चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्या नाचांचा आनंद घ्यायचा असेल तर गाणे म्युट करुन बघावे<< +१

मला भन्सालीचा खामोशी आणि गुझारिश आवडले होते. त्याचा ट्रीटमेंटचा सोस पत्करूनदेखील सावरिया "चांगला" होता. ब्लॅक अतिशय प्रीटेन्शियस होता. देवदास आनि बाजीरावबद्दल नो कमेम्ट्स

ब्रिजवरच्या त्या एका सीनसाठी भन्सालीला अख्खा हम दिल दे चुके सनम माफ आहे. त्यानं साक्षात सलमानला नंदिनी आय लव्ह यु ओरडायला लावलं आहे!!!!!! और चाहिये भी क्या जीनेकेलिये.

Not only Mrs Raut बघितला. आवडला.

त्यानं साक्षात सलमानला नंदिनी आय लव्ह यु ओरडायला लावलं आहे!!!!!! << Lol

भन्सालीने बाजीरावाला पिंगा घालायला नाही लावला, हे नशिब Happy नाहीतर काशिबाई मस्तानी आणि मध्ये बाजीराव असे एका रांगेत उभे राहून पिंगा घालतायत असे द्रूष्य दिसले असते.

गुझारिश>>>> हा पुर्ण चित्रपट अ‍ॅश च्या मिल गयी आज आसंमाँ से.. ह्या एका गाण्यामुळे सुसह्य झाला.र्‍ह्रीतीक ची अ‍ॅक्टींग पण क्लास.. पण त्याला असा अजिबात परत पाहवणार नाही.

काल कलर्स मराठीवर 'क्लासमेट्स' होता. मस्त आहे सिनेमा. खूपच आवडला. सुरूवात मित्राच्या मृत्यूने झालेली पाहून हा 'दुनियादारी' वळणावर चाललाय की काय अशी (रास्त) भीती वाटली होती. पण नंतर लगेचच सिनेमाने वेग घेतला. सिनेमाची कथा, संवाद आणि सर्वांचं अ‍ॅक्टिंग मस्त झालं आहे. त्यामुळे काही दिग्दर्शकीय ग्लिचेसकडे दुर्लक्ष केलं. बाकी सिनेमा खरंच एंगेजिंग आहे, अगदी शेवटपर्यंत. सई ताम्हनकरने उत्तम अभिनय केला आहे. अंकुश, सिद्धार्थची उत्तम साथ मिळाली आहे. खूप दिवसांनी घरबसल्या एक चांगला मराठी सिनेमा बघितल्याचा आनंद मिळाला.

दुनियादारीचंच निम्मं पब्लिक आणि कॉलेज हीच पार्श्वभूमी घेऊनही चित्रपट संपूर्णपणे वेगळा आहे. एकदा टीव्हीवर आलाय, आता बरेचदा लागेल. जरूर बघा.

मी काल star प्रवाह वर 'रमा-माधव' बघितला. आवडला मला.

क्लासमेट्स दुपारी शेवटी अर्धा तास बघितला. फार काही कळलं नाही कारण आधीपासूनच बघायला हवा. संध्याकाळी होता पण 'रमा-माधव' किती दिवस बघायचा होता म्हणून तो बघितला.

क्लासमेट्स मस्त आहे.. शेवटचा ट्वीस्ट फारच वेगळा.. अंकुश चौधरी परत एकदा डीएसपी स्टाईलचाच झाला.. पण साधारण तसाच लिहीलेला रोल होता.. बाकीचे पण फिट होते रोल्स मधे..

मी सुद्धा रमा माधव पाहिला. चांगला वाटला. काही प्रसंग शेंडा बुडखा नसल्यासारखे संपल्यासारल्हे वाटले. उदा. एका ठिकाणी माधवराव पेशव्यांना रघुनाथराव अटक करतात. त्याचं पुढे काय झालं दाखवलंच नाही. टीव्हीवर दाखवताना कापले का काही सीन ते कळले नाही.

बायकांचे दागिने फारच हायलाईत केले जात होते. नंतर लक्षात आले की कोणीतरी ज्वेलर्सनी 'रमा माधव' कलेक्शन आणले होते. म्हणून दागिने सतत लक्ष जाईल अशाप्रकारे पडद्यावर येत होते.

दुसरे म्हणजे पेशवे कायम अंगरखा सुरवार वगैरे घालूनच रहायचे का, झोपतानाही असेच कपडे घालून झोपायचे का, असे प्रश्न पडले.

ते माधवरावाना अटक करतात, त्याची लिंक नाहीच का दाखवली. मी जरा किचनमध्ये गेले त्यामुळे मला वाटलं, माझं हुकलं ते. ह्म्म्म. मग त्रोटकच झाला तो प्रसंग.

ते प्रसाद ओकचं काही कळलंच नाही, माधवरावांवर वार करतो, त्याला पाण्यात पाहतो आणि शेवटी त्यांचा अंत होताना का रडतो? त्याला तेच हवं असतं ना.

आणखी एक, आनंदिबाई रघुनाथरावांना वाटणी मागायला सांगते. पण ते वाटणी मागताना दाखवले नाहीत. मग असे प्रसंग चित्रपटात का आहेत ते कळत नाहीत.

Lol पूनम.

आवडला ग रमा-माधव मला आणि आमचे जावईबापू होतेना त्यात 'रामशास्त्री प्रभुणे' म्हणून, मला पाहिचाच होता पण मधेच कामं चालू होती किचनमध्ये म्हणून मला वाटलं माझं हुकलं असेल काही बघायचं.

चुकुन चार फोटो झालेत. सांभाळुन घ्या.) >>> नो वरीज. पासपोर्ट साईज काढले असतील तिने.

फा Happy

पासपोर्ट साइझ फोटो Happy
म्हणजे टोपी खरीच आहे.उगीच बिचार्‍या अश्राप सलीभ ला नावं ठेवली.
त्या काळी क्रॉस मॅचिंग ची फॅशन असावी. मस्तानी चे कानातले बदामी नसून लाल आहेत.

रमा-माधव मधे कन्टीन्युटिचा काहि पत्ताच नाही, सीन टु सीन मुव्ह होते कथानक, आधी काय चाललय याचा काही पत्ताच लागत नाही, माधव च काम छान केलेय आलोकने , रमा ठिकठाक, बाकी ज्वेलरी,कपडे अगदी ऑम्थिटिक आहे..... सलिभ ने निदान त्यासाठी बघायचा होता सिनेमा..

बाजिराब मस्तानी च्या एका फोटोत रणविरला चक्क हिरवी पगडी दिलिय, पेशवेकालिन पगडि लालच असाय्ची ना!?

क्लास्मेटस चान्गलाय,

च्यायला सलिभ कडून लोकं ऑथेंटिसितीची का अपेक्षा करतायत कुणास ठाऊक. त्याने कधी म्हटलेय का मी शाम बेनेगल आहे म्हणून ? आं?

अहो श्णेम्याटिक लिबर्टीच लिबर्टी ,,,मौजा ही मौजा.

प्राजक्ता,

बाकी ज्वेलरी,कपडे अगदी ऑम्थिटिक आहे..... सलिभ ने निदान त्यासाठी बघायचा होता सिनेमा..>>>>

आनंदेबाईंची ज्वेलरी बघीतली नाहीस का तू? सध्या तुळशीबागेत सुद्धा मिळते. रमा प्रथम गोपिकाबाईंना भेटते त्या प्रसंगातला पार्वतीबाईंचा शालू वामा किंवा हिंद किंवा कासटमधे घेतलेले वाटतो. यात कणभरही अतिशयोक्ती नाही. आयटम साँग तर एकदम ढिन्चॅक होते. म्हणजे त्याकाळातही कजरारे टाईप ड्रेस होता तर. आता हे सगळं त्या काळातही नव्हतं याचा पुरावा कोणी मागितला तर माझ्याकडे नाही बुवा. पण हे सगळं त्या काळात होतं याचा पुरावाही नाही.
तर असो. विनोद बाजूला ठेवल्यास इतक्या बारकाईनं सगळ्या गोष्टी सिनेमात दाखवण्यासाठी बजेट मोठं हवं. स्वतंत्र रीसर्च टीम हवी. जे मराठी सिनेमांसाठी अवघड आहे. त्यामुळे प्रयत्नासाठी मृणाल कुलकर्णीचं कौतुक आहे.

मल्याळम दृष्यम अप्रतिम आहे हिंदीपेक्षा. मोहनलाल रॉक्स.

अन्जली! बिग बजेट हा अडथळा मृणालला असणारच पण तरिही तिने ऑथेन्टिसिटिच्या जवळ जायचा प्रयत्ना केलाय
(तिनेच ही भुमिका कधीकाळी केल्याने आणी मराठी असल्याने असेल)
भन्साळीला तर बजेटचा काही प्रोब्लेमच नाही तरी डिझानयर साड्या,मन्गळसुत्र घातलेल्या काशिबाई?

अंजली,
सवाई माधवरावांच्या काळातल्या दागिन्यांच्या याद्या उपलब्ध आहेत. म. वि. सोवनी यांच्या पुस्तकांमध्ये दागिने, वस्त्र यांबद्दल उत्तम माहिती आहे. आज जरी ते दागिने तुळशीबागेत मिळत असले, तरी माझ्या माहितीप्रमाणे दागिन्यांच्या बाबतीत दिग्दर्शिकेने बरीच काळजी घेतली आहे. बाबासाहेब पुरंदर्‍यांनीही अनेकदा स्वतः याबाबतीत लक्ष घातलं आहे.

Pages