चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल बाम पाहिला. ठीक वाटला. रणवीर बेस्ट. दिपिका पांढरीफट्ट. प्रिचो ठीके. तन्वी आझमी उत्तम. एकुणात बरा आहे बाम.

मधल्या काळातले काही बरे सस्पेन्स सिनेमे

१) अगर ( अमोल पालेकर, झरीना वहाब, विजयेंद्र घाटगे )
२) ऋषी कपूर, किमी काटकर, डॅनी चा एक, नेपाळमधे शूट झालेला
३) अमोल पालेकर आणि शबाना आझमीचा एक, यात दोघांनी आपापल्याच भुमिका केल्या होत्या.
४) हंड्रेड डेज ( माधुरी आणि जॅकी श्रॉफ )

आताच तिसरी मंजिल पाहिला. मस्त चित्रपट. खुनी कोण असेल हे प्रेडिक्ट करता आलं मलातरी कदाचित रहस्यमय चित्रपट, क्राईल पॅट्रोल जास्त बघण्याचा परिणाम असेल Wink

योगायोग असा की आजच सकाळी ऑफिसला येताना FM वर अनु कपुर विजयआनंदच्या कारकिर्दीबद्दल सांगत होते ते ऐकतच आले आणि इथे आले तर 'चित्रपट कसा वाटला' या धाग्यावर त्यांचीच चर्चा सुरु होती, हातोहात नीधपने नविन धागापण काढला. या सगळ्यांना धन्यवाद. जे उत्तम चित्रपट बघायचे राहुन गेलेत ते या निमित्ताने बघण्यात येतील.

तिसरी मंजिल शाळेत असताना गणेशोत्स्वात पाहीला होता, खुप आवडला होता. आम्ही चाळीतली सगळी मुले एकत्र बघत होतो, आम्ही सहज खुनी प्रेडीक्ट केला होता अगदी थेट. खुप वर्ष झाली त्या गोष्टीला.

हिंदी रहस्यपट (कदाचित विशेष माहिती नसलेले)
१. चुपः मिथुन चक्रवर्ती, सोमी अली, ओम पुरी. सोमीबाईंनी चक्क चांगलं काम केलं आहे.
२. कत्लः संजीवकुमार, सारिका. संजीवकुमारचा शेवटचा चित्रपट, त्यात त्याने आंधळ्याची जबरदस्त भूमिका केली आहे.
३. छुपा रुस्तमः मनीषा कोईराला, संजय कपूर, ममता कुलकर्णी. रहस्यभेद चांगला केला आहे.
४. कब, क्यो और कहा: धर्मेंद्र, बबिता, प्राण. शेवटी धक्कातंत्र छान साधलं आहे.
५. महलः देव आनंद, आशा पारेख.
६. ये रात फिर ना आयेगी: विश्वजीत, शर्मिला, मुमताज.

ऑनलाईन सगळे उपलब्ध आहेत, लाभ घ्यावा Happy

कत्ल हा खूप जबरदस्त पिक्चर आहे. संजीव कुमार बद्दल सहानूभूती वाटत राहते. त्यातलं फकिराचं गाणं पण सुंदर आहे.

रहस्यपटांच्या गप्पा का? वा! वा!

तीसरी मंझिल :डोळ्यांत बदाम:

खामोश (अमोल पालेकर, शबाना आझमी, पंकज कपूर, सोनी राझदान) - माझा ऑल टाईम फेवरिट! (असले सिनेम कधीही टीव्हीवर दाखवत नाहीत. :राग:)

एक मिथुन-रंजिताचा 'धुआं' म्हणून सिनेमा होता. त्यात पण जबरी सस्पेन्स आहे असं ऐकलं आहे. (मी पाहिलेला नाही.)

जुना कृष्णधवल कानून पण भारी होता. (राजेंद्रकुमार, अशोककुमार)

धुंद पण मस्त आहे. झीनत, डॅनी आणि संजय खानचा.

बाकी - तीसरी मंझिल >> ऑल टाईम फेव्हरेट

खामोश, खोज पण मस्तच. खेल खेल में पण चांगला आहे ना? बघितलाय पण आता आठवत नाहीये.

कत्ल तर फार मस्त आहे. संजीव कुमारचं काम अफलातून. त्यातलं फकिराचं गाणं पण सुंदर आहे ++१

वर लिहीलेल्यातले बरेच पाहिलेले नाहीयेत ते पाहिले पाहिजेत.

खामोश (अमोल पालेकर, शबाना आझमी, पंकज कपूर, सोनी राझदान) - माझा ऑल टाईम फेवरिट! (असले सिनेम कधीही टीव्हीवर दाखवत नाहीत. >>> मी २ वेळा टीवी वरच बघितला होता.
बहुदा बी४यु , ईटीसी , दूरदर्शन किन्वा तत्सम चॅनेल दाखवतात .
जाम अंगावर येणारा चित्रपट आहे Sad .

कत्ल , धुन्द , धुआ - टाकले टीबीएस लिस्टमध्ये.

उलझन नावाचा एक शिणुमामा होता. आठवत नाही. संजीवकुमार इन्पेक्टर्च्या युनिफॉर्ममधे छडी घेउन दारावर टकटक करायचा आणि सुलक्षणा पंडीत केसाचा फ्लॉवरपॉट बनवून सुबह और शाम, काय हे काम अशी गाणी म्हणायची इतकेच लक्षात आहे.

एव्हढ्या वरून म्हातारा रंगेल दिसतोय, स्टोरी लक्षात नाही पण हिरोइन बरी डिटेल मधी लक्ष्यात राहिली असे कुणी म्हणेल, पण खरंच सांगतो लहान्पणापासून हिरॉईन कडे लक्ष्य जायचच, या सिनेमात सुलक्षणाने पांढऱ्या रंगावर काळे गोल असलेली साडी नेसली होती आणि नंतर सुलक्षणा साडीची फॅशन आली होती हे पण लक्षात राहीलं

काही हिरविनी साडीतच बघायची सवय होती. राखी, सुपं इ.. यांना रडणे, पडणे, चिडणे अशी कामे असत . काही पंजाबी ड्रेस मधे पण चालायच्या, रेखा वगैरे.
स्कर्टवाल्या हिरविनी इंग्लिश बोलायच्या, शक्यतो व्हॅम्प असायच्या किंवा सेक्रेटरी.
चुकून जरी आशा काळे, किंवा अलका कुबलला टीशर्ट जीन्स मधे दाखवलं तर निम्म पब्लिक हार्ट अ‍ॅटॅक ने जाईल अशी निर्मात्या ला भीती असायची बहुतेक.

आताच तिसरी मंजिल पाहिला. मस्त चित्रपट. खुनी कोण असेल हे प्रेडिक्ट करता आलं मलातरी कदाचित रहस्यमय चित्रपट, क्राईल पॅट्रोल जास्त बघण्याचा परिणाम असेल डोळा मारा
>> मलाही सस्पेन्स लगेच कळला .
मेबी त्या काळच्या मानाने तो सस्पेन्स बराच डेंजर असावा Happy
आजकाल सीआयडी मुळे जो सगळ्यात जास्त सज्जन तोच खुनी असणार हे गणित झालय .

बाकी गाणी अन शम्मी जबरदस्त:_)

एक मिथुन-रंजिताचा 'धुआं' म्हणून सिनेमा होता (राखी पण होती त्यात), येस. हा मला बघायचा होता थेटरात (मिथुन-रंजिता जोडी मला फार आवडायची तेव्हा), राहिलंच ते, अजूनही पोस्टर्स आठवतात. तेव्हा मी शाळेत होते. नंतर टीव्हीवर पण आल्याचं आठवत नाहीये. बघायला हवा.

आजकाल सीआयडी मुळे जो सगळ्यात जास्त सज्जन तोच खुनी असणार हे गणित झालय . >>> हा हा हा. मी पण 'त्याच्या' एन्ट्रीला 'ये जादाही अच्छा है, कुछ तो गडबड है दया' असं मनातल्या मनात म्हणाले होते Proud

निल्सन आणि केदार, पण हेच आम्ही फार पूर्वी म्हणायचो त्याच प्रकारे तिसरी मंजिलचा खुनी कोण हे लक्षात आले, तेव्हा दूरदर्शनवर ओल्ड fox बघायचो, अजून एक हिंदी सिरीयल होती त्यावरून लक्षात यायचं ज्याच्यावर संशय दाखवतात तो नाही. Lol

पण तरीही मला अमिताभच्या युद्धमधला खुनी फार उशिरा ओळखता आला. आधी भलतेच वाटायचे.

राज बब्बर, डिंपल आणि सुरेश ओबेरॉयचा ’ऐतबार’ पाहिलाय का? स्टारकास्ट डाउटफुल वाटते, आय नो तरी सिनेमा एकदम मस्त आहे Proud ’किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ ही गजल याच सिनेमात आहे. डिंपल इतकी सुरेख दिसली आहे की बास! शेवटाकडे डॅनीची बहारदार एन्ट्री आहे!

मूव्ही कम्प्लीट थ्रिलर आहे. एन्डला मात्र पाऽऽऽर गंडलाय ते सोडा. डायम एम फॉर मर्डर हे या सिनेमाचं ’प्रेरणास्थान’ आहे Proud

रच्याकने, अनेक जुने ’तेव्हा आवडलेले’ सिनेमे आता परत पाहताना जाणवतं की त्यात एडिटिंग नावाचा किती गंडलेला प्रकार असायचा! कशाचा कशाला ताळमेळ नाहीे, वाटेल तिथे कात्री लावलेली, ऍब्रप्टली संपलेले सीन. अगदी काहीही. पण तरीही ते सिनेमे ’आवडते’ या कॅटॅगरीतले! Happy

Pages