' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

Submitted by नीधप on 4 November, 2008 - 10:31

दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाच्या विषयासंदर्भाने अनेकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. साहजिक आहे कारण प्रॉब्लेम सगळ्याच आयाबायांचा आहे.
हा धागा तुमचं म्हणणं मांडण्यासाठी सुरू करतेय.
मी लेख लिहिला तेव्हा निश्चितच माझ्या डोळ्यासमोर पुढची कृती नव्हती. पण एकुणात मिळालेला प्रतिसाद बघता आपण काही करू शकतो का याबद्दल असा विचार सुरू होतोय.
माझा लेख इतर अनेक ठिकाणी देण्याबद्दल मला अनेकांनी विनंती केलीये पण एकदा इथे प्रसिद्ध झाल्यावर परत इतर ठिकाणी कोणी घेतील की नाही याची मला कल्पना नाही. कुणाला माहित असेल तर जरूर कळवावे.
माझ्याकडून होण्यासारख्या या तीन गोष्टी आहेत. ज्या माझ्या आवाक्यातल्या आहेत आणि मी त्या यशस्वीरित्या करू शकेन.
१. एका कव्हर लेटरसहीत या लेखाची प्रत मुंबईच्या महापौर शुभा राउळ यांना पाठवणे आणि त्यांना ह्या समस्येत लक्ष घालायला लावणे.
२. या विषयावर अजून अभ्यास करून मग अर्धा तासाचा एक माहितीपट तयार करणे. जो अनेक ठिकाणी लोकांवर आदळवणे (हॅमर चे भाषांतर..)
३. हाच विषय घेऊन किंवा या लेखातून २५-३० मिनिटाचा प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स तयार करणे जो वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमांच्या वेळी त्या त्या ठिकाणी जाउन सादर करणे. जेणेकरून कुठल्यातरी स्त्री समस्यांशी संबंधित कामे करणार्‍या संस्थेला ह्याचा पाठपुरावा करण्याची इच्छा व्हावी.

प्रशासकीय पातळीवर करायचे प्रयत्न करण्याची माझी ताकद वा अनुभव नाही. पण हे वरचं मी नक्की करू शकते. यात कुणाला माझ्याबरोबर यायचं असेल, मला मदत करायची असेल तर तुमचं स्वागतच आहे.

तुम्ही स्वतःहून या संदर्भात काही उपक्रम हाती घेत असाल तर तेही इथे मांडा म्हणजे कोण काय करतंय याची माहिती आणि चर्चा दोन्ही घडेल.

तसेच कुणाला काही सूचना करायच्या असतील या संदर्भात तर त्याही जरूर कराव्यात.

या सगळ्या संदर्भात अजून काही माहीती असेल कुणाला. तर तीही कृपया इथे द्यावी.

सत्यजित याने काही शोधाशोध करून माहिती मिळवली आहे ती त्यानेच इथे टाकावी अशी मी त्याला विनंती करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> बाकी सगळीकडे अगदी ऑफिशीयली भिंतीवर रेट लिस्ट लावून लोक काऊंटरवर बसलेले असतात. <<<<
यांना जागा म्युनिशीपालटी देते अत्यल्प भाड्यावर, तिथे हे धंदा टाकुन बसतात व लिखित/अलिखित कायद्यांनुसार फक्त स्त्रीयांना लुटतात.
मग म्युनिशीपालटी/स्थानिक स्वराज्य संस्थांची आम्हि नागरिकशास्त्रात शिकलेली "कर्तव्ये" करण्याचे कुठे जाते? यास सर्व म्युनिशीपालट्यांची प्रशासने/स्थानिक स्वराज्य संस्था/त्यांचे नेते, गावोगावीचे जन्त्रीवार फुडारीच जबाबदार नाहीत का?

विठ्ठलपंत, तुम्ही अगदीच त्या ह्यांच्यासारखे विचारताय, अहो इथे या नीरजाच्या धाग्यावर लिहुन "येथिल माझ्या मर्यादित वर्तुळात" तरी या विषयाबद्दल समयोचित लिहून जागृती घडवुन आणणे ही चळवळच नाही का?
अन बाहेर अळिमिळी म्हणजे काय? नेमके कशा प्रसंगी काय करायला हवे एखाद्याने बाहेर? तुम्हीच जरा तुमच्या अनुभवी बुद्धिमत्तेने सल्ला द्या की, म्हणजे येथिल वाचकांना नेमके काय करायला हवे हे समजेल.

फेसबुकावर आपले तरुण्पणाचे फोटो टाकतोस त्यापेक्षा या पोष्टी तिथे टाक की. व्हॉट्स अ‍ॅप आहेच तुझ्याकडे , त्यावर लिही. त्या कुठल्याशा देवळाबाहेरच्या माणसाला 'अ‍ॅट्रॉसिटी'च्या भितीने ओरडला नाहीस, पण ट्रस्टी/पुजारी यांच्याविरुद्ध आवाज उठवण्यात अ‍ॅट्रोसिटी लागत नाही नां?? संघाचे संस्कार आहेत ना, अन्यायाविरुद्ध लढण्याचे? मग, का गप्प बसलास?

विठ्ठल आणि लिंब्या, तुमच्या मारामार्‍या कृपया दुसरीकडे करा ही विनंती.
इथे प्लीज विषयापुरते बोला. इथे आत्ता मला ३१ नवीन पोस्टस दिसल्या त्यातल्या २५ तुमच्या टेनिसच्या आहेत. तुम्ही हवे तितके टेनिस खेळा मला काही प्रॉब्लेम नाही पण प्लीज हात जोडून विनंती की या धाग्यावर या धाग्याच्या विषयाला अनुसरूनच बोला.

लिंब्या, तू आणि सर्वच माझी उत्तर दिलेली पोस्ट ओलांडून गेलात.
स्त्रियांच्या साठी मुतारी व संडास एकच असते. पुरूषांसाठी वेगळे असते.
संडासासाठी दोघांनाही शुल्क आहे.
स्त्रियांच्या स्वच्छतागृहामधे दोन्ही गोष्टी एकच असल्याने व्यक्ती आत जाऊन नक्की काय करतेय हे ठरवण्याची सोय नाही म्हणून स्त्रियांना शू करायलाही पैसे द्यावे लागतात.

अमा, तुम्ही आणि मी स्वच्छ सोय मिळावी म्हणून दिवसातून किमान ४-५ वेळा ५ रूपये देऊ शकणार्‍या आर्थिक गटात आहोत. पण सर्व स्त्रिया नसतात. ज्यांना परवडत नाही त्यांना हायजिन व आडोसा नाकारायचा का?
एक नागरिक म्हणून बेसिक हायजिन आणि आडोसा या गोष्टी मानवी अधिकाराच्या यादीतल्या आहेत. लिंग, आर्थिक परिस्थिती, धर्मजातवगैरे बिनकामाचे तपशील यापलिकडे जाऊन केवळ मानव आहोत म्हणून हे अधिकार आहेत.

दिवसातून किमान ४-५ वेळा ५ रूपये देऊ शकणार्‍या आर्थिक गटात आहोत. पण सर्व स्त्रिया नसतात. >> +१

त्या त्या ठिकाणी लोकल बॉडीज असतीलच की. मंदीर वगैरे ठिकाणी मंदिर प्रशासनालाही अशक्य नाही प्रशासनाकडून मोफत सोय करून देणं (ज्याचे पैसे वेगळ्या मार्गाने वसुल होऊ शकतात). इच्छाशक्ती पाहीजे आणि महत्वाचं म्हणजे जागृती, संघटना पाहीजे.

कापोचे, साधारण ३० + पोस्टींपूर्वीची माझी एक पोस्ट वाचणार का?
प्रशासन, कुठलाही राजकीय पक्ष आणि त्यांना बांधील असलेल्या संघटना यांना हा विषय अजेंड्यावर घेणे सोयीचे नसावे.
ते काहीही करणार नाहीत.

कारण महिला जागृत नाहीत. आंदोलन झालं नाही तर यंत्रणा हलत नाही. कुठे कुठे खाजगी प्रयत्न करणार ? ते चालूच ठेवून व्यापक करण्यासाठी काही करता आलं तर खरंच छान होईल. हा खरं तर फक्त महिलांचा एकट्याचा प्रश्न नाही. पुरूषांनाही सोबत मुली बाळी असताना या समस्येला तोंड द्यावेच लागते. कुठपर्यंत दुर्लक्ष करीत राहणार ?

शहरात मॉल्स झाल्यामुळे ब-याच प्रमाणात सोय झाली.
एकट्याने प्रयत्न करू नये असा अर्थ काढू नये पोस्टचा कृपया. जे काही प्रयत्न होतील ते चांगलेच असणार आहेत.

राईट टू पी संघटनेचे प्रयत्न चालू आहेत.
मला स्वत:ला हा मुद्दा महत्वाचा वाटत असूनही मी वैयक्तिक कारणास्तव आंदोलनात उतरू शकत नाही. ज्यांच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा होतोय पण आंदोलनात उतरू शकत नाहीत अश्या कितीतरी असतील.
ज्यांना शक्य आहे त्या राइट टू पी बरोबर उतरलेल्याच आहेत.

या काही गाईडलाईन्स आहेत.
http://www.urbanodisha.gov.in/(S(mmsysc45j1g52d55er0ffn45))/pdf/plans_polices/GUIDELINES_PUBLIC&COMMUNITY_TOILETS.pdf

मुंबईत या प्रश्नावर काही महिलांनी लढा दिला होता
http://www.thenational.ae/news/world/south-asia/mumbai-women-in-fight-fo...

पुणे मॉडेल बाबत थोडंसं
http://pubs.iied.org/pdfs/G02004.pdf

Don’t Hold It In. व्हिडीओ कँपेन
http://www.buzzfeed.com/imaansheikh/dont-hold-it-in#.nevrxOWJdp

वुमेन टॉइलेट डे च्या दिवशी पुरूषांसाठी असलेल्या टॉयलेटसला घेराओ किंवा बंदी करण्याचं आंदोलन . असे मार्ग प्रभावी वाटतात.
http://indiatoday.intoday.in/story/international-womens-day-world-health...

>>>> लिंब्या, तू आणि सर्वच माझी उत्तर दिलेली पोस्ट ओलांडून गेलात. स्त्रियांच्या साठी मुतारी व संडास एकच असते. पुरूषांसाठी वेगळे असते. संडासासाठी दोघांनाही शुल्क आहे. <<<<<
मी हे दोनही मुद्दे नंतरच्या एका पोस्ट मधे (पान ६ कॉमेण्ट नं 3779139) घेतले आहेत व या अशा एकत्रीत व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. खास करुन कम्पन्या वगैरे ठिकाणी पाश्चात्य कमोड असलेली जागाच वापरण्याबाबत. जस्ट चेक कर.
तुझ्याकरता पुन्हा देतो....
>>>>> वर कुणीतरी म्हणले की संडास व मुतारी स्त्रीयांकरता एकच असते म्हणुन संडास साफ करण्याचे पाच रुपये चार्जेस, तर ते कारण पटत नाही व गैरलागु आहे. कारण संडास वा मुतारी एकत्र वा स्वतंत्र असले तरी त्यांची स्वच्छता ही करावीच लागणार.
अन तो एक नविनच प्रश्न उपस्थित होतोय की स्त्रीयांकरता "संडासालाच" मुतारी सारखे वापरण्याची सक्ति का? बरे तो इंडियन कमोड असेल तर काहीतरी शक्य, पण युरोपिअन कमोड असेल, तर कमोडव्यतिरिक्तच्या चिंचोळ्या जागेत त्या कमोडच्याच शेजारी खाली बसुन एका तरी पुरुषाने/अधिकार्‍याने/नेत्याने मुतुन दाखवावे. ही घाणेरडी सोय का?
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ कमोडवरती बसुन काही करणे शक्य होत असेल यावर माझा विश्वास <<<<<<

पण युरोपिअन कमोड असेल, तर कमोडव्यतिरिक्तच्या चिंचोळ्या जागेत त्या कमोडच्याच शेजारी खाली बसुन एका तरी पुरुषाने/अधिकार्‍याने/नेत्याने मुतुन दाखवावे. ही घाणेरडी सोय का?
>>
कमोड मध्ये शी शु करतात ना? की बाजुला बसुन :अ ओ:

>>युरोपिअन कमोड असेल, तर कमोडव्यतिरिक्तच्या चिंचोळ्या जागेत त्या कमोडच्याच शेजारी खाली बसुन एका तरी पुरुषाने/अधिकार्‍याने/नेत्याने मुतुन दाखवावे. ही घाणेरडी सोय का?>>
Uhoh युरोपिअन कमोडचा वापर मलमूत्र दोन्ही विसर्जनासाठी करतात. आसपासची जागा त्यासाठी नसते. ती कोरडी रहायला हवी. फ्लोअर स्वच्छ करायला बरेच पाणी वापरणार असाल तर किंवा टॉयलेट लिक वगैरे झाल्यास म्हणून फार तर कोपर्‍यात एक ड्रेनेज होल असते. पण सर्वसाधारण परीस्थितीत फ्लोअर , कमोड सीट कोरडे असणे अपेक्षित आहे.

कमोड अथवा भारतीय काहीही फरक पडत नाही.
कुठल्याही सार्वजनिक स्वच्छतागृहांमधे स्त्रियांसाठी दोन वेगळ्या व्यवस्था नसतात.
पुरूषांच्यासाठी असतात.

बाकी मला शब्दच्छलामधे इंटरेस्ट नाही.

खरंच काही उपाय शोधण्याबद्दल विचार होणार असेल तर इथे बोलू नाहीतर ब्लेमगेम, रणधुमाळी, धुळवड खेळायला इतर अनेक धागे आहेत.

खरंच काही उपाय शोधण्याबद्दल विचार होणार असेल तर इथे बोलू नाहीतर ब्लेमगेम, रणधुमाळी, धुळवड खेळायला इतर अनेक धागे आहेत.
<<

नी,

तुमचे बरोबर आहे. विषय खरेच गंभीर आहे, व गांभीर्य ठेवलेच पाहिजे.

विषयांतर करणार्‍या पोस्टीबद्दल क्षमस्व. पण त्या लिंबूटिंबूच्या निरर्थक धुळवडीमुळे खरेच राहवले नाही.

मा. अ‍ॅडमिन यांना सांगून इथल्या इर्रिलेव्हंट पोस्टी काढून टाकता येतील का?

तुम्ही आणि मी स्वच्छ सोय मिळावी म्हणून दिवसातून किमान ४-५ वेळा ५ रूपये देऊ शकणार्‍या आर्थिक गटात आहोत. पण सर्व स्त्रिया नसतात. ज्यांना परवडत नाही त्यांना हायजिन व आडोसा नाकारायचा का?
एक नागरिक म्हणून बेसिक हायजिन आणि आडोसा या गोष्टी मानवी अधिकाराच्या यादीतल्या आहेत. लिंग, आर्थिक परिस्थिती, धर्मजातवगैरे बिनकामाचे तपशील यापलिकडे जाऊन केवळ मानव आहोत म्हणून हे अधिकार आहेत.>>>>>

याशिवाय यात फक्त वैयक्तिक हायजिनचा प्रश्न नाहीये. उघड्यावर मलमूत्र विसर्जन समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीनंही घातक आहे. यात परत महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न आहे. गावांमधून बायका पहाटे उजाडायच्या आत किंवा अंधार पडल्यावर परसाकडे जातात तेव्हा अंधाराचा फायदा घेऊन अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

याशिवाय यात फक्त वैयक्तिक हायजिनचा प्रश्न नाहीये. उघड्यावर मलमूत्र विसर्जन समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीनंही घातक आहे. यात परत महिलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न आहे. गावांमधून बायका पहाटे उजाडायच्या आत किंवा अंधार पडल्यावर परसाकडे जातात तेव्हा अंधाराचा फायदा घेऊन अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. <<

+ १००

जितकं या विषयाच्या खोलात जाऊ तितकी याची व्याप्ती मोठी आहे हे लक्षात येत गेले आहे.

स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे, ती साफ ठेवणे हे प्रशासनाचे कर्तव्य पण नागरिक म्हणून आपण कुठे आहोत?
एक संपूर्ण समाज म्हणून बघायचं तर आपण भारतीय हे सार्वजनिक पातळीवर अत्यंत अस्वच्छ आहोत. का, कसे, कश्यामुळे, कुठे, किती प्रमाण हे सगळं बाजूला ठेवून हे मान्य व्हायला हवे.

आपल्याला स्वच्छतागृह कसे वापरायचे हे माहित नसते. स्वच्छतागृहात आपला उद्योग करून झाल्यावर पाणी टाकायचे/ साफ करायचे वगैरे माहित नसते.

याच धाग्यावर आधी शाळाशाळांमधे छोटी वर्कशॉप्स घेण्याचा मुद्दा चर्चिला गेला आहे. त्याबद्दलचे मुद्दे काढताना लक्षात हे यायला लागले की ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्यच आहे अश्या ठिकाणचे काय? तिथे कुठल्या तोंडाने सांगायचं झालं की पाणी टाका म्हणून?
लोकांना प्यायला पाणी पुरवणे प्रशासनाला झेपत नाहीये. हे कुठून झेपणारे?

पाण्याशिवायची स्वच्छतागृहे ही संकल्पना ज्यांनी तयार केलीये त्यांचे काम अजून समजून घ्यायचे आहे.

असो.. हे असेच रॅण्ट म्हणून..

बाकी जर उपाय, समस्या या संदर्भाने काहीही नवीन म्हणण्यासारखे नसेल तर हा धागा शंभर पाने मागे गेला तरी चालेल. पण कृपया नेहमीची धुळवड इथे खेळू नका.

मागच्याच आठवड्यात पेपर मध्ये वाचलं की बिहार की कुठल्याश्या राज्यात लोकांनी सरकारनी बांधून दिलेली टॉयलेट्स तोडली. बरेच लोक ती तशीही वापरत नाहीच. काही लोकांनी त्याचा स्टोररूम म्हणून वापर केला तर काहींनी त्यात दगड्/विटा/माती टाकून ती कायमची निकामी केलीत.
Those people prefer to go to open farms for toilet needs instead of closed toilets!

लिंक मिळाली की इथे देतोच.

>>>>> आपल्याला स्वच्छतागृह कसे वापरायचे हे माहित नसते. स्वच्छतागृहात आपला उद्योग करून झाल्यावर पाणी टाकायचे/ साफ करायचे वगैरे माहित नसते. <<<<<
यासही आपली आत्यंतिक एकांगी मूर्खपणाच्या ग्रुहितकावर आधारीत पुरुषप्रधान संस्कृती कारणीभूत आहे, मी कित्यक घराम्मधे पाहिले आहे की संडासला जायचे तर घरातल्या स्त्रीने/सुनेने पुरुषास्/पोराटोरांस टमरेल भरुन हातात द्यायचे, मग ही धेंड पर्साकडला जाणार.... अन वर मुजोरी अशी की आमच्याकडे अश्शीच पद्धत अस्ते!
असे पुरुष जेव्हा बाहेर जातात, तेव्हा काय कप्पाळ स्वच्छता राखणार? असो. तो एक वेगळाच पैलु आहे.

वर माझ्या मुद्याची बर्‍यापैकी खिल्ली उडवली आहे की कमोडचे आजुबाजुला काही करायचेच नसते. मला ते माहित आहे. पण....... !
इथे माहित असण्याचा संबंधच नसतो, तर मुळातच कमोडची सीट किंवा सीटशिवायचे कमोड इतके अस्वच्छ असते की त्यावर "बसणे" म्हणजे नरकयातनाच होत. अन म्हणून "बाजुला रिक्याम्या चिंचोळ्या जागेत" उरकावे लागते.
आता ज्यांना फाईव स्टार हॉटेल मधिलच कमोड फक्त माहित आहेत, त्यांचे करता सांगतो की तिथे पाण्याचा एक थेंबही उपलब्ध होत नाही एक्सेप्ट कमोडचा फ्लश. तिथे युरोपिअन थंडगार स्टाईलने फक्त पेपरच उपलब्ध अस्तो.
अर्थात आपली चर्चा वा उदाहरणे ये देशीच्या फाईव स्टार हॉटेलातील टेन स्टार टॉयलेट्स बद्दल नसुन बाकि सार्वजनिक ठिकाणच्या सुविधांबद्दल आहे.

वरील थेऊर वा तत्सम ठिकाणी शाळेच्या सहली येत असतात बस बस भरुन. मी स्वतः काही ठिकाणि प्रत्यक्ष बघितले आहे की पन्नास सीटर बस भरुन आलेल्या लहानग्या शाळकरी मुली, सग्ळ्यांन्नाच जमले पैसे देऊन तिथे जायला असे नाही, शिक्षकाम्चे लक्ष होतेच असेही नाही की त्यांनी पैसे भरले असते, शिवाय माझ्याकरता मला मुतायचे आहे म्हणुन त्याची फी तुम्ही भरा असे सांगण्यातही त्या लहानग्या मुलिंना स्त्रीसुलभ लाज वाटत असेलच. अशी लाज वाटताना तर मी भरल्या घरातील स्त्रीया (खास करुन नवपरिणीत सुनांना) बघितले आहे. शेवटी नवर्‍यास बाजुला घेऊन शाब्दिक कानफटवला तेव्हा तो मग आपल्या बायकोची "योग्य ती" काळजी घेऊ लागला.
हे सगळे सांगायचे कारण इतकेच, की वैयक्तिक रित्या तुम्हाला स्वतःला काय उपलब्ध आहे, यावरुन या प्रश्नाचा धांडोळा घेऊ नका, कल्पनाशक्ति थोडी विस्तारा अन विदारक सत्य बघा.
लिंब्याची पोस्ट पिळण्यास फार अक्कल लागत नाही हे माबोवर सगळ्यांनाच माहिती आहे. पण मूळात मांडलेल्या प्रश्नास आधी तो नीट समजुन घेऊन मग उत्तर शोधण्यास निश्चितच अक्कलेची व त्याहुन जास्त किमान माणुसकीची जरुरी आहे.

लिंबुकाका, अनुमोदन!
छान पोस्ट!

त्या टॉयलेट सीटवर आणि त्या भांड्यातही काय काय असते हे पाहता अगदी असेच होते.

एस टी स्टँडवर तर पाण्याअभावी घाणीने अगदी इंडीयन स्टाईलचे संडास आणि उलट्यांनी बेसिन भरलेले असते.
त्यामुळे बायका अगदी पैसे देऊनही संडास बाहेरच्या पॅसेजमध्ये शू चे कार्यक्रम आटपतात किंवा संडास उपलब्ध असेल तरी बाहेर उघड्यावर जाणे पसंद करतात.

बाकी डिस्पोजेबल कागद्/कागदी कमिड सीट यांत हायजिन वाटली तरी पर्यावरणाचा किती र्हास होतो हे कोण्बघणार?

>>>> ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्यच आहे अश्या ठिकाणचे काय? तिथे कुठल्या तोंडाने सांगायचं झालं की पाणी टाका म्हणून? <<<<
>>>>> पाण्याशिवायची स्वच्छतागृहे ही संकल्पना ज्यांनी तयार केलीये त्यांचे काम अजून समजून घ्यायचे आहे <<<<
हा एक स्वतंत्रच प्रश्न आहे. या दुसर्‍या पर्यायाचा नीट अभ्यास व्हायला हवाय.

गंमतीचा भाग म्हणजे, प्यायला / टाकायला पाणि नाही, अन तरीही मराठवाड्यात "स्त्रीयांकडून पैसे" घेणे काही थांबत नाहीच. ज्यांच्याकडे पैसे नव्हते, त्या तशाच कॉन्ग्रेस गवताच्या आडोशाला बसुन उरकत होत्या अन आजुबाजुला डुकरांचे लेंढार लुडबुडत होते. हे प्रत्यक्ष नजरेने पाहिलेले आहे, व प्रातिनिधिक आहे.

हे सर्वच हॉरिबल आहे.

परवा स्वच्छ भारत अभियानाच्या एका कार्यक्रमाला गेले होते.
प्रोजेक्टचे नोडल ऑफिसर तावातावाने संडास वापरा, संडास बांधा, आम्ही अनुदान देतो इत्यादी काय्काय सांगत होते.
शेवटी 'आपल्याकडे कुणी पुरुषमंडळी आली की बायकांना घरात जा सांगतो आणि चहा वगैरे सुद्धा स्वतः आणतो. आपल्या बायकांचं नखही बाहेरच्यांना दिसू देत नाही आणि सकाळी मात्र याच बायका टमरेल आणि तोंडावरून पदर घेऊन रस्त्याच्या कडेला बसतात. यात काय इज्जत राहिली?' असं भावनिक आवाहनही केलं.

गावात आत्तापासून पिण्याच्या पाण्यालाच टँकर लागतोय अशी स्थिती.
संडास साफ ठेवायला पाणी कुठून आणणार?

Pages