' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

Submitted by नीधप on 4 November, 2008 - 10:31

दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाच्या विषयासंदर्भाने अनेकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. साहजिक आहे कारण प्रॉब्लेम सगळ्याच आयाबायांचा आहे.
हा धागा तुमचं म्हणणं मांडण्यासाठी सुरू करतेय.
मी लेख लिहिला तेव्हा निश्चितच माझ्या डोळ्यासमोर पुढची कृती नव्हती. पण एकुणात मिळालेला प्रतिसाद बघता आपण काही करू शकतो का याबद्दल असा विचार सुरू होतोय.
माझा लेख इतर अनेक ठिकाणी देण्याबद्दल मला अनेकांनी विनंती केलीये पण एकदा इथे प्रसिद्ध झाल्यावर परत इतर ठिकाणी कोणी घेतील की नाही याची मला कल्पना नाही. कुणाला माहित असेल तर जरूर कळवावे.
माझ्याकडून होण्यासारख्या या तीन गोष्टी आहेत. ज्या माझ्या आवाक्यातल्या आहेत आणि मी त्या यशस्वीरित्या करू शकेन.
१. एका कव्हर लेटरसहीत या लेखाची प्रत मुंबईच्या महापौर शुभा राउळ यांना पाठवणे आणि त्यांना ह्या समस्येत लक्ष घालायला लावणे.
२. या विषयावर अजून अभ्यास करून मग अर्धा तासाचा एक माहितीपट तयार करणे. जो अनेक ठिकाणी लोकांवर आदळवणे (हॅमर चे भाषांतर..)
३. हाच विषय घेऊन किंवा या लेखातून २५-३० मिनिटाचा प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स तयार करणे जो वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमांच्या वेळी त्या त्या ठिकाणी जाउन सादर करणे. जेणेकरून कुठल्यातरी स्त्री समस्यांशी संबंधित कामे करणार्‍या संस्थेला ह्याचा पाठपुरावा करण्याची इच्छा व्हावी.

प्रशासकीय पातळीवर करायचे प्रयत्न करण्याची माझी ताकद वा अनुभव नाही. पण हे वरचं मी नक्की करू शकते. यात कुणाला माझ्याबरोबर यायचं असेल, मला मदत करायची असेल तर तुमचं स्वागतच आहे.

तुम्ही स्वतःहून या संदर्भात काही उपक्रम हाती घेत असाल तर तेही इथे मांडा म्हणजे कोण काय करतंय याची माहिती आणि चर्चा दोन्ही घडेल.

तसेच कुणाला काही सूचना करायच्या असतील या संदर्भात तर त्याही जरूर कराव्यात.

या सगळ्या संदर्भात अजून काही माहीती असेल कुणाला. तर तीही कृपया इथे द्यावी.

सत्यजित याने काही शोधाशोध करून माहिती मिळवली आहे ती त्यानेच इथे टाकावी अशी मी त्याला विनंती करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>> बाकी डिस्पोजेबल कागद्/कागदी कमिड सीट यांत हायजिन वाटली तरी पर्यावरणाचा किती र्हास होतो हे कोण्बघणार? <<<<
वरील एक उल्लेख पाण्याशिवायाची स्वच्छता गृहे, ती कशी असतील ते माहित नाही, हे कागदी डिस्पोजेबल्सचेही माहित नाही.
मात्र पुण्यातील गांधीभवनच्या मागे बघितलेत तर तिथे निरनिराळ्या डिझाइनची संडासची सोय बनवुन ठेवली आहे. मी ती कित्येक वर्षांपुर्वी बघुन अभ्यासली होती. आता फार कमी लक्षात आहे, पण जे लक्षात आहे त्यावरुन एक नक्की करता येईल (व बरेचदा तात्पुरत्या सोईसाठी केलेही जाते) की स्त्रीयांचे मुतारीसाठि आडोसा महत्वाचा, अन तिथे "शोषखड्डे" ही संकल्पना वापरणे सहज शक्य आहे.
आजही गावांकडे, न्हाणीचे पाणि एकी बाजुला अशा खोल खड्ड्यात नेले जाते की तिथे ठराविक काळाने थोडी थोडी माती टाकत राहिली जाते, तिथेच पाणि जास्त खाणारी/पिणारि झाडे जसे की केळी/कर्दळ लावले जातात. हे योजना किमान दोन्/तिन वर्षे रहाते, तो खड्डा भरत आला की दुसरा खड्डा करतात, व आधीच्या खड्डा अजुन दोन वर्षांनी क्वचित खत म्हणून वापरतात वा त्याच जागी पाच वर्षांनी परत खणतात.

Now a days, I have seen ladies urinals at many places. Don't remember if paid facility or not. Those ladies urinals are quite hygienic also in design. If that + paid enclosed toilet cabinet design made mandatory for communal ladies restrooms then there is a possible solution.

<< If that + paid enclosed toilet cabinet design made mandatory for communal ladies restrooms then there is a possible solution.>>

या वाक्याचा अर्थ कळला नाही.
म्हणजे काय?
कसलं सोल्युशन?

मला जे थोडेसे लक्षात येतेय ते म्हणजे हर मर्जकी एक दवा टाइप एक उपाय या समस्येवर असू शकत नाही.
वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे विचार केला जायला लागेल.

लिंबु,
तुमच्या पोस्टस ++

नोकरदार सगळेच इन्कम टॅक्स भरतो.
ते + इतर सगळेच प्रत्येक वस्तु वा सर्वीसवर 14% टॅक्स देतोच.
आता त्यावर 0.5% स्वच्छता सेसही देतो.

इतका कर घेऊन , इतर सोयी जाऊदे, साधी मोफत, स्वच्छ सार्वजनिक टॉयलेट्स ची सोयही मिळु नये का?

आपण पैसे देऊ शकतो की नाही हा मुद्दाच नाही. आपण केवळ टॉयलेट वापरता यावे म्हणुन महागड्या दुकानात जाऊन कॉफी मागवु शकतो. पण असे करावे लागावे हे दुर्दैव नाही का?
लाखो लोक असे आहेत ज्यांच्याकडे खायला पैसे नाहीत. ते 2/5 रू. टॉ.साठी कसे व का देतील.

पाणी उपलब्धता , सवयी या प्रशनाच्या एक बाजु आहेतच. त्यावरही चर्चा व्हावी.

पण मोफत, स्वच्छ सार्वजनिक टॉयलेट्स मिळणे हा आपला अधिकार आहेच.

पैसे भरुन आडोसा मिळतो हे ठीक पण हायजिन??? आजिबात नाही. अत्यंत भयंकर अवस्था असते पैसे घेणार्‍या शोउचालयातही.

If we make restroom model where urinals and toilets separate then no need to charge money for urinals. They are free to Gentlemen right? So money problem is solved. Ladies / Gentlemen no discrimination, everyone gets free urinals.

Those ladies urinals which I have seen are half Indian toilet with steps; my body parts are not touching anywhere hense I said hygienic.

तशी युरिनल्स पण खराब केली जातात.
प्लस तीही इतर बायकांबरोबर क्लोज्ड स्पेस मध्ये उघड्यावर बसणे झाले+विशीष्ठ दिवसांमध्ये जास्त अडचणीचे.

>>>> संडास साफ ठेवायला पाणी कुठून आणणार? <<<<<
हा प्रश्न आहे खरेच. अन याकरताच संडासाच्या बेसिक डिझाईनमधेच मूलभुत बदल करावे लागतील.
यातही, गावाकडे जे संडास बांधतात त्यांचेकरता संडासालगत, वा त्याचे खालिच सेफ्टिक टँकची रचना असते. व जितके पाणी अदरवाईज टमरेल घेऊन उघड्यावर जायला वापरता तितकेच पाणि येथेही पुरु शकते. (अन डोण्टच से एनिबडी, की सध्या उघड्यावर जाताना पाणि न नेता दगड्/वीटकुर वापरतात. ) याठिकाणि, संडासची भांडीही आकाराने फार लांबोडकी न वापरता कमी लांबीची वापरतात. तेव्हा अनुदान मिळते आहे तर संडास बांधण्यास हरकत नाही.
मी मावळातील परिस्थिति जवळून अनुभवली आहे. तिथेही नोव्हेंबर पासुनच पुढे व उन्हाळ्यात मैलोगणती पाण्याची सोय नसते व विहिरींचे पाणी डोक्यावरुन आणावे लागते. अन तरीही तिकडच्या यच्चयावत गावात घराबाहेर अनुदानित संडास बांधलेले आहेत व ते त्यांनी स्वच्छही ठेवले आहे.
याबाबतच "राजस्थान" सारख्या ठिकाणी काय केले जाते याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.

राजसी यांना बहुदा ( https://www.google.co.in/search?q=ladies+urinal&biw=1366&bih=613&source=... ) या चित्रांमध्ये दाखविल्याप्रमाणे अभिप्रेत असावे. असे हल्ली अनेक सार्वजनिक प्रसाधनगृहांत असतात.

https://www.facebook.com/PoonamMahajanOfficial/posts/1092179284137608

खासदार पूनम महाजन यांच्या फेसबुक पानावरून मिळालेली http://www.mahanews.gov.in/Home/DisplayTalukaNewsDetails.aspx?str=eKDOoG... ही माहीती वाचून हा धागा आठवला व इथे शेअर करावेसे वाटले.

Pages