' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

Submitted by नीधप on 4 November, 2008 - 10:31

दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाच्या विषयासंदर्भाने अनेकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. साहजिक आहे कारण प्रॉब्लेम सगळ्याच आयाबायांचा आहे.
हा धागा तुमचं म्हणणं मांडण्यासाठी सुरू करतेय.
मी लेख लिहिला तेव्हा निश्चितच माझ्या डोळ्यासमोर पुढची कृती नव्हती. पण एकुणात मिळालेला प्रतिसाद बघता आपण काही करू शकतो का याबद्दल असा विचार सुरू होतोय.
माझा लेख इतर अनेक ठिकाणी देण्याबद्दल मला अनेकांनी विनंती केलीये पण एकदा इथे प्रसिद्ध झाल्यावर परत इतर ठिकाणी कोणी घेतील की नाही याची मला कल्पना नाही. कुणाला माहित असेल तर जरूर कळवावे.
माझ्याकडून होण्यासारख्या या तीन गोष्टी आहेत. ज्या माझ्या आवाक्यातल्या आहेत आणि मी त्या यशस्वीरित्या करू शकेन.
१. एका कव्हर लेटरसहीत या लेखाची प्रत मुंबईच्या महापौर शुभा राउळ यांना पाठवणे आणि त्यांना ह्या समस्येत लक्ष घालायला लावणे.
२. या विषयावर अजून अभ्यास करून मग अर्धा तासाचा एक माहितीपट तयार करणे. जो अनेक ठिकाणी लोकांवर आदळवणे (हॅमर चे भाषांतर..)
३. हाच विषय घेऊन किंवा या लेखातून २५-३० मिनिटाचा प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स तयार करणे जो वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमांच्या वेळी त्या त्या ठिकाणी जाउन सादर करणे. जेणेकरून कुठल्यातरी स्त्री समस्यांशी संबंधित कामे करणार्‍या संस्थेला ह्याचा पाठपुरावा करण्याची इच्छा व्हावी.

प्रशासकीय पातळीवर करायचे प्रयत्न करण्याची माझी ताकद वा अनुभव नाही. पण हे वरचं मी नक्की करू शकते. यात कुणाला माझ्याबरोबर यायचं असेल, मला मदत करायची असेल तर तुमचं स्वागतच आहे.

तुम्ही स्वतःहून या संदर्भात काही उपक्रम हाती घेत असाल तर तेही इथे मांडा म्हणजे कोण काय करतंय याची माहिती आणि चर्चा दोन्ही घडेल.

तसेच कुणाला काही सूचना करायच्या असतील या संदर्भात तर त्याही जरूर कराव्यात.

या सगळ्या संदर्भात अजून काही माहीती असेल कुणाला. तर तीही कृपया इथे द्यावी.

सत्यजित याने काही शोधाशोध करून माहिती मिळवली आहे ती त्यानेच इथे टाकावी अशी मी त्याला विनंती करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्जुका, documentary च्या research साठी US मधून जी मदत करता येईल ती करायला मी तयार आहे आणि आर्थिक मदत सुध्दा ..
साखळी इमेल असेल तर please मला पण Add करा.

<<एका कव्हर लेटरसहीत या लेखाची प्रत मुंबईच्या महापौर शुभा राउळ यांना पाठवणे आणि त्यांना ह्या समस्येत लक्ष घालायला लावणे.>>

याची एक प्रत आपण सुप्रिया सुळेंना देखिल पाठवु शकतो. आजकाल त्यासुद्धा स्त्रियांच्या आणि एकंदरीत सगळ्याच सर्व साधारण समस्यांबाबत जागरुकपणे सरकारचा पाठ पुरावा करत असतात.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.

एक वास्तव.. दिव्याहून ( मुंब्र्याच्या पुढच ) रोह्याला ( कोकणातल्या ) जायला रोज एक शटल टाईप ट्रेन असते. एकूण प्रवासाला ३/३.३० तास लागतात. कोकण रेल्वेला एकच ट्रॅक असल्याने बर्याच वेळा मेल एक्स्प्रेस आली की ह्या गाडीला साईड ला घेतात. ( आता मुळ मुद्दा ) ह्या ट्रेन मध्ये टॉयलेट्स नाहीत... ( अश्या दुसर्या ट्रेन्स असतील तर कल्पना नाही ) पण ह्या ट्रेन ने प्रवास करणे एक शिक्षा असते.

आज एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन आहे असे रेडिओवर ऐकले...

बाप रे लेबर डे असला की लेबर्स ला सुट्टी देतात तसा काही प्रकार नाही ना Wink

नीरजा,
हा प्रश्न पुरूषांचाही आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते !
डॉक्यु.साठी मी काय मदत करू शकेन त्याची तयारी आहे. मला मायबोलीवरून इमेल पाठवशील का?

सध्या राष्ट्रीय शहर स्वच्छता मोहीम सुरु आहे. नुकत्याच स्वच्छतेच्या निमित्ताने भरलेल्या आशियाई देशांच्या परिषदेत भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी specifically स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबतचा मुद्दा मांडला आहे.

सध्या "सकाळ" मधे रोज याबद्द्ल बातमी येत आहे. आजचीच बातमी आहे की केंद्रीय नगर विकास खात्याने सर्व पालिकांना स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे असे त्यात म्हटले आहे. तर या मोहिमेच्या प्रशासकांशी हात मिळवून ही मोहीम खूप पुढे नेता येईल असे वाटतेय. In other words, the timing could not be better!

जाता जाता.. मुंबईत बृहन्मुंबई प्रशासनाचा बोर्ड पाहिला - कचरा फेकणार्‍याला २०० रू. दंड. असा नियम पुण्यात का नाही? असा नियम सगळीकडे हवा व तो अंमलात यायला हवा याचा पाठपुरावा केला पाहिजे.

हा सर्व (मराटी आणी इतर) लोकाचा प्रश्न असल्यामुळे इतर भाशात ही लीहीणया ची गरज आहे.

मी काही साईट शोधल्या आहेत. मी WHo India ला फोन केला होता ते काही मदत करु शकतात का हे पहाण्या साठी. त्यवर मला माहीती मिळाली की ए.के. सेनगुप्त ह्यांच्याशी संपर्क साधावा लागेल मी काही वेळा प्रयत्न केला पण त्यांच्याशी बोलण होउ शकल नाही. मेल केली अजुन तरी रेप्लाय नाही. चला सुरवात चांगली झाली म्हणायची... Happy

माझ्या मते हे काम अस एकएकट्याने करुन होणार नाही आहे. श्रद्धा आणि सबुरीची नितांत गरज आहे. कामाचा ढोबळ आराखडा आखुन त्याची विभागणी होणे गरजेच आहे. माझ्या मते Corporate NGO's जसे ईन्फोसीस, विप्रो, HP, ect. ह्याच्याशी बोलणी करुन काही मदत मिळते का बघाता येईल. सर्वात आधी निरजाच्या लेखाचा आधर घेउन मराठी, हिंदी आणि इंग्लीश भाषेत एक निवेदन पत्रिका तयार करावी लागेल जेणे करुन कुठेही जाताना मुद्देसुदपणे बोलता येईल. मग एखादी मेल तयार करुन ते १०-१५ लोकांना पाठवा असे अव्हान करुन सामाजिक जाणिव तयार करता येईल आणि जास्तित जस्त लोकांना सहभागि करुन घेता येईल. जास्ती जास्त क्षेत्रातिल लोकांना एकत्र करुन एक सामाजिक चळवळ उभी करता येईल. मताच्या भुकेल्या सत्ताधरीना आणि सत्ताभिलाशिना हाताशी धरुन काही करता येइल का बघाव ( हे जरा रिस्की आहे पण ट्राय करायला हरकत नाही)

निवेदन पत्रिका आणि मेल तयार करायला कोणी मदत करु शकेल का? हिच निवेदन पत्रिका आपण बाय पोस्ट सरकारी विभागांना पाठवु शकतो. कंपनिस ना पाठवु शकतो, मेल करु शकतो. पण निवेदन मात्र जबरदस्त इंपॅक्ट करणार हव.

मी जमवलेली माहीती येथे देत आहे.

Mr A.K. Sengupta

Cluster Focal Point

(Sanitary Engineer)

Sustainable Development and Healthy Environment

senguptaak@searo.who.int

World Health Organization India Office,

534, "A" Wing, Nirman Bhawan, Maulana Azad Road,

New Delhi – 110 011

Phone: 91-11-23061955, 23062179, 23063632, 23061993; Fax: 23062450

Site to write to President of India.

presidentofindia@rb.nic.in
http://presidentofindia.nic.in/sitemap.html

Public site by HFM
http://healthy-india.org/index.asp

Contact details of Health ministry
http://mohfw.nic.in/ph/tmins.htm

पण निवेदन मात्र जबरदस्त इंपॅक्ट करणार हव >>
असे काही मला लिहीता येते असे नाही. पण मी मदत करायला तयार आहे Happy

दुसरे म्हणजे, एखदा-दुसरा चांगला सत्तधारी भेटतोच की त्यांना गाठुन काही करता येते का बघता येईल.

केवळ विषयाच्या आस्थेमुळे प्रतिक्रिया देण्यास उद्युक्त झालो. प्रतिक्रिया प्रतिसादकांसाठी आहे.त्यांच्या प्रतिसादात कुठलाही तोरा वा अभिनिवेश न जाणवता कळकळ व आस्था जाणवली. स्वतःपुरते बोलायचे झाल्यास
या विषयासाठी जेवढे शक्य आहे तेवढे करत राहिलो. इथे पहा. स्वच्छतेसाठी ईश्वरालाही वेठीस धरुन पाहिले. इथे पहा. लेखाला प्रतिसाद देणार्‍यांचे वाचक या नात्याने आभार.
http://faljyotishachikitsa.blogspot.com
प्रकाश घाटपांडे

पुरुषस्पंदन दिवाळी २००५ मधील या लेखात स्वच्छतागृहाचा उपयोग केलेला दिसतो. त्याची आठवण आली.
http://faljyotishachikitsa.blogspot.com
प्रकाश घाटपांडे

खाली एक लिंक देत आहे.अशा प्रकारच्या स्वच्छतागृहामधे पाणी कमी वापरले जाते आणी खतही मिळते.शहरात नाही तरी हायवे धाब्यावरती हा पर्याय चांगला आहे.
http://www.downtoearth.org.in/full6.asp?foldername=20081130&filename=new...
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

या विषयाला धरुन नुकताच वाचण्यात आलेल्या लेखाची लिन्क देत आहे.
http://www.loksatta.com/daily/20090502/ch12.htm

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

माझ्या माहिती प्रमाणे स्वच्छते सन्दर्भात डॉ. मापुस्कर, देहुगाव, ता. हवेली, जि. पुणे यान्नी बरेच काम केले आहे. आपणास आवश्यकता वाटल्यास त्यान्ची मदत घेवू शकता.

सुनिता,
चांगली माहीती दिलीत. मी नक्कीच त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न करेन.

लोकहो,
सुरूवातीला धडाक्याने सुरू केलेला हा गृप आणि बरंच काही करू असं स्वतःलाच दिलेलं वचन बाजूला पडलं तरी विसरलं मात्र नव्हतं. अनुभवांची आणि चिडचिडीची भर पडतच होती.

मध्यंतरी याच विषयावर एक डॉक्यु ऑलरेडी केलेली आहे असं कळलं होतं. 'Que to Pee' असे त्या डॉक्यूचे नाव आहे. कॉपी अजून मिळालेली नाही त्यामुळे पाह्यलेली नाही.
मी बनवायच्या डॉक्युच्या दृष्टीने रिसर्च मटेरियल जमा होतच आहे.

संशोधनात जे लोक भाग घेऊ इच्छित असतील त्यांच्यासाठी मी काही प्रश्नावल्या तयार करणारे. त्यानुसार त्यांनी आपल्या आजूबाजूला जेजे लोक योग्य वाटतील त्यांना प्रश्न विचारून त्याची उत्तरे जमा करून माझ्याकडे पाठवावीत ही विनंती.

डॉक्यु करण्याच्या दृष्टीने तांत्रिक दृष्ट्या काही गोष्टी पुढे सरकल्या आहेत. मधे दुसर्‍या एका एनजीओ साठी मी एक डॉक्यु बनवून दिली त्यामुळे संपूर्णपणे आपण काही गोष्टी करण्याचा अनुभव पदरात आलाय. ती चांगली झालीये असा त्या एनजीओ आणि इतर काही लोकांकडून निर्वाळा मिळाल्याने आत्मविश्वास वाढलाय. अजून एका डॉक्युचं काम मिळाल्याने अजून थोडा अनुभव आणि आत्मविश्वास...
कॅमेरा आणि एडिट सेटप या बाबींचं प्रकरण लवकरंच हातात येणार आहे. अ‍ॅव्हिड सेटप हाताशी असल्याने एडिट शिकणंही सोपं जाणारे. अर्थात हे आमच्या फिचर फिल्मच्या शूट नंतर पण तरीही सेटप असणं महत्वाचं.

बाकी काय काय मुद्दे आणि कसे कसे यायला हवेत याबद्दल कोणालाही काही शेअर करायचे असल्यास इथे टाकत रहाच किंवा माझ्या विपुत टाका किंवा मला संपर्क करा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5294292.cms

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये असलेल्या (खरे तर नसलेल्या) स्वच्छतागृहांमुळे अनेक मुलींनी शालेय शिक्षण अर्धवट स
ोडून दिल्याचे वृत्त जितके संतापजनक तितकेच उद्विग्न करून सोडणारे आहे. कोणाचाही सहजासहजी त्यावर विश्वास बसणेही कठीण आहे; कारण हे महानगर आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक शहर असल्याचा डंका गेली काही वषेर् सातत्याने पिटला जात आहे. पण प्रत्यक्षात या महानगरात स्वच्छतागृहांबद्दल असलेली कमालीची अनास्था आणि उदासीनता हा खरे तर राष्ट्रीय पातळीवरील चचेर्चा विषय आहे.

जि. प. प्रा. शाळां मध्ये देखिल संडासाची सोय नसते तसेच असल्यास फक्त शिक्षक त्यांचा वापर करतात व विद्यार्थी बाहेर बसताना दिसतात. काही मुले ज्यांना बाहेर बसायची सवय नसते किंवा लाज वाटते ते शाळा सुटे पर्यंत जातच नाही रोखून धरतात व त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतो. हे कुठे तरी थांबायला पाहिजे असे वाटते.

http://desert.com.au/waterless.htm

मुंबई सारख्या मोठ्या शहरात किमान मुतारीचे सोयीसाठी तरी अशी प्रॉडक्ट्स बाजारात असणे गरजेचे आहे. नुसते परदेशी दौरे करुन हात हलवत परत येण्यापेक्षा प्रत्येक नेत्याने एक डबा क्युबिकल आणले, तर बरीच सोय होइल!

लेख वाचला..
शहरी भागात ही स्थिती तर ग्रामिण भागात....?
अंदाजाने काही आकलन होते,पण पडताळणी करायचे मार्ग बंद....?
ग्रामिण भागात स्वतंत्र महिला नेतृत्व नसतेच.असते त्या नामधारी .. पुढार्‍यांच्या बायका.
महिलांच्या प्राथमिक मुलभुत गरजा सुद्धा समस्या बनतात... कठीन आहे..
तुम्ही काही करताच आहात तर त्यात ग्रामिण भागाचा सुद्धा समावेश करावा..

सर्व शिक्षा अभियानमध्ये शाळेत स्वच्छता गृहे बांधण्याचाही समावेश आहे. एकदरावाडी ता. अकोला. जिल्हे नगर येथील ग्रामपंचायतीत 'पंचायती' करीत बसलो होतो. समोरच शाळाही होती आणि तिचे स्वच्छतागृहही !! हे काय? 'त्ये ना मुतारी आणि संडास' --सरपंच.

पण त्ये तर पडायला लागलय आणि गवतही भरपूर आहे तिथे.--मी
हो ना, वापरात न्हाय ते- सरपंच

का. ? बांधलय तर वापरायला पाहिजे ना.?- मी

अवो सायेब. हितं प्यायला पानी न्ह्याय .ट्यांकर सुरू करावा लागतोय. मुश्किलीनी दोन दोन हांडे पानी मिळतय कधी कधी ते बी नाय. त्याच्यात काय टाकायच? चार घराचं त गाव. त्या तिथं पर्‍याड तं जात्यात समदी....... _ सरपंच्य!

रॉबीन, प्रश्ण केवळ, मुतुन वा हगुन झाल्यावर किती लिटर पाणी दरडोई वापरायचे याचा नाहिये हेच कुणाच्या लक्षात येत नाहीये
सर्वदुर अशी परिश्तिती आहे की किमान "आडोसा असावा हागयलामुताय्ला" याचीही जाणीव नाही, कायदे आहेत, पण अम्मलबजावणि नाही ही परिस्थिती!
स्त्रियान्नाच नव्हे तर मुतायला वेळेला शहरी वा कुणाही प्रुरुषान्नाही आडोसा लागतो येवढी किमान गरज जरी भागली तरी वेळेला साफसफाईसाथी मुसलमानान्प्रमाणे विटेचातुकडा वापरायची वेळ आली तरी बेहत्तर, बाकी बघुन घेऊ! आडोसा तर द्या! ते ही गेल्या साठ सत्तर वर्षात क्~ओग्रेसी सरकारला कुठेच अगदी पुण्यामुबैत देखिल जमत नाही का? शेम ऑन थिस!
की उद्या मन्त्र्यान्च्या अन सोनियाच्या बन्गल्यात हगण्यामुतण्याकरता मोर्चा काढला कीच हे जागे होणार?

बर नि म्हणते तसे डॉक्युमेन्टरी केली तरी "हिन्दुस्थानची लक्तरे देशाबाहेर टान्गण्याचा" दोषारोप आहेच उरावर!

रॉबिन, सॉरी म्यान, पण सरकारी खाती खरच धोबी घाटावर जशी आपटुन आपटन् धुतात तशी धुण्याची वेळ आली आहे! (यालाच तर नक्षलवाद म्हणत नसावेत न? ;प)

मिलिन्दा, त्या दिवशी तुझ्याबरोबर च्याट केल्याचा हा परिणाम बर!
या सर्व प्रश्नाला रॊबिनहूडच्या गोष्टीतील मुख्याध्यापक म्हणतात तशीच दुसरी बाजू शहराव्यतिरिक्त भागात आहे
पूर्वि गावात हागनदरी असायची ठरलेली! पावसाळ्यात वर्षभर उन्हातानात प्रक्रिया झालेली वर्षभराची "घाण" वाहुन खालील भागातील शेतात पहिल्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून यायची व त्याचे नैसर्गिकरित्या खत मिळायचे. आजची परिस्थिती, "माझ्या नजरेसमोरिल" अशी की गावागावातील हागिनदार्या बन्द झाल्यावर तसेच गुराढोरान्चे शेणखत मिळण्य़ाचे प्रमाणही आत्यन्तिक घटल्यावर सेन्द्रिय खतान्ची ही बिनखर्चाची गरज आता पुरी करणे खर्चिक रासायनिक खतान्मुळे आवाक्याबाहेरचे काम बनले आहे.
अर्थात, हा बीबी जेव्हा उघडला, तेव्हाच हा विषयही माझ्यापुढे होता, पण मूळ विषयास बाधा नको (कारण तो देखिल तितकाच योग्य आहे) म्हणून ही दुसरी बाजु मान्डली नव्हती
असो

अतिशय चांगला प्रकल्प. सरत्या वर्षाच्या शेवटी अत्यंत महत्वाच्या समस्येला वाचा फोडली. नव्या वर्षात याचा योग्य पाठपुरावा करण्याचा संकल्प करुया. बरेच गमतीदार किस्से आहेत या विषयावर. परंतु त्यापेक्षा गैरसोयही तितकीच महत्वाची. कालचाच प्रसंग दादरला ४ नंबर फलाटावर कल्याणला जाणार्‍या जलद गाडीची वाट पाहत होतो. कार्यभाग उरकणार्‍यांची रांग मुतारीच्या बाहेर लागली होती. ती रांग पाहुनच मी माघार घेतली इतक्यात १ महाविद्यालयीन विद्यार्थी डोळे चोळतच बाहेर आला. तो आपल्या इतर मित्रांना सांगु लागला की आत असा वायु तयार झाला की त्याचे नाक व डोळे चुरचुरु लागले. बरेचजण बाहेरही तोंडावर रुमाल घेऊनच गाडीची वाट पाहत होते. सगळीकडे कमी-अधीक प्रमाणात असेच चित्र बघायला मिळते. उघड्यावर प्रात:विधी ही सुद्धा फार मोठी समस्या आहे. सकाळच्या वेळी कल्याण ते मुंबई रेल्वेचा प्रवास करत असाल तर डोंबिवली, दिव्याची थंडगार हवा घेऊन गाडी जेव्हा सुसाट पारसिकच्या बोगद्यातुन बाहेर येते त्यानंतर असा काही सुगंधीत फवारा प्रवाशांचे स्वागत करतो की आपणच सकाळी आपल्या कपड्यांवर फवारलेला महागडा फवारा फिका पडतो. असो, लिहीण्या व चर्चा करण्यापेक्षा आता काहीतरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तुमच्या या उपक्रमात मलाही सहभाग करुन घ्या ही विनंती.
वेळ, पैसा वा अन्य काही मदत करायला मलाही नक्कीच आवडेल. नविन वर्षाच्या नविन उपक्रमाला भरपुर शुभेच्छा.

The problem is less acute in South India. I am involved in Ekal Vidyalaya and I happened to visit remote parts of Kerala, TamilNadu and Karnataka, Surprisingly in all villages where Ekal sponsored schools existed, the toilets were remarkably clean.
How they achieved this? It will be helpful to study.
Sorry, I can't write in this font in Marathi. Could we not have an easier font like the one in 'Google Transliteration?'

हा चांगला लेख लिहिल्याबद्द्ल धन्यवाद
लिहिलेले सगळे अगदी खरे आहे. याचा followup करणे हि जरुरि आहे.
मीहि कुठलीहि मद्त करण्यास तयार आहे.
खर सांगायच तर मी भारतात परत जायचा विचार करते त्या प्रत्येक वेळी मला हि भिती सतावते. माझ्या छोटिला हि शाळेत , प्रवासात हाच त्रास होणार. लहानपणी मी झेललेले सगळे तिलाहि झेलावे लागणार या विचाराने भिती वाटते.
मला माहितेय माझ्या या वक्तव्यावर बरेच जण म्हणणार की परदेशात जाऊन हे सगळे सुचायला लागते. पण चांगल्या गोष्टि पाहिल्यावर आपण काय झेलत होतो ते जाणवते.
ज्यांची २/३ वर्षाची लहान मुले आहेत ते काय करतात तेही कळ्त नाहि. एवढ्यालहानपणीपासुन त्यांना घाणेरड्या सवयी लावायच्या का?
इथे मुलामुलींना toilet training मधेच toilet manner पण शिकवतात. आपल्याकडेहि हे गरजेचे आहे. पण त्याहि आधि toilet असणे जरुरि आहे. आणि स्वच्छ्तेच्या द्रूष्टीने कमोडपे़क्षा भारतीय स्टाईलचे हवे.

आणखी एक गोष्ट. स्वच्छता रहावी म्हणुन इथे Auto flushing toilet पण असतात. बाहेर गेल की toilet automatically flush होतात.
पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी rain water harvesting, washbasin water reuse असे काहि ऊपाय पण आहेत.

Pages