' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

Submitted by नीधप on 4 November, 2008 - 10:31

दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाच्या विषयासंदर्भाने अनेकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. साहजिक आहे कारण प्रॉब्लेम सगळ्याच आयाबायांचा आहे.
हा धागा तुमचं म्हणणं मांडण्यासाठी सुरू करतेय.
मी लेख लिहिला तेव्हा निश्चितच माझ्या डोळ्यासमोर पुढची कृती नव्हती. पण एकुणात मिळालेला प्रतिसाद बघता आपण काही करू शकतो का याबद्दल असा विचार सुरू होतोय.
माझा लेख इतर अनेक ठिकाणी देण्याबद्दल मला अनेकांनी विनंती केलीये पण एकदा इथे प्रसिद्ध झाल्यावर परत इतर ठिकाणी कोणी घेतील की नाही याची मला कल्पना नाही. कुणाला माहित असेल तर जरूर कळवावे.
माझ्याकडून होण्यासारख्या या तीन गोष्टी आहेत. ज्या माझ्या आवाक्यातल्या आहेत आणि मी त्या यशस्वीरित्या करू शकेन.
१. एका कव्हर लेटरसहीत या लेखाची प्रत मुंबईच्या महापौर शुभा राउळ यांना पाठवणे आणि त्यांना ह्या समस्येत लक्ष घालायला लावणे.
२. या विषयावर अजून अभ्यास करून मग अर्धा तासाचा एक माहितीपट तयार करणे. जो अनेक ठिकाणी लोकांवर आदळवणे (हॅमर चे भाषांतर..)
३. हाच विषय घेऊन किंवा या लेखातून २५-३० मिनिटाचा प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स तयार करणे जो वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमांच्या वेळी त्या त्या ठिकाणी जाउन सादर करणे. जेणेकरून कुठल्यातरी स्त्री समस्यांशी संबंधित कामे करणार्‍या संस्थेला ह्याचा पाठपुरावा करण्याची इच्छा व्हावी.

प्रशासकीय पातळीवर करायचे प्रयत्न करण्याची माझी ताकद वा अनुभव नाही. पण हे वरचं मी नक्की करू शकते. यात कुणाला माझ्याबरोबर यायचं असेल, मला मदत करायची असेल तर तुमचं स्वागतच आहे.

तुम्ही स्वतःहून या संदर्भात काही उपक्रम हाती घेत असाल तर तेही इथे मांडा म्हणजे कोण काय करतंय याची माहिती आणि चर्चा दोन्ही घडेल.

तसेच कुणाला काही सूचना करायच्या असतील या संदर्भात तर त्याही जरूर कराव्यात.

या सगळ्या संदर्भात अजून काही माहीती असेल कुणाला. तर तीही कृपया इथे द्यावी.

सत्यजित याने काही शोधाशोध करून माहिती मिळवली आहे ती त्यानेच इथे टाकावी अशी मी त्याला विनंती करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका कव्हर लेटरसहीत या लेखाची प्रत मुंबईच्या महापौर शुभा राउळ यांना पाठवणे आणि त्यांना ह्या समस्येत लक्ष घालायला लावणे.>>>नुसत्या मुंबईचा नाही ग प्रश्न हा. तरिपण हरकत नाही तिथे सुरवात झाली तर सगळीकडे काहितरी होउ शकतं

पुढच्या दोन पर्यांच पण स्वागत....माझी काय मदत होउ शकेल याचा विचार करतेय. तुला काहि सुचलं तर जरुर कळव

>>नुसत्या मुंबईचा नाही ग प्रश्न हा.<<
खरं आहे. मी मुंबईत रहाते सध्या आणि माझ्या लेखातले संदर्भही बरेचसे मुंबईचे आहेत म्हणून मी मुंबईच्या महापौरांकडे म्हणाले. मला तर वाटतं प्रत्येक शहरातल्या कुणी आपापल्या शहरातले या समस्येच्या संदर्भातले अनुभव लिहून आपापल्या शहराच्या महापौरांकडे पाठवले तर नक्कीच काही होऊ शकेल.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

'स्वच्छतागृह बांधुन मिळाल्यावरही समस्या संपेल का' ह्याचा पण विचार व्हावा. वापरणार्‍यांच्या अकला गहाण असतात (निम्म्याहून जास्त) . तेव्हा फॅसिलिटी उभारल्यावर ती मेंटेन करण्याबाबत उहापोह झाला तर आणखी उपयोग होईल असं वाटतं.

नी, सर्वच पर्याय उपयुक्त वाटत आहेत. पहिला पर्यायाने चांगली सुरुवात होवु शकते. मुंबईत या समस्येला आळा बसत असेल तर तोच तोडगा सगळीकडे अमलात आणणे सोपे जाउ शकते.
मॄणला अनुमोदन. अशी व्यवस्था नुसती उभारून उपयोग नाही, मेंटेन करण्याची व्यवस्थापण असावी.

खरंच अत्यंत गरजेच्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल अभिनंदन निरजा! (वरच्या पोस्ट्मधे राहुन गेलं).

वापरणार्‍यांच्या अकला गहाण असतात >>>> अनुमोदन. इथे चक्क माझ्या ऑफिसमधील स्वच्छतागृहात देखील "आपल्यानंतर ही जागा वापरणार्‍यांची कीव करा" अशा अर्थाचे फलक लावले आहेत ह्यात काय ते आले Sad

अजून काही लिहायचे आहे, ते नंतर. सध्या इतकेच की अज्जुकेच्या लेखाची एक प्रत काढुन आमच्या (भारतातील) गावच्या नगराध्यक्ष बाईंना द्यावी म्हणते. अज्जुका, तुझी परवानगी आहे का ?

मृ आणि सिंडीला अनुमोदन. भारतात सुशिक्षित समजल्या जाणार्‍या समाजातदेखिल याबाबतीत उदासीनता जाणवते. लोक बाथरूम्स नीट वापरत नाहीत, रेस्टरूम व्हिजीट नंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत ही साधी पण तितकीच महत्वाची गोष्ट लोक पाळत नाहीत. शहरात ही तर्‍हा तर खेड्यांमधे काय प्रकार असेल..
इथेही थोड्याफार फरकाने तोच प्रकार दिसतो. सिंडी म्हणते त्याप्रमाणे आमच्या ऑफिसमधल्या बाथरूममधेही अश्या सूचना लावल्या आहेत Sad

निरजा आणि ज्या ब्लॉग लिहितात त्या सगळ्या एक सुचावणी , ह्याबद्दल प्रत्येकिनं ब्लॉगवर लिहिल तर ?
आजकाल वर्तमानपत्रात ई-विश्वाचि बरीच दखल घेतली जाते

या विषयावर अजून अभ्यास करून मग अर्धा तासाचा एक माहितीपट तयार करणे. जो अनेक ठिकाणी लोकांवर आदळवणे (हॅमर चे भाषांतर..) >>>

माझ्यामते हा उपाय सर्वात चांगला ठरेल. त्यासाठी मात्र लोनावळा, पनवेल, बार्शी फाटा, चौपुला व इतर अनेक ठिकानं जिथे अशा ट्रॅव्हेल्सच्या गाड्या जिथे थांबतात तिथे जाऊन प्रत्यक्ष मुलाखात घ्यावी लागेल, बायका त्याला तयार होतील का नाही हे माहीत नाही. ही कल्पना खुप चांगली आहे. शिवाय अभिनव ही. (ह्या बाबतीत)
माहितीपट स्पर्धेतही उतरवता येईल. मी फक्त कर्मशिअल विचार करत नाही तर, त्यामुळे हा विषय सर्वांपर्यंत जाउ शकतो. व पर्यायाने सरकार ह्याबद्दल दखल घेऊ शकते.
माहीतीपट करायचे ठरले तर त्याला लागनारे थोडे फार आर्थीक सहाय्य मी करायला तयार आहे. कदाचित बाकीचे पण तयार होतील.

विषय फक्त सरकार व जनते पर्यंत पोचवनेच आपले काम, स्वच्छतागृहे काढून चालविने त्यांची जबाबदारी. तुमचा मुद्दा मान्य पण सध्या ही फॅसीलीटीच नाही.

ह्या विषयावर ऐखादा कायदा करे पर्यंत पाठपुरावा केला तरच ह्या सुविधा गावोगावी येतील. कायदा करने हा उपाय नसायला पाहिजे, पण गेल्या शेकडो वर्षात काहीच फरक् पडला नाही म्हणून कायदा. ह्यासाठी जनहितार्थ केसही टाकू शकतो, पण ते खर्चीक व वेळखाऊ होईल. चित्र विदारक आहे पण सत्य आहे.

फक्त भारतात नाही गं, मला तर ३-४ आंतरराष्ट्रीय विमानतळांवर, लंडन, मुंबई, पुणे, हार्टफोर्ड, स्टॅमफोर्ड ओफिसमधे, इतर सार्वजनिक ठिकाणी हा अनुभव आला आहे. सुशिक्षित व्यक्ती सुजाण असेलच असे नाही ह्याचे "हे" उत्तम उदाहरण आहे Happy

एक वेगळी कल्पना मांडतोय. इथे आपण मुंबईत प्रत्येकाला माहिती असणारी चांगली स्वच्छता गृहे (त्यांचे पत्ते) देऊ शकतो. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ही माहिती मोबाईलवरून उपलब्ध करता येईल. जर एखाद्या उपनगरात गेल्यावर जायची वेळ आली तर जवळचे स्वच्छता गृह मोबाईलवरून पटकन सापडवता येईल.
(मूळात स्वच्छता गृह नसेल तर हा त्या वर उपाय नाही. पण वर सुचवलेले सगळे उपाय अंमलात येईपर्यंत हा वापरता येईल)

सगळ्यांच्या सूचना मोलाच्या आहेत.
सिंड्रेला, जरूर माझ्या लेखाची प्रत दे तुमच्या नगराध्यक्षांना.
मृण्मयी, खरंय की नुसती टॉयलेटस उपलब्ध झाल्याने प्रश्न सुटणार नाही. त्यासाठीही प्रशिक्षणाची गरज आहेच.
प्रत्येकीने आपल्या ब्लॉगवर या गोष्टीला वाचा फोडावी ही सूचना तर अगदी अगदी..
एकाचवेळेला अनेक ब्लॉग्ज वर हाच विषय चर्चिला जात असेल तर नक्कीच दखल घेतली जाईल.

केदार, डॉक्यु करायची म्हणल्यावर ते सगळं मी अर्थातच करणार आहे. जागोजागची टॉयलेटस, वापरणार्‍यांचे अनुभव, टॉयलेट एथिक्स, प्रशासनापुढची समस्या (तीही समजून घ्यायला हवी), प्रशासनाचे म्हणणे, उपाय निघू शकतो की नाही?, एकच टॉयलेट असणार्‍या मोठ्या हॉटेल्सच्या मालकांचे, वास्तुविशारदांचे म्हणणे सगळं सगळंच येणार. रफ स्क्रिप्टिंगला अजून सुरूवात व्हायचीये पण. झाली तयार डॉक्यु की वेगवेगळ्या ठिकाणी त्याची स्क्रिनिंग्ज, फेस्टिव्हल्स च्या राउंडस हे सगळं मी करणारच. ते नेटवर्क बर्‍यापैकी माहीतीये मला. म्हणूनच म्हणाले डॉक्यु हे प्रकरण मी यशस्वीपणे करू शकते.

त्याविषयी सविस्तर इमेल/ फोन वर बोलूया का?

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मी अजुन काही नाही करू शकले तरी ब्लॉग वर नक्कीच लिहू शकीन.. अज्जुका तुझ्या लेखाची लिंक, ही चर्चा इत्यादी देईन ब्लॉगवर..

मध्यंतरी म.टा. ने ह्याच प्रश्नावर एक लेखमाला सुरू केली होती 'मटा फोकस' ह्या सदरात. पण दोन्-चार लेख लिहून झाल्यावर त्यांचा प्रोजेक्ट संपला असावा बहुधा... त्यामुळे जरी ह्या प्रश्नाची त्यांच्या मते त्यांनी चिरफाड केली असली तरी लेखमाला संपल्यावर हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. आणि टॉयलेट्सची स्थितीही 'जैसे थे'च राहिली. त्यातल्या काही लेखांच्या ह्या मिळालेल्या लिंक्स..
लेडिज टॉयलेट्स नेमकी कुणासाठी?
यांचा वापर करायचा तरी कसा?

अस्वच्छतेची परंपरा जपणारे एसटी स्टॅण्डवरचे टॉयलेट

अज्जुका, डॉक्यूमेंटरीला जास्त प्रतिसाद मिळेल असं मला वाटतंय. आणि सगळ्या शहराच्या महापौरांना, मी-मी म्हणवणार्‍या नगरसेवकांना लेखाची प्रत पाठवून दखल घ्यायला भाग पाडणं आवश्यक आहे.

महापौर म्हणजे परत राजकारणी लोकं. ही लोकं कितपत याकडे लक्ष देतील हे माहितीच आहे. म्हणून फक्त लघुपट काढून भागणार नाही तर तो लघुपट सर्वसामान्य जनतेपर्यंत कसा पोचेल आणि त्यामागे तुमचे काय उद्दीष्ट आहे हे त्यांना कसे कळेल हे महत्त्वाचे. महापौर लोकांना हा प्रश्न माहिती नसावा असे मला तरी मुळीच वाटतं नाही. हा तर सर्वात मुलभुत प्रश्न आहे.

इथे परदेशात रेल्वे-बसस्थानका शेजारी जे शौचालय असतात तेही अत्यंत घाण अणि दुर्गंधी असतात. पण इथे लोकसंख्या कमी आहे शिवाय मॉल्स खूप आहेत म्हणून त्यांना हा प्रश्न भेडसावत नसेल. पण असे मुळीच नाही की हा प्रश्न फक्त भारतातच आहे.

अखिल भारतीय स्तरावर हा प्रश्न सोडवायचा असल्यास ३३% आरक्षण घेउन नंतर त्या प्रतिनिधींना हे करायला लावणे हा उपाय वाटतो.स्थानिक समस्या सोडवायची असल्यास अजयचा उपाय ठिक आहे

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

अज्जुका, तू नुसती वाचा फोडून थांबली नाहीस तर त्याबद्दल काहीतरी ठोस पावलं उचलते आहेस म्हणुन मी तुला मानतो.

ही फार जुनी समस्या आहे. ४० वर्षांपूर्वी कल्याणसारख्या ठिकाणी सुध्दा पाटीचे संडास होते हे आत्ता कुणाला खरं वाटणार नाही. पण हळुहळू सुधारणा होतेय असं पण म्हणायला पाहीजे. अर्थात त्याचा वेग आता वाढायलाच हवा. अजून बर्‍याच शाळा-कॉलेजमधेही स्वच्छ टॉयलेट नसतात. सर्वांचच बौध्दिक घेण्याची गरज आहे, त्या कामी तुझा लघुपट फारच कामाला येईल. त्यातून 'स्वच्छता हा आमचा हक्क आहे' अशा अर्थाचा संदेश सगळ्यांना मिळाला पाहीजे.

या संदर्भात 'सुलभ इंटरनॅशनल' या संस्थेने बरेच काम केले आहे. त्याबद्दल इथे पहा - http://www.sulabhinternational.org/
त्यांनी बरीचशी टॉयलेट्स उभारली आहेत. पण ती चालवतांना त्यांना बर्‍याच अडचणी येतात - उदा. दिवे, नळ चोरीला जाणे. आपण काही वेगळे करण्यापेक्षा याच संस्थेला कशी मदत करता येईल हे आधी पहावे असे मला वाटते. उदा. कुणाला वरील समस्येवर काही उपाय (अर्थातच कमी खर्चिक) सुचलाच तर त्यांना सांगता येईल. मुंबईत रहाणार्‍यांपैकी कुणी जर त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या पुढील उपक्रमांची आणि समस्यांची माहिती घेतली व इथे चिकटवली तर सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल. त्यानंतर पुढे काय करायचे हे ठरवता येईल.

त्यांचा पत्ता खाली आहे.

Sulabh International
Social Service Organisation
52/B, Sindhi Society
Chembur
Mumbai - 400 071
E_mail: skinimumbai@yahoo.co.in
022-25295177 022-28415883 9920018221

चिन्या,
तू म्हणतोयस ते योग्य असेलही कदाचित पण राजकीय वा प्रशासकीय पातळीवर काही करण्याची माझी ताकद, मानसिकता आणि लायकीही नाही. मला माझ्या मर्यादा आणि strongpoints दोन्ही माहीतीयेत त्यामुळे मी जे उपाय सुचवले/ करणारे ते माझ्या आवाक्यातले आहेत.
पण अर्थातच तू जो मार्ग म्हणतोयस त्या बाजूनेही कोणी प्रयत्न करायला हरकत नाही.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

चिमण्या गोखले,
अर्थातच वेगळं काही उभारण्यापेक्षा आहेत त्या सोयी जास्त चांगल्या कश्या होतील या दृष्टीनेच प्रयत्न करायला हवेत.
तु दिलेल्या माहितीबद्दल आभार. डॉक्यु मधे निश्चितच त्यांना काय काय समस्या आहेत ते include करणे गरजेचे आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अज्जुका तूला मेल केलय.

लोकहो केदार आणी टण्याने बरीच काही मदत करायचे मनावर घेतलेय. सत्या पण इतर काही मार्ग शोधतोय.
मला डॉक्यु साठी सुरुवातीच्या फेजमधे manpower लागणारे. रिसर्च साठी. तपशील टाकीन मी इथे पण whoever is interested, all welcome to join the bandwagon...

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नी, लेख आवडला. आवडला म्हणण्यापेक्षा भिडला असं म्हणणं योग्य ठरेल कारण गाडीवर भटकंतीत हा त्रास मला पदोपदी होत असतो. अगदी हायवेवर सुद्धा टॉयलेट असलेलं हॉटेल शोधण्यात इतका वेळ जातो. फार कमी हॉटेल्समध्ये स्वच्छ टॉयलेट्स असतात. अर्थात गोवा, हैदराबाद अशा काही ठिकाणी जागोजागी पब्लिक टॉयलेट्स आहेत आणि ती बर्‍यापैकी स्वच्छ असतात ही जमेची बाजू. रिलायन्स पेट्रोलपंपावर (दुर्दैवाने ते पंपच आता बंद पडलेत) तसचं HPच्या काही पंपावरही ही सोय आहे. अर्थात हे सगळं पुरेसं नाहीच. तुझ्या डॉक्युमेंट्रीच्या उपक्रमात काही मदत करायला किंवा इतर कोणत्याही प्रकारे ह्या विषयावर काम करायला आवडेल. मी काही करु शकते का??

अज्जुका
लेख आवडला. टॉयलेट्सची छोट्या गावातून तर भयानक अवस्था आहे. आम्ही नगरला असतो. जर कधी बसने पुण्याला जायची पाळी आली तर प्रवासाला जाण्याआधी ३/४ तासपासून पाणीच प्यायले जात नाही. कारण नगर पुणे अंतर दोन अडीच तासांचेच आहे. पण एकंदरीत ३/४ तास लागतातच. तर एवढ्या काळात आपल्याला टॉयलेटला जायचेच नाही असे मनाशी पक्के ठरवून मगच बसमध्ये बसायचे! कारण मधल्या एस टी स्टँडवर हा विचार करणे अशक्य कोटीतली बात आहे.

अज्जुका,जर ही समस्या अखिल भारतीय स्तरावर सोडवायची असल्यास सरकारवर अवलंबुन रहावेच लागेल्.बाकी ते सोडून जे सर्वांच्या आवाक्यात आहे ते तर करावच लागेल्.मी फक्त मत दिल की खेड्यापाड्यात वगैरे ही समस्या सोडवायची असल्यास आपण फारस काही करु शकणार् नाही. ३३%च्या मार्गावरच अवलंबुन रहायची गरज नाही.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

डायरेक्ट पुणं, मुंबई..वा इतर कुठल्या मोठ्या गावाला जायचं असेल तर खासगी बसेसचा पर्याय असतोच ब-यापैकी चांगल्या ठिकाणी ह्या बसेस थांबतात. सोय होते. पण हेच जर अडमार्गी असणा-या गावात जायच असेल तर आणि त्यातही एकटीला जायच असेल् तर एस-टी महामंडळाच्या लाल डब्ब्याशिवाय पर्याय नसतोच. एकटीसाठी गाडी घेउन जाणं परवडतच असं नाही. हा प्रवासही ब-याचदा ५ तासापेक्षा जास्त असतो. अश्या वेळी तर किती शिव्या घालव्या आणि कोणाला घालव्या तेही कळत नाही. Sad

या बाबत एस-टी महामंडळाशी संपर्क साधला तर काही मार्ग निघेल का? Uhoh

चिन्या,
तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे फक्त तो माझ्या कुवतीतला मार्ग नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याही बाजूने प्रयत्न करावा.
श्यामले,
खाजगी बस ज्या ठिकाणी थांबतात तिथे सोय बरी असते पण अर्ध्याहून अधिक प्रवाशांनाच अकला नसतात कसं वापरायचं या.
एसटी महामंडळाशी संपर्क साधायला काहीच हरकत नाही.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अज्जुका, बर्‍याच वर्षान्पासून माझ्याही मनात खदखदत असलेल्या, "खरतर ज्वलन्त" अशा विषयावर लेख लिहिला हेस!
हा प्रश्ण केवळ स्त्रीयान्चाच हे अस नाही तर पुरुषान्साठी देखिल ही परिस्थिती भयानक हे! अर्थात स्रीयान्च्या बाबतीत त्याचे गाम्भिर्य जास्तच वाढते, हे ही तितकेच खरे!
या विषयाला, दिवाळी अन्कामार्फत तोन्ड फोडलेस ते बरे केलेस
...;
आपला, लिम्बुटिम्बु

अज्जुका,त्या मार्गावर विसंबुन रहाण्यात काही पॉईंंट नाही.

हा प्रश्ण केवळ स्त्रीयान्चाच हे अस नाही तर पुरुषान्साठी देखिल ही परिस्थिती भयानक हे!
ऐकाव ते नवलच्.आम्हाला तर अस कधी नाही वाटल.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

Pages