशस्वीरित्या करू शकेन.
१. एका कव्हर लेटरसहीत या लेखाची प्रत मुंबईच्या महापौर शुभा राउळ यांना पाठवणे आणि त्यांना ह्या समस्येत लक्ष घालायला लावणे.
२. या विषयावर अजून अभ्यास करून मग अर्धा तासाचा एक माहितीपट तयार करणे. जो अनेक ठिकाणी लोकांवर आदळवणे (हॅमर चे भाषांतर..)
३. हाच विषय घेऊन किंवा या लेखातून २५-३० मिनिटाचा प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स तयार करणे जो वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमांच्या वेळी त्या त्या ठिकाणी जाउन सादर करणे. जेणेकरून कुठल्यातरी स्त्री समस्यांशी संबंधित कामे करणार्‍या संस्थेला ह्याचा पाठपुरावा करण्याची इच्छा व्हावी.

प्रशासकीय पातळीवर करायचे प्रयत्न करण्याची माझी ताकद वा अनुभव नाही. पण हे वरचं मी नक्की करू शकते. यात कुणाला माझ्याबरोबर यायचं असेल, मला मदत करायची असेल तर तुमचं स्वागतच आहे.

तुम्ही स्वतःहून या संदर्भात काही उपक्रम हाती घेत असाल तर तेही इथे मांडा म्हणजे कोण काय करतंय याची माहिती आणि चर्चा दोन्ही घडेल.

तसेच कुणाला काही सूचना करायच्या असतील या संदर्भात तर त्याही जरूर कराव्यात.

या सगळ्या संदर्भात अजून काही माहीती असेल कुणाला. तर तीही कृपया इथे द्यावी.

सत्यजित याने काही शोधाशोध करून माहिती मिळवली आहे ती त्यानेच इथे टाकावी अशी मी त्याला विनंती करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> व येणार्‍या प्रत्येक स्त्रीला अगदी लांबुनच आरडाओरडा करीत शब्दशः लाज आणित आधी पैसे देण्यास फर्मावित असतो <<<<
नीरजे, वरील वस्तुस्थिती सर्वाधिक भयाण आहे.
इकडे एकीकडे इंडस्ट्रियल बिल्डिंग व कामगारांबाबतचे कायदे इतके परिपुर्ण आहेत की स्त्रियांना लाज येईल वा वाटेल अशा पद्धतीने स्वच्छता गृहाचे प्रवेशद्वारही कसे असु नये याबद्दल विशिष्ट नियम आहेत.
अन इकडे हा म्हातारा आरडाओरडा करीत, जणू काही "अरे मुतायला चालला आहात तर आधी पैशे द्या" म्हण्जेच "मुतायला चालल्या आहेत याची जोरदार जाहिरात करीत" आजुबाजुच्यांच्या नजरा त्या त्या स्त्रीकडे वळतीलच याची (कळत वा निर्लज्य नकळत) हमखास खात्री करीत पैशे मागत असतो व (माझ्यासहित) बाकी तमाम "जनता" सलज्यपणे बघण्या/सहन करण्याशिवाय काही करू शकत नाही हे दुर्दैव आहे.
(मी तिथेच त्याच्या "अगदि कानाखाली जाळ न काढता पण जाब तरी विचारला असता" पण मग त्याचे वय... अन "अ‍ॅट्रॉसिटी" आड आली असति अन मीच "आत झालो असतो", म्हणून गप्पच बसावे लागले).
या देशात/प्रदेशात कुठल्याच व्यवस्था धड, सरळ नाहीत का?

या धाग्यावर हिंदु-मुस्लिम, ब्रिगेडी-संघी वगैरे विषय प्लीज नको.

>>> गैरसोयीचे म्हणण्यापेक्षा "मतांची बेगमी करण्यास" निरुपयोगी आहे म्हणून दुर्लक्ष असे म्हणता येईल . <<<
हे मत अगदी योग्य आहे पण ही सर्वच राजकीय पक्षांबद्दलची वस्तुस्थिती आहे.

बाकी मुस्लिम, ख्रिश्चनांच्या यात्रा असतात का देशात?
मुंबईत माहिमचा उरूस आणि मतमाऊलीची जत्रा याठिकाणी तरी इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी असावी तितपतच (अ) व्यवस्था असते.
जैनांच्या यात्रेच्या ठिकाणचे माहित नाही पण जैन लोकांच्यात पैसेवाले जैन हे गरीब जैन लोकांसाठी सुविधा उपलब्ध करून देतात असे ऐकले आहे. खखोदेजा.

पारसी लोक एकुणातच खूप व्यवस्थित आणि स्वच्छताप्रेमी असावेत आणि यात्रा भरवण्याइतकी त्यांची संख्याच नसावी असा माझा समज आहे.

आता आपण धर्म, त्याला लागून असलेल्या संघटना, राजकीय पक्षा यापलिकडे जाऊन बोलूया अन्यथा मला इंटरेस्ट नाही.

>>>> आता आपण धर्म, त्याला लागून असलेल्या संघटना, राजकीय पक्षा यापलिकडे जाऊन बोलूया अन्यथा मला इंटरेस्ट नाही. <<<<
नीरजे, मी तो उल्लेख मुद्दामहून केला याचे कारण "एरवी हिंदु हिंदु म्हणून आम्ही कसे श्रेष्ठ वगैरे संस्क्रुतीच्या वल्गना करणार्‍या" तमाम हिंदुत्ववादी व हिंदुत्वविरोधी राजकीय पक्षांचे /संघटनांचे पायही एकसारखे मातीचेच आहेत ते नजरेस भरावे म्हणून. व स्त्रीयांचे रास्त प्रश्नांचे/अधिकाराचे बाबतीत तर या सगळ्यांचे हे पाय अधिकच लाथाळ्या झाडणारे क्रुर व माणुसघाणे होतात हे वास्तव आहे.
तेव्हा हा प्रश्न राजकिय पक्षांचे कडून सोडवला जाणारच नसेल, तर कशाप्रकारे सोडवावा यावर विचार /क्रुती होणे अपेक्षित आहे.

राजकीय पक्ष नालायक आहेत. ते कुठलाही प्रश्न सोडवणार नाहीत. ३३% आरक्षणातल्या महिलाही काही करणार नाहीत. हे गृहित धरून काय करता येऊ शकते याबद्दल विचार सुरू केला तेव्हा मला माझ्या ’करता येऊ शकण्याच्या’ मर्यादा पहिल्या लक्षात आल्या. त्यामुळेच आजवर हे सगळंच बाजूला पडलंय.
याच धाग्यावर काय काय करता येऊ शकते याचा एक उहापोह झालेला आहे.

असो..सध्या थांबते. वेळेची मर्यादा आहे. पर्याय नाही.

लिंबू, स्त्रियांना ५ रुपये आणि पुरुषांना पैसे का आकारात नाहीत ह्याचे माझ्या मते कारण असे की, पुरुषांना पैसे आणि तेही ५ रुपये वैगेरे आकारले तर ते सरळ रस्त्याच्या कडेला आपलं काम उरकतील पैसे देण्यापेक्षा. बाया असं करु शकत नाहीत आणि म्हणुन झक मारत पैसे देतील. अगदी ५ रुपये सुध्धा.
तर पुरुषांना ही फुकट सोय देउन एक प्रकारे स्वच्छतेचाच विचार केलेला आहे Happy

सस्मित, तुम्ही म्हणता त्यात फारच तथ्य आहे, शिवाय की शेवटचा नि:ष्कर्ष.
बायका लज्जेखातर का होईना, पैसे देतिलच देतिल, जातिल कुठे, हा नालायक विचार आहे या मागे.

बाया अस करु शकत नाहीत, ते "एका मर्यादेपर्यंतच", एक ना एक दिवस ही मर्यादाही तुटेल, अन मोर्चा येऊन बाया यांच्या घरादारासमोर पंचायती/नगरपालिका/संसदेच्या सभाग्रुहात सामुहिक मलमूत्र विसर्जन करतील, तेव्हाच बहुधा या भ्रष्ट व्यवस्थेतील तमाम प्रशासकीय नोकर व सत्तेतील नेते मंडळींना अक्कल येईल.

होय, अन हे होईलच होईल. उघड्यावर करायची लाज वाटली तर, तुम्ही प्यायला बिसलेरी नेताना, तर त्या बाटलीत करुन भरुन नेतील अन सभागृहात निषेधार्थ ओततील. फक्त अजुनहि भोळीभाबडि अपेक्षा इतकीच, की इतकी वेळही ये देशीच्या स्त्रीयांवर येऊ नये अन असे झाल्यास "मिडीयाचा धन्दा" होऊ नये.

अरे पाच रु. पैकी अडीच रुपये ती सोय उपलब्ध करून दिल्याचे. फिटिंग्ज प्लंबिंग मेंटेनन्स आणि अडीच रुपये आडोसा उपलब्ध करून दिल्याचे. मेंटेनन्स स्वच्छतेचे. बायकांना अश्यावेळी
आडो श्याची गरज असते. जी पुरुषांना नसते. ( आपल्या देशात तरी) त्याचे ते पैसे. शिवाय जे देवाला गाडी करून येतात, नैवेद्य पूजा आदि वर खर्च करतात. आजकाल बायका देवाचे संपूर्ण दागिने करायचे वगिअरे असे पण पण करत अस्तात व खरेदी करत असतात. तर अश्या भाविकांना पाच रु. पर पी देणे अवघड नाही. रुपया आज ६८ रु. प्रति डॉ. आहे. सोय +सुविधा + रुपया चे अवमुल्यन

आपल्या देशात फुकट सर्व वापरायची सवय असते. म्हणून म्हातारा ओरडत असेल. बायका त श्याच जाओन निघून जाउ नयेत म्हणून.

>>>> आजकाल बायका देवाचे संपूर्ण दागिने करायचे वगिअरे असे पण पण करत अस्तात व खरेदी करत असतात. तर अश्या भाविकांना पाच रु. पर पी देणे अवघड नाही. <<<<<
अमा, धन्य आहे. अहो बायका पस्तिस हजार ते पंचविस हजार रुपये तोळा दराने कदाचित सोनेही घेत असतील, पण म्हणून मुतारीची सोय पैसे देऊन? बर ते देखिल मान्य करेन मी, पण मग फक्त स्त्रियांकडूनच पैसे का? पुरुषांकडून का नाहीत ?

बाकी देवदर्शनासाठि खर्च करुन येतात / देवाला दागिने करतात वगैरे बाबी जनरलाईज करुन तोंडी लावण्याकरता छान निवडल्यात..... Wink

आता प्रश्न इथेच निर्माण होतो अमा, की ज्या स्त्रीया उच्चभ्रू आहेत, त्या सहसा इथे येतच नाहीत, गरज वाटत नाही वा देवावर विश्वास नाही, त्यातुन आल्याच, तर आर्थिक सुस्थितीमुळे "ऊहूं, पाचच्च रुपड्या ना, ह्या फेकल्या तोंडावर" करीत ऐटीत जाऊ शकतील. तेव्हा त्यांच्या दृष्टीने हा प्रश्नच असत नाही.
पण मग तिथे सगळ्याच स्त्रीया त्याच त्या उच्चभ्रू आर्थिक स्तराच्या येतात का? अन एकदा तिथे आल्यानंतर, घाईची लागल्यावर शरिरधर्माला कसला आलाय स्तर?
की रोजच्या रोज इथे थोडीच येतोय? आजच्या पुरते तर आहे, करू अ‍ॅडजेस्ट, ही वृत्ती?
जरा मुम्बैतल्या नोकरदार स्त्रीया तरी या बाबतीत उघड बोलतील वा पुढे येतिल तर ते ही नाही अमा, तुमच्यासारखेच भलतेच युक्तिवाद.
डोंबिवली कल्याण वा विरार ला बसल्यावर चर्चगेट/दादर/व्हिटी कुठेही उतरले तरी एकाही स्टेशनवर स्वच्छ व सुरक्षित मुतारीची सोय नाही, व असली तरी.... कित्येकदा तसेच पोट दातओठ खाऊन मनानेच, क्वचित हाताने ओटीपोट आवळून धरुन ऑफिस गाठायचे, व धावतपळत जाऊन "तिकडे हलके व्हायचे" हे रुटीन असलेल्यान्नाही यातिल काहीच डाचत नाही. अन अशी वेळ येऊ नये म्हणुन घरुन निघतानाच पाणिच प्यायचे नाही/कमी प्यायचे, प्रवाआतही कमीच प्यायचे अशी स्वतःच्याच शरीरावर दूरगामी दु:ष्परिणाम करणारी "व्रते" पाळायची?
अहो देवधर्माच्या व्रतांना जितका विरोध करताना, त्यातिल किमान एक दशांश विरोध तरी "व्रत करुन" या गैरसोई विरोधात करा.
पण बहुतांश त्या गैरसोई मुळे भरडणार्‍या स्त्रीयाच जेव्हा अंग काढुन घेऊ पहातात, वा कुणी पुढे होत असेल तर विषयाला फाटे फोडतात, याची गरजच नाही, पाच रुपये परवडतात वगैरे गमजा मारतात, तेव्हा स्त्रीयांच्या प्रश्नाकरता स्त्रीयांनाच परत " पुरुषांच्या' तोंडाकडेच पहावे लागले तर त्यात नवल ते काय?
अशक्य आहे सगळे......

लिंबू सर,
"वी आर हेल्पलेस इन सम केसेस" ऑर 'प्रिफर टु पे टु गेट गुड फॅसिलिटीज रादर दॅन नॉट हॅविंग देम अ‍ॅट ऑल' डझ नॉट मीन 'वी फाईंड एस्केप फ्रॉम इश्यू'

मी पूर्वीही उल्लेख केला असेल इथेच कुठेतरी, परत करतो, की हा प्रश्न कित्येक दशके जुना आहे, व युरोपात इंग्लंडमध्येही शंभरवर्षांपूर्वी स्त्रीला मुतारीची सोय वापरायला अर्धा सेंट (की पन्नास शिलिंग? नेमके चलन आठवत नाही) खर्च करायला लागायचा. याबद्दलचा स्पष्ट उल्लेख पुलंच्या (?) महानगर या कादंबरीत आहे, प्रसंग असा कि ती युरोपिअन प्रेयसी, या इंडियन प्रियकराला म्हणत असते की मला अर्धा सेंट्/शिलिंग खर्च करायचा आहे, तर हा येडा विचारत /म्हणत रहातो की प्रिये बोल, मला सांग, मी तुझ्याकरता हवा तितका खर्च करायला तयार आहे, मी बरोबर असताना तू का खर्च करतेस? Proud
आता या मुतारीच्या फीच्या खर्चावर विनोदही निर्माण व्हावा व कालौघात तो विनोद नष्ट होऊन तरिही फक्त स्त्रीयांकरता मुतायच्या सोईकरता "मोबदला" द्यावा लागावा, अन त्याचे ये देशीच्या स्त्रियांनाही काहीच वावगे वाटू नये, यातुन कुणि असा नि:ष्कर्ष काढला की अजुनही "सुशिक्षित/उच्चशिक्षित/समृद्ध " स्त्रीयाही स्त्रीत्वाच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेरच पडल्या नाहीयेत, तर त्यातही वावगे काय?
होप सो, की या स्त्रीयांकरता परत एकदा कुणीतरी धोंडो केशव किंवा रघुनाथ धोंडो कर्वेच जन्माला यायला हवाय.
तोवर वाट बघा, मी पण बघतो.

होप सो, की या स्त्रीयांकरता परत एकदा कुणीतरी धोंडो केशव किंवा रघुनाथ धोंडो कर्वेच जन्माला यायला हवाय.
तोवर वाट बघा, मी पण बघतो.>> लिंब्या, एखादा 'जयंत नित्सुरे' हे काम कररु शकणार नाही कां??

>>>>> लिंब्या, एखादा 'जयंत नित्सुरे' हे काम कररु शकणार नाही कां?? <<<<
बा गोजिर्‍या, हुडहुड्या मधुकरा Proud , नाही, त्याची ती क्षमता नाही.

स्त्रीयांकरता मुतायच्या सोईकरता "मोबदला" द्यावा लागावा, अन त्याचे ये देशीच्या स्त्रियांनाही काहीच वावगे वाटू नये, यातुन कुणि असा नि:ष्कर्ष काढला की अजुनही "सुशिक्षित/उच्चशिक्षित/समृद्ध " स्त्रीयाही स्त्रीत्वाच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेरच पडल्या नाहीयेत, तर त्यातही वावगे काय?
>> जर स्वच्छ सोय उपलब्ध असेल तर पाच रुपये द्यायला खरेच काय प्रॉब्लेम आहे. माझे देवाशी सरळ नाते आहे. त्याला भेटाय आधी स्वच्छ व्हावे. ते ही आडोश्याला. ( हो. मला माझी प्राय्वसी जपायची आहे. ) व बरोबर दहाच रुपये असतील तर मी ते इथे देइन. व काही पूजेची थाळी फुले वगिअरे घेणार नाही. चपला गाडीत ठेवीन. प्रसाद गोड असतो तो ही मी खातच नाही.

तू विचार कर हे टॉयलेट साफ करायला एखादे माणूस असले तर त्याचा काही एक पगार द्यावा लागेल.
का देवस्थान ते पगार बेअर करते? प्रत्येक स्त्री मागे पाच रुपये ते देवस्थान ट्रस्टी का नाही भरू शकत? फिनेल बाटली, झाडू पोछा ह्याला पण पैसे लागतात ते कोन देणार तर वापरणारे? देवस्थानाने सोय करायला नको का? पाणी वापरले जाते त्याची पाणी पट्टी कोण भरते?

पैसे न देता बाहेर कुठे गेल्यास किंवा पोरीबाळींना तसे करायला सांगितल्यास कोणी पर्वर्ट पुरुष माणूस त्याचा व्हिडीओ घेउन व्हॉट्सॅप वर फिरवू शकतो. ही शक्यता नक्कीच आहे. त्यापेक्षा पाच रुपये गेलेले परवडले. असे होणार नाही अशी हमी द्या. मग विरोध करतो.

बायकांनीच का पण?
पुरुषांना नको का स्वच्छ सोय?
की पुरूष नंतर पाच रुपयाचं पाणी टाकून फ्लश करतच नाहीत असा सार्वत्रिक समज आहे?

अमा, तूमचे दुर्लक्ष होतय की कसे?
प्रश्न तुम्हाला पैसे देणे योग्य वाटते वा परवडते वा सफाईचे चार्जेस द्यावेत हा नाहीच्चे.
प्रश्न असा आहे की अगदी "मूतारीच्या सोईबाबतही" त्याबद्दलच्या "चार्जेस देण्यावरुन" स्त्री-पुरुष असा सर्रास भेदभाव का? इथे पाच रुपयांचा प्रश्नच नाहीये, फक्त पाच पैसे जरी घेत असले तरीही ते किमान मी (पुरुष असुनही) स्त्रीयांबाबत अपमानास्पदच मानिन.
वर कुणीतरी म्हणले की संडास व मुतारी स्त्रीयांकरता एकच असते म्हणुन संडास साफ करण्याचे पाच रुपये चार्जेस, तर ते कारण पटत नाही व गैरलागु आहे. कारण संडास वा मुतारी एकत्र वा स्वतंत्र असले तरी त्यांची स्वच्छता ही करावीच लागणार.
अन तो एक नविनच प्रश्न उपस्थित होतोय की स्त्रीयांकरता "संडासालाच" मुतारी सारखे वापरण्याची सक्ति का? बरे तो इंडियन कमोड असेल तर काहीतरी शक्य, पण युरोपिअन कमोड असेल, तर कमोडव्यतिरिक्तच्या चिंचोळ्या जागेत त्या कमोडच्याच शेजारी खाली बसुन एका तरी पुरुषाने/अधिकार्‍याने/नेत्याने मुतुन दाखवावे. ही घाणेरडी सोय का?
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ कमोडवरती बसुन काही करणे शक्य होत असेल यावर माझा विश्वास नाही, व कुणाचा विश्वास असेल, तरी आरोग्यरक्षणाच्या द्रुष्टीने त्याने/तिने तसे करु नये असेच मी म्हणेन.

अन मग इकडे असे काय घडते की स्त्री गेली रे गेली की आभाळ कोसळते अन तिथे पाच रुपये चार्ज करावे लागतात, अन पुरुष जाऊन मुतला तर ते इतके पवित्र असते की त्याच्या स्वच्छतेची गरजच पडत नाही अन त्यामुळे पैशेही पडत नाहीत, अशा कोणत्या युक्तिवादाचे समर्थन करायचे आहे का तुम्हाला?

मला अशाच स्वच्छता सेवका कडुन याबद्दल मिळालेले (अर्थातच अनधिकृत) उत्तर जर इथे मांडले, तर इथे किती गदारोळ माजेल याची कल्पनाही करवत नाही पण किमान तुमचे डोळे खाडकन उघडु शकतील, अन एरवी देवधर्माच्या धाग्यांवर मासिकपाळीच्या शिवाशिवीवर रास्त वाद घालण्यार्‍यांनो, जर याच कारणामुळे तुमच्याकडुन तुम्ही मुतायला जा वा हगायला जा, पैशे घेणारच्च असे अलिखित कायद्याने ठरवित असतिल व अंमलात आणित असतील, अन आम्ही काय "आत तपासायला जायचे का" असा निर्लज्य प्रतिप्रश्न करीत असतील, तर ते "पाच रुपये" वा कितीका रक्कम, द्यायची वा नाही?
अन म्हणुनच मी पुन्हा पुन्हा याच धाग्यावर आडून आडून उघडपणे विचारले आहे की स्त्री अन पुरुष यांच्या मूत्रात काही फरक अस्तो का? की म्हणुन स्त्रीकडून स्वच्छतेचे जास्त चार्जेस घ्यावे लागावे?
मी मूर्ख/चुकीचा/बेअक्कल असेन तर येथिल वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी जरुर मला सांगावे, की होय, लिंब्या, स्त्रीयांचे मूत्र अमुक तमुक कारणाने धोक्याचे असते व जास्तीची स्वच्छता करावी लागत असल्याने त्यांचेकडून चार्जेस घेतले जातात, व्हेअरअ‍ॅज, पुरुषांचे मूत्र "निर्धोक" असते म्हणून मूत्रकर्माबाबत त्यांचेकडून चार्जेस घेतले जात नाहीत. द्या सर्टिफिकेशन, मी हा विषय व धागा सोडून देतो. अ‍ॅडमिनना सांगुन हव तर कुलुप घालू.

जयंत्राव, मोदींसाठी ट्विट करा पाहु. गेला बाजार मायबोलीवरचे तुमचे राष्ट्रभक्त पुतणे मंदार जोशी यांना तरी सांगा ट्विट करायला. त्यांची भलतीच वट आहे. लगेच कार्वाई होईल.

अन अमा, तुम्ही परत परत ते देवाचे वर्णन मध्यात आणु नकाच प्लीजच.... कारण मी जो फोटो अन उदाहरण दिले ते प्रातिनिधिक आहे, एका देवस्थानाचे जिथे मी गेलो होतो, पण हेच वर्णन महाराष्ट्रातल्या यच्चयावत सार्वजनिक ठिकाणी दिसुन येईल, अगदी सुलभ शौचालयात देखिल. तेव्हा त्याबद्दल बोला, तुम्ही देवावर विश्वास ठेवता वा नाही, ठेवलात तर किती वगैरेशी इथे काहीही देणेघेणे नाही. देवस्थानाच्या निमित्ताने पर्यटक येतात, त्यात स्त्रीयाही असतात, दूरदुरुन प्रवास् करुन येतात, इतकाच संबंध.

पेड टॉयलेटस ही संकल्पना प्रथम 'सुलभ' इंटरनॅशनल वाल्यांनी आणली.
यांच्यात पुरुषांसाठी लाईनीत उभे राहून एका पाट सदृश्य थोड्या उंचावर असणार्‍या चरामध्ये मूत्रविसर्जन करायची सोय असे.
प्रत्येकाने आपले काम झाल्यावर वेगवेगळे फ्लश करायची गरज नसे.
थोड्याथोड्यावेळाने सफाई कामगार ते येऊन फ्लश करणे अपेक्षित असे.
यांच्या स्त्रियांसाठी असलेल्या भागात मात्र क्लोज्ड इंडियन टॉयलेट्स असून आत नळ किंवा बाहेर एक पाण्याची टाकी पुरवलेली असे.
प्रत्येक स्त्रिने वापरानंतर ती जागा पाणी टाकून साफ करावी अशी योजना असे.
म्हणून सुलभ वाल्यांनी सुरूवातीस पुरुषांना मुतारी फुकट, स्त्रियांना मुतारी आणि दोघांनाही शौचालय १ रु.
आंघोळी साठी पाणी १ बकेट २ रु असे ठेवले होते.

तोच पॅटर्न सर्वत्र उचलला गेला आणि पुरुषांना मुतार्‍या फुकट आणि बायकांना पैसे देऊन (फ्लश साठीच्या पाण्याचे, बंदिस्त कागेचे, दोन मिनिटाच्या प्रायवसीचे) टॉयलेटस बरेच ठिकाणी वापरावे लागतात.

अन मग इकडे असे काय घडते की स्त्री गेली रे गेली की आभाळ कोसळते अन तिथे पाच रुपये चार्ज करावे लागतात, अन पुरुष जाऊन मुतला तर ते इतके पवित्र असते की त्याच्या स्वच्छतेची गरजच पडत नाही अन त्यामुळे पैशेही पडत नाहीत, अशा कोणत्या युक्तिवादाचे समर्थन करायचे आहे का तुम्हाला?
>> मी पुरुशांबाबत विचार करायचे सोडले त्यालाही जमाना झाला. त्यामुळे कोणताच युक्तिवाद व त्याचे समर्थन करत नाही. जर देवस्थान पुरूषांना फ्री टॉयलेट व स्त्रियांना चार्ज करत असेल तर ते चुकीचेच आहे. ( आता अबाउट टर्न यू टर्न वगैरे म्हणता येइल. ) पण ह्याबद्दल देवस्थानाच्या
ट्र्स्टीकडे किंवा पुजार्‍याक्डे तक्रार केली का? इथे लिहून फार समाज प्रबोधन होणार नाही.
त्यांचे काय म्हणणे पडले? स्त्रीयांना परवडत असेल तर त्यांनी पैसे भरावेत व वेळ साजरी करावी इतकेच मर्यादित मत आहे माझे. व त्याचे जस्टिफिकेशन दिले आहे. का बरोबरीच्या स्रियांचे पाच रुपय भरावे लागले प्रत्येकी म्हणून वाद आहे? त्यांनी त्यांच्या पर्स मधून भरून दिले असते तर काय वांधे होते?
अश्या देवस्थानी जावेच का?

विठ्ठल्राव, तुमच्या खर्‍या नावाने या पाहु, या धाग्यावर राजकरण आणु नका असे नीरजातैंचे सांगणे विसरलात का?
अन मोदिंना म्या कशाला सांगु, त्यांच्या विरोधकांना नै का अक्कल ना बक्कल? Proud
इतके मुद्दे उघड करुन मांडले तरी ......... ! माझ्यासारखा एखादा अधिकृत पणे बीजेपी विरोधात अस्ता तर आत्ता पर्यंत झिन्ग आणली अस्ती त्यांना या केवळ एका मुद्यावरुन... म्हणे निघाले स्वच्छ भारत करायला.... Wink पण माझा तो प्रांत नाही. राजकारण हा माझा विषय नाही. सबब माझ्याकरता सगळेच राजकारणी मी एकाच तराजुत तोलुन तपासुन घेतो.

लिंब्याची छुपी स्ट्रॅटेजी वेगळीच आहे. जर या भेदभावाला महिला मुकाट्याने मान्य करतात तर देवळात प्रवेशाबाबतचा भेदभावही मान्य करावा, हा अजेंडा पुढे होईल आता.

अमा, देवस्थानाचा प्रश्न नाही.
चर्चगेट स्टेशनापासून दादरच्या प्लाझासमोरच्या मुतारीपर्यंत हीच सिस्टीम आहे.
चर्चगेट स्टेशनात तिथे असलेल्या ढालगज भवान्या उद्धटपणा करून (बहुतेक ) अनऑथराईज्डरीत्या पैसे उकळतात.
बाकी सगळीकडे अगदी ऑफिशीयली भिंतीवर रेट लिस्ट लावून लोक काऊंटरवर बसलेले असतात.

साती, धन्यवाद, तुम्ही मला जे म्हणायचे आहे ते नेमक्या शब्दात थोडक्यात मांडता आहात. धन्यवाद.

पुरुषाने पाणी स्वतः टाकायची गरज नाही/वा फ्लश करायची गरज नाही, स्वच्छता सेवक ती करेल इथपर्यंत काहीबाही ठीक आहे.
फक्त स्त्रीने स्वतः पाणी टाकले वा फ्लश केले तर तिलाच चार्जेस का? हा प्रश्न आहे.
अन याच्या उत्तराच्या शोधात मी वर निरनिराळ्या शंकाकुशंका/लिखित-अलिखित नियम मांडले आहेत. ते योग्य आहेत असे वाटते का?

>>>> जर या भेदभावाला महिला मुकाट्याने मान्य करतात तर देवळात प्रवेशाबाबतचा भेदभावही मान्य करावा, हा अजेंडा पुढे होईल आता <<<< Lol
सरड्याची धाव कुंपणापर्यंत तसे आहे तुमचे विठ्ठलपंत...... तुमची स्वतःची मते माझ्या नावावर थापून पोस्टू नका Proud तरी तुम्हाला धन्यवाद, एक नविन युक्तिवाद लक्षात आणुन दिल्याबद्दल, ब्यालिश्टर का नै ओ झालात तुम्ही? Wink

अहो हाच मुद्दा घेऊन मी असेही नक्कीच म्हणु शकतो नव्हे, त्या शनिचौथर्‍या बाजुने नि विरोधात लढणार्‍या दोन्ही बाजुंना ऐकवुन झालय माझे कि, बायांनो कुणाच्या तरी सांगण्यावरुन आख्ख्या जगात एकमेव असलेल्या त्या दहापंधराफुटी चौथर्‍यावर चढण्यासाठी वा चढणार्‍यांना अडविण्यासाठी आपापसात झिंज्या उपटत लढता आहात, तर त्या ऐवजी किमान आख्खा महाराष्ट्रभर स्त्रीयांच्या असलेल्या/नसलेल्या स्वच्छता गृहाच्या गंभीर प्रश्ना बद्दल एकत्रीतपणे स्त्री म्हणुन लढावे असे तुम्हाला का वाटत नाही? Happy
अर्थात या रुदनाचा सध्यातरी उपयोग नाही हे मला ठाऊके....

Pages