Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुनम हो ऐतबार, नाईस मुवी. तो
पुनम हो ऐतबार, नाईस मुवी. तो ज्या इंग्लिश मुवीवरुन केलाय, ती मुवीपण थोडी बघितली (तीच का डायल एम फॉर मर्डर?). नाव आठवत नाही मला पण ते ती तिला मारायला आलेला असतो तो टेलीफोन शॉट सेम टू सेम होता. पुर्ण बघता आला नाही, लाईट गेले होते नंतर. स्टार मुवीजला होता बहुतेक.
ऐतबार म्हटलं की ’किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ ही गजल पहीली आठवते.
’किसी नजर को तेरा इंतजार आज
’किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ ही गजल याच सिनेमात आहे. डिंपल इतकी सुरेख दिसली आहे की बास! >>>>>>> दोन्हीला अनुमोदन. त्यामुळेच हे बघताना हे गाणं डिंपलच्या तोंडी शोभत नाही.
ऐतबार मध्ये 'आवाज दी है' हे
ऐतबार मध्ये 'आवाज दी है' हे अजून एक सुंदर गाणे आहे. संगीत भप्पीदांचे आहे हे सांगूनही खरे वाटले नव्हते मला.
नव्या काळातले चालणार असतील तर
नव्या काळातले चालणार असतील तर मनोरमा सिक्स फीट... फार जबरी सिनेमा आहे.
हा कधी आलेला ?
हा कधी आलेला ?
खामोशबद्दल +१ एक ऋषी कपूर,
खामोशबद्दल +१
एक ऋषी कपूर, किमी काटकर (हो!), नसीरुद्दीन, डॅनी यांचा 'खोज' म्हणून सिनेमा आला होता, मिस्टरी कॅटेगरीत चांगला होता.
नकाब नावाचा एक सिनेमा आला
नकाब नावाचा एक सिनेमा आला होता. अर्जून राजपाल होता त्यात, त्याच कथेवर पुर्वीच लव्ह बर्ड नावाचे नाटक आले होते., दोन्हीतला सस्पेन्स जबरदस्त आहे. ( पण मूळ कल्पना परकीय होती )
पूनम... मला वाटते पुर्वीच्या
पूनम... मला वाटते पुर्वीच्या फिल्म्स अनेकवेळा हाताळताना, मधले फिल्मचे तूकडे जळाले, कापले गेले असे झाले असणार. त्यावेळी दुसरे माध्यम नव्हतेच. मी पण परत कधीतरी एखादी जूनी फिल्म बघतो त्यावेळी जाणवते हे.
हल्लीच, धोबीघाट बघितला ( पुर्वीचा बाँबे डायरी ) त्यातही हे जाणवले. मेरा नाम जोकर मधली दोन गाणीच नव्हे तर दोन ( तसले) सीन्सही कापले गेलेत. ममता, मधली रागमालिका आता नाही दाखवत.
उर्मिला, मनोज बाजपेयीचा कौन
उर्मिला, मनोज बाजपेयीचा कौन पण चांगला सस्पेन्स थ्रिलर होता, पण तोपर्यंत असल्या सस्पेन्सची सवय झाली होती. काजोलचा गुप्त ही तसाच.
तिसरी मंझील बद्दल ऐकलेली एक
तिसरी मंझील बद्दल ऐकलेली एक आठवणः माझ्या मित्राचे वडिल त्यावेळी कॉलेज मधे होते आणी मित्रांबरोबर फर्स्ट डे-सेकंड शो ला गेले होते. सिनेमा सुरू होऊन १० मिनिटं झाली असतील-नसतील, कुणीतरी दाराच्या त्या काळ्या पडद्यातून डोकं आत घातलं, जोरात 'प्रेमनाथ खुनी आहे रे', असं ओरडलं आणी पळून गेलं.
नकाबमधे बॉबी देओल आणि अक्षय
नकाबमधे बॉबी देओल आणि अक्षय खन्ना होते. अर्जून रामपाल कुठे होता?
एक जबरदस्त सस्पेन्स सिनेमा
एक जबरदस्त सस्पेन्स सिनेमा आहे, इतका की त्याच्याबद्दल अद्याप कुणालाच काही माहीत नाही.
इथे का लिहीत आहात सगळे?
इथे का लिहीत आहात सगळे? रहस्यमय चित्रपटांचा नवा बाफ काढा की. तिथे डॉक्युमेंटेशेन होईल. शोधायला बरे पडेल.
कहर आहे.... मिक्सरवर का
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/57158#comment-3763394
कृपया वरच्या धाग्यावर रहस्यमय चित्रपटांविषयी लिहा.
मनोरमा मस्तच.. मला सुद्धा
मनोरमा मस्तच..
मला सुद्धा आवडला खुप..
आत्ता मातृभुमी पाहिला.. खुप अंगावर येतो ..
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/33448
इथे आहे सगळे
वझीर पहिला , मस्त आहे थोडा
वझीर पहिला , मस्त आहे थोडा predictable आहे.
टीना मीही काही माहीत नसतांना
टीना मीही काही माहीत नसतांना मातृभुमी बघायला घेतला, सुरुवातीलाच नको नको अस झाल.

अदिति, मला एकंदर आयडीया
अदिति,
मला एकंदर आयडीया होती..प्रोमो बघीतला होता कधी काळी कि एकीच लगिन पाचांसोबत लावून देतात ते..पण बघताना खरच खुप कसतरी वाटत..
असाच एक भाग सावधान इंडीया मधे दाखविला होता.. त्यात त्या मुलीच लग्न दोन भावांसोबत लावुन देतात.. त्यातला एक चांगला एक वांगला..सासरा सुद्धा तिच्यावर डोळा ठेवुन असतो असे..चांगल्याला मारुन टाकतात अन मग ती सासरा आणि वांगल्यामधे फाटे फोडून दोघांनाही गोत्यात आणते असे.. खरी गोष्ट असेल तर ठिके पण चित्रपटावरुन उचललेली असेल तर कठीणे शिरेल बनवणार्यांच..असो..
मातृभूमी भयंकर चित्रपट आहे.
मातृभूमी भयंकर चित्रपट आहे. तो तितका भयंकर रियॅलिटी अंगावर येण्यासाठी मुद्दाम बनवला असावा.
Ankur Arora Murder Case |
Ankur Arora Murder Case | Hindi full Movies | Kay Kay Menon | Paoli Dam | Arjun Mathur
https://www.youtube.com/watch?v=uiP8GwSFHbo
आताच पाहिला. आवडला.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका लहान मुलाचा गेलेला जीव .. त्याविरुद्ध लढा..
इथे डॉक्टरांच्या वैद्यकीय चातुर्यकथा ज्यांना वाचायला आवडतात त्यांना हा आवडेल अशी आशा, कोणी बघितला नसेल तर बघा, वेळ फुकट गेला असे वाटणार नाही. सर्वांचा अभिनय उत्तम
आज कॉफी आणि बरंच काही,
आज कॉफी आणि बरंच काही, बघितला. फार गोड मूवी आहे. अगदी तरल वाटला.
वर कोणीतरी Manorama Six Feet
वर कोणीतरी Manorama Six Feet Under चा उल्लेख केलेला... बरेच दिवस ऐकून होतो.. लगे हाथ तो देखील बघितला.. तो देखील आवडला.
धागा चुकला...
धागा चुकला...
मनोरमा पाहिला. ठीक ठाक
मनोरमा पाहिला. ठीक ठाक आहे.
अनबिलिव्हेबल मर्डर नावाचा सिनेमा आहे. तो पण पाहिला.
एका बंद खोलीत एका म्हाता-या ख्रिश्चन बाईचा खून होतो. कोकणातलं टिपीकल गाव. त्यातली दोन घरं ख्रिस्ती समाजाची. ज्या खोलीत खून झाला ती आतून बंद. खिडकी आतून बंद. खून होत असताना बाहेर कामगार असतात. दार उघडता येत नसल्याने ते पोलिसांना बोलावतात. एकमेव कॉन्स्टेबल येऊन दार तोडतो. हे सर्व होत असताना आतून कण्हन्याचा आवाज येत असतो. दार तोडून पाहतात तो सर्व संपलेलं. बाहेर यायला जायला रस्ता नाही. पण खूनी गायब आणि कपाटात खून्याचे बूट !
असा प्लॉट असताना रहस्याची उकल कशी होणार ही उत्सुकता होती म्हणूनच सिनेमा पूर्ण पाहू शकलो.
नेहमीच्या मार्गाने जाणारे रहस्यमय सिनेमे पाहून कंटाळा आला म्हणून कहानी आवडला होता. रहस्यभेद हा अत्यंत कंटाळवाणा असतो. त्याची उकल झाल्यावर तो मनोरंजक वाटू लागतो या सूत्रावर हा सिनेमा आहे. मेन स्ट्रीममधला नाही , रहस्य गडद आहे पण ग्लॅमरस नाही या सगळ्या जमेच्या बाजू असताना सिनेम्याची हाताळणी जराही मनोरंजक नाही त्यामुळे जांभया येतात. दूरदर्शनवरची टीव्ही सीरीयल असावी अशी. खरं म्हणजे चार पाच हौशी लोकांनी आपण या पेक्षा चांगले सिनेमे बनवू शकतो या जिद्दीने सिनेमा बनवल्यासारखा वाटतो. पण एक आहे , विषयाशी प्रामाणिक आहे. एकही गाणे नाही की भरीचे प्रसंग नाहीत.
रहस्याची उकल होताना अनेक कच्चे दुवे दिसू लागतात. हा सिनेमा पहा म्हणून सांगणार नाही तरीही पुढचे विवेचन वाचण्याआधी स्पॉयलर अॅलर्ट देऊन ठेवतो.
इथून पुढे रहस्यभेद होऊ शकत असल्याने आपल्या जबाबदारीवर पुढे वाचावे.
जिचा खून झालाय तिची कथा संबंधितांच्या चौकशीतून पुढे येत राहते. चौकशी करणारा दाखवलाच नाही. त्याचा फक्त आवाज ऐकू येतो. हा एक नवीन प्रकार आहे. पोलीसांनी नोकरानीला अटक केलेली असते. पण त्यांच्या तपासाला दिशाच नसते हे जाणवते.
खूनाचे कारण हा सर्वात कच्चा दुवा आहे. जिचा खून झालाय ती आत्ता वृद्ध आहे. ती तरूण असता ना तिच्यावर बलात्कार झाला होता. तेव्हां बलात्कार करणारा आता वृद्ध असायला हवा. पण तो पोरगेलासा दिसत राहतो. खूनाची उकल ही ओढून ताणून केलेली.
एक चांगला सिनेमा बनता बनता फसला याचं आपणास वाईट वाटत राहतं.
आता हा पाहिला, हा सुद्धा
आता हा पाहिला, हा सुद्धा आवडला.
Deadline: Sirf 24 Ghante {HD} - Irfan Khan - Konkana Sen Sharma - Hindi Full Movie
https://www.youtube.com/watch?v=Xd7RmBN5YWo
नकाब नाही का ? मग काय नाव
नकाब नाही का ? मग काय नाव होते त्याचे ?
अर्जून रामपालला अपघात होतो. चेहरा विद्रुप होतो, डॉक्टर खुप प्रयत्नाने त्याला चेहरा मिळवून देतात. बायको त्याला पुर्वीच्या स्मृती आठवून देते... पण पुढे सगळाच घोळ आहे. शेवटी उकलही छान आहे.
नकाब नाही का ? मग काय नाव
नकाब नाही का ? मग काय नाव होते त्याचे ?<<<<<<<
यकीन...
अनबिलिव्हेबल मर्डर लिन्क
अनबिलिव्हेबल मर्डर लिन्क मिळेल का ? कुठे पाहिला
Pages