' स्वच्छतेच्या बैलाला...!! ' संदर्भाने..

Submitted by नीधप on 4 November, 2008 - 10:31

दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाच्या विषयासंदर्भाने अनेकांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. साहजिक आहे कारण प्रॉब्लेम सगळ्याच आयाबायांचा आहे.
हा धागा तुमचं म्हणणं मांडण्यासाठी सुरू करतेय.
मी लेख लिहिला तेव्हा निश्चितच माझ्या डोळ्यासमोर पुढची कृती नव्हती. पण एकुणात मिळालेला प्रतिसाद बघता आपण काही करू शकतो का याबद्दल असा विचार सुरू होतोय.
माझा लेख इतर अनेक ठिकाणी देण्याबद्दल मला अनेकांनी विनंती केलीये पण एकदा इथे प्रसिद्ध झाल्यावर परत इतर ठिकाणी कोणी घेतील की नाही याची मला कल्पना नाही. कुणाला माहित असेल तर जरूर कळवावे.
माझ्याकडून होण्यासारख्या या तीन गोष्टी आहेत. ज्या माझ्या आवाक्यातल्या आहेत आणि मी त्या यशस्वीरित्या करू शकेन.
१. एका कव्हर लेटरसहीत या लेखाची प्रत मुंबईच्या महापौर शुभा राउळ यांना पाठवणे आणि त्यांना ह्या समस्येत लक्ष घालायला लावणे.
२. या विषयावर अजून अभ्यास करून मग अर्धा तासाचा एक माहितीपट तयार करणे. जो अनेक ठिकाणी लोकांवर आदळवणे (हॅमर चे भाषांतर..)
३. हाच विषय घेऊन किंवा या लेखातून २५-३० मिनिटाचा प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स तयार करणे जो वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमांच्या वेळी त्या त्या ठिकाणी जाउन सादर करणे. जेणेकरून कुठल्यातरी स्त्री समस्यांशी संबंधित कामे करणार्‍या संस्थेला ह्याचा पाठपुरावा करण्याची इच्छा व्हावी.

प्रशासकीय पातळीवर करायचे प्रयत्न करण्याची माझी ताकद वा अनुभव नाही. पण हे वरचं मी नक्की करू शकते. यात कुणाला माझ्याबरोबर यायचं असेल, मला मदत करायची असेल तर तुमचं स्वागतच आहे.

तुम्ही स्वतःहून या संदर्भात काही उपक्रम हाती घेत असाल तर तेही इथे मांडा म्हणजे कोण काय करतंय याची माहिती आणि चर्चा दोन्ही घडेल.

तसेच कुणाला काही सूचना करायच्या असतील या संदर्भात तर त्याही जरूर कराव्यात.

या सगळ्या संदर्भात अजून काही माहीती असेल कुणाला. तर तीही कृपया इथे द्यावी.

सत्यजित याने काही शोधाशोध करून माहिती मिळवली आहे ती त्यानेच इथे टाकावी अशी मी त्याला विनंती करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान...

माहितीपट करायचा मार्ग मस्त आहे. तो टीव्ही चॅनल्स वर पण (हिंदी, मराठी)दाखवणार ना अज्जुका? जाहीरातीसारखे दाखवता येऊ शकते का?

केदार, इमेल साखळी करणार असशील तर माझा पण आयडी टाकशील का. lataismusic@yahoo.com

बहुतेकांनी उत्तम सुचना दिल्यात.
सर्वच सुचना आवडल्या आहेत जसे की--
ब्लॉग वर लिहिणे,
आहे ती पब्लिक स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम हाती घेणे, शाळा/कॉलेजात/हॉटेलांत/बसस्टेशन वर वगैरे जाऊन त्यांची स्वत:ची टॉयलेट्स स्वच्छ ठेवण्यास त्यांना भाग पाडणे (किंवा नगराध्यक्षाच्या मार्गे स्वच्छतामोहिम), नगराध्यक्षाना 'सारखी सारखी' पत्रे लिहिणे (एकदा लिहुन दखल घेतीलच असे नाही म्हणुन) ,
कायदा-दंड करणे ,
मोबाइल चा वापर.

अज्जुका मी आणि अनेक सध्या तरी भारता बाहेर आहो.. तेव्हा इथे राहुन करता येण्यासारख्या गोष्टी म्हणजे- इंटरनेट वरुन प्रसार (म्हणजे एक इमेल तयार करायची आणि ती सर्वाना पाठवायची , जमेल तितक्या वेबसाईटस वर टाकायची वगैरे), आर्थिक मदत, इथे कशा सोयी आहेत त्याची माहिती देणे.. इतकेच आठवतेय.. अजुन काही??

माझ्यातर्फे सध्या हे केले जाईल-- मी मित्र/मैत्रिणींशी फोनवर बोलताना ह्या बद्दल सांगणार आणि त्यांचे मत घेणार. काय माहीत कोणाची वर ओळख वगैरे निघाली तर उपयोग करुन घेता येइल :). पेपर मधे काही होऊ शकते का ते ही पाहीन.

सुनिधि ला अनुमोदन. आमच्यासारख्या सध्या भारताबाहेर रहाणार्‍यांना काहि मदत करता येण्यासारखि असेल तर मला पण या उपक्रमात सहभागि व्हायला आवडेल. माझ्याकडुन काहि मदत होण्यासारखि असेल तर नक्कि कळव.

मला वाट्ते , कुठ्लीहि गोस्त जर सरकार करू शकते तर त्याचा व्यवसाय ही करु शकता तुम्हि.
ही समस्या ही एक व्यवसयाचि सन्धि आहे. एक प्रशन विचरते. किति रुपये द्यायला तुम्हि सगल्यान आवडेल स्वछ बाथरुम साथि? मी तयार आहे अश्या बाथरुम काढण्या साथि.

अज्जुका
जियो! ह्या चळवळीत माझी इथून(सिडनीहून) होईल तितकी मदत! माझा ब्लॉग नाही. पण साखळी मेल, माहितीपट, ह्यासाठी माझ्याकडून होईल तशी मदत, नक्कीच. तुझ्या लेखाची लिन्क माझ्या मित्रमैत्रिणींना पाठवलीयेच.
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

मी_ना,
पतेकी बात कही. अश्या सोयीसाठी प्रत्येक वेळेला ५ ते १० रूपये द्यायला काहीच हरकत नाही. अजून जास्त पण देता येतील पण सामान्य बायांना परवडू शकतील असे हे दर आहेत.
काही बायका अश्याही असतील की त्यांना हे ही परवडणार नाही. तो एक वादाचा वेगळा मुद्दा होईल कदाचित.

सुलभ ची निर्मिती याच तत्वावर झाली होती मला वाटतं. तिथे दर वेळेला ५० पैसे वा १ रूपया आकारला जातोच.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

साखळी मेल, ब्लॉगवर टिप्पणी, संपर्कातील लोकांशी बोलणे यातून awareness वाढायला नक्कीच मदत होईल.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

>>>>> ऐकाव ते नवलच्.आम्हाला तर अस कधी नाही वाटल.
चिन्या, आहे रे आहे! (अर्थात मानल तर आहे! हेही खरेच, नाही का? Proud )

या अज्जुकाचाच श्वास चित्रपट लागलेला इस्क्वेअरला! मी अन लिम्बी गेलेलो! सकाळपासून जरा गडबड वाटत होती, पण थेटरला पोचल्यावर नक्की झाल! मग काय? शोधमोहीम सुरू! पार्किन्ग स्पेस मधे एक टॉयलेट होत पण त्याची अवस्था महाबिकट होती, सिट नव्हत, पाणी नव्हत, पेपर नव्हता....... फक्त भाण्ड होत, अन ते कस होत त्याच वर्णन मी करणार नाही! (जवळपास एखाद मऊ पानान्च झाडही नव्हत पाने तोडून घ्यायला, अस्त तर मग विशेष वाटल नस्त, नाही का???? Proud )
तिकीट हातात नसल्यामुळे थेटरच्या आत जाता येईना, तर मी रिक्षा करुन सरळ शिवाजीनगर बसस्टॅण्ड गाठला! तिथली अवस्थाही भयानकच होती! पण ठीके....... काम तर झाल!
असे अनेक प्रसन्ग हेत! इथे सान्गता येतिल!
सगळ्यात मोठ्ठा विरोधाभास हे जो अज्जुकाच्याही लक्षात आला असेल, कुठेही पुरुषान्च्या मुतारीला चार्जेस द्यावे लागत नाहीत, पण बहुतेक सार्वजनिक ठिकाणी स्त्रियान्ना चार्जेस द्यावे लागतात, असे का? हा नालायकपणा का? की पुरुषान्चे तेवढ पवित्र अन बायकान्च अपवित्र????? लिम्बी बरोबर कुठे फिरताना जेव्हा तिला माझ्याकडे चिल्लर मागायची वेळ येते तेव्हा मी अन ती देखिल मनसोक्त शिव्याशाप देतो या सिस्टिमला!
मूळात शहरातून मुतार्‍या कमी, त्यातुन असलेल्या मुतार्‍यात विशिष्ठ धर्माच्या रितीनुसार विटान्चे तुकडे ठेवलेले अस्तात (त्याच ते काय करतात ते विचारु नकोस, एखाद्या तुकड्याचा "सामुहिकरित्या" येवढा गलिच्छ उपयोग तेच करु जाणोत) तर ते तुकडे खाली पडले की मुतारी तुम्बते, आता याचे अधिक वर्णन हवे का चिन्या तुला?
कोणत्याही नविन शहरात गेल की माझ्यासारख्याची नजर रस्त्यावर भिरभिरत रहाते व उपलब्ध स्वच्छतागृहाची नोन्द मनात करुन ठेवली जाते! पण नसेलच तर?
याकरता, कोणा सन्स्थेने जबाबदार प्रशासकीय व्यवस्थान्ना कोर्टात खेचले पाहिजे, हाच एकमेव उपाय हे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

---याकरता, कोणा सन्स्थेने जबाबदार प्रशासकीय व्यवस्थान्ना कोर्टात खेचले पाहिजे, हाच एकमेव उपाय हे! ---
अगदी अगदी. आणि वापरणार्‍यांनासुद्धा शिस्त लावली पाहिजे. मी तर हे ही पाहिलंय की प्लॅट्फॉर्म वरचे टॉयलेट हल्ली टाईल्स वगैरे लावलेले असते, पैसेही घेतात पण अगदी नाईलाज झाल्यावर जावेच लागले (अज्जुकाने म्हटल्याप्रमाणे शक्यतो avoidच करावे लागते)तर मोकळ्या जागेत प्लॅटफॉर्मवासी बायका चक्क अंघोळ व धुणी करत असतात. चडफडत थांबावेच लागते. पुन्हा पर्स वगैरे लटकवायला कुठे हुक्सही नसतात Sad

अज्जुका, हा स्पष्ट लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन. या लेखाबद्दल मतभिन्नता असुच शकत नाही. मला तर बरेच तास कुठे गेल्यास बाथरुम्/टॉयलेट कुठे आहे विचारायची बिल्कूल लाज वगैरे वाटत नाही कारण ही गरज प्रत्येकाचीच आहे व त्या गरजेची आत्यंतिक जाणिव प्रत्येकालाच असते. त्यामुळे चेहरा अगदी नॉर्मल ठेवूनच विचारायचे म्हणजे समोरचा/ची नॉर्मल चेहर्‍याने व टोन ने उत्तर देतो आणि नाही नीट उत्तर दिलं तर गेला उडत !!!

हा झाला पब्लिक प्लेस मधला प्रॉब्लेम. पण "आमिर" सिनेमात राजीव खंडेलवालला टॉयलेट शोधत जावे लागते दहशतवाद्यांची चिठ्ठी शोधायला. तो तर रेसिडेन्शियल भाग असतो पण त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहूनच आपल्याला पण "व्याSSक" असे होते. म्हणजे वापरणार्‍यांना पण शिस्त लागेल असे कडक उपाय झाले पाहिजेत.

अज्जुका तुझा तो लेख वाचला होताच.
ह्या बीबी वर चर्चा चांगली सुरु आहे.
साखळी मेल हा एक उपाय आहे पण तो लिमिटेड राहिल.
हा लेख लोकसत्ता मध्ये छापुन येइल का हे बघाव लागेल.
त्यानी ह्या विषयाला वाहुन एक लेखमाला केली (सर्वेक्षण करुन) तर त्याचा जास्त उपयोग होइल.
कमीत कमी स्थानिक प्रशासन तरी काहितरी हालचाल करेल.
ही खरच मोठी समस्या आहे. अगदी ४-५ तास प्रवासात अगदिच ठरवुन कंट्रोल करण (अर्थात ही सवय चांगली नाहीच.) हे एकवेळ शक्य आहे. पण समजा ७-८ तासाचा प्रवास असेल तर??
साखळी मेल सारख काहि करत असाल तर माझहि नाव असु दे लिस्टात.
हाच लेख दुसरीकडे (जसे की तुझा ब्लॉग दुसर्‍या मराठी साइट्स) लिहिशील का??

अज्जुका, लेख उत्तमच आहे. अगदी मनाला भिडणारा. माझी बायको पण या त्रासाला वैतागुन जाते. तुमच्या प्रयत्नांना यथशक्ती मी जरुर मदत करेन.
चिन्या, पुरषांचे पण टॉयलेटस (सॉरी, मुतारी!!) अतिशय वाईट असतात. पण पुरूष निर्लज्जपणे ऊघड्यावर कुठे ही कार्यभाग आटोपुन घेतात. स्त्रियांचे काय?
लोकसत्ताला हा विषय दिला तर चांगलेच होईल.

चिन्या, पुरषांचे पण टॉयलेटस (सॉरी, मुतारी!!) अतिशय वाईट असतात. पण पुरूष निर्लज्जपणे ऊघड्यावर कुठे ही कार्यभाग आटोपुन घेतात. स्त्रियांचे काय?

तेच तर मी म्हणतोय ,स्त्रीयांचे काय्????पण लिंब्याला पुरुषांच्या टॉयलेटची समस्याही भेडसावतेय्.आपल्या देशातील एकुणच स्वच्छतेबद्दलच्या उदासीनतेमुळे पुरुषांची स्वच्छ टॉयलेट्सची मागणी अनाठायी असते.तसे हवे असल्यास एसी सुविधा ,चकाचक असलेल्या इमारतींमधेच पुरुषांनी जावे.

----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

अरे हे इतक्या लवकर थंडही पडल???
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

चिन्या,
माझ्याकडून माझ्या कामाला सुरूवात झाली. डॉक्यु चं प्रोजेक्ट प्लॅनिंग चालू केलंय.
बाकी कुणी किती आणि कसा हातभार लावतंय बघूया.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अज्जूका.. शाब्बास.. मी केदारशी बोलतो यावर.. ब्लॉगवर लिहीनच मी, शिवाय तुला किती खर्च येणार आहे हे करायला.. सगळ्या इच्छूकांना तो विभागून घेता येतो का ते बघू.. वर कोणीतरी ह्याकडे व्यावसायिक दृष्टीने बघतय ते अर्थातच अभिनंदनीय आहे. ह्यातून रोजगार निर्मिती होईलच शिवाय सामाजिक सुधारणाही... अगदी यशस्वी झालच हे तर सरकारला दखल घ्यावीच लागेल आणि मग सबसिडी वगैरेच्या मार्गाने अगदी तळागाळापर्यंत पोहोचता येऊ शकेल असे वाटते. अज्जूका, एका महत्त्वाच्या विषयाला हात घातलास आणि पाठपुरावा करतेयस कौतुक वाटलं... excellent use of Mayboli platform!!
पु. लं. एकदा म्हणाले होते की कोणत्याही शाळेला भेट देताना ते तिथल्या संडासाची स्चच्छता बघतात, प्रयोगशाळा, वाचनालय पहायच्या आधी.. त्याची आठवण झाली..

मी देखिल तयार आहे आर्थिक मदत करायला.

अजुन एक पर्यय म्हणजे. मुम्बई मिरर ला कळविणे.

लोकहो,
तुम्ही काय करू शकता हे ही सांगा. मुंबई मिरर ला किंवा अजून कुठे कळवणे अश्या गोष्टींच्या जबाबदार्‍या कोणीतरी घ्या ना.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

लोकहो,
अजून एक आयडीया आहे. लगेच उपयोग होणारी नाही तर भविष्यात उपयोग व्हावा म्हणून..
कुणीतरी लहान मुलांसाठी (वेगवेगळ्या वयोगटाच्या) सार्वजनिक स्वच्छतागृह कसं वापरायचं याचं वर्कशॉप डिझाइन करायला हवं साधारण तीन-चार तासांचं.
मग दर महिन्याला १ दिवस एका शाळेत जाउन तिथे तिथे मुलांना ते वर्कशॉप द्यायचं. यासाठी आधी वर्कशॉप डिझाइन करणे मग शाळाशाळातून जाउन भेटणे आणि मग वर्कशॉप देणे हे सगळं करावं लागेल. एकटीनेच नाही तर टीम तयार झाली तरी हरकत नाही.
निदान पुढच्या पिढीच्या अंगात तरी हे टॉयलेट एथिक्स लहानपणीच रूळले जावेत..

बधा कोणी पुढाकार घ्यायला तयार आहे का?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अज्जुका, मी डिझाईन करायचा प्रयत्न करते. आधी कधी केलेलं नाहीये, पण यावर काम करायला आवडेल. आराखडा करून तर पाठवते, मग पाहू कसं काय सुधारणा करायच्या ते.

नीरजा, हा विचार माझ्या डोक्यातही आला होता. पण हे प्रशिक्षण देण्याआधी शाळाशाळांतून टॉयलेट्स स्वच्छ होणं पण आवश्यक आहे असं नाही का वाटंत?
मी आईशी पण बोलतेय ह्या संदर्भात. कमितकमी तीच्या (आणि माझ्यापण) शाळेपासून सुरुवात होऊ देत नागपुरात. नागपुरातल्या स्थानिक वृत्तपत्रात (हितवाद, तरुण भारत, लोकसत्ता आणि जनवाणीसारख्या हिंदी देखिल) तुझा लेख देता येईल, तुझ्या परवानगीने. त्यासाठी मी काही लोकांना संपर्क साधते. त्यानंतर तुला ई-मेल करते.

ही कल्पना छान आहे. आयटी, डिझाईन करशील तेव्हा त्यात शिक्षकांसाठी प्रबोधनाचा पण एक भाग टाक Happy

अज्जुका, डॉक्युच्या कामात मी करण्यासारखे काही असेल तर नक्की सांग. किंवा, कुठल्या-कुठल्या कामात तुला काय मदत लागणार आहे ह्याची एक यादी टाकलीस तर ज्यांना जे जमण्यासारखे असेल ते उचलतीलच.

शिंडे, तुला आवडेल का माझ्याबरोबर काम करायला? एकसे भले दो Happy

होssssss Happy मी पण असे काही आधी केले नाहीये.

अज्जुका, documentary च्या research साठी US मधून जी मदत करता येईल ती करायला मी तयार आहे आणि आर्थिक मदत सुध्दा ..

अतिशय महत्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन ..

अज्जुकाने मोठ्ठया सामाजीक समस्येला हात घातला आहे. ह्याचे दोन मुद्दे म्हणजे

१. फसिलिटिज नसणे
२. फसिलिटिज असल्या तर त्या स्वच्छ नसणे. ह्यालाही दोन कारणं आहेत. एक म्हणजे लोकांना नीट वापरता न येणे किंवा पाण्याअभावी नीट वापरली न जाणे.

पहिल्या प्रश्णाला महानगरपालिका उत्तर देईलच अस नाही कारण ते म्हणू शकतात आम्ही सुलभ शौचालय उपलब्द्ध केली पण जनता त्याचा वापर नीट करत नाही. पण जनतेने एखाद्या सामजीक जागेचा नीट वापर केला नाही तर कायदेशीर रित्या वापर करायला लावणे हे जस सरकारच कर्तव्य आहे तसच नीट वापर करू शकण्यासाठी पाणी पुरवणे हेपण सरकारच कर्तव्यच आहे.

आपण दोन गोष्टी करू शकतो. एक तर सर्वांनी म्हटल्याप्रमाणे सामजीक जाणीव करून देणं आणि दुसरं म्हणजे म्युनसिपाल्टिजना कॉन्ट्याक्ट करणं आणि काही उपाय सुचवणं. नुसता problem सांगितला तर नीट response मिळेलच असं सांगता येत नाही. पण त्याच वेळी जर solution सुचवलं तर government कडून लक्ष देण्याचे chances असतात. मला दोन गोष्टी अशा वाटतात.

१. म्युन्सिपालटीने existing facilities चा maintenance कोणालातरी contractवर देणं. ह्यासाठी कोणती तरी प्रायव्हेट कंपनी तयार झाली पाहिजे आणि त्यांनी त्यासाठी लोकांकडून वापरलेली शुल्क घेतल्यावर अशा कंपनीना झालेला फायदा लक्षात आल्यावर इतरही काही कंपन्या ह्या क्षेत्रात उतरू लागतील.

२. सुरुवात शहरातील ज्या प्रेक्षणीय जागांना जगभरातून येणारे पर्यटक जास्त भेट देतात तेथून सुरुवात केली तर त्याचा डबल फायदा होतो. दोन वर्षांपूर्वी मी माझ्या अमेरीकन मैत्रीणीला घेऊन भारतात गेले होते. अजंठा वेरूळ्च्या लेणी पहायला गेलो असता तिचे तिकीट पाचशे रुपये तर माझे मला वटत दहा का पंधरा. चौकशी करता तेथील माणसाने उत्तर दिले " अहो त्यांना सवय असते इतके पैसे देण्याची. " त्यावर मैत्रणिचं उत्तर होतं आम्हाला स्वच्छ रेस्टरुमचीपण सवय असते मग आमच्यासाठी निदान जास्त पैसे देतो तर पाणी असलेल्या रेस्टरुमतरी अव्हेलेबल करायच्या. सांगायला लाज वाटते की ना धड तेथे अव्हेलेबल होत्या न धड जवळ्पासच्या हॉटेलमध्ये अव्हेलेबल होत्या.

ज्या शाळा (underprivileged) मुलांना स्वच्छ आणि पाणी असलेल्या रेस्टरुम्स अव्हेलेबल करतील त्यांना मी पैसे देईन बक्षीसरुपाने.

Pages